पीएम वाणी योजना 2024 | PM Wani Yojana: फ्री वाय-फाय योजना लाभ, रजिस्ट्रेशन संपूर्ण माहिती मराठी

PM WANI Yojana 2024 संपूर्ण माहिती मराठी | PM Wani Yojana online apply 2024 | पीएम वाणी फ्री  वाय-फाय योजना रजिस्ट्रेशन | PM Wani Yojana Registration | PM Wani Business Plan | PM Wani Yojana Application Form | पीएम वाणी योजना | फ्री वाय-फाय योजना 

पीएम वाणी योजना 2024: इंटरनेट किंवा ब्रॉडबँड हा शब्द आता जगातील लोकांना म्हणजेच जसे विकसित देशांमधील जनतेला इंटरनेट संबंधित संपूर्ण माहिती आहे, तसेच आता इंटरनेट हा फक्त तांत्रिक शब्द न राहता तो सर्व जगातील लोकांची गरज बनला आहे, आधीच्या काळात माहिती तंत्रज्ञान इतके प्रगतीशील नसल्या मुळे माहितीची आदानप्रदान करण्यासाठी एक निश्चित कालावधी लागत होता, संपूर्ण जगात इंटरनेट म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाने वेगाने प्रगती केली असल्याने, संपूर्ण जगात माहितीची देवाण घेवाण अत्यंत वेगाने होत असते. इंटरनेट मुळे जगातील कोणतीही माहिती आणि व्यवहार करणे अत्यंत जलद झाले आहे. संपूर्ण जगातील सरकारांनी या गोष्टीचे महत्व जाणले आहे, त्याचे दूरगामी परिणाम ओळखले आहे, त्यामुळे ब्रॉडबँड नेटवर्क्स दूर-दूर च्या भागात तसेच जगातील प्रत्येक भागात स्थपीत केले जात आहे.

पीएम वाणी योजना 2024: देशात इंटरनेट नेटवर्क्सचा वापर शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचप्रमाणे देशातील ग्रामीण भागात सुद्धा इंटरनेटचा वापर धीरे-धीरे वाढत आहे, एका ताज्या सर्वेक्षणा नुसार ग्रामीण भागामध्ये इंटरनेट घनता 100 वापरकर्त्यांच्या मागे 38 इतकी आहे, इंटरनेट हे मध्यम ग्रामीण भागातील साक्षरता तसेच आर्थिक विकास यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरत आहे. आणि ग्रामीण भागातील आर्थिक सुधारणेसाठी हे आवश्यक सुद्धा आहे, या माध्यमाने हे विकासाचे अंतर भरून निघण्यास मदत होईल.

या सर्व महत्वपूर्ण बाबींचा विचार करून केंद्र सरकारने संपूर्ण देशांतर्गत नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी 2018 चे ध्येय साध्य करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे एक मजबूत डिजिटल कम्युनिकेशन व्यवस्था निर्माण करण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 9 डिसेंबर 2020 च्या बैठकीत  वाय-फाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस (पीएम वाणी) फ्रेमवर्क अंतर्गत सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कसाठी दूरसंचार विभागाच्या (DoD) ब्रॉडबँडच्या माध्यमातून प्रसार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. वाचक मित्रहो आपण या लेखामध्ये पीएम वाणी योजना 2022 या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे पीएम वाणी योजना काय आहे, या योजनेचे नागरिकांना काय लाभ आहेत, महत्वाचे कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया तरी हा लेख संपूर्ण वाचावा.

Table of Contents

पीएम वाणी योजना 2024 संपूर्ण माहिती मराठी

मित्रांनो प्रधानमंत्री वाय-फाय ऍक्सेस नेटवर्क इनिशिएटिव्ह (पीएम वाणी योजना ) या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी केली, या योजनेच्या माध्यमातून डिजिटल संप्रेषण संधी निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय कम्युनिकेशन डिजिटल धोरण 2018 (NDCP)चे संपूर्ण ध्येय गाठण्यासाठी. पीएम वाणी योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व सार्वजनिक ठकाणी वाय-फाय इंटरनेट ची सुविधा सरकार कडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत हि सुविधा संपूर्णपणे मोफत असेल, हि योजना ब्रॉडबॅंड आणि इंटरनेट च्या माध्यमातून देशात मोती क्रांती घडवून आणणार आहे. या योजनेमध्ये छोटे दुकानदार, व्यावसायी, छोट्या आस्थापनां या योजनेच्या अंतर्गत व्यवसाय करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल व त्यांना या योजनेच्या अंतर्गत वाय-फाय प्रदाता बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल, जेणेकरून प्रत्येक वापरकर्त्या पर्यंत इंटरनेटची सुविधा पोहचू शकेल. या साठी या छोट्या व्यावसायिकांना कोणतेही रजिस्ट्रेशन किंवा परवाना यांची आवश्यकता भासणार नाही.

