Maharashtra Construction Workers Registration: Apply Online Renewal, Online Claim at mahabocw.in

BOCW Registration Online Maharashtra | Online Worker Registration | www.mahabocw.in  Marathi | Maharashtra Construction Workers Registration, Apply Online Renewal, Online Claim Information in Marathi | बांधकाम कामगार योजना 2023 माहिती मराठी | महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाइन | Online Workers Registration Maharashtra 

Maharashtra Construction Workers Registration: महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांसाठी आणि समाजातील विविध घटकांसाठी नेहमीच विविध प्रकारच्या योजना राबवीत असते, या धोरणाचा अवलंब करून महाराष्ट्र शासन राज्यातील असंघटित कामगार तसेच समाजातील कामगार गट, या प्रमाणे बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार हा राज्यातील सर्वात मोठा असंघटित विभाग आहे, रोजगार आणि सेवेच्या शर्तीचे नियमन करण्यासाठी आणि याचप्रमाणे बांधकाम आणि इतर बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा व आरोग्य आणि कामगारांसाठी कल्याणकारी योजना व उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाना कडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले, 

या कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत इमारत आणि इतर बांधकाम कामगार अशा प्रकारच्या कामांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबऊन तसेच विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांच्या अंतर्गत कामगारांना आरोग्य व शैक्षणिक तसेच आर्थिक लाभ देऊन कामगारांचे जीवनमान सुधारणे त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावणे महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. 

वाचक मित्रहो, या लेखामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ या मंडळा बद्दल संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या कल्याणासाठी राबवीत असलेल्या विविध योजनां विषयी पूर्ण माहिती तसेच कंस्ट्रक्शन वर्कर्स ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे आणि ऑनलाइन रिनिवल, एप्लिकेशन फॉर क्लेम इत्यादी संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.

Table of Contents

महाराष्ट्र ईमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ माहिती मराठी 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ, हे मंडळ महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेले मंडळ आहे, या मंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने इमारत आणि इतर बांधकाम [रोजगार नियमन आणि सेवा शर्ती] कलम 60 आणि कलम 40 या कलमांच्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार [रोजगार नियमन आणि सेवा शर्ती] नियम, 2007 तयार केले आहेत. 1 मे 2011 रोजी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापनेला मान्यता देण्यात आली, राज्यातील कामगारांच्या संपूर्ण विकासासाठी हे मंडळ काम करते, बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियमाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व इमारत आणि बांधकाम आस्थापनांकडून जमिनीचे मूल्य वगळून बांधकामाच्या एकूण खर्चाच्या 1 % दराने उपकर.

Maharashtra Construction Workers Registration
Maharashtra Construction Workers Registration

वसूल केला आणि उपकराची रक्कम महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे जमा केल्या जातो, या निधीतून हे मंडळ कामगारांच्या विकासासाठी तसेच कामगारांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबवीत असते. महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळचे एक ऑनलाइन पोर्टल सुरु केले आहे त्यामुळे कल्याणकारी मंडळाव्दारे कामगारांसाठी राबविल्या जात असलेल्या विविध सेवा आणि योजनांचा लाभ सुलभतेने घेता यावा, या योजनांचा आणि सेवांचा लाभ मिळविण्यासाठी पात्र लाभार्थींनी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ उद्दिष्टे 

महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करून राज्यातील असंघटित बांधकाम कामगारांच्या गटाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे, बांधकाम कामगारांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मंडळाने विविध कल्याणकारी योजना आणि सामाजिक कार्यक्रम सुरु केले आहेत. कामगार कल्याणकारी मंडळाचे खालीलप्रमाणे प्रमुख उद्दिष्टे आहेत
  • महाराष्ट्र राज्यातील सर्व बांधकाम कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात सुधारणा आणने त्याच प्रमाणे त्यांना आरोग्य, सुरक्षा प्रदान करून त्यांचे जीवनमान उंचावणे, याचप्रमाणे बांधकाम कामगारांन पर्यंत पोहचून त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती गोळा करणे. 
  • राज्यातील बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक लाभ मिळावा म्हणून विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना या मंडळातर्फे राबविण्यात आल्या आहे. तेसेच नवीन बांधकाम कामगार ऑनलाइन नोंदणी सुलभ करण्यात आली आहे.
  • बांधकाम कामगारांच्या दावा प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांसाठी दावा अर्ज करण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात आली आहे, तसेच कामगारांसाठी कामगार कल्याणकारी मंडळाचे ऑनलाइन वेबसाईट सुरु करून ऑनलाइन कामगार नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे, याचबरोबर विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणे.
  • कल्याणकारी मंडळाची कार्यक्षमता वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे, त्याचप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी जाऊन बांधकाम कामगारांची नोंदणी करणे आणि बांधकाम कामगारांची नोंदणी प्रमाण वाढविणे, याचबरोबर बांधकाम कामगारांना नोंदणी क्रमांक देणे, तसेच योजनेची धनराशी कामगार लाभार्थ्यांच्या खात्यात DBT पद्धतीचा वापर करून हस्तांतरित करणे.

