अग्निपथ योजना 2024 मराठी: राष्ट्राची सुरक्षा अबाधित ठेवणे राष्ट्राची एकता अबाधित ठेवणे, तसेच परकीय आक्रमण आणि आतंरिक आक्रमण किंवा राष्ट्र विरोधी कारवाया याच्या पासून देशाचे रक्षण करणे त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे ही महत्वपूर्ण कर्तव्ये भारतीय लष्कराची आहेत. भारतीय लष्कर देशाच्या अंतर्गत घडणाऱ्या नैसर्गिक आपदांच्या वेळी सुद्धा नागरिकांच्या मदतीला धावून येते, भारतीय सैन्याने संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेचा एक भाग म्हणून सुद्धा अनेक देशांमध्ये महत्वपूर्ण काम केले आहे, भारतीय सैन्यात अनेक रेजिमेंट्स आहेत, भारतीय सैन्य हे जगातील एक मोठे लष्कर आहे, भारतीय सैन्य आधुनिक पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान तसेच आधुनिक शस्त्रास्त्रे या सर्व आधुनिक पद्धतीचा सतत अभ्यास करून स्वतःला सक्षम करत आहे अग्निपथ योजना, भारताचे आत्मनिर्भर आणि सशक्त भारत निर्माण करण्याचे जे स्वप्न आहे त्याला एक पाऊल पुढे नेण्यास सक्षम आहे आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय तरुणांचे यात मात्वपूर्ण भूमिका असेल, या अग्निपथ योजनेच्या माध्यमातून सशस्त्र दलात सामील होण्याचे आणि देश सेवा करण्याचे भारतीय तरुणांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
हि अग्निपथ योजना 2024 मराठी भारतीय तरुणांना केवळ नागरी जीवनात सैन्य अनुशासन व नैतीक्तेसह सशक्त आणि शिस्तबद्ध, कौशल्य प्रदान करणार नाही तर बदलत्या परिस्थिती नुसार युद्धाची तयारी सुद्धा चांगल्या पद्धतीने करायला शिकवेल. हि अग्निपथ योजना भारतीय तरुणांना अग्निविरांमध्ये बदलण्याची क्षमता ठेवते, वाचक मित्रहो, आपण या लेखात भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने भारतीय तरुणांसाठी एक नवीन योजना सुर केली आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती मराठीत पाहणार आहोत, या लेखात ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, योजनेची निवड प्रक्रिया तसेच पात्रता आणि लाभ या संबंधित संपूर्ण माहिती.
अग्निपथ योजना 2024 संपूर्ण माहिती मराठी
भारताच्या संरक्षण मंत्रालायाने अग्निपथ योजना हि भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांच्या, वायुसेना, भारतीय लष्कर आणि नौदल या तिन्ही शाखांमध्ये याप्रमाणे, एअरमन व जवान आणि खलाशी या सर्व पदांवर भरतीसाठी निर्माण केलेली एक योजना आहे या अग्निपथ योजनेमध्ये निवड झालेल्या जवानांना अग्निवीर संबोधले जाईल, या योजनेच्या माध्यमातून 50,000 जागा भरण्यात येणार आहे. या जवानांचा लष्करामध्ये कार्यकाल चार वर्षाचा निर्धारित काळ असेल, निर्धारित चार वर्षाचा काळ संपल्यानंतर नोंदणीकृत बॅचच्या 25 टक्के जवानांना त्यांच्या संबंधित सेवेत पुन्हा नियुक्त केले जाईल. आपल्या देशात अनेक तरुण आहे ज्यांना सैन्यात भरती होऊन देश सेवा करायची आहे, या योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना शॉर्त-टर्म साठी सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे, हि योजना तरुणांना रोजगार मिळावा आणि त्याचबरोबर देश सेवा व्हावी या उद्देशाने योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
अग्निपथ योजना केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सुरु करण्यात आली, अग्निपथ योजनेला मंत्रिमंडळाच्या सूक्ष्म व्यवहार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, शासनाकडून अग्निपथ योजना 2024 मराठी सुरु करण्याचा निर्णय 14 जून 2022 रोजी घेण्यात आला होता, हि योजना रोजगारच्या संधी निर्माण करण्यात प्रभावी ठरेल तसेच या योजनेच्या अंमलबजावणी मुळे देशाच्या सुरक्षितते मध्ये मजबुती येईल. हि भरती अग्निवीर भारती अंतर्गत केली जाणार आहे. या योजनेमुळे देशातील तरुणांना योजनेच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळेल आणि त्याचबरोबर आरोग्य पातळी सुधारण्यास मदत होईल. अग्निपथ योजना 2024 मराठी सुरु करण्याच्या अगोदर सेनेच्या तिन्ही प्रमुखांनी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना या योजनेच्या संबंधित projection दिले होते.
