महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र 2024 मराठी : अर्ज ऑनलाइन | rojgar.mahaswayam.gov.in

Maharashtra Mahaswayam Employment Registration | महाराष्ट्र महास्वयम् रोजगार नोंदणी 2024 संपूर्ण माहिती मराठी | सरकारी योजना | महाराष्ट्र सरकारी योजना | महास्वयम् पोर्टल ऑनलाईन अर्ज | Maharashtra Mahaswayam Rojgar Nondani | Mahaswayam Online Portal | Mahaswayam In Marathi

भारत देशात मनुष्यबळ मोठया प्रमाणात उपलब्ध आहे या मनुष्यबळाचा संपूर्ण उपयोग व्हावा यासाठी भारताला जगाची मानव संसाधनाची राजधानी बनविण्याचे धोरण माननीय प्रधानमंत्री यांनी जाहीर केले आहे, या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2022 पर्यंत 4.5 कोटी कुशलमनुष्यबळ निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे मनुष्यबळाच्या दृष्टीकोनातून दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्र सरकारला हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 45 लाख कुशल मनुष्यबळाची गरज असेल, या उद्देशाने राज्याव्दारे दरवर्षी मोठ्याप्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण केल्या जाईल.

महाराष्ट्र राज्यात मोठ्याप्रमाणात सुशिक्षित बेरोजगार असलेले तरुण आहेत, जे रोजगाराच्या शोधात असतात परंतु त्यांना रोजगार शोधण्यात अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो, या सर्व बेरोजगार तरुणांच्या अडचणी व समस्या विचारात घेऊन राज्य शासनाने महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करून देणार आहे, या माध्यमातून बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा शासनाचा उद्देश आहे. वाचक मित्रहो या लेखात आपण शासनाच्या महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल संबंधित संपूर्ण माहिती उदाः ऑनलाईन अर्ज कसा करावा, ऑफलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्र, इत्यादी माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र 2024 संपूर्ण माहिती मराठी

महाराष्ट्र शासनाने राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी तसेच रोजगार शोधणाऱ्या तरुणांना सुविधा निर्माण करून देण्यासाठी या महास्वयम् पोर्टलची राज्यात सुरुवात केली आहे, महास्वयम् याचा अर्थ होतो, महा म्हणजे महाराष्ट्र आणि स्वयं याचा अर्थ होतो विद्यार्थी, रोजगार शोधणारा तरुण, उद्योजक, प्रशिक्षण देणारा प्रशिक्षक या सर्व लोकांना एकाच प्लॅटफॉर्म एकत्र आणण्याचा राज्य शासनाचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाचे महास्वयम् पोर्टल हे शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणारे उद्योजक व कौशल्या संबंधित उद्योगांमधील रोजगार आणि कुशल मनुष्यबळ यांना एकत्रित करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

महास्वयम् पोर्टल हे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सुविधा या पद्धतीने काम करणार आहे, या प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी वापरता येणार आहे, या वेबपोर्टलवर कुशल मनुष्यबळाची माहिती उपलब्ध करता येईल तसेच प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल, या वेबपोर्टलवर नोंदणी करणाऱ्या उमेदवारास एकाच  प्लॅटफॉर्मवर कौशल्या संबंधित उपक्रम व कौशल्य विकास आणि उपलब्ध रोजगार या विषयीची संपूर्ण एकत्रित माहिती उपलब्ध होणार आहे. या वेबपोर्टलवर उमेदवारांना एकाच क्लिकवर रोजगारा संबंधित संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे, तसेच या संबंधित एसएमएस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र
महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र

महास्वयम् पोर्टलच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगार उपलब्ध असण्याविषयीची माहिती तसेच नोंदणी प्रक्रिया आणि नोकरीसाठी अर्ज करणे, प्रशिक्षणाविषयीची संपूर्ण माहिती, रोजगार मेळाव्यांबद्दल माहिती त्याचप्रमाणे मेळाव्यात सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, कौशल्य विकास योजनेत सहभागी होणे, उपलब्ध नोकऱ्यांसाठी अर्ज करणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आहे.

               महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता 

महास्वयम् रोजगार नोंदणी 2024 महाराष्ट्र पोर्टलचे वैशिष्ट्ये 

महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक एकत्रित सर्व सुविधायुक्त महास्वयम् रोजगार नोंदणी वेब पोर्टल सुरु केले आहे, या पोर्टलच्या अंतर्गत महाराष्ट्रातील नोकरी शोधणाऱ्या बेरोजगार तरुणांना रोजगार शोधण्यासाठी ऑनलाइन सुविधा देण्यात आली आहे. राज्यातील बेरोजगार तरुण या महास्वयम् पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. या पोर्टलच्या माध्यमातून विविध कंपन्या, उद्योग, सरकारी, निमसरकारी, विविध संस्थांव्दारे उपलब्ध करण्यात आलेल्या रोजगारांची माहिती बेरोजगार तरुणांना सहजपद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र पोर्टलच्या अंतर्गत विविध कौशल्यसंबंधित उपक्रमांमध्ये रोजगार शोधणाऱ्या उमेदवारांना सुलभतेने रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या या महास्वयम पोर्टलचे प्रथम तीन भाग करण्यात आले होते, पहिला भाग बेरोजगार तरुणांसाठी महारोजागर (Maharojgar), यामध्ये दुसरा भाग होता कौशल्य विकास (MSSDS) आणि पोर्टलचा तिसरा भाग म्हणजे स्वयंरोजगार (Mahaswayam Rojgar) शासनाने या तीन भागांमधील सुविधांसाठी वेगवेगळे पोर्टल्स उपलब्ध करून दिले होते. ते पोर्टल्स आता महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र पोर्टल अंतर्गत जोडण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील रोजगाराच्या शोधात असलेले सर्व बेरोजगार तरुण, शासनाच्या महास्वयम् पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून त्यांच्या कौशल्या प्रमाणे व पात्रतेप्रमाणे रोजगार मिळवू शकतात.

 • महाराष्ट्र शासनच्या कौशल्य विकास आणि उद्योग विभागाव्दारे हे महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र पोर्टल तयार करण्यात आले आहे.
 • या पोर्टलचा उद्देश आहे राज्यात कौशल्य विकासाला गती देणे त्याचबरोबर राज्यातील रोजगार शोधणाऱ्या तरुणांना नोकरीच्या संधी उपलभ करून देणे.
 • महास्वयम् पोर्टलच्या माध्यमातून रोजगाराची उपलब्धता तसेच विविध प्रकारचे सर्व कौशल्यविकास प्रशिक्षण आणि उद्योग विकासासंबंधित माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे.
 • या महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण, विद्यार्थी नोंदणी केल्यानंतर विविध प्रकारच्या सर्व कौशल्यविकास प्रशिक्षणाची माहिती तसेच विविध प्रकारच्या रोजगारांसंबंधित माहिती आणि रोजगार मेळाव्या संबंधित माहिती मिळवू शकतात.
 • या वेबपोर्टलच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक त्यांच्या आस्थापनांची ऑनलाइन नोंदणी पोर्टलवर करून, पोर्टलव्दारे उद्योजक त्यांच्याकडील मनुष्यबळाची मागणी पूर्ण करून घेऊ शकतात.

महास्वयम् वेबसाईटवर विविध पर्यायांतर्गत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी (Employment) पर्यायांतर्गत नोकरी शोधणारे तरुण ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी करू शकतात, शैक्षणिक पात्रता सुविधा देण्यात आली आहे, तसेच रोजगार शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उद्योजकता (Entreprneurship) या पर्यायांतर्गत स्वयंरोजगारची सुविधा आणि कौशल्य विकास (Skill Development) पर्यायांतर्गत कौशल्य प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या पोर्टल अंतर्गत उद्योजकांसाठी (Employer) या पर्यायांतर्गत तात्पुरती किंवा कायम रिक्त पदे, रोजगार मेळावा, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमा अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने पदे अधिसूचित करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. या पोर्टलवर यासर्व सुविधा विनामुल्य उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

                Mahadbt Scholarship

Maharashtra Mahaswayam Online Portal Highlights

योजनेचे नावमहास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र 2024
व्दारा सुरुवात महाराष्ट्र शासन
राज्य महाराष्ट्र
आधिकारिक वेबसाईट https://rojagar.mahaswayam.gov.in
लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे बेरोजगार तरुण
उद्देश्य तरुणांना रोजगार शोधण्याचे उत्तम माध्यम उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
विभाग कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता

महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल उद्दिष्ट (Objectives)

महाराष्ट्र राज्य हे लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून देशात दुसरे मोठे राज्य आहे, आपल्याला दिसून येईल राज्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे, ज्यांच्या कडे डिग्री किंवा डिप्लोमा आणि अनुभव असून सुद्धा तरुण बेरोजगार आहे तसेच ज्यांच्या कडे कौशल्य आहे त्यांना त्यांच्या कौशाल्याप्रमाणे रोजगार मिळाला नाही, बेरोजगारीची हि समस्या संपूर्ण राज्यांमध्येच आहे, शासनाकडून बेरोजगारीची हि समस्या कमी करण्याच्या दृष्टीने तसेच तरुणांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार मिळावा या उद्देशाने विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.

