स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना मराठी: नोंदणी, ऑनलाइन अर्ज

स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना | Balasaheb Thakre Accidental  Insurance Scheme | सरकारी योजना | महाराष्ट्र सरकारी योजना | अपघात विमा योजना महाराष्ट्र | बाळासाहेब ठाकरे योजना ऑनलाइन नोंदणी | स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते  अपघात विमा योजना संपूर्ण माहिती मराठी

देशातील किंवा राज्यातील रस्त्यावर वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे शहरातील रस्त्यांवर असो अथवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागते, त्याचप्रमाणे या अपघातांमध्ये काही नागरिकांना कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागते, या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्वाची योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्याचे ठरविले आहे.

हि योजना चार वर्षापूर्वी तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात आखली गेली होती, 16 सप्टेंबर 2020 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी मिळाली आहे, या योजनेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीला आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच या योजनेसाठी विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल. वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण माहिती मराठी 

अपघात झाल्यानंतर सुरवातीचे काही तास अपघात ग्रस्त व्यक्तीसाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असते, या अत्यंत महत्वाच्या वेळेला वैद्यकीय क्षेत्रात गोल्डन अवर म्हणतात या कालावधीत जर अपघात ग्रस्त व्यक्तीला वेळेवर प्राथमिक उपचार मिळाले तर त्या व्यत्क्तीचे प्राण वाचू शकतात. या योजनेच्या अंतर्गत अपघात झालेला नागरिक कोणत्याही राज्याचा अथवा कोणत्याही देशाचा असला तरी त्यांना योग्य तो उपचार देण्यात येईल, या योजनेच्या अंतर्गत अपघात झालेल्या नागरिकांना गोल्डन अवरमध्ये अत्यंत तत्परतेने वैद्यकीय सेवा आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येईल.

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

या योजनेस सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून मान्यता देण्यात आली आहे, त्यानुसार 14 ऑक्टोबर 2020 पासून संपूर्ण राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना नागरिकांचे प्राण वाचाविण्यासाठी अत्यंत लाभकारी ठरणार आहे, रस्त्यावर अपघात झालेल्या नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे.

                Mahadbt scholarship 

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना वैशिष्ट्ये 

अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे आणि तसेच नागरिकांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने हि योजना अत्यंत महत्वाची आहे. माहितीनुसार राज्यातील महामार्गावर आणि तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर झलेल्या अपघातात सरासरी दरवषी 40000 हजार नागरिक जखमी तर 13 हजार नागरिक मृत्युमुखी पडतात, या अपघातानंतर जखमी रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचविणे शक्य होते. अपघात झालेल्या व्यक्तीला गोल्डन अवरमध्ये वेळीच उपचार मिळाला आणि जर रुग्णाला वेळीच जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले तर मृत्यूचे आणि अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, यामध्ये विशेषकरून अस्थिभंगांच्या रुग्णांना तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने स्थिर करून स्थलांतरित केल्यास त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीचे नुकसान कमी होईल.

 • अपघातग्रस्त व्यक्तीस रक्तस्त्राव होत असेल आणि या रुग्णाला वेळेवर स्थलांतरित केले तर रक्त आणि रक्तघटक मिळून रुग्णाचे प्राण वाचवता येईल, तसेच जर अपघातग्रस्त व्यक्तीच्या मेंदूला इजा झाली असल्यास रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन देऊन आणि योग्य पद्धतीने स्थलांतरित केले तर अशा व्यक्तीचे प्राण वाचेल तसेच त्याच्या मेंदूला इजा कमी होण्यास मदत होईल.
 • या योजनेच्या अंतर्गत रस्त्यावरील अपघातांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला त्यांची परिस्थिती स्थिर करण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा पहिल्या 72 तासांसाठी जवळच्या अंगीकृत हॉस्पिटलमध्ये 74 उपचार पद्धतीच्या माध्यमातून देण्यात येतील.
 • स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना च्या अंतर्गत अपघात झालेल्या नागरिकांना पूर्णपणे विनामुल्य वैद्यकीय सुविधांचा लाभ देण्यात येईल.
 • बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना अंतर्गत अपघात झालेल्या व्यक्तीला 30,000/- रुपये पर्यंतचा खर्च अंतिम केलेल्या पॅकेज दरानुसार या योजनेंतर्गत अंगीकृत हॉस्पिटला विमाकंपनी कडून अदा करण्यात येईल.
 • अपघातग्रस्त रुग्णाला स्थलांतरित करण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी सुविधा उपलब्ध नसल्यास अशा सुविधा उपलब्ध असलेल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये 108 रुग्णवाहिकेने स्थलांतरित केले जाईल, जर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास पर्यायी रुग्णवाहिकेने स्थलांतरित केले जाईल अशा परीस्थित पॅकेजच्या दराव्यतिरिक्त 1000/- रुपये पर्यंत रुग्णवाहिकेचे भाडे विमा कंपनी मार्फत हॉस्पिटलला देण्यात येईल.
 • हॉस्पिटल जर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत मान्यताप्राप्त असेल आणि अपघातग्रस्त व्यक्ती या योजनेचा लाभार्थी असेल व होणारे उपचार योजनेपैकी असून त्याची पूर्व मंजुरी मिळाली असेल तर त्या उपचारासंबंधी या योजनेची रक्कम रुग्णालयास मिळणार नाही, अशा परीस्थितीत रुग्णालयास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पॅकेजमधील आर्थिक तरतूद मिळेल.