पीएम वाणी योजना 2024
PM Wani Yojana

या योजनेच्या या धोरणामुळे ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल आणि छोट्या व्यवसायांना अधिक चालना मिळेल, त्यामुळे सहजच रोजगाराच्या संधीही वाढण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री वाय-फाय ऍक्सेस नेटवर्क इनिशिएटिव्ह (पीएम वाणी योजना) उत्तराखंडची राजधानी देहरादून इथे शुक्रावार 5 ऑगस्ट रोजी सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत आता डेहराडूनच्या रेशनदुकानात अन्नधान्या बरोबर वाय-फाय इंटरनेट ची सविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. पीएम वाणी योजनेच्या माध्यमातून देशात वायरलेस इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढविण्याचा शासनाचा उद्देश्य आहे.

                        जेष्ठ नागरिक मोफत बस प्रवास योजना 

वाय-फाय काय आहे (पीएम वाणी योजना)

वाय-फाय हे एक वायरलेस नेट्वर्किंग तंत्रज्ञान आहे जे संगणक (लॅपटॉप आणि डेस्कटॉप) किंवा मोबाइल (स्मार्टफोन आणि वेअरेबल) उपकरणे जोडते आणि त्याचबरोबर (प्रिंटर आणि व्हिडीओ) या सर्व उपकरणांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्याचे काम करते. ज्यावेळी एखादा व्यक्ती इंटरनेटचा उपयोग करतो त्यावेळी हि इंटरनेट कनेक्टिव्हिटी मोडेम किंवा राउटर या उपकरणाच्या माध्यमातून होते, वाय-फाय कनेक्टिव्हिटीने दोन दशकांच्या कालावधीत जगाची कार्यपद्धती आणि संप्रेषणाची पद्धत बदलली आहे, इलेक्ट्रिकल आणि 802.11n वर आधारित वाय-फाय तंत्रज्ञानामध्ये, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सचे वायरलेस कम्युनिकेशन मानक (IEEE) यामध्ये सतत सुधारणा होत आहे, आणि त्याचा परिणाम प्रत्येक पिढीमध्ये विविध प्रकारचे वातावरण आणि विविध प्रकारचे लोक निर्माण झाले आहे. आतापर्यंत या उपकरणांनी जलद गती व कमी विलंब आणि चांगला वापरकर्ता अनुभव प्रदान केला आहे.

पीएम वाणी योजना 2024

वाय-फायचा इतिहास :- सन 1999 मध्ये काही दूरदर्शी कंपन्यांनी नवीन वायरलेस नेट्वर्किंग तंत्रज्ञान  वापरून, ब्रांड न बनविता सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करण्याच्या उद्दिष्टांबरोबर एक गैर-लाभकारी संघ बनविण्यासाठी एक नवीन व्यासपीठ निर्माण करण्यात आले. या समूहाने नंतर सन 2000 मध्ये आपल्या टेकनिकल ऑपरेशन्स एक टोपणनाव म्हणून वाय-फाय हा शब्द स्वीकारला. लॅपटॉप स्मार्टफोन आणि टॅब्लेट आणि संगणक या सारख्या अनेक आधुनिक उपकरणांसाठी वायरलेस ब्रॉडबॅंड इंटरनेट प्रवेश प्रदान करण्यासाठी वाय-फाय देखील वापरला जाऊ शकतो, वाय-फाय सक्षम उपकरणे इंटरनेटशी कनेक्ट केल्यावर इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतात वाय-फाय उपलब्ध असलेल्या भागाला हॉट-स्पॉट असेही म्हणतात.

                          महाराष्ट्र सरकारी योजना लिस्ट

PM WANI Yojana Highlights

योजनेचे नाव पीएम वाणी योजना
व्दारा सुरुवात केंद्र सरकार
योजना सुरु करण्याची तारीख 9 डिसेंबर 2020 मध्ये घोषणा
लाभार्थी देशाचे सर्व नागरिक
आधिकारिक वेबसाईट इथे क्लिक करा
उद्देश्य या योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय उपलब्ध करून देणे
श्रेणी सार्वावजनिक वाय-फाय योजना
विभाग दळणवळण मंत्रालय भारत

पीएम वाणी योजना 2024

प्रधानमंत्री वाई-फाय एक्सेस नेटवर्क इंटरफेस (PM-WANI) योजनेवर आधारित 22 राज्यांमधील 2384         वाय-फाय हॉट-स्पॉसह 100 रेल्वे स्थानकांवर सार्वजनिक वाय-फाय सेवांमध्ये प्रवेश प्रदान करण्याचा एक उपक्रम आहे, PM WANI हे देशातील वायफाय क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल आहे, नुकत्याच सुरु झालेल्या पीएम वाणी योजनेंतर्गत, देशात 10 दहा लाख डेटा केंद्रे आणि सार्वजनिक डेटा कार्यालय म्हणजे (PDO) उघडणे, प्रधानमंत्री यांनी या योजनेच्या संबंधित सांगताना म्हटले कि हि योजना आपल्या छोट्या दुकानदारांना वाय-फाय सेवा प्रदाते बनविण्यात सक्षम करेल त्याचबरोबर त्यांची आय वाढण्यास सुद्धा मदत होईल तसेच या योजनेमुळे तरुणांना अबाधित इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल आणि या योजनेच्या माध्यमातून डिजिटल भारत मिशन सुद्धा मजबूत होईल. 

