महा शरद पोर्टल 2024 मराठी: ऑनलाइन रजिस्ट्रेशन, दिव्यांग नोंदणी महाराष्ट्र

महाराष्ट्र महा शरद पोर्टल 2024 ऑनलाइन अर्ज | Maha Sharad Portal Maharashtra | महाराष्ट्र सरकारी योजना | महा शरद पोर्टल ऑनलाइन नोंदणी | महा शरद पोर्टल संपूर्ण माहिती मराठी | दिव्यांग योजना महाराष्ट्र 2024 | मूक बधीर योजना महाराष्ट्र | दिव्यांग पेन्शन योजना
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासन समाजातील निराधार वृद्ध, अंध, अपंग, मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, अनाथ बालके,  निराधार विधवा अशा विविध स्तरांवरील नागरीकांसाठी त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी, त्यांच्या जीवनात स्थेर्य निर्माण करण्यासाठी तसेच या नागरिकांसाठी शाश्वत आणि स्थायी उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील नगरीकांना आर्थिक सहाय्य करत असते. देशातील प्रत्येक राज्यात अनेक प्रकारचे दिव्यांग नागरिक आढळतात, अपंग, मूक बधीर, मानसिक आजाराने ग्रस्त या नागरिकांच्या सहाय्यतेसाठी राज्य सरकार विविध प्रकारच्या योजना राबवीत असते परंतु असे असंख्य दिव्यांग नागरिक असतात ज्यांच्या पर्यंत या योजनांची माहिती पोहचत नाही, त्यामुळे हे दिव्यांग नागरिक या योजनांचा लाभ मिळवू शकत नाही.

हे दिव्यांग नागरिक शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहतात कारण या नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत नाही, या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने दिव्यांग नागरिकांसाठी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे, महाराष्ट्र शासनाकडून या दिव्यांग नागरिकांसाठी महा शरद पोर्टल सुरु करण्यात आले आहे, दिव्यांग नागरिकांना केवळ आपल्या नावाची महा शरद पोर्टवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर दिव्यांग व्यक्तीचे ज्या प्रकारचे अपंगत्व आहे, त्याचप्रकारची मदत किंवा साहित्य सरकारकडून दिव्यांगाना दिले जाते.

महा शरद पोर्टल 2024 संपूर्ण माहिती मराठी 

महाराष्ट्र सरकारने राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी महा शरद पोर्टल सुरु केले आहे, शासनाने सुरु केलेले महा शरद पोर्टल म्हणजे एक असे अभिनव व्यासपीठ आहे ज्यामध्ये राज्यातील निरनिराळ्या भागातील दिव्यांग नागरिक त्यांच्या अपंगत्वा प्रमाणे यामध्ये आपल्या नावाची नोंदणी सहपणे करू शकतात, त्याचप्रमाणे महा शरद पोर्टलवर राज्यातील दिव्यांग नागरिकांना त्यांच्या अपंगत्वानुसार लागणाऱ्या मदतीसाठी राज्यातील दानशूर देणगीदार त्यांचा शोध घेऊ शकतात. त्यामुळे या पोर्टलवर आतापर्यंत मोठयाप्रमाणात दिव्यांग नागरिकांनी आपली नोंदणी केली आहे, तसेच देणगीदारांनी सुद्धा या पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे.

महा शरद पोर्टल
महा शरद पोर्टल

महा शरद पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिव्यांग नागरिकांसाठी असलेल्या संपूर्ण योजनांची माहिती उपलब्ध करून दिल्या गेली आहे. mahasharad.in हि महा शरद पोर्टलची महाराष्ट्र शासनाची आधिकारिक वेबसाईट आहे.

               महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना

महा शरद पोर्टल वैशिष्ट्ये (Features)

दिव्यांग नागरिकांचे जीवनात सुगमता येण्यासाठी तसेच त्यांचे जीवन सुलभ होण्यासाठी विविध प्रकारच्या साधनांची आणि उपकरणांची आवश्यकता असते जेणेकरून त्यांना अपंगत्वावर मात करून साधारण लोकांप्रमाणे जीवन जगता यावे, त्याचप्रमाणे समाजातील काही सेवाभावी संघटना आणि समाजातील दानशूर नागरिक यांना दिव्यांग नागरिकांना त्यांचे जीवन सहज आणि सुलभ करण्यासाठी मदत करायची असते, त्यांना या दिव्यांग नागरिकांना त्यांना आवश्यक असलेल्या उपकरणांचा पुरवठा करण्याचा असतो, या दोघांमध्ये दुवा साधण्याचे काम महाराष्ट्र शासनाचे वेबपोर्टल महा शरद करत आहे.

  • महा शरद पोर्टल दिव्यांग नागरिकांसाठी त्याचप्रमाणे दिव्यांग नागरिकांना सहाय्य करणाऱ्या सेवाभावी संघटना तसेच समाजातील दानशूर नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध दिलेले विश्वासपूर्ण व्यासपीठ आहे.
  • महाराष्ट्र शासनाची हि अधिकृत वेबसाईट आहे ज्यामध्ये देणगी देणारे दानशूर नागरिक आणि दिव्यांग नागरिक या दोघांनाही नोंदणी करता येते.
  • महा शरद डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती OLX या अॅपच्या धर्तीवर करण्यात आली आहे, महा शरद मोबाईल अप्लिकेशन अपंग कल्याण आयुक्तालयाच्या मार्फत दिव्यांग व्यक्तींना विविध प्रकारची उपकरणे आणि साहित्य मोफत उपलब्ध करून देईल.
  • या पोर्टलवर राज्यातील दिव्यांगांना त्यांच्या अपंगत्वानुसार लागणाऱ्या मदतीसाठी देणगीदार त्यांचा शोध घेऊ शकतात.

               महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना

महाराष्ट्र महा शरद पोर्टल मुख्य Highlights

योजनेचे नावमहा शरद पोर्टल महाराष्ट्र
व्दारा सुरु महाराष्ट्र सरकार
योजनेची सुरुवात वर्ष 2020
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी राज्याचे दिव्यांग नागरिक
अधिकृत वेबसाईट mahasharad.in
उद्देश्य योजनांचा लाभ मिळण्यासाठी राज्याच्या दिव्यांग नागरिकांना पोर्टलवर नोंदणीकृत करणे
विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

महा शरद पोर्टल लाभ

महाराष्ट्र शासनाचे महाशरद पोर्टल हे असे एक अभियान आहे ज्याच्या सहाय्याने समाजातील दानशूर नागरिक, सेवाभावी सामाजिक संस्था, कंपन्या यांच्या व्दारे गरजू आणि होतकरू दिव्यांग नागरिकांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्याच्या दृष्टीने या सर्व समाजातील घटकांना विनामुल्य एकच मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे अभियान पूर्णपणे पारदर्शीपणे राबविण्यात येणार आहे.