BOCW रजिस्ट्रेशन ऑनलाइन महाराष्ट्र Key Highlights

योजनाMaharashtra Construction Workers Registration
राज्याचे नावमहाराष्ट्र
व्दारे सुरुमहाराष्ट्र सरकार
ऑफिशियल वेबसाईटmahabocw.in
उद्देश्ययोजनेच्या माध्यमातून राज्याच्या कामगारांना सक्षम करणे
लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे बांधकाम कामगार
विभागमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
Email[email protected]

महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ: योजनांची संपूर्ण माहिती 

महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत राज्यातील बांधकाम क्षेत्रात गुंतलेल्या असंघटित कामगारांच्या लाभासाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत, या सर्व योजनांची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे त्यांच्या उपविभागांतर्गत समाविष्ट करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सर्व शेक्षणिक सुविधा फक्त नोंदणीकृत कामगारांच्या पहिल्या दोन अपत्यांसाठी लागू राहील.
  • बांधकाम कामगार सामाजिक सुरक्षा योजना
  • बांधकाम कामगार शैक्षणिक योजना
  • बांधकाम कामगार आरोग्य योजना
  • बांधकाम कामगार आर्थिक सहाय्य योजना

बांधकाम कामगार सामाजिक सुरक्षा योजना 

  • या योजनेच्या अंतर्गत पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपये अनुदान देण्यात येते.
  • माध्यन्ह भोजन योजना.
  • आवश्यक अवजारे आणि आवश्यक किट्स खरेदीसाठी 5000 रुपये अनुदान.
  • प्रधानमंत्री सुरक्षा योजना
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
  • सुरक्षा किट्स पुरविणे
  • पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना
  • आवश्यक किट्स प्रदान करणे
  • प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना

बांधकाम कामगार शैक्षणिक योजना 

  • दरवर्षी 2500/- रुपये आर्थिक अनुदान इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी
  • दरवर्षी 5000/- रुपये आर्थिक अनुदान इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
  • प्रतीवर्षी 10,000/- रुपये आर्थिक मदत इयत्ता 11वी ते 12वी च्या प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी
  • पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 20,000/- रुपये आर्थिक अनुदान
  • वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 1 लाख रुपये इतके आर्थिक अनुदान
  • दरवर्षी 60,000/- रुपये आर्थिक मदत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तसेच या नंतर 20,000/- रुपये आर्थिक अनुदान डिप्लोमा कोर्से अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 25,000/- रुपये आर्थिक मदत पीजी डिप्लोमा कोर्स करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी MISCT अभ्यासक्रमाच्या शुल्काची परतफेड.

       प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना मराठी 

बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना

  • गर्भवती महिलांसाठी त्यांच्या प्रसुतीच्या वेळी खालीलप्रमाणे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल
  • सामान्य डिलिवरी 15,000/- रुपये
  • सर्जिकल डिलिवरी 20,000/- रुपये
  • नोंदणीकृत कामगारांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या गंभीर आजाराच्या उपचारांसाठी 1 लाख रुपये अनुदान दिले जाईल
  • ज्या कामगारांना 75% किंवा त्याहून अधिक अपंगत्व आहे अशा कामगारांसाठी 2 लाख रुपये आर्थिक मदत असेल
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नियमित आरोग्य तपासणी

बांधकाम कामगार आर्थिक सहाय्य योजना

  • बांधकाम कामगार योजनेंतर्गत कामगाराचा कामाच्या जागेवर मृत्यू झाल्यास तर त्याच्या कायदेशीर वारसास 5 लाख रुपये आर्थिक मदत
  • कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये आर्थिक मदत
  • अटल कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत आर्थिक सहाय्य 2 लाख रुपये
  • अटल कामगार आवास योजना शहरी अंतर्गत आर्थिक सहाय्य 2 लाख रुपये
  • अंत्यविधी करिता 10,000/- रुपये कामगाराचा मृत्यू झाल्यास
  • या योजनेमध्ये कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीला त्याचप्रमाणे महिला कामगाराचा मृत्यू झाल्यास तिच्या विधुर पतीला 24,000/- रुपये आर्थिक मदत [5 वर्षाकरिता ]
  • कामगारांना घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदीसाठी गृहकर्ज अनुदान 6 लाख किंवा 2 लाख 

Bandhkam Kamgar Yojana माहिती मराठी

बांधकाम कामगार आवश्यक किट्स खरेदीसाठी 5000/- रुपये अनुदान, महाराष्ट्र राज्यातील ज्या बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळमध्ये नोंदणी केली आहे, अशा पात्र बांधकाम कामगारांना त्यांना आवश्यक असलेली अवजारे आणि बांधकामासाठी लागणारी आवश्यक किट्स खरेदी करण्यासाठी 5000/- रुपये आर्थिक अनुदान दिल्या जाते. हे आर्थिक अनुदान कामगारांनी नोंदणी केल्यानंतर लगेच दिल्या जाते. हे आर्थिक अनुदान तीन वर्षाकरिता असते या नंतर या योजनेचा लाभ पुढील तीन वर्षानंतर मिळवण्यासाठी बांधकाम कामगारांना मंडळामध्ये सलग तीन वर्षे नोंदणी करणे आवश्यक आहे, याचा अर्थ असा होतो बांधकाम कामगारांची मंडळामध्ये नोंदणी सलग तीन वर्ष असेल तर त्यांना पुढील तीन वर्षानंतर 5000/- रुपये आर्थिक मदत मिळेल.
 
बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना, योजनेचे बांधकाम कामगारांना लाभ आणि फायदे :- भारत सरकारने जून 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात केली या योजनेचे धोरण देशातील प्रेत्येक नागरीकांजवळ त्यांचे स्वतःचे हक्काचे घरकुल असावे, महाराष्ट्र सरकारने याच धोरणाचा अवलंब करून आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन  महाराष्ट्र राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे, याच बरोबर या योजनेची अंमलबजावणी पूर्ण राज्यामध्ये सुरळीत होण्यासाठी (राज्यस्तरीय मंजुरी व संनियंत्रण समिती) समिती तयार करण्यात आली आहे. 
 
भारत देशात बांधकाम निर्माण क्षेत्र आणि बांधकाम उद्योग मोठ्याप्रमाणात आहे, या उद्योगाचा भारताच्या (जीडीपी) मध्ये मोठा हिस्सा आहे, याच बरोबर बांधकाम निर्माण क्षेत्र देशातील नागरिकांना मोठ्या  प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देत आहे, त्यामुळे या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणात असंघटित कामगार आहेत, अशा कामगारांना मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत जसे राहण्यासाठी पक्के घर, वीज, रस्ते, इत्यादी. अशा असंघटित बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाव्दारे नोंदणी करून कामगारांना या सर्व मुलभूत सुविधायुक्त घरकुले ( पाणी, वीज, शौचालये आणि रस्ते ) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आणि महाराष्ट्र बांधकाम आवास योजनेव्दारे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र आवास योजनेची अंमलबजावणी पूर्ण राज्यात सुरु केली आहे.
 
असे बांधकाम कामगार जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत आहे, आणि अटल आवास योजनेंतर्गत घरकुल बांधून घराच्या पूर्ण होण्याचा पुरावा सादर केला आहे ते बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेसाठी पात्र असतील. तसेच ज्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी अटल आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधून पूर्ण होण्याचा दाखला सादर केला असेल अशा लाभार्थी कामगारांना जमीन खरेदी आणि घरकुल निर्माणा संबंधित झालेल्या खर्चाची परतफेड म्हणून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे दोन लाख अनुदान आर्थिक मदत देण्यात येईल, आणि हि आर्थिक अनुदान लाभार्थ्यांचा बँकेच्या खात्यात थेट जमा केल्या जाईल.
 
महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगार जे प्रधानमंत्री आवास योजनेस पात्र आहेत, तसेच असे कामगार जे हि पात्रता पूर्ण करतात अशा कामगारांना बांधकाम आवास योजनेचा लाभ मिळेल, या योजनेमध्ये लाभ देण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांची पात्रता निश्चित करण्याच्या संबंधित जवाबदारी कामगार मंडळ आणि संबंधित विभागाची असते. कामगार आवास योजनेमध्ये विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या पात्र कामगारांना घरकुल निर्माणा मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सवलती देण्यात येतात त्याचबरोबर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून पात्र लाभार्थ्यांना अतिरिक्त आर्थिक अनुदान देण्यात येते. त्याचप्रमाणे या योजनेमध्ये म्हाडा मध्ये लागू असलेला बांधकाम FSI बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत निर्माण केलेल्या घरकुलांना देण्यात येतो. हा बांधकाम FSI फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील घरकुलांना लागू करण्यात येतो.
 

महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाइन पात्रता (Eligibility)

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांचा किंवा सेवांचा लाभ मिळविण्यासाठी पात्रता आवश्यक असते, हि पात्रता तपासण्यासाठी शासनाच्या बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबपोर्टल वर भेट देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सर्वप्रथम बांधकाम कामगारांना नोंदणी करणे आवश्यक आहे, या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे.
  • लाभार्थी कामगार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा
  • अर्ज करणारा कामगार हा बांधकाम कामगार असावा
  • अर्जदार 18 ते 60 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे
  • अर्जदार कामगार एक वर्षाच्या कालावधीत किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम करणे आवश्यक आहे 

            प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 

बांधकाम कामगार नोंदणी आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळमध्ये नोंदणी करण्यासाठी फॉर्म –V भरून खालीलप्रमाणे कागदपत्रांसह सबमिट करणे आवश्यक आहे
  • अधिकृत वयाचा पुरावा
  • 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचा दाखला, महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत कडून बांधकाम कामगार असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र
  • [रेशनकार्ड, वीजबिल] राज्याचा रहिवासी पुरावा
  • अधिकृत ओळखपत्र (आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र)
  • बँक पासबुक ची प्रत
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी नोंदणी शुल्क 25/- रुपये आणि वार्षिक वर्गणी पाच वर्षासाठी 60/- रुपये 