महाराष्ट्र शासनाव्दारा सुरु करण्यात आलेल्या महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र उद्देश आहे राज्यातील युवकांना त्यांच्या कौशल्यासंबंधित रोजगार मिळावा आणि उद्योजक यांना एकत्रित एकाच प्लॅटफॉर्मवर आणणे तसेच या पोर्टलच्या माध्यमातून सभासदांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या रिक्त जागा आणि उद्योजकता विकास कार्यक्रमांशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी एकच प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. महास्वयम् पोर्टलचे उद्दिष्ट केवळ कौशल्य विकास व तरुणांनासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि राज्यातील युवकांना सशक्त करणे एवढेच नाही तर रोजगार देणारे व्यवसायी व रोजगार शोधणारे आणि इतर सभासदांना एका समान व्यासपीठावर एकत्रित करणे हे आहे. महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र पोर्टलव्दारे विविध कंपन्यांकडून रोजगार शोधणाऱ्यांना नोकऱ्या सहज उपलब्ध करून दिल्या जातात.

             399/- पोस्ट ऑफिस दुर्घटना विमा योजना

महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल उपलब्ध सुविधा

महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टलवर नोकरीसाठी नोंदणी केल्यानंतर खालीलप्रमाणे सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात

 • कार्पोरेशन प्लान
 • स्वयंरोजगार योजना
 • स्वयंरोजगार कर्ज
 • ऑनलाइन कर्जाची पात्रता
 • नोकरी शोधणे
 • रोजगारासाठी अर्ज करणे
 • कर्ज परतफेड स्थिती
 • हेल्प लाईन क्रमांक 
 • अशा प्रकारच्या महत्वाच्या सुविधा महास्वयम् पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात

महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र 2024 लाभ

महाराष्ट्र शासनाच्या महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र पोर्टलच्या माध्यमातून नोंदणीकृत उमेदवारांना खालीलप्रमाणे सुविधा आणि लाभ उपलब्ध करून दिल्या जातात.

 • महास्वयम् पोर्टलवर महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतात या पोर्टलचा लाभ राज्यातील तरुणांना होणार आहे.
 • राज्यातील रोजगार इच्छुक बेरोजगार तरुणांनी या पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केल्यावर त्यांना रोजगारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
 • या पोर्टलच्या माध्यमातून कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षण दिल्या जाईल, त्यामुळे राज्यात कौशल्य विकास योजनेला गती मिळेल.
 • महास्वयम् पोर्टलच्या माध्यमातून उमेदवार त्यांच्या कौशल्यासंबंधित उपक्रमांमध्ये नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
 • राज्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार संदर्भात, कौशल्य विकास योजना तसेच रोजगार संबंधित मेळावे या सर्व सुविधांसाठी उमेदवारांना वेगवेगळ्या पोर्टलवर लॉगिन करण्याची आवश्यकता नाही या सर्व सुविधांचा लाभ एकाच महास्वयम् पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून मिळवू शकतात.
 • महास्वयम् पोर्टलवर उद्योजक त्यांच्या आस्थापना संबंधित किंवा कंपनी संदर्भात जाहिरात सुद्धा करू शकतात, त्यामुळे बेरोजगार तरुणांनी महास्वयम् पोर्टवर नोंदणी केल्यानंतर त्यांना रोजगाराच्या संधी सहजपणे उपलब्ध होतील. या पोर्टलमुळे नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगारासंदर्भातील संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 • महास्वयम् पोर्टलच्या माध्यमातून नोकरी शोधणारे बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांना रोजगार मेळाव्यात सहभागी होणे सुलभ झाले आहे, तसेच सुलभ प्रशिक्षण नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 • या पोर्टलच्या माध्यमातून उद्योजकांना त्यांना आवश्यक असलेल्या कौशल्यासंबंधित मनुष्यबळ आणि सुयोग्य उमेदवारांची यादी काढणे इत्यादी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पोर्टलवर उद्योजकांनी त्यांच्या आस्थापनांची नोंदणी करून त्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी पूर्ण करून घेऊ शकतात. 