  • महा शरद पोर्टल राज्यातील कोणत्याही भागात असलेल्या दिव्यांग नागरिकांसाठी सुरु करण्यात आले आहे, या पोर्टलवर सर्व प्रकारचे दिव्यांग नोंदणी करू शकतात. राज्यातील दिव्यांगांनी या पोर्टलवर नोंदणी करताच त्यांना अनेक सुविधा मोफत मिळणार आहे.
  • महा शरद पोर्टलवर दिव्यांगांसाठी तसेच त्यांना मदत देणाऱ्यांसाठी नोंदणी करणे विनामूल्य आहे.
  • महा शरद पोर्टलच्या अंतर्गत सर्व नोंदणीकृत दिव्यांग नागरिकांना शासनाने त्यांच्या साठी सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ व माहिती दिल्या जाईल.
  • या पोर्टलच्या अंतर्गत देणगीदार स्वतःची नोंदणी करून दिव्यांग नागरिकांची सहायता करण्यासाठी त्यांच्या पर्यंत पोहचू शकतात.
  • महा शरद पोर्टलच्या माध्यामतून शासनाला दिव्यांग नागरिकांना आर्थिक सहाय्य करून त्यांना जीवनात स्वावलंबी आणि तसेच दिव्यांग नागरिकांचे जीवन सुगम व सुलभ करून त्यांना जनसामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे.
  • शासनाच्या या वेबसाईटवर दिव्यांग व्यक्ती प्रमाणेच राज्यातील समाजसेवक, खाजगी सामाजिक संघटना आणि तसेच देणगीदार हे सुद्धा निशुल्क नोंदणी करू शकतात, त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींनी आवश्यक साहित्य मिळण्याबाबत नोंदणी केल्यानंतर दिव्यांग नागरिकांना आवश्यक असलेले साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र सरकारच्या महा शरद पोर्टलच्या अंतर्गत दिव्यांग नागरिकांना आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य व उपकरण आणि कृत्रिम अवयव उपलब्ध होणार आहे.
  • या पोर्टलच्या माध्यमातून शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सुरु केलेल्या नवीन योजनांची सर्व माहिती तुम्हाला मिळू शकते.
  • या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना त्यांना आवश्यक असलेले साहित्य व उपकरण उदाः श्रवण यंत्र, बॅटरीवर चालणारी व्हीलचेअर, ब्रेल कीट, कृत्रिम अवयव, इत्यादी उपकरण आणि साहित्य सुविधा पुरविल्या जाईल.

                महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र

महा शरद पोर्टल 2023 उद्देश (Objectives)

महाराष्ट्र सरकारचे महा शरद पोर्टल एक अभियान आहे, या अभियानाच्या अंर्तगत दिव्यांग नागरिकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली असून ज्यामध्ये दिव्यांग नागरिक थेट शासनाच्या या मंच्यामार्फत मागणी करू शकतात. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमूद केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या या मंचावर विस्तृतपणे नोंदणी करून त्यांना आवश्यक असलेली ती मदत किंवा सहकार्य मिळवू शकतात.

  • या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती आणि समाजातील दानशूर नागरिक व सामाजिक संस्था, कंपन्या आणि उद्योगपती यांना विनामूल्य जोडणारा दुवा म्हणजे महा शरद पोर्टल अभियान आहे.
  • या पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्ती आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या देणगीदारांना एकाच पोर्टलखाली नोंदणी करणे आणि त्यांचे समर्थन करणे.
  • सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे.
  • विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगांची परिस्थिती आणि गरजा समजून घेणे.
  • या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग नागरिक, खाजगी सामाजिक संस्था, समाजसेवी संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणणे.
  • महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे, महा शरद पोर्टलच्या माध्यमातून 29 लाख दिव्यांग नागरिकांना मदत करण्याचे उद्दिष्ट आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही भागातील दिव्यांग नागरिक ज्यांना महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्यासाठी सहाय्यक उपकरणे आणि आवश्यक साहित्य मिळवायचे आहे, ते सर्व दिव्यांग नागरिक महा शरद पोर्टलवर आपली नोंदणी करू शकतात.

महा शरद पोर्टल आवश्यक कागदपत्र आणि पात्रता

महा शरद पोर्टलवर असलेल्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी या पोर्टवर नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता खालीलप्रमाणे आहेत.