             महाराष्ट्र बाल संगोपन योजना

बांधकाम कामगार नोंदणी आणि नुतनीकरण कार्यप्रणाली 

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या नोंदणी आणि नोंदणी नुतनीकरण करण्याची कार्यप्रणाली यांच्या संबंधित तसेच बांधकाम आस्थापनांची संपूर्ण नोंदणी आणि बांधकाम आस्थापनांकडून होणारी उपकराची वसुली या सर्व सबंधित कार्यप्रणालीला महाराष्ट्र शासनाकडून प्राथमिकता देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विभाग प्रमुखांनी वर्षभरात जमा केलेली उपकाराची रक्कम व बांधकाम अस्थापनांची नोंदणी आणि नोंदणीकृत बांधकाम कामगार तसेच त्यांना देण्यात आलेले 90 दिवसाचे नोंदणी किंवा नोंदणी नुतनीकरण प्रमाणपत्र या सर्व कामगारांविषयी माहितीचा आढावा महाराष्ट्र शासनाने घेतला होता. त्यानुसार मंडळामध्ये राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी प्रमाण वाढविण्याच्या हेतूने आणि तसेच बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, सिडको, एम.आय.डी.सी आणि बांधकाम क्षेत्रांशी सबंधित असेलेल्या बांधकाम आस्थापनांची नोंदणी करण्यासाठी आणि बांधकाम कामगारांना आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत.
  • राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी प्रमाण वाढविण्याच्या हेतूने आणि कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळऊन देण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
  • विभाग प्रमुखांनी वर्षनिहाय जमा लेलेल्या उपकराची रक्कम तसेच बांधकाम आस्थापनांनी केलेली नोंदणी आणि नोंदणीकृत केलेले एकूण बांधकाम कामगार व कामगारांना देण्यात आलेले नव्वद दिवसाचे नोंदणी आणि नुतनीकरण प्रमाणपत्र याप्रमाणे पूर्ण माहिती शासनास सादर करावी.
  • बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण करण्या संबधित कार्यवाही तसेच बांधकाम आस्थापनांकडून उपकराची वसुली त्याचप्रमाणे बांधकाम आस्थापनांची नोंदणी शंभर टक्के पूर्ण होईल संपूर्ण दक्षता घेण्यात यावी.
  • बांधकाम कामगारांना आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी आणि बांधकाम आस्थापनांची नोंदणी करण्यासाठी सबंधित नियोक्त्यास निर्देश देण्याबाबत आदेश देण्यात यावे
  • केंद्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर नियम 1998 च्या नियम 3 नुसार निर्गमित केलेल्या दिनांक 26.9.1996 च्या अधिसूचनेनुसार एक टक्का उपकराची रक्कम इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे न चुकता जमा करावी.
  • शासन निर्णय –उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्र. बीसीए 2009/प्र.क्र 108/कामगार 7-अ, दि. 17 जून, 2010 मध्ये नमूद कार्यप्रणालीचे पालन करावे.

           जननी सुरक्षा योजना 

महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण आवास योजना पात्रता

  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये लाभार्थी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असावा आणि या योजनेस पात्र असावा
  • महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत लाभास पात्र असणारा गृहनिर्माण प्रकल्प महारेरा अधिनियम 2016 अंतर्गत नोंदणीकृत असावा.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून प्रती लाभार्थी पात्र बांधकाम  कामगारांना मिळणारे दोन लाख इतके अनुदान, नोंदणीकृत लाभार्थी कामगार कोणत्याही घरकुल प्रकल्पातील योजनेत सहभागी असल्यास महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत लाभास पात्र राहतील.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी असलेले बांधकाम कामगार आणि राज्यातील बांधकाम क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या प्रमाणामध्ये तफावत आहे, त्यामुळे हा मोठा फरक कमी करण्याच्या हेतूने आणि बांधकाम कामगारांना, बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी आकर्षित करण्याच्या दृष्टीने मंडळाने विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना जाहीर करून, बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 22.9.2017 रोजी बैठक घेऊन शासनमान्यतेनुसार या या योजनेची सुरुवात केली.

महाराष्ट्र राज्यात तसेच देशातसुद्धा बांधकाम क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगाराचा निर्माण करत त्यामुळे या बांधकाम क्षेत्रात रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील दुर्बल आर्थिक वर्गातील नागरिक मोठ्या प्रमाणात शहराकडे येतात त्यामुळे या बांधकाम कामगारांजवळ निवाऱ्याच्या दृष्टीने किंवा दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या जीवनावश्यक उपयोगी वस्तूंचा मोठ्या प्रमाणात आभाव असतो, कामगारांच्या या समस्यांचा किंवा अभावांचा सर्वांगीण विचार लक्षात घेऊन शासनाने या योजनेची सुरुवात कामगारांसाठी केली आहे. या योजनेच्या अंतर्गत कामगारांना दैनंदिन जीवन जगण्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा संच पुरविण, आणि कामगारांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांना कमी करणे.

            पोस्ट ऑफस सेविंग स्कीम 

महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणीची पार्श्वभूमी

  • 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण 14.09 लाख बांधकाम कामगार आहेत, अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नाही. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्ये मध्ये 15.99 ची वाढ झाली आहे हि वाढ लक्षात घेऊन बांधकाम कामगार 17.50 लाख असणे अपेक्षित आहे.
  • नोव्हेंबर 2016 अखेरीस बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये 5.62 लाख बांधकाम कामगारांची लाभार्थी म्हणून नोंदणी झाली असून 2.99 लाख कामगारांची नोंदणी आजपर्यंत वैध आहे.
  • महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2015-16 नुसार राज्यात 1.02 लाख बांधकाम आस्थापना अस्तित्वात आहेत.
  • 1/5/2011 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये स्वायत्त त्रिपक्षीय मंडळाची स्थापना करण्यात आली, त्यानुसार 3.11.2011 रोजी लाभार्थ्यांकडून किरकोळ योगदानासाठी अधिसूचना जरी करण्यात आली.
  • राज्यामध्ये या नंतर कामगार आयुक्त कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यामतून कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली.

