Maharashtra Construction Workers Registration: महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांसाठी आणि समाजातील विविध घटकांसाठी नेहमीच विविध प्रकारच्या योजना राबवीत असते, या धोरणाचा अवलंब करून महाराष्ट्र शासन राज्यातील असंघटित कामगार तसेच समाजातील कामगार गट, या प्रमाणे बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार हा राज्यातील सर्वात मोठा असंघटित विभाग आहे, रोजगार आणि सेवेच्या शर्तीचे नियमन करण्यासाठी आणि याचप्रमाणे बांधकाम आणि इतर बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा व आरोग्य आणि कामगारांसाठी कल्याणकारी योजना व उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाना कडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले,
या कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत इमारत आणि इतर बांधकाम कामगार अशा प्रकारच्या कामांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबऊन तसेच विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांच्या अंतर्गत कामगारांना आरोग्य व शैक्षणिक तसेच आर्थिक लाभ देऊन कामगारांचे जीवनमान सुधारणे त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावणे महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे.
वाचक मित्रहो, या लेखामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ या मंडळा बद्दल संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या कल्याणासाठी राबवीत असलेल्या विविध योजनां विषयी पूर्ण माहिती तसेच कंस्ट्रक्शन वर्कर्स ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे आणि ऑनलाइन रिनिवल, एप्लिकेशन फॉर क्लेम इत्यादी संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.
महाराष्ट्र ईमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ माहिती मराठी
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ, हे मंडळ महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेले मंडळ आहे, या मंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने इमारत आणि इतर बांधकाम [रोजगार नियमन आणि सेवा शर्ती] कलम 60 आणि कलम 40 या कलमांच्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार [रोजगार नियमन आणि सेवा शर्ती] नियम, 2007 तयार केले आहेत. 1 मे 2011 रोजी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापनेला मान्यता देण्यात आली, राज्यातील कामगारांच्या संपूर्ण विकासासाठी हे मंडळ काम करते, बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियमाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व इमारत आणि बांधकाम आस्थापनांकडून जमिनीचे मूल्य वगळून बांधकामाच्या एकूण खर्चाच्या 1 % दराने उपकर.
वसूल केला आणि उपकराची रक्कम महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे जमा केल्या जातो, या निधीतून हे मंडळ कामगारांच्या विकासासाठी तसेच कामगारांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबवीत असते. महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळचे एक ऑनलाइन पोर्टल सुरु केले आहे त्यामुळे कल्याणकारी मंडळाव्दारे कामगारांसाठी राबविल्या जात असलेल्या विविध सेवा आणि योजनांचा लाभ सुलभतेने घेता यावा, या योजनांचा आणि सेवांचा लाभ मिळविण्यासाठी पात्र लाभार्थींनी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ उद्दिष्टे
- महाराष्ट्र राज्यातील सर्व बांधकाम कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात सुधारणा आणने त्याच प्रमाणे त्यांना आरोग्य, सुरक्षा प्रदान करून त्यांचे जीवनमान उंचावणे, याचप्रमाणे बांधकाम कामगारांन पर्यंत पोहचून त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती गोळा करणे.
- राज्यातील बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक लाभ मिळावा म्हणून विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना या मंडळातर्फे राबविण्यात आल्या आहे. तेसेच नवीन बांधकाम कामगार ऑनलाइन नोंदणी सुलभ करण्यात आली आहे.
- बांधकाम कामगारांच्या दावा प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांसाठी दावा अर्ज करण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात आली आहे, तसेच कामगारांसाठी कामगार कल्याणकारी मंडळाचे ऑनलाइन वेबसाईट सुरु करून ऑनलाइन कामगार नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे, याचबरोबर विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणे.
- कल्याणकारी मंडळाची कार्यक्षमता वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे, त्याचप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी जाऊन बांधकाम कामगारांची नोंदणी करणे आणि बांधकाम कामगारांची नोंदणी प्रमाण वाढविणे, याचबरोबर बांधकाम कामगारांना नोंदणी क्रमांक देणे, तसेच योजनेची धनराशी कामगार लाभार्थ्यांच्या खात्यात DBT पद्धतीचा वापर करून हस्तांतरित करणे.