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना मुख्य Highlights   

योजनेचे नावस्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना
राज्य महाराष्ट्र
व्दारा सुरुवात महाराष्ट्र शासन
लाभार्थी राज्याचे नागरिक
उद्देश्य अपघातग्रस्त व्यक्तीला पहिल्या 72 तासात तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे
वर्ष 16 सप्टेंबर 2020
विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन

स्व. बाळसाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना उद्देश

महाराष्ट्र राज्यात नागरिकांना तत्परतेने गोल्डन अवर मध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्व. बाळसाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबविली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत शासनाचा उद्देश आहे अपघातग्रस्त नागरिकांना 74 उपचार पद्धतीतून जवळपास 30.000/- रुपयांपर्यंतचा खर्च विनामुल्य केला जाईल, त्याचबरोबर यामध्ये अतिदक्षता विभाग व वॉर्डा मधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णालयातील वास्तव्यातील भोजन यांचा समावेश असेल. स्व. बाळसाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा उद्देश अपघातग्रस्त रुग्णांना तत्काळ उपचार उपलब्ध करून देणे जेणेकरून अपघातग्रस्त नागरिकाचे प्राण वाचविता येईल, आणि हे अपघातग्रस्त नागरिकांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना अंतर्गत मिळणारे लाभ

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा महाराष्ट्रातील ग्रामीण अथवा महामार्गावर होणाऱ्या अपघातामधील जखमींना लाभ मिळणार आहे. हि योजना राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत मोलाची आणि जीवनदायी ठरणार आहे, अपघातग्रस्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही राज्यातील किंवा देशातील असला तरीही त्यांना या योजनेंतर्गत योग्य वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहे. या योजनेचे लाभ पुढीलप्रमाणे आहेत.

 • स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना अंतर्गत अपघातग्रस्तांना 108 रुग्णवाहिकेने किंवा उपलब्ध नसल्यास खाजगी रुग्णवाहिकेने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाईल
 • हॉस्पिटलमध्ये (कॅशलेस हॉस्पिटलायझेशन) तत्काळ दाखल करण्याची सुविधा
 • अपघात झालेल्या रुग्णावर तीन दिवसापर्यंत रुग्णालयात उपचार
 • रुग्णाला घरी किंवा अन्य रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पोहचविण्याची जवाबदारी.
 • यासाठी एक हजार रुपयांपर्यंत रुग्णवाहिकेचा अतिरिक्त खर्चही सरकार करेल.
 • या योजनेंतर्गत 30,000/- रुपयांच्या विमा संरक्षणांतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, नर्सिंग, शस्त्रक्रिया, वैद्यकीय सल्ल्याचा खर्च त्याचप्रमाणे रक्त व ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा खर्च. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वयाची अट नाही.
 • या योजनेंतर्गत विमा प्रीमियमची रक्कम अजून निश्चित झालेली नसली तरी अपघात झालेल्या व्यक्तीवर उपचारासाठी 30,000/- रुपये खर्च करण्याचे निश्चित झाले आहे.

या योजनेमध्ये समविष्ट नाही:-

 • या योजनेंतर्गत घरी घडलेले अपघात किंवा दैनंदिन कामातून घडलेले अपघात तसेच औद्योगिकी अपघात आणि रेल्वे अपघात यांचा समावेश नाही
 • तसेच स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेतलेला व्यक्ती किंवा दारूच्या नशेत असलेला व्यक्ती अथवा राज्याच्या बाहेर अपघात झालेला व्यक्तीला उपचारासाठी या योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळणार नाही.