तसेच जागतिक कोविड- 19 महामारीमुळे देशात इंटरनेट उपयोगकर्ते मोठ्याप्रमाणात वाढलेले आहे आणि ते निरंतर वाढत आहे त्यामुळे वाढत असलेल्या ग्राहकांना तीव्र आणि निरंतर वाले ब्रॉडबॅंड सेवा उपलब्ध व्हावेत आणि अशा हि ठिकाणी जिथे 4G मोबाइल सेवा पोहचू शकत नाही. 

पीएम वाणी योजना विजन

पीएम वाणी योजना विजन पीएम वाणी योजना या योजनेचा मुख्य उद्देश्य ओपन आर्किटेक्चर आधारित वायफाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस (वाणी) स्थापित करणे हा आहे या प्रमाणे 

 • या योजनेच्या माध्यमातून कोणतीही कंपनी, सोसायटी, प्रोप्रायटर, गैरलाभकारी संघटन, इत्यादी सहज भुगतानाच्या आधारावर एक सार्वजनिक वायफाय एक्सेस प्वाइंट स्थापित करू शकेल 
 • या योजनेच्या अंतर्गत वापरकर्ते सहजपणे सेवा अनुकूल SSID शोधू शकेल आणि त्याचबरोबर एक क्लिकवर प्रमाणीकरण आणि भुगतान करून एका सेशन मध्ये एक किंवा अनेक उपकरणे जोडू शकतील
 • या योजनेंतर्गत छोट्या व्यवसायिकांना PDO (पब्लिक डेटा ऑफिस) खरीदण्यासाठी तसेच स्वतःची नोंदणी करण्यासाठी त्याचप्रमाणे सेटअप करण्यासाठी आणि ऑपरेट करणे सोपे आणि कमी खर्चाचे असेल व या मध्ये देखभाल करण्याची कोणतीही आवश्यकता नसेल.
 • प्रदाता (पीडीओ प्रदाता, एक्सेस प्वाइंट हार्डवेअर/सॉफ्टवेअर, उपयोगकर्ता प्रमाणीकरण आणि केवायसी प्रदाता, तथा भुगतान प्रदाता) अलग अलग असेल जेणेकरून साइलो आणि क्लोस्ड प्रणालींना समाप्त केल्या जाऊ शकेल. यामुळे अनेक पक्ष एकत्र येऊन मोठ्याप्रमाणावर समावेशन होऊ शकेल. 

                           हाइड्रोजन फ्युल सेल बस 

पीएम वाणी फ्रेमवर्क म्हणजे काय आहे ?

या योजनेंतर्गत वाणी फ्रेमवर्क मध्ये सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट प्रदात्यांच्या माध्यमातून ब्रॉडबॅंड सेवा प्रदान करण्याची परिकल्पना करण्यात आली आहे. आणि यामध्ये खालीलप्रमाणे घटक समाविष्ट करण्यात आले आहे.
 • पब्लिक डेटा ऑफिस (पीडीओ जो वाय-फाय नुसार एक्सेस प्वाइंट च्या अनुकूल पीएम वाणीची स्थापना, देखरेख आणि संचालन करतील, आणि इंटरनेट सेवा प्रदात्यांकडून किंवा दूरसंचार प्रदात्यांकडून इंटरनेट बँडविथ प्राप्त करून संपूर्ण उपयोगकर्त्या पर्यंत ब्रॉडबॅंड सेवांना पोहोचविणे आणि प्रत्येक वापरकर्त्या पर्यंत इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणे.

pm wani yojana 2022

 • पब्लिक डेटा ऑफिस एग्रीगेटर (पीडीओए) जो पीडीओ ला एग्रीगेशन सेवांना उपलब्ध करून देईल, ज्यामध्ये प्रमाणीकरण, आणि लेखांकन, जेणेकरून पीडीओ अंतिम उपभोक्त्यांपर्यंत इंटरनेट सेवा प्रदान करू शकतील.
 • अप्लिकेशन प्रदाता : वापरकर्त्यांना नोंदणीकृत करण्यासाठी जवळपास उपलब्ध पीएम वाणी अनुकूल वाय-फाय शोधण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी जेणेकरून वापरकर्ता इंटरनेट सेवांचा उपयोग करू शकतील. त्याचप्रमाणे संभावित ब्रॉडबॅंड उपयोगकर्त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी अप्लिकेशन तयार करतील 
 • सेन्ट्रल रजिस्ट्री :- यांच्या व्दारे अप्लिकेशन प्रदाता आणि पीडीओए व पीडीओ यांचा संपूर्ण तपशील ठेवला जाईल आणि तसेच सेन्ट्रल रजिस्ट्रीचा संपूर्ण तपशील टेलिकॉम विभागाव्दारे ठेवण्यात येईल.