                  Mahajobs Portal 

महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टलवर लागणारी आवश्यक कागदपत्र

महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र पोर्टलवर अर्जदाराला नोंदणी करण्याच्या वेळेस आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

 • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला
 • अर्जदाराचा मोबाईल क्रमांक
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • अर्जदाराचे वय कमीत कमी 14 वर्ष पूर्ण असावे
 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका
 • असल्यास कौशल्य प्रमाणपत्र
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
 • नगरपरिषद किंवा सरपंचाने दिलेले प्रमाणपत्र

महास्वयम् पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता

 • या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी लागणारी पात्रता खालीलप्रमाणे आहे
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 14 वर्ष असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराने पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर तर त्याला वेळोवेळी आपला अनुभव, शैक्षणिक योग्यता आणि संपर्क तपशील अपडेट करावा लागेल.
 • या पोर्टलवर बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

महास्वयम् पोर्टल या घटकांच्या अंतर्गत नोंदणी केली जाते

कमी कालावधीचे प्रशिक्षण 

 • यासाठी संबंधित संस्था आहे महाराष्ट्र राज्य स्कील डेव्हलपमेंट सोसायटी.

जास्त कालावधीचे प्रशिक्षण

 • यासाठी संस्था आहे व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय.

रोजगार मार्गदर्शन आणि चर्चा

 • यासाठी संबंधित संस्था आहे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता संचालनालय.

स्टार्ट-अप आणि नाविन्यता

 • महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी.

कर्ज: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित.

घटकसंबंधित संस्थाअधिकृत वेबसाईट
कमी कालावधीचे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य स्कील डेव्हलपमेंट सोसायटी. इथे क्लिक करा
जास्त कालावधीचे प्रशिक्षण व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयइथे क्लिक करा
रोजगार मार्गदर्शन आणि चर्चा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता संचालनालयइथे क्लिक करा
स्टार्ट-अप आणि नाविन्यता महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी इथे क्लिक करा
कर्ज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादितइथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य स्कील डेव्हलपमेंट सोसायटी: (MSSDS)

भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून मनुष्यबळाचा अधिक भरीव आणि अर्थपूर्ण लाभ घेण्यासाठी सरकारने ‘’स्कील इंडिया’’ मोहीम सुरु केली ज्याचा उद्देश उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेवटी आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी उद्योगांना नोकरीसाठी तयार कर्मचारी प्रदान करणे हा आहे. भारताच्या श्रमशक्तीला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कौशाल्यांमध्ये प्रशिक्षण देण्याची स्पष्ट संधी आहे, महाराष्ट्र राज्यात हे कौशल्य मिशन साध्य करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीची नोंदणी 15 फेब्रुवारी 2011 रोजी करण्यात आली आहे. 

हि संस्था कौशल्य विकास उपक्रमांच्या नियोजन, समन्वय, अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी आहे. हि संस्था कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनच्या विविध विभागांच्या सर्व कौशल्य विकासाच्या योजना या सोसायटीच्या एकाच छत्राखाली सक्रीय समन्वयातून एकत्रित केली जातात आणि त्यांची अंमलबजावणी केली जाते.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय 

 • महाराष्ट्र राज्यातील उद्योगांची गरज, सेवा क्षेत्रातील व्यवसाय समाज यांची गरज भागविण्यासाठी विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विविध स्वयंसेवी संस्थांना गुणवत्तापूर्ण प्रशासन व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विषयक सेवा प्रदान करण्यात येतात.
 • अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, कृषी, पॅरामेडीकल, होम सायन्स, व्यापार आणि वाणिज्य यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाची मागणी पुरवठा यांच्यात विसंगती कमी करण्यासाठी मानवी संसाधनांचा विकास करण्यासाठी संस्थांना प्रोत्साहन देणे.
 • तरुणांमधली बेरोजगारी कमी करण्यासाठी विविध व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमाव्दारे योग्य त्या औद्योगिक, स्वयं आणि मजुरी रोजगारासाठी त्यांना विविध संस्थांमध्ये योग्य प्रकारे देण्यात येणाऱ्या औपचारिक व अनौपचारिक प्रशिक्षणामार्फत सक्षम करण्यात येते.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता संचालनालय

रोजगार सुलभ करण्यासाठी आणि तरुणांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी, अशा प्रकारे सर्वसमावेशक वाढीस चालना देण्यासाठी, कौशल्य विकास आयुक्तालय, रोजगार आणि उद्योजकता स्थापन करण्यात आली. संचलनालय सुमारे 33 लाख नोकरी इच्छुक आणि 67000 पेक्षा जास्त सार्वजनिक आणि खाजगी अस्थापानांचे नियोक्ता डेटाबेस एकत्रित आणते.

DSDE&E व्दारे नोकरी शोधणारे आणि नियोक्ते यांच्यासाठी 2007 पासून नियमितपणे जॉब मेळावे आयोजित केले जातात. DSDE&E सह नोंदणीकृत उमेदवार आणि नियोक्ते या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ शकतात ज्यामध्ये नोकरी शोधणाऱ्यांना जागेवरच रोजगार मिळतो आणि नियोक्त्याला या रोजगार मेळाव्यांव्दारे त्वरित योग्य मनुष्यबळ मिळते. हि योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहे.