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना अंमलबजावणी प्रक्रिया

या योजनेंतर्गत प्रतिसाद :-

ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्या ठिकाणाजवळची कोणतीही व्यक्ती 108 या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावेल, आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागांतर्फे अपघाताच्या ठिकाणावर रुग्णवाहिका पाठवली जाईल, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास खाजगी रुग्णवाहिकेने अपघातग्रस्त रुग्णास जवळच्या अंगीकृत हॉस्पिटलमध्ये नेण्याची परवानगी असेल, अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयामध्ये निशुल्क वैद्यकीय सेवा व उपचार दिले जातील. रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून पहिल्या 72 तासांमध्ये दिलेल्या उपचारांच्या खर्चापोटी विमा कंपनी मार्फत रुग्णालयांचे दावे अदा करणायत येतील.

या योजनेंतर्गत हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून 72 तसापर्यंत निशुल्क अनुज्ञेय सेवा:

 • अपघातग्रस्त हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून 72 तासापर्यंत खालीलप्रमाणे निशुल्क वैद्यकीय सेवा अनुज्ञेय राहतील.
 • अपघातग्रस्त व्यक्तीच्या जखमेतून होणारा रक्त प्रवाह थांबविणे, जखमेला टाके घालणे आणि तसेच ड्रेसिंग करणे असे प्राथमिक उपचार करणे.
 • अतिदक्षता विभाग, वार्डामधील उपचार
 • अस्थिभंग, हेड इंज्युरी, पाठीच्या मणक्याला झालेली दुखापत, जाळाल्यामुळे झालेली दुखापत आणि यावरील उपचार.
 • अस्थिभंग रुग्णांसाठी आकस्मिक परिस्थितीला लागणारे इम्प्लांटस् देणे.
 • रुग्णास साधारण रक्तस्त्राव झाला असेल तर रक्त देणे, अतिरिक्त रक्तस्त्राव झाला असल्यास रक्त घटक पी.सी.वी. देणे, अपघातामुळे जळालेला रुग्ण आल्यास आवश्यकतेनुसार रक्त घटक देणे, अपघातामुळे अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे आवश्यकतेनुसार ताजे रक्त किंवा रक्त घटक देणे.
 • तज्ञांनी सुचविलेला 74 प्रोसिजर्स मधील विविध तपासण्या व औषधोपचार.
 • रुग्णांच्या रुग्णालयातील वास्तव्याच्या कालावधीत भोजन.

अंगीकृत रुग्णालये :- 

Emergency आणि Polytrauma services देण्याची सुविधा असलेली सर्व शासकीय आणि इच्छुक खाजगी रुग्णालये तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधील Emergency आणि Polytrauma services साठी इच्छुक अंगीकृत रुग्णालयांना या योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात येईल, 108 रुग्णवाहीकेव्दारे किंवा ती उपलब्ध नसल्यास इतर पर्यायाने अपघातग्रस्त रुग्णास अंगीकृत रुग्णालयात स्थलांतरित केले जाईल. अंगीकृत रुग्णालयांची GPS व्दारे mapping केली जाईल, उपलब्ध उपचार सुविधेच्या आधारे रुग्णालयांची Level 1 (Super Speciality Care), Level 2 (Secondary Care), Level 3 (First Referal Care) अशी वर्गवारी करण्यात येईल, हि योजना विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार असून निविदा पद्धतीने निवडण्यात आलेली विमा कंपनी व राज्य आरोग्य हमी सोसायटी तसेच विमा कंपनी व इच्छुक रुग्णालये यांच्यामध्ये करार करण्यात येईल.

या योजने अंतर्गत स्वतंत्र संगणक प्रणाली :- 

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार असून विमा कंपनीस थर्डपार्टी प्रशासक नेमण्याची परवानगी असेल, रुग्ण नोंदणी, रुग्णालय अंगीकरण, उपचारपूर्व मान्यता, दाव्यांचे प्रदान यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात येईल. विमा कंपनीकडून अंगीकृत रुग्णालयास उपचारांसाठी मान्यता सहा तासात दिली जाईल, तथापि अपघातग्रस्त रुग्णावर रुग्णालयाने उपचार सुरु करावेत, त्यानंतर संगणकीय प्रणालीवर उपचारास मान्यता घ्यावी असे अपेक्षित आहे. अंगीकृत रुग्णालयाने सादर केलेल्या दाव्यांचे प्रदान पंधरा दिवसात केले जाईल.