पीएम वाणी योजनेच्या संबंधित शब्दसूची 

PDO Public Data Office
PDOA Public Data Office Aggregator
APP Application – mobile app provisioned as frontend for users to access and connect to the available WiFi hotspots
AP Access points distributed across the city
IP Internet protocol address assigned to all the elements in the architecture
JSON JavaScript Object Notation
URI/URL Uniform Resource Identifier/Locator
CP WiFi Captive Portal
OTP One Time Password
SSID Service Set Identifier
MAC Media Access Control – A globally unique ID/address given to physical network devices.
ACCESS POINT Wireless hardware device that allows other devices to connect over WiFi to a network/Internet.
HOTSPOT A physical location where WiFi Access Point is available for people to connect to Internet

पीएम वाणी योजना 2024: उद्दिष्ट्ये 

 • पीएम वाणी योजना, काही दिवसांपूर्वी भारतभर ब्रॉडबॅंड इंटरनेटच्या प्रसाराला चालना देण्यासाठी भारत सरकारने पंतप्रधान वाय-फाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस (पीएम वाणी) योजना सुरु केली, कनेक्टिव्हिटी पर्यायांना चालना देण्यासाठी आणि डिजिटल ऍक्सेस वाढविण्यासाठी संपूर्ण भारतभर वाय-फाय हॉटस्पॉट मोठ्याप्रमाणात स्थापन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आहे.
 • या उपक्रमात प्रादेशिक किरण आणि सामुदाईक दुकानांव्दारे सार्वजनिक डेटा कार्यालायांव्दारे सामाजिक वाय-फाय नेटवर्क आणि मुख्य बिंदूची स्थापना करण्याची कल्पना आहे, ज्यामध्ये कोणतेही शुल्क, परवाना किंवा नोंदणी समविष्ट होणार नाही.
 • याशियाय ब्रॉडबॅंड वाय-फाय सेवा उपलब्ध नसलेल्या राहिवाशांपर्यंत पोहचण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा एक महत्वपूर्ण उपाय आणि पर्यायी वाजवी उपाय असल्यामुळे तंत्रज्ञानाच्या जगात बदल घडवून आणू शकतो, आणि भारताच्या कानाकोपऱ्यात ब्रॉडबॅंड वाय-फाय सुविधा मोठ्याप्रमाणात वाढवू शकतो.
 • जागतिक कोविड-१९च्या महामारीमुळे भारतातील मोठ्या संख्येने इंटरनेट उपयोगकर्त्यांना तीव्रगती आणि स्थिर ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक झाले आहे, ज्यामध्ये सार्वजनिक वाय-फाय च्या उपयोजानामुळे 4G मोबाइल कव्हरेज नसलेल्या स्थानांचा समावेश आहे.
 • सार्वजनिक वाय फाय व्दारे ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवांचा विस्तार हा डिजिटल इंडिया मोहिमेचा एक उपाय आहे, आणि त्याचा एक महत्वपूर्ण फायदा आहे.
 • सार्वजनिक केलेल्या वायफाय हॉट स्पॉटचा वापर करून ब्रॉडबॅंड ऑनलाइन सेवा वितरीत करण्यासाठी कोणतेही परवाना शुल्क आकारले जाणार नाही, ज्यामुळे भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याच विस्तार आणि प्रवेश सुलभ होईल.
 • पीएम वाणी योजनेचा महत्वपूर्ण उद्देश्य म्हणजे सार्वजनिक वायफायच्या विस्तारामुळे रोजगार निर्माण होण्यास मदत होईल आणि त्यमुळे व्यावसायिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर भारताचा जीडीपी वाढण्यास मदत होईल.

                  अटल बांधकाम कामगार आवास योजना

 