राज्य सरकारचा रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (EPP) हि अनुभवी, तसेच अनुभवी नोकरी शोधणाऱ्यांना खाजगी क्षेत्रातील कौशल्य आणि अनुभव संपादन करण्यासाठी आणि उन्नत करण्यासाठी नोकरीवर प्रशिक्षण देण्यासाठी एक योजना आहे. रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (EPP) चे उद्दिष्ट युवकांचे कौशल्य वाढवणे आणि त्यांना बाजाराच्या गरजेनुसार रोजगारक्षम बनविणे आहे. ईपीपी हि एक वेतन योजना आहे.

महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी 

 • महाराष्ट्र राज्यातील नावोन्मेष-चालित उद्योजकीय परीसंस्थेला चालना देण्यासाठी नोडल सरकारी एजन्सी.
 • महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या, सोसायटीचे उद्दिष्ट नाविन्यपूर्ण दृष्टीकोनांना चालना देणे आणि नाविन्यपूर्ण व्यवसायांना महाराष्ट्रात चालविण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आहे.
 • फेब्रुवारी 2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 च्या अंतर्गत, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, टीम स्टार्टअप इकोसिस्टिमला अनेक स्तरांवर समर्थन देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवत आहे.

प्रमुख उपक्रम :-

 • महाराष्ट्र स्टार्टअप विक (MSW)
 • इन्क्युबेटर्सचे नेटवर्क
 • हिरकणी महाराष्ट्राची
 • जिल्हा व्यवसाय योजना स्पर्धा
 • स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित

कुशल कामगारांना आत्मसात करण्यासाठी रोजगार निर्मिती आणि उद्योजकता प्रोत्साहन महत्वपूर्ण ठरते. हि वस्तुस्थिती आहे कि उद्योजक केवळ आर्थिक प्रगतीस हातभार लावत नाहीत, तर ते स्वतःसाठी उत्पन्न आणि रोजगाराचे स्त्रोत प्रदान करतात. इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतात आणि किफायतशीर पद्धतीने नवीन आणि नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांची निर्मिती करतात. त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी उद्योजकतेला गती देणे या क्षणी महत्वाचे ठरते.

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायांना उद्योजकता आणि स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 1998 साली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित या संस्थेची स्थापना करण्यात आली. सन 2000 मध्ये महाराष्ट्र शासनाने स्वयं रोजगार आणि रोजगारांसाठी योजना जाहीर केली जी एक पूर्णपणे राज्य अनुदानित योजना होती.

महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

महाराष्ट्र राज्यातील ज्या उमेदवारांना या महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र पोर्टलच्या अंतर्गत रोजगार मिळविण्यासाठी नोंदणी किंवा अर्ज करावयाचा आहे, त्यांनी शासनाच्या या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात, या पोर्टवर नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

 • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र महास्वयम् च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, या महास्वयम् वेबसाईटवर गेल्यावर तुमच्यासमोर महास्वयमचे् होम पेज उघडेल.

maharashtra mahaswayam rojgar nondani

 • या होम पेजवर तुम्हाला ‘’रोजगार’’ हा पर्याय दिसेल या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल, या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल,
 • या नवीन पेजवर तुम्हाल ‘’नोंदणी’’ हा पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लिक करावे लागेल

mahaswayam rojgar nondani marathi

 • या नंतर एक नवीन नोकरी शोधक अर्ज फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल, या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल, त्यानंतर समोर दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि आता ‘’नेक्स्ट’’ बटनावर क्लिक करा.

महाराष्ट्र महास्वयम् रोजगार नोंदणी 2022

 • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, इथे तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP प्राप्त होईल, हा मिळालेला OTP बॉक्स मध्ये प्रविष्ट करावा लागेल त्यानंतर ‘’कन्फर्म’’ ऑप्शनवर क्लिक करा.
 • आता तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन होईल, यामध्ये फॉर्ममध्ये तुम्हाला वैयक्तिक तपशील, पात्रता तपशील आणि संपर्क तपशील इत्यादी संपूर्ण माहिती भरावी लागेल.
 • अशा प्रकारे संपूर्ण माहिती अचूक प्रविष्ट केल्यावर तुम्हाला ‘’क्रीएट अकाऊंट’’ या पर्यायवर क्लिक करावे लागेल. 
 • या नंतर तुमच्या मोबाईलवर किंवा ई-मेल आयडीवर मॅसेज येईल, यानंतर तुम्ही साबिमित बटनावर क्लिक करा.
 • या प्रकारे तुमची महास्वयम् पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी संपूर्ण होईल.
 • नोंदणी पूर्ण झाल्यावर अर्जदाराला mahaswayam.in रजिस्टर आयडी आणि पासवर्ड मिळेल, यानंतर नोकरी शोधणारे rojgar.mahaswayam.in वर लॉगिन करू शकतात, अर्जदार नोंदणीच्या वेळी मिळालेला आयडी आणि पासवर्ड वापरून पुन्हा कधीही या पोर्टवर लॉगिन करू शकतो. यासाठी आयडी आणि पासवर्ड नोट करू ठेवावा. 

महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया

 • ज्या तरुणांना ऑनलाइन नोंदणी किंवा अर्ज करणे अडचणीचे वाटत असेल किंवा त्यांच्याकडे ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसेल, ते उमेदवार ऑफलाईन पद्धतीने सुद्धा सादर शकतात, यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
 • यासाठी उमेदवाराला जवळच्या रोजगार माहिती कार्यालयाला भेट द्यावी लागेल (एम्प्लॉयमेंट एक्सचेंज)
 • यानंतर उमेदवाराला अधिकाऱ्याकडून रोजगार माहिती कार्यालयात महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र संबंधित संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घ्यावी लागेल.
 • यानंतर नोंदणीसाठी फॉर्म मिळवून तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे आणि अचूक भरावी लागेल, शैक्षणिक पात्रता, पत्ता, नाव इत्यादी माहिती व्यवस्थित भरा.
 • त्यानंतर नोंदणी फॉर्मला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडावीत उदाः रहिवासी दाखला, आधार कार्ड, कौशल्य प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका इत्यादी कागदपत्रे व्यवस्थित जोडावी लागेल.
 • आता नोंदणी फॉर्म पूर्ण भरल्यावर पुन्हा एकदा संपूर्ण महितीची तपासणी करा, काही राहिले असल्यास संपूर्ण करा आणि नोंदणी फॉर्म कार्यालयात जमा करा.
 • नोंदणी फॉर्म रोजगार माहिती कार्यालयात सादर करण्यापूर्वी तुम्हाला ओरीजनल कागदपत्र दाखवावी लागेल.
 • कार्यालयात नोंदणी फॉर्म जमा केल्यावर तुम्हाला कार्यालयातून अर्जाची पावती दिल्या जाईल. या प्रकारे तुमची रोजगार पोर्टवर ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

महास्वयम् पोर्टलवर नोकरी शोधक लॉगिन

 • सर्व प्रथम तुम्हाला अधिकृत महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टलवर भेट द्यावी लागेल,
 • यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या होम पेजवर ‘’नोकरी शोधा’’ (जॉब सीकर लॉगिन) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला आधार आयडी किंवा रजिस्टर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल.
 • यानंतर तुम्हाला लॉगिनवर क्लिक करावे लागेल
 • या पद्धतीने आपण नोकरी शोधक लॉगिन करू शकता.

नियोक्ता नोंदणी करण्याची प्रक्रिया

 • उमेदवाराला सर्वप्रथम अधिकृत महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टलवर जावे लागेल, यानंतर तुम्हाला होम पेजवर ‘’नियोक्ता नोंदणी’’ (एम्प्लॉयर रजिस्ट्रेशन) हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

महाराष्ट्र महास्वयम् रोजगार नोंदणी 2022

 • यानंतर तुमच्यासमोर पुढच्या पेजवर एक फॉर्म उघडेल, या फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला प्रविष्ट करावी लागेल उदाः संस्थेचे नाव, संघटना क्षेत्र, क्षेत्र, NIC, एकूण पुरुष, एकूण स्त्री, कामाचे स्वरूप, वर्णन, संस्थेचे पॅन क्रमांक, संस्था TAN क्रमांक, कंपनीचा नोंदणी क्रमांक, स्थापनेचे वर्ष, कार्यक्षेत्र, इत्यादी संपूर्ण माहिती भरावी लागेल.
 • आता यानंतर तुम्हाला ‘’क्रिएट अकाऊंट’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल, अशा प्रकारे प्रक्रिया करून तुमची नियोक्ता नोंदणी पूर्ण होईल.

महास्वयम् पोर्टवर नोकरी शोधण्याची प्रक्रिया

 • अर्जदाराला सर्वप्रथम आधिकारिक महास्वयम् पोर्टलवर भेट द्यावी लागेल, तुमच्यासमोर उघडलेल्या होम पेजवर तुम्हाला ‘’नोकरी शोधा’’ या विभागात जावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला स्थान किंवा क्षेत्र किंवा शिक्षण यामधून कोणताही एक विकल्प निवडावा लागेल या निवडलेल्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुम्हाला संबंधित माहिती प्रविष्ट करावी लागेल, संपूर्ण माहिती भरल्यावर सर्च या पर्यायावर क्लिक करा.
 • त्यानंतर संबंधित माहिती तुमच्यासमोर दिसेल.