               प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना 

विमा कंपनीच्या प्रीमियम बाबत अटी :– 

विमा कंपनीने प्रतीव्यक्ती प्रतीवर्षी असा प्रीमियम सादर करणे आवश्यक राहील. रुग्णालयात दाखल होणारा रुग्ण हा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभार्थी असेल आणि रुग्णावरील उपचार योजनेच्या उपचारांपैकी असेल व रुग्णालय योजनेंतर्गत अंगीकृत असेल तर रुग्णालयास या योजनेंतर्गत पॅकेज रक्कम देय नाही.

योजनेसाठी कॉल सेंटर :- 

या योजनेची माहिती प्राप्त करण्यासाठी तसेच सेवेविषयी तक्रार नोंदविण्यासाठी टोल-फ्री क्रमांकासह कॉल सेंटर कार्यान्वीत करण्यात येईल. योजनेची माहिती प्राप्त करण्यासाठी तसेच सेवेविषयी तक्रार नोंदविण्यासाठी 24 x 7 टोल-फ्री नंबर असेल, सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कॉल सेंटर राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत चालविण्यात येत आहे. म्हणून नवीन योजनेचे काल सेंटर प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याची जबाबदारी राज्य आरोग्य हमी सोसायटीची राहील. स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना योजनेची अंमलबजावणी आणि संनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून करण्यात येईल. तसेच या योजनेसाठी प्रतिवर्ष आवश्यक आर्थिक अनुदान शासनाकडून राज्य आरोग्य हमी सोसायटीला उपलब्ध करून देण्यात येईल.

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना लाभ राज्यातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमध्ये अपघातग्रस्त होणाऱ्या नागरिकांना होणार आहे, अपघातग्रस्त व्यक्तीला जर ताबडतोब वैद्यकीय उपचार मिळाला तर त्यांचे प्राण वाचू शकतात तसेच अपघातग्रस्तांना उपचार विनामुल्य मिळाले तर त्यांना दिलासा मिळेल, त्यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तींना विम्याचा लाभ देण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. वाचक मित्रहो, या लेखामध्ये या योजनेबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. हि योजना सुरवातीच्या टप्प्यावर असल्यामुळे योजनेमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया, योजनेचा टोल-फ्री नंबर इत्यादी माहिती अपडेट करण्यात आलेली नाही, याबद्दल माहिती उपलब्ध झाल्यास अपडेट करण्यात येईल.

शासन निर्णय PDFClick Here
महाराष्ट्र सरकारी योजना Click Here

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना FAQ

Q. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना काय आहे ?  

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दरवर्षी रस्त्यांवरील अपघातांमध्ये सरासरी चाळीस हजार नागरिक जखमी होतात आणि जवळपास तेरा हजार नागरिकांचा मृत्यू होतो, या अपघातग्रस्तांना जर सुरवातीच्या कालावधीत तत्काळ उपचार मिळाला तर त्यांचे प्राण वाचू शकते तसेच इजा कमी होण्यास मदत होते, या सर्व बाबींचा विचार करून शासनाने बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना सुरु केली आहे.

Q. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना कोणासाठी आहे ?

या योजनेच्या अंतर्गत कोणत्याही राज्याच्या किंवा देशाच्या नागरिकांना जर महाराष्ट्र राज्यात रस्ते अपघात झाल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यांना या योजनेच्या अंतर्गत विनामूल्य उपचार देण्यात येतील.

Q. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेमध्ये कोणते अपघात समविष्ट आहेत ?

या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर झालेले अपघात किंवा राज्यातील महामार्गावरील झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो, परंतु यामध्ये औद्योगिक अपघात, रेल्वेचे अपघात, घरी झालेले अपघात किंवा दैनंदिन कामातील अपघातांचा समावेश नाही, यासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Q. स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेमध्ये किती लाभ मिळतो ?

या योजनेच्या अंतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीला स्थिर करण्यासाठी पहिल्या 72 तासांसाठी जवळच्या रुग्णालयात 74 उपचार पद्धतीच्या माध्यमातून विनामुल्य उपचार केला जातो, यासाठी शासनाकडून 30,000/- रुपयांपर्यंतचा खर्च विनामुल्य केला जातो.

Leave a Comment