पीएम वाणी योजना 2024: मुख्य वैशिष्ट्ये 

पीएम वाणी योजनेची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत 
 • सार्वजनिक डेटा कार्यालय (पीडीओ) एक पीसीओ या सायबर कॅफेच्या तुलनेत आपल्या ग्राहकांना ब्रॉडबॅंड सर्विसेससाठी फक्त डब्लूएएनआयच्या अनुरूप वायफाय ऍक्सेस पॉईंट कि स्थापना, आणि रखरखाव आणि संचालन करेल, हे पीडीओ स्वतःग्राहकांना इंटरनेट सेवा प्रदान करतील किंवा दुसऱ्या इंटरनेट प्रदात्या कडून लीजच्या माध्यमातून इंटरनेट सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देतील.
 • पीएम वाणी योजनेच्या माध्यामतून एग्रीगेटर्स सार्वजनिक डेटा ऑफिस (पीडीओ) स्थापित केले जातील जे इतर अनेक पीडीओ ऑफिसच्या लेखांकानाचे कार्य करतील.
 • पीएम वाणी या योजनेच्या अंतर्गत अप्लिकेशन प्रदाता वापरकर्त्यांना नोंदणीकृत कारणासाठी अप्लिकेशन विकसित करेल, ज्याच्या माध्यमातून जवळपासच्या पीएम वाणी अनुरूप वायफाय शोधण्यात मदत होईल आणि नोंदणी सुद्धा करता येईल.
 • या योजनेच्या अंतर्गत उपोगकर्ता जो पीडीओच्या निर्देशानुसार इंटरनेटचा वापर करू इच्छितो त्याला ई-केवायसी प्रमाणीकरण केल्यानंतर पीएम वाणी योजनेचा लाभ घेता येईल.
 • पीएम वाणी योजनेंतर्गत व्यवसायांना सुगम करण्यासाठी व स्थानिक दुकानदारांना तथा छोट्या व्यावसायिकांना ब्रॉडबॅंड वाय-फाय प्रदाता बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे जेणेकरून प्रत्येक भागातील वापरकर्त्या पर्यंत वाय फाय सुविधा पोहचविता येईल आणि त्यासाठी वायफाय सुविधा प्रदान करणाऱ्या व्यवसायिकांना कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही तसेच नोंदणी करण्याची आवश्यकता नाही किंवा दूरसंचार विभागाला कोणतेही शुल्क देण्याचीही गरज नाही.
 • या पीएम वाणी योजनेंतर्गत पीडीओए जे प्रत्येक उपयोगकर्त्या पर्यंत इंटरनेट सेवा पोहचविणाऱ्या प्रदात्यांना एग्रीगेट करतील, त्यांनाही कोणत्याही प्रकारच्या परवान्याची आवश्यकता भासणार नाही, यामध्ये पीडीओ ला फक्त नोंदणी करावी लागेल, ज्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसाच्या आत नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
 • या मध्ये पीएम वाणी फ्रेमवर्क अप्लिकेशन प्रदात्यांना सुद्धा प्रोत्साहित केल्या जाईल जे वापरकर्त्यांना नोंदणी कृत आणि प्रमाणीकरणाच्या सेवा प्रदान करतील.
 • पीएम वाणी योजनेंतर्गत उपयोगकर्ता जो सार्वजनिक वाय फाय च्या माध्यमातून ब्रॉडबॅंड सेवांचा लाभ मिळवायचा आहे, त्याला प्रथम संबंधित अप्लिकेशन डाऊनलोड करवी लागेल, आणि त्यानंतर प्रमाणीकरण करावे लागेल, त्यानंतर तो कोणत्याही सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट वरून ब्रॉडबॅंड नेटवर्कचा उपयोग करू शकेल, यामध्ये उपयोगकर्ता ज्यावेळी कोणत्याही सार्वजनिक वाय-फाय हॉट-स्पॉट च्या हद्दीत पोहचेल त्यावेळी त्याच्या मोबाइलवर एप विभिन्न मोबाइल नेटवर्क प्रदर्शित करेल ज्यामधून उपयोगकर्ता आपल्या पसंतीचे नेटवर्क निवडून उपयोग करू शकेल.
 • या योजनेंतर्गत असे अपेक्षित केल्या जात आहे कि सार्वजनिक वाय फाय ब्रॉडबॅंड सेवेच्या उपयोगाने उपयोगकर्त्याचा ब्रॉडबॅंडचा अनुभव व त्याची गुणवत्ता यात महत्वपूर्ण सुधार होण्याची शक्यता असेल.
 • या योजने अंतर्गत सार्वजनिक वाय-फाय भारतनेट च्या अंतर्गत बनविले जात आहे जे भारतातील विशेष करून ग्रामीणभागांमध्ये अत्यंत उपयोगी सिध्द होतील, मोठ्याप्रमाणात सार्वजनिक वाय-फाय हॉट-स्पॉट उपलब्ध केल्यामुळे लघु आणि सूक्ष्म व्यवसायिकांसाठी रोजगाराचे अनेक साधन आणि संध्या निर्माण होतील, या माध्यमातून त्यांच्या साठी एक अतिरिक्त कमाईचा स्त्रोत निर्माण होईल.
 • या योजनेच्या अंतर्गत दूरसंचार आणि इंटरनेट प्रदात्यांना सुद्धा पीडीओंना बँडविथ विकून लाभ प्राप्त होईल 

