MHT CET Result 2022 Maharashtra : महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट चा परिणाम आज होणार जाहीर, तुम्ही अशा प्रकारे तपासू शकाल

MHT CET Result live 2022 at cetcell.mahacet.org | MHT CET PCM & PCB Result 2022 | महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा निकाल 2022 माहिती मराठी | MAH CET Result 2022 check

MHT CET Result महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट परिणाम नुकताच जाहीर केला आहे, फिजिक्स, केमेस्ट्री, गणित (PCM) आणि फिजिक्स, केमेस्ट्री, व बायोलॉजी (PCB या ग्रुपचे परिणाम (MHT CET Result 2022) संबंधित वेबसाईट वर आपल्याला पाहता येईल (cetcell.mahacet.org) या परीक्षेच्या संबंधित सर्व उमेदवार या वेबसाईटवर जाऊन परिणाम पाहू शकतील, या परीणामांबरोबर (सीईटी निकाल 2022) सोबत अंतिम उत्तरतालिका सुद्धा प्रसिध्द करण्यात आली आहे. हि परीक्षा (MHT CET 2022) PCM ग्रुप साठी 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट च्या दरम्यान आणि PCB ग्रुप साठी हि परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 च्या दरम्यान घेण्यात आली होती.

MHT CET Result 2022 माहिती 

महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा CELL, 28 ऑगस्ट रोजी पीसीएम आणि पीसीबी गटांसाठी पूनर्परिक्षा घेण्यात आली होती. एमएचटी सीईटी 2022 या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना (cetcell.mahacet.org) या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल तपासता येणार आहे आणि त्याचबरोबर डाऊनलोड सुद्धा करता येईल, इंजिनिअरिंग , मेडिकल आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी हि आवश्यक असलेली MHT CET परीक्षा राज्यातील 36 जिल्ह्यांतील 227 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. हि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने 13 दिवसात 25 सत्रांमध्ये घेण्यात आली होती. 

MHT CET Result
MHT CET Result

महाराष्ट्र सीईटी परीक्षा पीसीएम आणि पीसीबी निकाल 15 सप्टेंबर 2022 ला जाहीर झाला. हा निकाल उमेदवारांना या cetcell.mahacet.org अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहता येईल. हा निकाल परीक्षार्थी डाऊनलोड सुद्धा करू शकतील, MHT CET 2022 च निकाल डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक क्रेडेन्शियल्स म्हणजे महाराष्ट्र CET अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख, हा निकाल सायंकाळी पाच वाजता घोषित करण्यात आला आहे.   

  • MHT CET 2022 परीक्षा महाराष्ट्र शासनच्या, सामाईक परीक्षा CELL व्दारे घेण्यात आली ज्याचा परिणाम 15 सप्टेंबर 2022 रोजी घोषित करण्यात आला.
  • MHT CET 2022 या परीक्षेचा परिणाम विद्यार्थी अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट देऊन पाहू शकतील 
  • या परीक्षेत फिजिक्स, केमेस्ट्री, आणि मॅथ्स (PCM) आणि फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) या ग्रुपचे निकाल (MHT CET Result 2022) संबंधित वेबसाईट वर आपल्याला पाहता येईल.
  • या परीणामांबरोबर (सीईटी निकाल 2022) सोबत अंतिम उत्तरतालिका सुद्धा प्रसिध्द करण्यात आली आहे.
  • इंजिनिअरिंग , मेडिकल आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी हि आवश्यक असलेली MHT CET परीक्षा राज्यातील 36 जिल्ह्यांतील 227 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.
  • हि परीक्षा (MHT CET 2022) PCM ग्रुप साठी 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट च्या दरम्यान आणि PCB ग्रुप साठी हि परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 च्या दरम्यान घेण्यात आली होती.
  • महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा CELL, 28 ऑगस्ट रोजी पीसीएम आणि पीसीबी गटांसाठी पूनर्परिक्षा घेण्यात आली होती.