महास्वयम् पोर्टलवर रोजगार यादी पाहण्याची प्रक्रिया 

 • यासाठी सर्व प्रथम उमेदवारांना आधिकारिक महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टलवर जावे लागेल, यानंतर तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल, या होम पेजवर तुम्हाला ‘’नोकरी शोधा’’ या विभागात ‘’View All’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुम्हाला जिल्हा निवडावा लागेल आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर जिल्ह्याप्रमाणे सर्व रोजगारांची यादी दिसेल.

पोर्टलवर आयटीआय लॉगीन करण्याची प्रक्रिया

 • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आधिकारिक महास्वयम् पोर्टलवर भेट द्यावी लागेल.
 • यानंतर तुमच्यासमोर मुख्यपृष्ठ उघडेल या होम पेजवर तुम्हाला ‘’आयटीआय लॉगिन’’ हा पर्याय दिसेल या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

महाराष्ट्र महास्वयम् रोजगार नोंदणी 2022

 • यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेजवर तुम्हाला रजिस्टर आयडी (नोंदणी क्रमांक) भरावा लागेल आणि त्यानंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल.
 • आता सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल, या प्रकारे तुमचे आयटीआय लॉगिन पूर्ण होईल

पोर्टलवर परफॉर्मेंस बजट पाहण्याची प्रक्रिया

 • सर्व प्रथम तुम्हाला आधिकारिक महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टलवर जावे लागेल,
 • यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल, या होम पेजवर तुम्हाला ‘’परफॉर्मेंस बजट’’ हा विकल्प दिसेल या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर पुढचे पेज ओपन होईल,
 • या पेजवर तुम्हाला परफॉर्मेंस बजट संबंधित माहिती दिसून येईल.

महास्वयम् पोर्टलवर नागरिक सनद पाहण्याची प्रक्रिया

 • यासाठी सर्वप्रथम आपल्यालाआधिकारिक महास्वयम् पोर्टलवर भेट द्यावी लागेल
 • तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल, या होम पेजवर तुम्हाला ‘’जलद दुवे’’ (Quick Links) या विभागात जावे लागेल.
 • या विभागात तुम्हाला ‘’सिटीझन चार्टर’’ (नागरिक सनद) हा पर्याय दिसून येईल, या पर्यायवर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

महाराष्ट्र महास्वयम् रोजगार नोंदणी 2022 मराठी

 • या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर नागरिक सनद यादी उघडेल, तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार पर्याय निवडून त्यावर क्लिक करा.
 • तुम्ही निवडलेल्या पर्याया संबंधित माहिती दिसून येईल.

महास्वयम् पोर्टलवर डॅशबोर्ड पाहण्याची प्रक्रिया

महाराष्ट्र महास्वयम् रोजगार नोंदणी 2022

 • या होम पेजवर तुम्हाला ‘’डॅशबोर्ड’’ हा पर्याय दिसून येईल या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
 • या पेजवर तुम्हाला डॅशबोर्ड संबंधित संपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही डॅशबोर्ड पाहू शकता

द्रुत नियोक्ता नोंदणी फॉर्म भरण्याची प्रक्रिया

 • महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टला सर्वप्रथम भेट द्यावी लागेल, आता तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल.
 • या होम पेजवर ‘’द्रुतनियोक्ता फॉर्म (कंपनी)’’ (Quick Employer Form)(Company) हा पर्याय दिसून येईल या पर्यायवर क्लिक करावे लागेल.

महाराष्ट्र महास्वयम् रोजगार नोंदणी 2022

 • यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल, या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेले संपूर्ण तपशील भरावे लागतील उदाः संस्थेचे नाव, पत्ता, ई-मेल आयडी, शहर, जिल्हा, संघटना क्षेत्र, संघटना TAN, पिनकोड, मोबाईल नंबर, क्षेत्र, संस्था GST क्रमांक, रिक्त जागा इत्यादी संपूर्ण माहिती भरावी लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला ‘’सबमिट रिक्वेस्ट’’ या पर्यायावर क्लिक करून नोंदणी फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा. 