पीएम वाणी योजना 2024 :लाभ

पीएम वाणी योजनेची काही लाभ खालीलप्रमाणे असतील

 • वाढणारे इंटरनेट वापरकर्ते : पीएम वाणी योजनेमुळे जलद गतीने इंटरनेट वापरकर्ता वाढतील जे फक्त केवळ मनोरंजनासाठीच नव्हे तर शिक्षण प्रसारासाठी तसेच आरोग्य सेवांसाठी आणि शेती संबंधित विकासासाठी, या इंटरनेट उपयोगकर्त्यांची संख्या वाढेल, इंटरनेट वापरकर्त्यांची हि नवीन वाढलेली संख्या परस्परसंवाद आणि पारदर्शिता निर्माण करेल.
 • या इंटरनेटच्या माध्यमात 5G सारखे आगामी मोबाइल तंत्रज्ञान उत्कृष्ट दर्जाची डेटा सेवा देऊ शकतात, परंतु या नवीन तंत्रज्ञानात अलीकडील स्पेक्ट्रम व मानक ग्राहक खर्च आणि कनेक्टिव्हिटी साधनांमध्ये प्रचंड गुंतबणूक करावी लागेल.
 • पीएम वाणीच्या मदतीने भारत सरकार नोकरशाहीच्या पातळीच्या पलीकडे जाऊन शुल्क आणि खर्च काढून टाकण्याची योजना आखत आहे, यामुळे किराणा दुकान मालकाला ऑनलाइन नोंदणी करणे सुविधापूर्ण होऊ शकते, तसेच या योजनेच्या माध्यमातून एक सेवादाता म्हणून प्लॅटफॉर्म आणि अनपेक्षित उत्पन्नाच्या शक्यता उघडणे.
 • पीएम वाणी योजनेच्या अंतर्गत भारताचे आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने आणखी एक मजबूत पावूल आह, या योजना नीतीच्या अंतर्गत एक करोड पब्लिक डेटा क्रिएशन सेंटरांना वाय-फाय ब्रॉडबॅंड सेवा प्रदान करण्यासाठी सक्षम करण्याची योजना आहे. पीएम वाणी योजनेच्या अंतर्गत वर्ष 2021 च्या शेवटापर्यंत दोन मिलियन हॉटस्पॉट स्थापित करण्याचा सरकारचा उद्देश्य आहे. ब्रॉडबॅंडचा प्रसार हा आर्थिक विकासासाठी महत्वपूर्ण इंजन आहे.
 • पीएम वाणी योजना भारतीय समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि शिक्षा तसेच परस्पर सवांद आणि कार्य करण्याची पद्धती संपूर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवते 
 • या पीएम वाणी योजनेच्या माध्यमातून वाय-फाय सेवा देशातील प्रत्येक वापर्कार्त्यांपर्यंत पोहचल्याने, तो शहरातील असो किंवा ग्रामीण भागातील, यामुळे देशातील प्रत्येक भागात तो शहरी भाग असो किंवा ग्रामीण रोजगाराच्या संधींमध्ये मोठ्याप्रमाणात वृद्धी होण्याची शक्यता आहे.
 • पीएम वाणी योजना 2020 या योजनेचा मुख्य उद्देशांपैकी, एक म्हणजे महानगर तसेच शहर किंवा देशातील ग्रामीणभाग यांच्यातील डिजिटल अंतर कमी करणे. या योजनेच्या आणखी उद्देशांपैकी म्हणजे भारतातील नागरिकांना, इंटरनेट वापरकर्त्यांना कमी लगत वर चांगली वैकल्पिक डेटा सुविधा उपलब्ध करून देणे.
 • या योजनेच्या अंमलबजावणी देशात मोठ्याप्रमाणात इंटरनेट वापरकर्ते वाढण्यास मदत होईल जे फक्त इंटरनेट मनोरंजनासाठीच नव्हे तर त्याचा उपयोग शिक्षणा मध्ये, तसेच आरोग्य सुविधांमध्ये त्याबरोबर  शेती संबंधित सुद्धा मोठ्याप्रमाणात इंटरनेटचा उपयोग होईल.

पीएम वाणी योजना अंमलबजावणी प्रक्रिया

 • या पीएम वाणी वाय-फाय नेटवर्क मध्ये प्रवेश घेण्यासाठी वापरकर्त्यांना जे मोबाइलचा वापर करतात त्यांना गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध असलेले ”वाय डॉट” हे अप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल, जे C-DOT च्या समन्वयाने विकसित करण्यात आले आहे.
 • हि पीएम वाणी योजना तीन स्तरिय प्रणालीवर आधारित आहे, ज्याव्दारे देशातील 130 करोड नागरिकांना वाय-फाय व्दारे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल.
 • या योजनेच्या अंतर्गत टियर एक मध्ये व्यावसयिक, एअरटेल, जीओ किंवा इतर कोणत्याही नेटवर्कसाठी इंटरनेट सुविधा घेवू शकतात, तसेच त्यांच्यासाठी जवळपासची वाय-फाय सुविधा सुद्धा उपलब्ध असेल.
 • तसेच टियर दोन मध्ये पब्लिक डेटा ऑफिस जो देशातील प्रत्येक इंटरनेट उपयोगकर्त्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करेल.
 • यानंतर या योजनेच्या शेवटच्या चरणात सामान्य नागरिक एक अप्लिकेशनच्या माध्यमातून या इंटरनेट सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

पीएम वाणी योजना इंटरनेटच्या जगात काय बदल घडवेल ?