महाराष्ट्र MHT CET 2022 Highlights 

परीक्षेचे नावMHT CET 2022
राज्य महाराष्ट्र
MHT CET 2022 परीक्षेची तारीख PCM ग्रुप साठी 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट च्या दरम्यान आणि PCB ग्रुप साठी हि परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 च्या दरम्यान घेण्यात आली होती.
Result तपासण्यासाठी काय आवश्यक आहे CET अर्क क्रमांक आणि जन्मतारीख
निकाल जाहीर होण्याची वेळ सायंकाळी 5 वाजता
निकाल जाहीर होण्याची तारीख 15 सप्टेंबर 2022
आधिकारिक वेबसाईट cetcell.mahacet.org
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज शुल्क (सर्वसाधारण) 800 (ऑनलाइन)
परीक्षा पातळी राज्यस्तरीय
परीक्षेची पद्धत ऑनलाइन
सहभागी महाविद्यालये सहभागी महाविद्यालये 459
परीक्षेचा कालावधी तीन तास
हेल्पलाईन नंबर 022 – 22016153 / 57/ 59
विभाग State Common Entrance Test Cell, Government of Maharashtra

MHT CET 2022 निकाल कसा तपासाल 

MHT CET 2022 महाराष्ट्र परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी पुढील प्रमाणे अनुसरण करा 
  • सर्वप्र्थम तुम्हाला cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल 
  • यानंतर उघडलेल्या पेजवर तुम्हाला वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • या नंतर या पेजवर विचारलेली संपूर्ण माहिती सबमिट करा 
  • आता तुम्हाला तुमचा निकाल पेजवर दिसेल 
  • भविष्यातील आवश्यकतेसाठी प्रिंट काढून ठेवा  

MHT CET Result 2022 Maharashtra

महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षा सेल, यांनी MHT CET 2022 साठी नॉर्मलायझेशन प्रक्रिया तयार केलेली आहे, यामध्ये CET स्कोअर 0 ते 100 पर्यंत पर्सेटाइल म्हणून घोषित केले आहे, CET 2022 पात्र उमेदवार समुपदेशन प्रक्रियेस उपस्थित राहतील, या समुपदेशन प्रक्रीये मध्ये शासकीय विद्यापीठे, विनानुदानित विद्यापीठे, शासकीय अनुदानित खाजगी विद्यापीठे आणि खाजगी विनानुदानित महाविद्यालये समविष्ट राहतील. एमएचटी सीईटी 2022 च्या परिणामांच्या आधारेच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे, समुपदेशन प्रक्रियेच्या संबंधित माहितीसाठी विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र या अधिकृत वेबसाईटला भेट डेट राहावे लागेल.

MHT CET 2022 महाराष्ट्र या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, या परीक्षेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या संबंधित अधिक माहिती आणि परीक्षेचा परिणाम माहित करून घेण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे वेबसाईटला भेट द्या. यानंतर समुपदेशन प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटला भेट देत राहावे लागेल.

MHT CET परीक्षा माहिती मराठी  

MHT CET फुल फॉर्म म्हणजे महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट, एचएमटी सीईटी हि एक राज्य स्तरीय प्रवेश परीक्षा आहे, जी महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल, महाराष्ट्र सरकार, हा कक्ष दरवर्षी प्रमाणे बीटेक, बी.ई. आणि बी फॉर्म या सारख्या पदवी पूर्व इंजिनिअरींग व फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते, या परीक्षेसाठी पात्रता यासाठी सर्व उमेदवार HSC किवा 12वी परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार किंवा या इयत्ता 12वी च्या समकक्ष परीक्षा, तसेच उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे MHT CET मध्ये प्रवेशासाठी वयाची मर्यादा नाही.    

MHT CET महाराष्ट्र पात्रता निकष

महाराष्ट्र राज्य उमेदवारीचा फक्त एक प्रकार म्हणजे A पासून E पर्यंत दावा करू शकतो

प्रकार A ) 

  • महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेतून एसएससी आणि एचएससी किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा विज्ञान पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार 
  • उमेदवार जो एकतर महाराष्ट्राचा अधिवासी आहे / किंवा महाराष्ट्रात जन्मलेला आहे.   