            पोषण अभियान 

महाराष्ट्र बांधकाम कामगार आरोग्य योजना

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य आणि अपघात विमा योजना प्रायोगिक तत्वावर लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांनी आरोग्य आणि वैयक्तिक अपघात विमा योजना बांधकाम कामगारांना लागू करण्यासाठी ब्रोकर म्हणून लाईफ अॅन्ड जनरल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. यांची नियुक्ती केली.
 
लाईफ अॅन्ड जनरल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. यांनी कामगार आयुक्त यांच्यावतीने चार इन्शुरन्स कंपन्यांकडून आरोग्य व वैयक्तिक अपघात विमा योजनेबाबत कोटेशन मागवून चार कंपन्यांकडून प्राप्त झालेले कोटेशन्स कामगार आयुक्त यांना सादर केले. सदर कोटेशन्स नुसार कामगार आयुक्त यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या 3645/- रुपये प्लस सेवाकर 12.36 %प्लस 55/-रुपये असे एकंदर रुपये 4150/- प्रती कामगार एवढ्या रकमेची प्रिमियम असलेली आरोग्य व वैयक्तिक अपघात विमा योजना दि. 23.7.2013 च्या पत्रान्वये मंजूर केली.
 
महाराष्ट्र शासनामार्फत एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबास लागू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ बांधकाम कामगार घेऊ शकतात. तथापि सदरहू योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे पात्र ठरतात. त्यामुळे मंडळाकडील सर्वच नोंदीणीकृत बांधकाम कामगारांना राजीव गांधी जीवनदायी योजनेचा सरसकट लाभ मिळत नाही. तसेच जनश्री विमा योजना व राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना इत्यादी योजनांचा लाभही मर्यादित कुटुंबानाच मिळतो. आणि त्यामुळे कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत कामगारांच्या भविष्याचा विचार करून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील विविध पर्यायांची पडताळणी केली आहे.
 
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व मंडळाच्या तज्ञ समितीच्या दिनांक 30.7.2014 रोजीच्या स्वतंत्रपणे झालेल्या बैठकीमध्ये सर्व पर्यायांचा वचार करून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आरोग्य आणि वैयक्तिक अपघात विमा योजनान लागू करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यामध्ये नोंदणीकृत कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय, बांधकाम कामगारांचे बांधकाम क्षेत्रामधील सत्यात्याने होणारे स्थलांतर आणि नेहमी जोखमीच्या परिस्थितीत करावे लागणारे काम यामुळे बांधकाम कामगारांना नेहमी आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते. कायम जोखिमीच्या परिस्थिती मध्ये काम करावे लागत असल्यामुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान नेहमी असुरक्षित स्वरूपाचे असते, त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत कामगारांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना कायद्यातील तरतुदीनुसार या मंडळामार्फत सार्वजनिक क्षेत्रातील आरोग्य विमा योजनेचा लाभ वेळोवेळी देण्यात आला आहे. 
 
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविल्याजाणाऱ्या महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेनेच्या अंतर्गत येणाऱ्या रुगांलायाची संख्या अधिक असल्यामुळे आणि या रुग्णालयात मिळणाऱ्या आरोग्य सुविधेचा दर्जा निश्चित चांगला असल्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदीकृत बांधकाम कामगार (सक्रीय) आणि त्यांच्यावर अवलंबून असललेल्या त्यांच्या कुटुंबियांना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविल्याजाणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.  

आरोग्य योजनेस आवश्यक असलेली पात्रता

  • शासनाच्या निर्णयानुसार पात्र बांधकाम कामगारांना राज्याच्या सार्वजनिक विभागामार्फत दिनांक 2 ऑक्टोबर 2016 पासून राबविण्यात येणारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामधील नोंदणी सक्रीय असलेले बांधकाम कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंब
  • या आरोग्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांना नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, याचबरोबर कुटुंबियांकरिता लाभ मिळविण्यासाठी कल्याणकारी मंडळाच्या ओळखपत्रामध्ये कुटुंबियांचा पूर्ण तपशील नमूद असणे अनिवार्य आहे.
  • लाभार्थी बांधकाम कामगारांची ओळख महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या नोंदणी पावती व मंडळाच्या ओळखपत्रावरून करता येईल आणि कुटुंबाचा पुरावा म्हणून लाभार्थ्यांचे रेशनकार्ड ग्राह्य धरले जाईल ज्यामध्ये लाभार्थी नोंदणीकृत बांधकाम कामगारच्या (सक्रीय) कुटुंबातील सदस्यांची नवे समाविष्ट असणे अनिवार्य आहे.
  • या योजनेचा लाभ घेतेवेळी नोंदणीकृत बांधकाम कामगारच्या कुटुंबियांनी केंद्र किंवा राज्य शासनाकडून अधिकृत असलेले कोणतेही एक ओळखपत्र फोटोसहीत आधारकार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना, इत्यादी सादर करणे अनिवार्य राहील.
  • महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत पात्र असलेल्या लाभार्थी बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत शासनाने निश्चित केलेली
  • देय विमा हप्त्याची (प्रीमियम) रक्कम, लाभार्थी नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या सक्रीय नोंदणीचा आढावा घेऊन या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य आरोग्य हमी सोसायटीला दर तीन महिन्यांनी कल्याणकारी मंडळाने अदा करावी.