 • UPI ने मानक पेमेंट मॉडल बनविले आहे ज्याचा उपयोग नागरिकांना त्यांच्या पसंतीचे पेमेंट गेटवे निवडण्यास तसेच त्यांना ऑनलाइन पेमेंटसाठी बँक निवडण्यास मदत होईल 
 • या योजनेमुळे उपयोगकर्त्यांना चांगली सुविधा कमी खर्चात उपलब्ध होईल त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल 
 • पीएम वाणी योजनेमुळे, तुम्ही कोणाची इंटरनेट वाय फाय सेवा वापरता त्याचप्रमाणे तुम्हाला इंटरनेट सेवांसाठी कोणाला पैसे द्यायचे आहे या सर्व बाबतीत तुम्ही मुक्त असाल 
 • हि योजना व्यवसायिकांना प्रमाणीकरण, प्रवेश आणि लेखांकन या तत्वांवर बनलेल्या प्रत्येक इंटरनेट वाय फाय उपयोगकर्त्यांना जोडण्यात मदत करेल 
 • या योजनेच्या अंतर्गत ऑनलाइन वापरकर्त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी मजबूत पायाभूत ओळख सुविधा आधार आणि डिजिटल फॉर्म निर्माण करण्यात येईल.
 • योजनेच्या अंतर्गत हे आर्किटेक्चर पुढे प्रमुख डेटा प्रमाण आणि प्रमुख केवायसी उपलब्ध करून देईल जे ऑनलाइन वापरकर्ते देशभरात कुठेही सहजपणे उपयोगात आणू शकतील.
 • या योजनेमुळे जगभारतील इंटरनेट वाय फाय वापरकर्त्यांना त्यांच्या घरगुती इंटरनेट रोमिंगवर जास्त खर्च करण्यापेक्षा भारतातील इंटरनेट सुविधेचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहित करेल.

पीएम वाणी योजना काही अटी आणि नियम

 • पीडीओ ला वापर्कार्त्यांचा डेटा एक वर्षासाठी साठवून ठेवणे आवश्यक आहे, सुधारित तरतुदींचे पालन सुनिश्चित करण्यासाठी शक्य तितक्या तरतुदी करण्यात येईल 
 • अॅप प्रदात्यांना आणि पीडीओ व्दारा वापरकर्त्यांच्या गोपनियतिचे संरक्षण करण्यासाठी डेटा सुरक्षा सुनिश्चित केल्या जाईल, तसेह संपूर्ण वापरकर्ता डेटा आणि उपयोग संबंधित लॉग भारतातच ठेवल्या जाईल.
 • अॅप प्रदाता, PDOA आणि केंद्रीय नोंदणी प्रदाता राज्य नोंदणी अटींच्या अधीन असेल, त्यामुळे ज्या पक्षाला सेवा प्रदान केली जाते, त्या पक्षासंबंधित कोणत्याही माहितीची गोपनीयता, आणि वापर्कात्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले पाउल उचलेल.  

पीएम वाणी योजनेंतर्गत संपूर्ण देशात पीडीओ उघडले जाणार 

प्रधानमंत्री वायफाय योजना 2022 अंतर्गत, संपूर्ण देशभरात इंटरनेट वायफाय ब्रॉडबॅंड सुविधा देण्यासाठी सार्वजनिक डेटा कार्यालये स्थापन केली जाणार आहे, कारण प्रधानमंत्री यांनी हि योजना सुरु करण्यामागे त्यांचा हेतू स्पष्ट केला आहे, कि संपूर्ण देशात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना वायफाय इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे, जेणेकरून देशभरातील सर्व नागरिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीशी कनेक्ट होऊ शकतील आणि जगभरातील ऑनलाइन सुविधांचा लाभ घेऊ शकतील, यासाठी हि सार्वजनिक डेटा कार्यालये नगरीकांना सार्वजनिक वाय फाय सुविधा उपलब्ध करू शकतील, त्यामुळे या सार्वजनिक डेटा कार्यालयांना स्थापित करण्याचे काम जलद गतीने सुरु झाले आहे 

देशातील रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे 

भारतीय प्रवाशांना वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने प्रयत्नशील असते, यामुळे प्रवाशांना प्रवास करतांना वायफायची सुविधा मिळावी म्हणून भारतीय रेल्वेने अनेक रेल्वे स्थानकांवर वाय फाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या रेल्वे स्थानकांना वाय-फायने जोडण्याचे काम पीएम वाणी योजना अंतर्गत केले जात आहे. या संपूर्ण कामात रेल्वे मदत करीत आहे, त्यामुळे पीएम योजनेंतर्गत लवकरच देशातील सर्वच रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये सध्या देशातील 22 राज्यांमध्ये 100 रेल्वे स्थानकांवर या योजनेच्या अंतर्गत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिल्या गेली आहे. या सर्व रेल्वे स्थानकांपैकी 71 रेल्वे स्थानक A1 आणि 29 रेल्वे स्थानक A श्रेणींचे आहेत.

या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मोफत या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या मोबाइल मध्ये WI DOT हि अप्लिकेशन डाऊनलोड करावी लागेल, या नंतर अॅप उघडल्यावर, तुम्हाला railwaire service set identifier निवडावा लागेल, यानंतर तुमचा मोबाइल वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट होईल, या योजनेच्या अंतर्गत देशातील 2000 रेल्वे स्थानकांवर लवकरच वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, या मध्ये 2022 पर्यंत देशातील 1000 रेल्वे स्थानकांवर हि सुविधा उपलब्ध होईल आणि पुढे हि सुविधा देशातील सर्वच रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात येईल.

पीएम वाणी योजनेंतर्गत अर्ज कस करावा ?