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे
  • फक्त दिव्यांग उमेदवार आणि डोनर नोंदणी करू शकतात

महा शरद पोर्टल रजिस्ट्रेशन

                सौर कृषी पंप योजना 

महा शरद पोर्टल दिव्यांग नोंदणी प्रक्रिया

महाराष्ट्र शासनाच्या महा शरद पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांगांची स्थिती आणि आवश्यकता समजून घेतल्या जातात, या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील सामजिक कार्यकर्ते, समाजसेवी संस्था, देणगीदार इत्यादी दिव्यांगांची माहिती घेवून त्यांना मदत करू शकतात, महा शरद पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग कोणावरही अवलंबून राहू नये यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य केले जाते, त्यामुळे महा शरद पोर्टलवर असलेल्या सुविधांचा आणि योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग नागरिकांनी या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे, या पोर्टलवर नोंदणी करण्याची सुलभ प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम अर्जदाराला सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट द्यावी लागेल 

महा शरद पोर्टल महाराष्ट्र

  • यानंतर आपल्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल, या होम पेजवर तुम्हाला ‘’दिव्यांग नोंदणी’’ हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करावे लागेल

महा शरद पोर्टल ऑनलाइन नोंदणी

  • यानंतर तुमच्यासमोर नोंदणीसाठी नवीन फॉर्म ओपन होईल
  • या नोंदणी फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचे नाव, लिंग, राज्य, जिल्हा, जन्मतारीख, तहसील, शहराचे नाव किंवा गावाचे नाव, पिनकोड, आधार क्रमांक, तुमचा मोबाईल नंबर, या प्रकारची संपूर्ण माहिती भरावी लागेल.
  • अशा प्रकारे संपूर्ण माहिती प्रविष्ट केल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP प्राप्त होईल, तो OTP तुम्हाला प्रविष्ट करावा लागेल, यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल
  • यानंतर तुम्हाला तुमचे अपंगत्व किती प्रमाणात आहे किंवा अपंगत्वाचे स्वरूप काय आहे हे निश्चित करण्यासाठी समोर असलेल्या पर्यायांपैकी एका पर्यायावर टिक करण्याची आवश्यकता आहे. आता तुम्हाला तुमचा UDID क्रमांक प्रविष्ट करावा लागेल, या नंतर तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र 150 kb साईजमध्ये अपलोड करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला Account Created By (खाते कोणामार्फत सुरु केले) या सबंधी पर्याय निवडावा लागेल.
  • अशा प्रकारे अचूक संपूर्ण माहिती प्रविष्ट केल्यावर ‘’रजिस्टर’’ या बटणावर क्लिक करावे, या प्रकारे तुमची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

महा शरद पोर्टल देणगीदार नोंदणी प्रक्रिया

महाराष्ट्र राज्यातील ज्या दानशूर नागरिकांना किंवा समाजसेवी नागरिकांना दिव्यांग नागरिकांना मदत किंवा सहकार्य करण्याचे आहे त्यांना सर्वप्रथम या पोर्टलवर नोंदणी करण्याची आवश्यकता आहे, नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे राहील.

महा शरद पोर्टल 2022

  • या होम पेजवर तुम्हाला ‘’Register As Donar’’ हा पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लिक करा

maha sharad portal

  • यानंतर या पर्यायावर क्लिक केल्यावर नोंदणी अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. या अर्जामध्ये तुम्हाला तुमचे नाव, लिंग, जन्म तारीख, राज्य, जिल्हा, तहसील, गाव किंवा शहराचे नाव, पिनकोड, आधार नंबर, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती अर्जामध्ये भरावी लागेल, आता तुम्हाला नोंदणीकृत मोबाईलवर एक OTP प्राप्त होईल, तो OTP भरून पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल.