BOCW रजिस्ट्रेशन ऑनलाइन महाराष्ट्र Key Highlights
योजना | Maharashtra Construction Workers Registration |
---|---|
राज्याचे नाव | महाराष्ट्र |
व्दारे सुरु | महाराष्ट्र सरकार |
ऑफिशियल वेबसाईट | mahabocw.in |
उद्देश्य | योजनेच्या माध्यमातून राज्याच्या कामगारांना सक्षम करणे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्याचे बांधकाम कामगार |
विभाग | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ |
[email protected] |
महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ: योजनांची संपूर्ण माहिती
- बांधकाम कामगार सामाजिक सुरक्षा योजना
- बांधकाम कामगार शैक्षणिक योजना
- बांधकाम कामगार आरोग्य योजना
- बांधकाम कामगार आर्थिक सहाय्य योजना
बांधकाम कामगार सामाजिक सुरक्षा योजना
- या योजनेच्या अंतर्गत पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपये अनुदान देण्यात येते.
- माध्यन्ह भोजन योजना.
- आवश्यक अवजारे आणि आवश्यक किट्स खरेदीसाठी 5000 रुपये अनुदान.
- प्रधानमंत्री सुरक्षा योजना
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
- सुरक्षा किट्स पुरविणे
- पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना
- आवश्यक किट्स प्रदान करणे
- प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
बांधकाम कामगार शैक्षणिक योजना
- दरवर्षी 2500/- रुपये आर्थिक अनुदान इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी
- दरवर्षी 5000/- रुपये आर्थिक अनुदान इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
- प्रतीवर्षी 10,000/- रुपये आर्थिक मदत इयत्ता 11वी ते 12वी च्या प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी
- पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 20,000/- रुपये आर्थिक अनुदान
- वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 1 लाख रुपये इतके आर्थिक अनुदान
- दरवर्षी 60,000/- रुपये आर्थिक मदत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तसेच या नंतर 20,000/- रुपये आर्थिक अनुदान डिप्लोमा कोर्से अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 25,000/- रुपये आर्थिक मदत पीजी डिप्लोमा कोर्स करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी MISCT अभ्यासक्रमाच्या शुल्काची परतफेड.
बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना
- गर्भवती महिलांसाठी त्यांच्या प्रसुतीच्या वेळी खालीलप्रमाणे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल
- सामान्य डिलिवरी 15,000/- रुपये
- सर्जिकल डिलिवरी 20,000/- रुपये
- नोंदणीकृत कामगारांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या गंभीर आजाराच्या उपचारांसाठी 1 लाख रुपये अनुदान दिले जाईल
- ज्या कामगारांना 75% किंवा त्याहून अधिक अपंगत्व आहे अशा कामगारांसाठी 2 लाख रुपये आर्थिक मदत असेल
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नियमित आरोग्य तपासणी
बांधकाम कामगार आर्थिक सहाय्य योजना
- बांधकाम कामगार योजनेंतर्गत कामगाराचा कामाच्या जागेवर मृत्यू झाल्यास तर त्याच्या कायदेशीर वारसास 5 लाख रुपये आर्थिक मदत
- कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये आर्थिक मदत
- अटल कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत आर्थिक सहाय्य 2 लाख रुपये
- अटल कामगार आवास योजना शहरी अंतर्गत आर्थिक सहाय्य 2 लाख रुपये
- अंत्यविधी करिता 10,000/- रुपये कामगाराचा मृत्यू झाल्यास
- या योजनेमध्ये कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीला त्याचप्रमाणे महिला कामगाराचा मृत्यू झाल्यास तिच्या विधुर पतीला 24,000/- रुपये आर्थिक मदत [5 वर्षाकरिता ]
- कामगारांना घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदीसाठी गृहकर्ज अनुदान 6 लाख किंवा 2 लाख
Bandhkam Kamgar Yojana माहिती मराठी
महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाइन पात्रता (Eligibility)
- लाभार्थी कामगार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा
- अर्ज करणारा कामगार हा बांधकाम कामगार असावा
- अर्जदार 18 ते 60 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे
- अर्जदार कामगार एक वर्षाच्या कालावधीत किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम करणे आवश्यक आहे
बांधकाम कामगार नोंदणी आवश्यक कागदपत्रे
- अधिकृत वयाचा पुरावा
- 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचा दाखला, महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत कडून बांधकाम कामगार असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र
- [रेशनकार्ड, वीजबिल] राज्याचा रहिवासी पुरावा
- अधिकृत ओळखपत्र (आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र)
- बँक पासबुक ची प्रत
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी नोंदणी शुल्क 25/- रुपये आणि वार्षिक वर्गणी पाच वर्षासाठी 60/- रुपये
बांधकाम कामगार नोंदणी आणि नुतनीकरण कार्यप्रणाली
- राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी प्रमाण वाढविण्याच्या हेतूने आणि कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळऊन देण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
- विभाग प्रमुखांनी वर्षनिहाय जमा लेलेल्या उपकराची रक्कम तसेच बांधकाम आस्थापनांनी केलेली नोंदणी आणि नोंदणीकृत केलेले एकूण बांधकाम कामगार व कामगारांना देण्यात आलेले नव्वद दिवसाचे नोंदणी आणि नुतनीकरण प्रमाणपत्र याप्रमाणे पूर्ण माहिती शासनास सादर करावी.
- बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण करण्या संबधित कार्यवाही तसेच बांधकाम आस्थापनांकडून उपकराची वसुली त्याचप्रमाणे बांधकाम आस्थापनांची नोंदणी शंभर टक्के पूर्ण होईल संपूर्ण दक्षता घेण्यात यावी.
- बांधकाम कामगारांना आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी आणि बांधकाम आस्थापनांची नोंदणी करण्यासाठी सबंधित नियोक्त्यास निर्देश देण्याबाबत आदेश देण्यात यावे
- केंद्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर नियम 1998 च्या नियम 3 नुसार निर्गमित केलेल्या दिनांक 26.9.1996 च्या अधिसूचनेनुसार एक टक्का उपकराची रक्कम इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे न चुकता जमा करावी.
- शासन निर्णय –उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्र. बीसीए 2009/प्र.क्र 108/कामगार 7-अ, दि. 17 जून, 2010 मध्ये नमूद कार्यप्रणालीचे पालन करावे.
महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण आवास योजना पात्रता
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये लाभार्थी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असावा आणि या योजनेस पात्र असावा
- महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत लाभास पात्र असणारा गृहनिर्माण प्रकल्प महारेरा अधिनियम 2016 अंतर्गत नोंदणीकृत असावा.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून प्रती लाभार्थी पात्र बांधकाम कामगारांना मिळणारे दोन लाख इतके अनुदान, नोंदणीकृत लाभार्थी कामगार कोणत्याही घरकुल प्रकल्पातील योजनेत सहभागी असल्यास महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत लाभास पात्र राहतील.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी असलेले बांधकाम कामगार आणि राज्यातील बांधकाम क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या प्रमाणामध्ये तफावत आहे, त्यामुळे हा मोठा फरक कमी करण्याच्या हेतूने आणि बांधकाम कामगारांना, बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी आकर्षित करण्याच्या दृष्टीने मंडळाने विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना जाहीर करून, बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 22.9.2017 रोजी बैठक घेऊन शासनमान्यतेनुसार या या योजनेची सुरुवात केली.
महाराष्ट्र राज्यात तसेच देशातसुद्धा बांधकाम क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगाराचा निर्माण करत त्यामुळे या बांधकाम क्षेत्रात रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील दुर्बल आर्थिक वर्गातील नागरिक मोठ्या प्रमाणात शहराकडे येतात त्यामुळे या बांधकाम कामगारांजवळ निवाऱ्याच्या दृष्टीने किंवा दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या जीवनावश्यक उपयोगी वस्तूंचा मोठ्या प्रमाणात आभाव असतो, कामगारांच्या या समस्यांचा किंवा अभावांचा सर्वांगीण विचार लक्षात घेऊन शासनाने या योजनेची सुरुवात कामगारांसाठी केली आहे. या योजनेच्या अंतर्गत कामगारांना दैनंदिन जीवन जगण्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा संच पुरविण, आणि कामगारांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांना कमी करणे.
महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणीची पार्श्वभूमी
- 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण 14.09 लाख बांधकाम कामगार आहेत, अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नाही. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्ये मध्ये 15.99 ची वाढ झाली आहे हि वाढ लक्षात घेऊन बांधकाम कामगार 17.50 लाख असणे अपेक्षित आहे.
- नोव्हेंबर 2016 अखेरीस बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये 5.62 लाख बांधकाम कामगारांची लाभार्थी म्हणून नोंदणी झाली असून 2.99 लाख कामगारांची नोंदणी आजपर्यंत वैध आहे.
- महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2015-16 नुसार राज्यात 1.02 लाख बांधकाम आस्थापना अस्तित्वात आहेत.
- 1/5/2011 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये स्वायत्त त्रिपक्षीय मंडळाची स्थापना करण्यात आली, त्यानुसार 3.11.2011 रोजी लाभार्थ्यांकडून किरकोळ योगदानासाठी अधिसूचना जरी करण्यात आली.
- राज्यामध्ये या नंतर कामगार आयुक्त कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यामतून कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली.
महाराष्ट्र बांधकाम कामगार आरोग्य योजना
आरोग्य योजनेस आवश्यक असलेली पात्रता
- शासनाच्या निर्णयानुसार पात्र बांधकाम कामगारांना राज्याच्या सार्वजनिक विभागामार्फत दिनांक 2 ऑक्टोबर 2016 पासून राबविण्यात येणारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामधील नोंदणी सक्रीय असलेले बांधकाम कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंब
- या आरोग्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांना नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, याचबरोबर कुटुंबियांकरिता लाभ मिळविण्यासाठी कल्याणकारी मंडळाच्या ओळखपत्रामध्ये कुटुंबियांचा पूर्ण तपशील नमूद असणे अनिवार्य आहे.
- लाभार्थी बांधकाम कामगारांची ओळख महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या नोंदणी पावती व मंडळाच्या ओळखपत्रावरून करता येईल आणि कुटुंबाचा पुरावा म्हणून लाभार्थ्यांचे रेशनकार्ड ग्राह्य धरले जाईल ज्यामध्ये लाभार्थी नोंदणीकृत बांधकाम कामगारच्या (सक्रीय) कुटुंबातील सदस्यांची नवे समाविष्ट असणे अनिवार्य आहे.
- या योजनेचा लाभ घेतेवेळी नोंदणीकृत बांधकाम कामगारच्या कुटुंबियांनी केंद्र किंवा राज्य शासनाकडून अधिकृत असलेले कोणतेही एक ओळखपत्र फोटोसहीत आधारकार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना, इत्यादी सादर करणे अनिवार्य राहील.
- महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत पात्र असलेल्या लाभार्थी बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत शासनाने निश्चित केलेली
- देय विमा हप्त्याची (प्रीमियम) रक्कम, लाभार्थी नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या सक्रीय नोंदणीचा आढावा घेऊन या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य आरोग्य हमी सोसायटीला दर तीन महिन्यांनी कल्याणकारी मंडळाने अदा करावी.
महाराष्ट्र बांधकाम कामगार शैक्षणिक योजना माहिती
शासन निर्णय बांधकाम कामगारांना आवश्यक वस्तूंचा संच देण्याविषयी
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) असलेल्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळेल.
- बांधकाम कामगार मंडळामध्ये सक्रीय नोंदणीकृत बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील, या नोंदणीकृत पात्र कामगार लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर जीवनावश्यक वस्तू संच पुरविण्यात येईल.
बांधकाम कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा संच खालीलप्रमाणे राहील आणि वितरण कार्यप्रणाली
- ताट-चार नग
- वाट्या-आठ नग
- पाण्याचे ग्लास-चार नग
- पातेले झाकणा सहित- तीन नग
- मोठा चमचा- एक नग ( भात वाटप )
- मोठा चमचा – एक नग ( वरण वाटप )
- पाण्याचा जग – ( दोन लिटर ) – एक नग
- डब्बा – चार नग
- परात – एक नग
- प्रेशर कुकर ( पाच लिटर ) – एक नग
- कढई ( स्टील ) – एक नग
- स्टील टाकी ( मोठ्या झाकाणासाहित ) – एक नग
- याचबरोबर पात्र बांधकाम कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा संच्यामध्ये खालील वस्तूंचा समवेश असावा
- प्लास्टिक चटई, मच्छरदाणी, सोलर टॉर्च, जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली, खांद्यावरील बॅग, पत्र्याची पेटी, इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.
- लाभार्थी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच पुरविण्याबाबत ई-निविदा पद्धतीचा अवलंब करून नोंदणीकृत, नामांकित व अनुभवी संस्थेची निवड करावी, तसेच यासंदर्भात उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
- बांधकाम कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा संच मधील पुरविण्यात येणाऱ्या वस्तूंचे दर, पुरवठा, वाहतूक आणि वितरण व सर्व करांसहित निचित करण्यात यावे.