मित्रांनो तुम्हाला जर पीएम वाणी योजनेमध्ये, या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर किंवा अर्ज करण्याचा असेल तर तुम्हाला काही कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागेल, कारण हि योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे, त्यामुळे पीएम वाणी योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून लवकरच जाहीर करण्यात येईल, तसेच पीएम वाणी योजनेंतर्गत शासनाकडून अर्ज प्रक्रिया सुरु होताच आम्ही या लेखाच्या माध्यमातून अपडेट्स करू.

                        पीएम वाणी योजना माहिती PDF 

पीएम वाणी योजनेच्या अंतर्गत भारत सरकारचा उद्देश्य आहे कि देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत तो शहरी असो वा ग्रामीणभाग किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासी त्यांच्या पर्यंत एक स्थिर आणि निरंतर इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे, तसेच वेगवेगळ्या प्रदात्यांव्दारे सर्व हॉटस्पॉट इंटरनेट सेवांचा एक साधा आणि निरंतर अनुभव प्रदान करण्यासाठी प्रवेश बिंदू प्रमाणीकरण भुगतान आणि लेखांकन हि प्रक्रिया एक्सेस प्वाइंटवर प्रचीलीत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर पासून वेगळे करावे लागेल, जेणेकरून छोट्या दुकानदारांना आणि लहान व्यवसायिकांना एक वाय-फाय एक्सेस प्वाइंट स्थापित करणे आणि त्याचा रखरखाव करण्याची परवानगी मिळेल. तसेच उपकरण विनिर्माण कंपन्या, आईएसपी/दूरसंचार कंपन्या, आणि उपभोक्ता इंटरनेट कंपन्या सार्वजनिक डेटा ऑफिस (PDO) स्थापन करण्यासाठी लागणारे इतर साहित्य प्रदान करू शकतील.

या पीएम वाणी योजनेमुळे बाजारात व्यवसायिकांची आणि उपयोग्कार्त्यांची एक नवीन पिढी निर्माण होईल, जे प्रत्येक वापर्कार्त्यांची इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यकता पूर्ण करतील. या योजनेमुळे भारतातील लाखो लोकांपर्यंत इंटरनेट कनेक्टिव्हिटीची उपलब्धता सुलभ होईल जे त्याची प्रतीक्षा करत आहे. आपण पीएम वाणी योजना 2022 संबंधित संपूर्ण माहिती पहिली, आपल्याला हि माहिती उपयुक्त वाटली असल्यास आम्हाला अवश्य कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. तसेच सस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट्स मिळत राहील.

पीएम वाणी योजना 2024 FAQ

 Q. पीएम वाणी योजना काय आहे ?

पीएम वाणी योजना या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशात शहरातील किंवा ग्रामीणभागात छोट्या व्यावसायिकांच्या सहाय्याने वाय-फाय एस्क्सेस प्वाइंट स्थापित करून देशातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत इंटरनेट कनेक्टिव्हिटी सहज आणि सुलभतेने उपलब्ध करून देणे, आणि देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देणे, या योजनेच्या अंतर्गत देशातील 22 राज्यांमधील 2,384 वाय-फाय हॉटस्पॉट सह 100 रेल्वे स्थानकांवर सार्वजनिक वाय-फाय सेवा प्रदान करणे.

Q. पीएम वाणी योजनेचे काय लाभ आहेत ?

या योजनेचे देशातील नागरिकांना अनेक फायदे मिळणार आहे, या योजनेमुळे सर्व नागरिकांना स्वस्त आणि स्थिर इंटरनेट सेवा मिळेल त्याचबरोबर छोट्या व्यावसायिकांना अतिरिक्त मिळकत होण्यास मदत होईल तसेच ग्रामीण किंवा शहरी भागातील बेरोजगारी कमी होईल, या योजनेच्या संबंधित अनेक लाभ या लेखात आपल्याला वाचायला मिळेल त्यामुळे लेख संपूर्ण वाचावा.

Q. पीएम वाणी योजनेच्या अंतर्गत PDO होण्यासाठी काय करावे ?

PDO किंवा अप प्रोव्हायडर होण्यासाठी खालीलप्रमाणे सूचनांचे अनुकरण करावे लागेल 

 • सरल संचार इथे नोंदणी करावी लागेल 
 • त्यानंतर सेन्ट्रल रजिस्ट्री मध्ये साईन करावे लागेल 
 • त्यानंतर सेन्ट्रल रजिस्ट्रीमध्ये लॉगीन करणे आणि पुढील गोष्टी करा 
 • प्रमाणीकरणासाठी अर्ज करा 
 • वैध सुरक्षा प्रमाणपत्र जोडा 
 • वाय-फाय हॉटस्पॉट तपशील जोडा 
 • PM वाणी फ्रेमवर्कनुसार कॅप्टिव्ह पोर्टल आणि प्रमाणीकरण URL जोडा

Q. PM WANI फ्रेमवर्क अंतर्गत कोणत्या सेवांना परवानगी आहे ?

पीएम वाणी योजनेच्या अंतर्गत वाणी अनुरूप वाय-फाय हॉटस्पॉट वरील सर्व ब्रॉडबॅंड सेवांना परवानगी आहे. 

Leave a Comment