प्रकार B)

  • असा उमेदवार जो वरील प्रकार A मध्ये येत नाही, परंतु जो किंवा ज्याचे वडील किंवा आई महाराष्ट्र राज्यात अधिवासित आहे आणि त्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र आहे. 

प्रकार C) 

  • उमेदवार जो प्रकार A किंवा प्रकार बी मध्ये येत नाही परंतु ज्याचे वडील किंवा आई भारत सरकारच्या उपक्रमांमध्ये कर्मचारी आहेत आणि ज्याची अंतिम तारखेपूर्वी महाराष्ट्र राज्यात नियुक्ती केली गेली आहे आणि कर्तव्यावर अहवाल दिला गेला आहे, CAP साठी अर्ज सादर करणे.

प्रकार D)

  • जो उमेदवार वरीलपैकी कोणत्याही प्रकारा A, B, आणि C मध्ये येत नाही परंतु ज्याचे वडील किंवा आई महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र शासन उपक्रमांचे कर्मचारी किंवा सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.
प्रकार E)
  • वादग्रस्त महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात असलेल्या आणि ज्यांची मातृभाषा मराठी आहे, अशा मान्यताप्राप्त संस्थेतून एसएससी आणि किंवा एचएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. 
अखिल भारतीय उमेदवार :-
  • भारतीय नागरिकत्व असलेले उमेदवार या श्रेणी अंतर्गत पात्र आहेत 

अल्पसंख्याक उमेदवार :-

  • महाराष्ट्र राज्यातील विशिष्ट भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्यांक समुदायातील उमेदवार आणि सरकारने अधिसूचित केल्यानुसार या श्रेणी अंतर्गत पात्र आहेत. 

MHT CET कायदा परीक्षा परिणाम 2022 

महाराष्ट्र सामाईक परीक्षा सेल, एलएलबी तिसऱ्या आणि एलएलबी पाचव्या वर्षासाठी MHT CET LAW निकाल जाहीर केला आहे, हा परिणाम प्रसिद्ध झाल्यानंतर या परीक्षेला बसलेलेल विध्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेब साईट cetcell.mahacet.org वार जाऊन पाहू शाकतात. या परीक्षेच्या परिणामाचे शेड्युल राज्य CET सेल यांनी 10 सप्टेंबर 2022 ला घोषित केले होते, त्याला अनुसरून MAH CET एलएलबी पाच वर्षे, MAH MCA CET आणि MAH MBA CET च्या परीणामांबरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कोअर कार्ड सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

  • CET सेल महाराष्ट्र ने हि परीक्षा, 2 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट 2022 रोजी, MAH CET एलएलबी पाचव्या वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली होती. या मध्ये काही तांत्रिक कारणांमुळे काही परीक्षा केंद्रांवर हि परीक्षा 27 ऑगस्ट रोजी पुन्हा घेण्यात आली.
  • MHT CET Result महाराष्ट्र प्रवेश परीक्षा सेल च्या माध्यमातून अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर महाराष्ट्र CET एलएलबी 5 वार्षिक निकाल 2022 घोषित करण्यात आला आहे.

MHT CET 2022 निकाल कसा तपासावा

महाराष्ट्र सामाईक परीक्षा सेल, एलएलबी तिसऱ्या आणि एलएलबी पाचव्या वर्षासाठी MHT CET LAW निकाल जाहीर केला आहे, हा निकाल विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर  cetcell.mahacet.org जाऊन पाहू शाकतात. खालीलप्रमाणे प्रक्रिया असेल

  • यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर भेट द्यावी लागेल 
  • या नंतर तीन वर्ष एलएलबी आणि पाच वर्ष एलएलबी कोर्ससाठी पर्यायावर क्लिक करा 
  • या नंतर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉ गिन करा
  • आता तुम्हाला MHT CET Result चा परिणाम दिसेल 
  • आता तुम्ही भविष्यातील संदर्भासाठी हा निकाल डाऊनलोड करू शकता 
  • अशा पद्धतीने तुम्ही MHT CET Result हा निकाल पाहू शकता    
तंत्र शिक्षण, उच्च शिक्षण आणि फाईन आर्ट या मधील पदवी, पदव्यत्तर पदवी शिक्षणसाठी घेण्यात येणाऱ्या सुमारे 16 CET परीक्षांसाठी जवळपास 11 लाख 63 हजार 270 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, या प्रवेश परीक्षा होत  असतांना निर्माण झालेल्या तांत्रिक समस्येमुळे काही विद्यार्थ्यांना हि परीक्षा पूर्ण करता आली नाही, त्याचप्रमाणे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थी हि परीक्षा देऊ शकले नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी हि परीक्षा पुन्हा घेण्यात आली, यानंतर या परीक्षेच्या संबंधित निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या.
 
अधिकृत वेबसाईट :-  cetcell.mahacet.org
 
MHT CET प्रवेश परीक्षा हि प्रवेश परीक्षा सामाईक प्रवेश परीक्षा सेल महाराष्ट्र राज्य, यांच्या व्दारे, महाराष्ट्र राज्यात इंजिनिअरींग आणि बीटेक आणि बीफॉर्म या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी घेतली जाणारी राज्यस्तरीय परीक्षा आहे.
 

एमएचटी सीइटी निकाल 2022 FAQ  

Q. MHT CET Result निकाल कसा तपासावा ?
 
या साठी तुम्हाला खालीलप्रमाणे स्टेप्स अनुसरण करावे लागतील 
  • यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर भेट द्यावी लागेल
  • यानंतर तुमच्या समोर होमपेज ओपन होईल
  • या होम पेजवर दिलेल्या MHT CET Result या पर्यायावर क्लिक करावे लागेल 
  • आता आपले लॉ-गिन क्रेडेन्शियल्स म्हणजे अर्ज क्रमांक आणि जन्म तारीख टाकावी
  • यानंतर तुमचा MHT CET Result हा तुमच्या समोर दिसेल 
  • यानंतर एमएचटी सीईटी स्कोअर कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट काढून स्वतःकडे  ठेवावी.      
Q. MHT CET प्रवेश परीक्षा वर्षातून किती वेळा घेतली जाते ?
 
MHT CET प्रवेश परीक्षा वर्षातून फक्त एकदाच घेण्यात येते, हि परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येत नाही 

Q. MHT CET चा निकाल जाहीर झाला आहे काय ?

पीसीएम आणि पीसीबी अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी निकाल जाहीर झाला आहे, हा निकाल डाऊनलोड करण्यासाठी थेट या लिंक वार क्लिक करा, MHT CET 2022 महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा सेलने 15 सप्टेंबर 2022 रोजी निकाल अधिकृत वेबसाईटवर प्रसिध्द केला आहे.

Q. CET चा निकाल किती वाजता जाहीर होईल ? 

MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची वेळ 15 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता होती, MHT CET 2022 या परीक्षेचा परिणाम अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे, विद्यार्थी थेट वेबसाईटला भेट देऊन स्कोअर कार्ड डाऊनलोड करू शकतात.

Q. MHT CET आपण किती वेळा देऊ शकतो?

MHT CET प्रवेश परीक्षा आपण फक्त तीन वेळा देऊ शकतो, यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असले पाहिजे

Q. MHT CET परीक्षा कठीण आहे काय ?

विद्यार्थ्यांच्या पुनरावलोकनानुसार, एमएचटी सीईटी 2021 सप्टेंबर 21 परीक्षेची एकूण कठीण्य पातळी सरासरी मध्यम होती.   

Q. MHT CET नंतर कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहे ?
 
महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालया मध्ये , बॅचलर ऑफ फार्मसी ( बी.फॉर्म) आणि डॉक्टरेट ऑफ फार्मसी (फार्मा डी) अभासक्रम उपलब्ध आहेत, प्रवेश घेण्यासाठी एमएचटी सीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.  

Leave a Comment