महा शरद पोर्टल 2022

  • आता तुम्हाला देणगीची माहिती भरावी लागेल, तुम्हाला कोणत्या अपंगत्व प्रकारात देणगी द्यायची आहे ते निवडण्यासाठी ‘’Select Interest For Donation To Divyang Type’’ निवडा, यानंतर तुमच्यासमोर अपंगत्वाचे प्रकार आणि माहिती येईल, त्यामधून पर्याय निवडून त्यावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला देणगी रक्कम भरावी लागेल, देणगी रक्कम भरल्यावर रजिस्टर बटनावर क्लिक करावे. याप्रमाणे आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

दिव्यांगजणांचे जीवन सुलभ आणि सुगम्य होण्यासाठी विविध साहित्य आणि आधुनिक उपकरणांची आवश्यकता असते, ज्यांच्या सहाय्याने ते अपंगत्वावर मात करून जनसामान्याप्रमाणे जीवनयापन करू शकतील, तसेच आधुनिक उपकरणे आणि साहित्य दिव्यांग व्यक्तीला सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगण्यास मदत करतात. हे उपकरण आणि दिव्यांगांना सहाय्यक असलेले साहित्य बाजारात उपलब्ध आहेत परंतू प्रत्येक दिव्यांगजन ते खरेदी करू शकत नाही, त्यामुळे समाजातील अनेक समाजसेवी संस्था, दानशूर व्यक्ती अशा गरजू दिव्यांग नागरिकांना त्यांना आवश्यक असलेले साहित्य आणि उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक असतात.

महाराष्ट्र शासनाने या दोघांमधील दुआ साधण्यासाठी हे महा शरद पोर्टल सुरु केले आहे. वाचक मित्रहो, या लेखा मध्ये शासनाच्या महाशरद पोर्टल विषयी संपूर्ण माहित देण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्याला या पोर्टल बद्दल आणखी इतर काही माहिती जाणून घायची असल्यास आपण शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता. हि पोस्ट आपल्याला आवडली असल्यास आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून अवश्य कळवा.

                               महत्वपूर्ण लिंक्स 

आधिकारिक वेबसाईटइथे क्लिक करा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग इथे क्लिक करा
अपंग कल्याण इथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ इथे क्लिक करा
महाराष्ट्र शासन इथे क्लिक करा
UDID नोंदणी इथे क्लिक करा
महाराष्ट्र सरकारी योजना इथे क्लिक करा

महा शरद पोर्टल FAQ

Q. महा शरद पोर्टल काय आहे?

महाराष्ट्र शासनच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अंतर्गत राज्यातील होतकरू आणि गरजू दिव्यांग नागरिकांना त्यांच्या त्यांच्या अपंगत्वाप्रमाणे साहित्य आणि उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी त्याचवेळी या अपंग नागरिकांना आर्थिक साहाय्य आणि सहकार्य करण्यासाठी इच्छुक असलेले समाजसेवी यांच्या मध्ये दुआ साधण्यासाठी शासनाने महा शरद पोर्टल विकसित केले आहे.

Q. महा शरद पोर्टलचा उपयोग कोण करू शकतो ?

महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही भागांतील दिव्यांग नागरिक या महा शरद पोर्टलवर, त्यांच्या अपंगत्वा प्रमाणे मदतीसाठी नोंदणी करू शकतो, त्याचवेळी त्यांना मदत करणारे समाजसेवी सुद्धा या पोर्टलवर त्यांची विनामुल्य नोंदणी करू शकतात.

Q. या पोर्टलवर नोंदणीसाठी फी भरावी लागते काय ?

महा शरद पोर्टलवर कोणत्याही प्रकारची फी भरण्याची आवश्यकता नाही या पोर्टलवर दिव्यांग व्यक्ती तसेच त्यांना मदत करणारे समाजसेवी विनामूल्य नोंदणी करू शकतात.

Q. दिव्यांग नागरिकांसाठी या पोर्टलवर कोणत्या योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहे ?

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिव्यांग नागरिकांशी संबंधित संपूर्ण योजना आणि त्यांची माहिती महा शरद पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Q. शासनाचा महा शरद पोर्टल सुरु करण्याचा उद्देश काय आहे ?

राज्यातील सर्व गरजू आणि होतकरू दिव्यांग नागरिकांना विशेष सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने या पोर्टलची सुरुवात केली आहे.

Leave a Comment