- बांधकाम कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) च्या निविदा स्वीकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक वस्तू संच मधील वस्तूंच्या दर्जाची शासन मान्य प्रयोग शाळेकडून तपासणी व खात्री करून घावी व तसे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अत्यावश्यक वस्तूंचे वितरण लाभार्थी कामगारांमध्ये करावे.
- यामध्ये सबंधित सहाय्यक कामगार आयुक्त यांनी रीतसर प्रमाणित केलेल्या पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या यादीनुसार विहित मुदतीचे आत अत्यावश्यक वस्तू संच पुरवठा करावा.
- पात्र लाभार्थी बांधकाम कामगरांना अत्यावश्यक वस्तू संच प्राप्त झाल्याचे सरकारी कामगार अधिकारी यांनी खात्री करून व पुरवठा केल्याची पोचपावती उपायुक्त कामगार यांना सादर करावी. अत्यावश्यक वस्तू संच पुरवठ्याचा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीतून भागविण्यात यावा. सदर योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणी व देखरेखीचे काम कामगार आयुक्त यांनी पाहावे.
- लाभार्थी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच पुरवठा करण्याची कार्यवाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी. कालावधी वाढविण्यास मान्यता देण्याचे अधिकार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास राहतील.
Maharashtra Bandhakam Kamgar Registration Online
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी पात्र बांधकाम कामगारांना सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईट वर नोंदणी करावी लागेल, नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे राहील.
- सर्वप्रथम पात्र लाभार्थ्याना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट भेट देणे आवशयक आहे www.mahabocw.in
- वेबसाईट वर गेल्यावर तुमच्यासमोर होम पेज उघडेल होम पेजवर तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील त्यापैकी बांधकाम कामगार नोंदणी या ऑप्शन वर क्लिक करा.
- या ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर दुसरे पेज ओपन होईल, या सूचीमधून तुमच्या जवळचे स्थान निवडा.
- त्यानंतर या सबंधित फिल्डमध्ये तुमचा बारा अंकी आधार क्रमांक आणि सक्रीय मोबाइल नंबर भरा आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसिड टू फॉर्म बटनावर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही दिलेल्या मोबाइल एक OTP पाठविला जाईल, त्याची पडताळणी करून त्यानुसार पुढच्या स्टेप वर जा
- आता तुम्हाला महाराष्ट्र बांधकाम कामगारांसाठी नोंदणी फॉर्म दिसेल, त्यामध्ये आवश्यक संपूर्ण माहिती भरा जसे कि वैयक्तिक माहित, रहिवासी पत्ता, कुटुंबाची पूर्ण माहिती, बँक खात्याचे पूर्ण तपशील, रोजगाराचे तपशील
- यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे आवश्यक त्या आकारात आणि फॉरमॅट मध्ये अपलोड करा, आणि चेकबॉक्स वर खूण करून पुडे जाण्यासाठी सेव बटनावर क्लिक करा.
- आता तुमचा अर्ज स्क्रीनवर प्रदर्शित होईल आणि नंतर वापरण्यासाठी ते लक्षात ठेवा, अशाप्रकारे तुमची मंडळाच्या वेबसाईट वर नोंदणी पूर्ण होईल.
महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी (ऑफलाईन)
- महाराष्ट्र शासनाच्या इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी कामगारांना मंडळाच्या अधिकृत वेबपोर्टल वर जाऊन ऑनलाइन पद्धतीच्या व्यतिरिक्त कामगार थेट BOCW मंडळाच्या संबधित कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नोंदणी फॉर्म भरू शकतात. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया आहे.
- ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासठी सर्व सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन कामगार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करावा लागेल किंवा सरळ खाली दिलेल्या लिंकवरून फॉर्म डाऊनलोड करून घावा.
- यानंतर फॉर्मची प्रिंटआउट काढून घावी लागेल, या नंतर पूर्ण तपशीलवार माहिती भरून फॉर्म पूर्ण करा
- फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा
- यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सबंधित कार्यालयात जाऊन जमा करा.
- नोंदणी फॉर्म कार्यालयात जमा केल्यानंतर तुम्हाला याच्या संबंधित पोचपावती मिळेल, ती पावती सुरक्षित ठेवा. नोंदणी फॉर्मची पडताळणी पूर्ण झाल्यावर अधिकारी तुमचा नोंदणी फॉर्म पुढे पाठवतील.