महास्वयम् पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया

 • सर्वप्रथम आपल्याला अधिकृत महास्वयम् पोर्टलवर भेट द्यावी लागेल.
 • आता तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल, या होम पेजवर शेवटी तळाशी तुम्हाला ‘’तक्रारी’’ हा पर्याय दिसून येईल, या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

mahaswayam employment registration 2022 maharashtra

 • या (Grievance) पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, या पेजवर तुम्हाला तक्रार नोंदविण्यासाठी एक फॉर्म दिसेल, या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसेकी वैयक्तिक माहिती, पत्ता आणि संपर्क तपशील आणि तक्रार इत्यादी माहिती भरावी लागेल.
 • याप्रमाणे सर्व माहिती प्रविष्ट केल्यावर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल, याप्रमाणे तुम्ही या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात. 

महास्वयम् पोर्टल संपर्क तपशील

mahaswayam employment registration 2022 maharashtra

 • यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज ओपन होईल, आता तुम्हाला ‘’संपर्क साधा’’ (Reach Us) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेजवर तुम्हाला संपूर्ण संपर्क तपशील दिसून येईल.

पोर्टल हेल्पलाईन नंबर

महाराष्ट्र महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल संबंधित हेल्पलाईन नंबर :-

महाराष्ट्र शासनाने महास्वयम् पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार नोंदणी, रोजगार उपलब्धतेबद्दल माहिती, आणि अर्ज भरणे, प्रशिक्षणाबाबतची माहिती, रोजगार मेळावे व सहभागी होण्याची सुविधा तसेच रिक्त पदांसाठी अर्ज करणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याचप्रमाणे तरुणांना एकाच ठिकाणी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताविषयक माहिती एकत्रितपणे उपलब्ध होणार आहे. तसेच उमेदवार आणि उद्योजक यांना रोजगार मेळाव्यात सहभागी होणे, सुलभ प्रशिक्षण नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. राज्यातील तरुणांनी या महास्वयम् पोर्टलवर नोंदणी करून पोर्टलच्या सुविधांचा लाभ घ्यावा. वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण शासनाच्या महास्वयम् पोर्टल संबंधित सर्व महत्वाची माहिती पहिली आहे. तरीही आपल्याला इतर काही आणखी माहिती जाणून घायची असल्यास महास्वयम् पोर्टलवर भेट देऊ शकतात किंवा वरीलप्रमाणे हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

महाराष्ट्र महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल FAQ

Q. महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल काय आहे ?

महाराष्ट्र महास्वयम् पोर्टल हे राज्यातील बेरोजगार तरुण, विद्यार्थी, उद्योजक, प्रशिक्षक, नोकरदार, आणि रोजगार शोधणारे या सर्वांना एकाच ठिकाणी किंवा एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे.

Q. नियोक्ता म्हणून कोणाला नोंदणी करता येते ?

असा व्यक्ती किंवा अस्थापना ज्यामध्ये एक किंवा जास्त व्यक्तींना अस्थापानांचे काम करण्यासाठी वेतन किंवा मानधन / रोजगार / योग्य मोबदला देते, किंवा असा व्यक्ती ज्याला आस्थापनेचे देखरेख आणि नियंत्रणाचे काम दिले आहे. अशा व्यक्तीला नियोक्ता म्हणून काम नोंदणी करता येते.

Q. नियोक्ता नोंदणी करतांना किती शुल्क भरावे लागते ?

महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही

Q. महास्वयम् पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे काय ?

महास्वयम् पोर्टलवर विविध कार्यक्रमांच्या संधी ऑनलाइन प्राप्त करण्यासाठी, तसेच कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि इतर सर्व सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.

Q. पोर्टलवर नोंदणीची वैधता किती दिवस आहे ?

महास्वयम् पोर्टलवर नोंदणीचा कालावधी साधारण: नोंदणी केल्यापासून एक वर्षापर्यंत राहील, परंतु वापरकर्ता ज्या-ज्या वेळेस पोर्टलवर लॉगिन होईल त्या त्या दिवसापासून पुढील एक वर्षापर्यंत वैधता कालावधी वाढत जाईल.

Q. पोर्टलवर नोंदणी केल्यावर नोंदणी कार्ड केव्हा मिळेल ?

महास्वयम् पोर्टलवर उमेदवाराने नोंदणी करून आपली सर्व माहिती भरल्यानंतर त्वरित नोंदणी कार्डाची प्रिंट काढता येऊ शकेल, किंवा जेव्हा आवश्यकता असेल त्यावेळी आपले युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून प्रिंट काढू शकता.

Q. अधिकाधिक नोकरीच्या संधी प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल ?

अधिकाधिक नोकरीच्या संधी प्राप्त करण्यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी आपली संपूर्ण माहिती उदाः शैक्षणिक अहर्ता, अनुभव, कौशल्य, आणि संपर्क इत्यादी सर्व माहिती अपडेट करावी.

Leave a Comment