महाराष्ट्र बांधकाम कामगार शैक्षणिक  योजना माहिती

महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळ हे स्वायत्त मंडळ आहे, या मंडळामार्फत राज्यातून उपकर अधिनियमानुसार उपकर गोळा केल्याजातो, या उपकर जमा झालेल्या रकमेतून कामगार मंडळाचा कार्यभार चालविला जातो, यातूनच बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. कामगारांच्या मुलांना त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीची जाणीव होण्यासाठी तसेच त्यांच्या सामान्य ज्ञानात वाढ होणे, त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे तसेच शिक्षणातून कामगारांच्या मुलांचा शेक्षणिक, भावनिक, बौद्धिक आणि तसेच शारीरिक विकास व उच्च शिक्षणासाठी आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी आणि तसेच दैनदिन पाठ्यपुस्तकांतील अभ्यासासोबत अन्य पुस्तकांचीही अभ्यासासाठी आवश्यकता असते. 
 
त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण ज्ञान वृद्धिंगत करणाऱ्या अशाप्रकारच्या पुस्तकांची उपयुक्तता विचारात घेऊन नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना 1000/- रुपये पर्यंत किंमतीच्या शैक्षणिक उपयोगाच्या पुस्तकांचा संच भेट देण्याचा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जवळपास दोन लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. यापैकी एक लाख बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रीय असल्याचे विचारात घेऊन, एकूण एक लाख सक्रीय नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना 1000/- रुपये पर्यंतच्या किंमतीचा शैक्षणिक उपयोगाच्या पुस्तकांचा संच भेट देण्याचा मंडळाचा मानस आहे.
 

शासन निर्णय बांधकाम कामगारांना आवश्यक वस्तूंचा संच देण्याविषयी

राज्यामध्ये बांधकाम क्षेत्र हे मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये रोजगार शोधण्यासाठी ग्रामिण भागामधील आर्थिकदुर्बल नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात, अशावेळी त्यांच्याकडे राहण्यासाठी तसेच दैनंदिन उपयोगातील जीवनावश्यक वस्तूंची कमतरता असते. त्यानंतर या बांधकाम कामगारांना एक काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या जागेवर स्थलांतर करावे लागते. या योजनेच्या माध्यमातून अशाप्रकारच्या अत्यावश्यक वस्तूंचा संच पुरविणे आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची कमतरता भरून काढणे त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी आकर्षित करणे यासाठी अत्यावश्यक वस्तू संच पुरविणे हि योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिनांक 27 ऑक्टोबर 2020 रोजीच्या बैठकीत ठरविण्यात येऊन, राज्यातील मंडळाकडे नोंदणीकृत दहा लाख सक्रीय बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तू संच पुरविण्याचा ठराव खालीलप्रमाणे मंजूर करण्यात आला.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) असलेल्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळेल.
  • बांधकाम कामगार मंडळामध्ये सक्रीय नोंदणीकृत बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील, या नोंदणीकृत पात्र कामगार लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर जीवनावश्यक वस्तू संच पुरविण्यात येईल.

           भूमी अभिलेख महाराष्ट्र 

बांधकाम कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा संच खालीलप्रमाणे राहील आणि वितरण कार्यप्रणाली

  • ताट-चार नग
  • वाट्या-आठ नग
  • पाण्याचे ग्लास-चार नग
  • पातेले झाकणा सहित- तीन नग    
  • मोठा चमचा- एक नग ( भात वाटप )
  • मोठा चमचा – एक नग ( वरण वाटप )
  • पाण्याचा जग – ( दोन लिटर ) – एक नग
  • डब्बा – चार नग
  • परात – एक नग
  • प्रेशर कुकर ( पाच लिटर ) – एक नग
  • कढई ( स्टील ) – एक नग
  • स्टील टाकी ( मोठ्या झाकाणासाहित ) – एक नग
  • याचबरोबर पात्र बांधकाम कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा संच्यामध्ये  खालील वस्तूंचा समवेश असावा
  • प्लास्टिक चटई, मच्छरदाणी, सोलर टॉर्च, जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली, खांद्यावरील बॅग, पत्र्याची पेटी, इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.
  • लाभार्थी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच पुरविण्याबाबत ई-निविदा पद्धतीचा अवलंब करून नोंदणीकृत, नामांकित व अनुभवी संस्थेची निवड करावी, तसेच यासंदर्भात उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
  • बांधकाम कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा संच मधील पुरविण्यात येणाऱ्या वस्तूंचे दर, पुरवठा, वाहतूक आणि वितरण व सर्व करांसहित निचित करण्यात यावे.
  • बांधकाम कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) च्या निविदा स्वीकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक वस्तू संच मधील वस्तूंच्या दर्जाची शासन मान्य प्रयोग शाळेकडून तपासणी व खात्री करून घावी व तसे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अत्यावश्यक वस्तूंचे वितरण लाभार्थी कामगारांमध्ये करावे.
  • यामध्ये सबंधित सहाय्यक कामगार आयुक्त यांनी रीतसर प्रमाणित केलेल्या पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या यादीनुसार विहित मुदतीचे आत अत्यावश्यक वस्तू संच पुरवठा करावा.
  • पात्र लाभार्थी बांधकाम कामगरांना अत्यावश्यक वस्तू संच प्राप्त झाल्याचे सरकारी कामगार अधिकारी यांनी खात्री करून व पुरवठा केल्याची पोचपावती उपायुक्त कामगार यांना सादर करावी. अत्यावश्यक वस्तू संच पुरवठ्याचा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीतून भागविण्यात यावा. सदर योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणी व देखरेखीचे काम कामगार आयुक्त यांनी पाहावे.
  • लाभार्थी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच पुरवठा करण्याची कार्यवाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी. कालावधी वाढविण्यास मान्यता देण्याचे अधिकार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास राहतील.