कामगारांनी त्यांच्या प्रोफाईल मध्ये लॉगिन करण्याची प्रक्रिया
कामगार कल्याणकारी मंडळामध्ये यशस्वीरित्या नोंदणी झाल्यानंतर. महाराष्ट्रातील बांधकाम कामगार शासनाच्या या अधिकृत वेबसाईट वर लॉगिन करून मंडळाच्या कामगारांसाठी सुरु केलेल्या विविध योजना विषयी माहिती मिळऊ शकतात, आणि त्याचप्रमाणे त्यांच्या सबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या प्रोफाईल मध्ये लॉगिन करू शकतात. प्रोफाईल मध्ये लॉगिन करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया आहे.
- सर्व प्रथम आपल्याला महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या पोर्टलवर भेट द्यावी लागेल यानंतर तुमच्यासमोर पोर्टलचे होम पेज उघडेल.
- यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉगिन बटनावर क्लिक करा.
यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल यामध्ये तुमचा आधारकार्ड क्रमांक आणि तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर भरा आणि लॉगिन बटनावर क्लिक करा. - तुमच्या नोंदणीकृत मोबाइल वर एक OTP पाठविला जाईल, या नंतर पोर्टलवर संपूर्ण तपासणी झाल्यावर तुमचे बांधकाम कामगार प्रोफाईल उघडेल.
Maharashtra Construction Workers Registration Renewal
- महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळामध्ये आधीच नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना कामगार मंडळाच्या योजनांचा सत्यात्याने लाभ मिळविण्यासाठी नोंदणीकृत कामगारांना ठराविक कालावधीनंतर त्यांच्या नोंदणीचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे, नोंदणीचे नुतनीकरण करण्यासाठी खालील पद्धतीचे अनुसरण करा.
- महाराष्ट्राच्या BOCW च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, या नंतर कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाइन रिनिवल या बटनावर क्लिक करा, तुमच्यासमोर एक नविन विंडो उघडेल या नंतर खालील पर्ययामधून तुमच्या सबंधित पर्याय निवडा.
- यामध्ये तुम्ही निवडलेल्या पर्ययानुसार सम्पूर्ण तपशीलवार माहिती भरा
- यानंतर तुमच्या समोर एक नुतनीकरण फॉर्म उघडेल यामध्ये संपूर्ण तपशिलासह माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
- वेबसाईट वर तुमची कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईट सबंधित नियमांचा आणि अटी यांचा एक चेक बॉक्स येईल त्याला टिक करून आपला नुतनीकरण अर्ज सबमिट करा.
- नुतानिकरणासाठी लागणारी आवशयक कागदपत्रे या प्रमाणे आहे : कामगाराचे ओळखपत्र, अधिकृत 90 दिवस बांधकामचे प्रमाणपत्र, इत्यादी
BOCW मंडळाच्या अंतर्गत दावा अर्ज कसा करावा ?
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये कामगारांना दावा करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया असेल
- महाराष्ट्राच्या कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबपोर्टल वर जाऊन, वेबसाईट च्या होम पेज वर पुढील ऑप्शनवर क्लिक करा कंस्ट्रक्शन्स वर्कर अप्लाय ऑनलाइन फॉर क्लेम
- उघडलेल्या पेजवर समोरील सबंधित ऑप्शन निवडा, नवीन दावा / दावा अपडेट
- त्यानंतर निवडलेल्या ऑप्शन नुसार तुमचा नोंदणी क्रमांक किंवा पोचपावती क्रमांक प्रविष्ट करा
- समोर दिसत असलेल्या क्लेम फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तपशीलवार भरा, त्यानंतर निर्धारित पध्दतीने आवश्यक कागदांची यादी अपलोड करा.
- या संपूर्ण पडताळणी करून सबमिट बटनावर क्लिक करून रीतसर भरलेला फॉर्म सबमिट करावा.
Mahabocw संपर्क:- हेल्पडेस्क
Mahabocw | Click Here |
---|---|
Registration | Click Here |
Online Claim | Click Here |
Application Form | Click Here |
फोन | (022) 26572631 |
कार्यालयाचा पत्ता | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, पाचवा मजला, एम एमटीसी हाउस, प्लॉट सी–22, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे(ई), मुंबई–40051, महाराष्ट्र |
ई-मेल | [email protected] |
महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी FAQ