Maharashtra Bandhakam Kamgar Registration Online

  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी पात्र बांधकाम कामगारांना सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईट वर नोंदणी करावी लागेल, नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे राहील.

maharashtra construction workers registration

  • सर्वप्रथम पात्र लाभार्थ्याना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट भेट देणे आवशयक आहे www.mahabocw.in
  • वेबसाईट वर गेल्यावर तुमच्यासमोर होम पेज उघडेल होम पेजवर तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील त्यापैकी बांधकाम कामगार नोंदणी या ऑप्शन वर क्लिक करा.
  • या ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर दुसरे पेज ओपन होईल, या सूचीमधून तुमच्या जवळचे स्थान निवडा.

maharashtra construction workers registration

  • त्यानंतर या सबंधित फिल्डमध्ये तुमचा बारा अंकी आधार क्रमांक आणि सक्रीय मोबाइल नंबर भरा आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसिड टू फॉर्म बटनावर क्लिक करावे लागेल.
  • तुम्ही दिलेल्या मोबाइल एक OTP पाठविला जाईल, त्याची पडताळणी करून त्यानुसार पुढच्या स्टेप वर जा
  • आता तुम्हाला महाराष्ट्र बांधकाम कामगारांसाठी नोंदणी फॉर्म दिसेल, त्यामध्ये आवश्यक संपूर्ण माहिती भरा जसे कि वैयक्तिक माहित, रहिवासी पत्ता, कुटुंबाची पूर्ण माहिती, बँक खात्याचे पूर्ण तपशील, रोजगाराचे तपशील
  • यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे आवश्यक त्या आकारात आणि फॉरमॅट मध्ये अपलोड करा, आणि चेकबॉक्स वर खूण करून पुडे जाण्यासाठी सेव बटनावर क्लिक करा.
  • आता तुमचा अर्ज स्क्रीनवर प्रदर्शित होईल आणि नंतर वापरण्यासाठी ते लक्षात ठेवा, अशाप्रकारे तुमची मंडळाच्या वेबसाईट वर नोंदणी पूर्ण होईल.

महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी (ऑफलाईन)

  • महाराष्ट्र शासनाच्या इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी कामगारांना मंडळाच्या अधिकृत वेबपोर्टल वर जाऊन ऑनलाइन पद्धतीच्या व्यतिरिक्त कामगार थेट BOCW मंडळाच्या संबधित कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नोंदणी फॉर्म भरू शकतात. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया आहे.

maharashtra construction workers registration

  • ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासठी सर्व सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या कामगार मंडळाच्या अधिकृत  वेबसाईट वर जाऊन कामगार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करावा लागेल किंवा सरळ खाली दिलेल्या लिंकवरून फॉर्म डाऊनलोड करून घावा.
  • यानंतर फॉर्मची प्रिंटआउट काढून घावी लागेल, या नंतर पूर्ण तपशीलवार माहिती भरून फॉर्म पूर्ण करा
  • फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा
  • यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सबंधित कार्यालयात जाऊन जमा करा.
  • नोंदणी फॉर्म कार्यालयात जमा केल्यानंतर तुम्हाला याच्या संबंधित पोचपावती मिळेल, ती पावती सुरक्षित ठेवा. नोंदणी फॉर्मची पडताळणी पूर्ण झाल्यावर अधिकारी तुमचा नोंदणी फॉर्म पुढे पाठवतील.

कामगारांनी त्यांच्या प्रोफाईल मध्ये लॉगिन करण्याची प्रक्रिया 

कामगार कल्याणकारी मंडळामध्ये यशस्वीरित्या नोंदणी झाल्यानंतर. महाराष्ट्रातील बांधकाम कामगार शासनाच्या या अधिकृत वेबसाईट वर लॉगिन करून मंडळाच्या कामगारांसाठी सुरु केलेल्या विविध योजना विषयी माहिती मिळऊ शकतात, आणि त्याचप्रमाणे त्यांच्या सबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या प्रोफाईल मध्ये लॉगिन करू शकतात. प्रोफाईल मध्ये लॉगिन करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया आहे.

maharashtra construction workers registration

  • सर्व प्रथम आपल्याला महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या पोर्टलवर भेट द्यावी लागेल यानंतर तुमच्यासमोर पोर्टलचे होम पेज उघडेल.
  • यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉगिन बटनावर क्लिक करा.
    यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल यामध्ये तुमचा आधारकार्ड क्रमांक आणि तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर भरा आणि लॉगिन बटनावर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाइल वर एक OTP पाठविला जाईल, या नंतर पोर्टलवर संपूर्ण तपासणी झाल्यावर तुमचे बांधकाम कामगार प्रोफाईल उघडेल.

Maharashtra Construction Workers Registration Renewal 

  • महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळामध्ये आधीच नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना कामगार मंडळाच्या योजनांचा सत्यात्याने लाभ मिळविण्यासाठी नोंदणीकृत कामगारांना ठराविक कालावधीनंतर त्यांच्या नोंदणीचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे, नोंदणीचे नुतनीकरण करण्यासाठी खालील पद्धतीचे अनुसरण करा.
  • महाराष्ट्राच्या BOCW च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, या नंतर कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाइन रिनिवल या बटनावर क्लिक करा, तुमच्यासमोर एक नविन विंडो उघडेल या नंतर खालील पर्ययामधून तुमच्या सबंधित पर्याय निवडा.

maharashtra construction workers registration

  • यामध्ये तुम्ही निवडलेल्या पर्ययानुसार सम्पूर्ण तपशीलवार माहिती भरा
  • यानंतर तुमच्या समोर एक नुतनीकरण फॉर्म उघडेल यामध्ये संपूर्ण तपशिलासह माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.

maharashtra construction workers registration

  • वेबसाईट वर तुमची कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईट सबंधित नियमांचा आणि अटी यांचा एक चेक बॉक्स येईल त्याला टिक करून आपला नुतनीकरण अर्ज सबमिट करा.
  • नुतानिकरणासाठी लागणारी आवशयक कागदपत्रे या प्रमाणे आहे : कामगाराचे ओळखपत्र, अधिकृत 90 दिवस बांधकामचे प्रमाणपत्र, इत्यादी 

BOCW मंडळाच्या अंतर्गत दावा अर्ज कसा करावा ?

  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये कामगारांना दावा करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया असेल

maharashtra construction workers registration

  • महाराष्ट्राच्या कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबपोर्टल वर जाऊन, वेबसाईट च्या होम पेज वर पुढील ऑप्शनवर क्लिक करा कंस्ट्रक्शन्स वर्कर अप्लाय ऑनलाइन फॉर क्लेम
  • उघडलेल्या पेजवर समोरील सबंधित ऑप्शन निवडा, नवीन दावा / दावा अपडेट
  • त्यानंतर निवडलेल्या ऑप्शन नुसार तुमचा नोंदणी क्रमांक किंवा पोचपावती क्रमांक प्रविष्ट करा
  • समोर दिसत असलेल्या क्लेम फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तपशीलवार भरा, त्यानंतर निर्धारित पध्दतीने आवश्यक कागदांची यादी अपलोड करा.
  • या संपूर्ण पडताळणी करून सबमिट बटनावर क्लिक करून रीतसर भरलेला फॉर्म सबमिट करावा.

Mahabocw संपर्क:- हेल्पडेस्क 

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना, कामगार नोंदणी, दावा फॉर्म, नोंदणी नुतनीकरण, किंवा मंडळाच्या पोर्टल विषयी काही प्रश्न किंवा आणखी माहिती जाणून घायची असल्यास, खालीलप्रमाणे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
वाचक मित्रहो या लेखामध्ये आम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामगारांच्या कल्याणासाठी असलेल्या योजना आणि कामगारांची नोंदणी, नोंदणी नुतनीकरण इत्यादी संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही आपल्याला आणखी माहिती जाणून घायची असल्यास खालीलप्रमाणे संपर्क करावा.
 
MahabocwClick Here
RegistrationClick Here
Online ClaimClick Here
Application FormClick Here
फोन (022) 26572631
कार्यालयाचा पत्ता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, पाचवा मजला, एम एमटीसी हाउस, प्लॉट सी–22, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे(ई), मुंबई–40051, महाराष्ट्र
ई-मेल [email protected]

 महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी FAQ 

Q. महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाच्या कामगारांसाठी कोणत्या योजना आहेत ?
 
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाव्दारे नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना, आरोग्य योजना, शैक्षणिक योजना, आणि आर्थिक लाभ या प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
 
Q. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये कोण नोंदणी करू शकतात ? आणि पात्रता
 
ज्या बांधकाम कामगरांचे वय 18 ते 60 वर्षाच्या आत आहे असे बांधकाम कामगार मंडळा मध्ये नोंदणी करू शकतात आणि त्यांनी वर्षभरात 90 दिवस बांधकामचे काम करणे अनिवार्य आहे.
 
Q. How Can I Register For BOCW In Maharashtra?
 
आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत mahabocw मंडळाच्या वेबसाईट वर जाऊन नोंदणी फॉर्म डाऊनलोड करावा लागेल किंवा आपण ऑनलाइन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नोंदणी करू शकता.
 
Q. What Is BOCW Registration?
 
बांधकाम क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण नागरिक बांधकाम कामगार म्हणून काम करतात, त्यांना बांधकाम क्षेत्रा मध्ये अत्यंत जोखिमीच्या परिस्थितीत काम करावे लागते, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबांना या सर्व समस्यांना सामोरे जावे लगते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अशा सर्व कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सामजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना बांधकाम कामगारांसाठी सुरु केल्या आहेत, या सर्व योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे, या कल्याणकारी मंडळामार्फत या सर्व योजनांची अंमलबजावणी केली जाते.

Leave a Comment