अग्निपथ योजना 2024 मुख्य मुद्दे
योजनेचे नाव | अग्निपथ योजना 2024 |
---|---|
व्दारा सुरुवात | भारत सरकार |
योजनेची सुरुवात | 14 जून 2022 |
लाभार्थी | भारतीय नागरिक |
उद्देश्य | भारतीय सैन्यात युवा शक्तीला समाविष्ट करणे तसेच या योजनेच्या माध्यमाने बेरोजगारी कमी करणे |
आधिकारिक वेबसाईट | इथे क्लिक करा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन/ऑफलाईन |
विभाग | भारतीय संरक्षण मंत्रालय |
श्रेणी | योजना |
वर्ष | 2024 |
अर्ज करण्याचे किमान वय | या योजनेच्या अंतर्गत 17.5 ते 21 वर्ष |
अवश्य वाचा :- सूर्य नूतन चुल्हा
अग्निपथ योजना 2024 मराठी वैशिष्ट्ये
अग्निपथ योजनेच्या अंतर्गत 4 वर्ष सेवा पूर्ण केल्या नंतर कोणताही अग्निवीर सैन्याच्या कोणत्याही शाखेत नियमित होऊ शकतो, जेव्हा ते जुनियर कमिशंड ऑफिसर किंवा त्याच्या समकक्ष पदांसाठी असलेल्या नियामनुसार योग्य असतील तर, हि अग्निपथ योजना सुरु झाल्यानंतर या पदांसाठी असलेल्या दुसऱ्या योजना समाप्त केल्या जाईल, या योजनेच्या अंतर्गत ज्या तरुणांचे वय 17.5 ते 21 वर्ष आहे ते सर्व तरुण या योजनेच्या अंतर्गत अर्ज आकृ शकतात. जागतिक करोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अग्निपथ योजनेंतर्गत भर्ती प्रभावित झाली होती, त्यामुळे या वर्षी म्हणजे 2022 मध्ये या योजनेच्या अंतर्गत वयाच्या अधितम मर्यादेमध्ये 2 वर्षाची सुटू देऊन ती 23 वर्षे करण्यात आली आहे. याचा अर्थ 2022 मध्ये 23 वर्ष वयापर्यंतचे तरुण या योजनेंतर्गत भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या योजनेंतर्गत भरतीसाठी अर्ज जुलै मध्ये सुरु झाले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश्य म्हणजे भारतीय तरुणांमध्ये देशप्रेम निर्माण करून त्याचबरोबर भारतीय सेनेला युवा शक्ती मिळवून देणे. सध्यस्थितीत भारतीय सशस्त्र दलांमध्ये 13 लाख पेक्षा अधिक सैनिकांचे अनुमानित वय जवळपास 32 वर्ष आहे, या योजनेमुळे सैन्यदलात तरुणांची संख्या वाढेल
- अग्निपथ योजनेत अधिकारी दर्ज्याच्या पदांवर भरती करण्याची तरतूद नाही, आणि त्या पदांसाठी जी भरती प्रक्रिया सुरु आहे तीच सुरु ठेवण्यात येईल
- अग्निपथ योजना भारतीय सेनेच्या थलसेना, वायुसेना, आणि नौदल या सेच्या तिन्ही शाखांसाठी अनुक्रमे जवान, एअरमन आणि खलाशी या पदांच्या मोठ्याप्रमाणात भरतीसाठी आहे.
- 2022 मध्ये सैन्याच्या तिन्ही शाखांमध्ये 46,000 सैनिकांची भरती करण्याची लक्ष ठेवण्यात आले आहे. या नंतर पुढील चार किंवा पाच वर्षात हि संख्या 50 ते 60 हजार आणि त्यानंतर 90,000 हजारांवरून 120,000 पर्यंत वार्षिक करण्याचे सरकारचे लक्ष आहे, करोना जागतिक महामारीमुळे सैनिकांच्या भारीमध्ये अडथळा निर्माण झाला होता, त्यामुळे डिसेंबर 2021 पर्यंत, लष्करात जवान किंवा अधिकारी ( पीबीओआर) च्या खाली असलेल्या कर्मचाऱ्यांची जवळपास एक लाख पदे, तसेच हवाई दलात 5000 आणि एकूण नौदलात 11000 पदे. या अग्निपथ योजनेच्या माध्यमातून हि पदे लवकरात लवकर भरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- चार वर्षाच्या आपल्या सेवा कालावधीच्या दरम्यान या अग्निविरांना मासिक वेतन, आणि त्या व्यतिरिक्त हार्डशिप अलाउंन्स आणि ट्रेव्हल अलाउंन्स, युनिफॉर्म अलाउंन्स, कैन्टीनची सुविधा आणि त्याचबरोबर स्वास्थ्य सुविधापण देण्यात येईल, या व्यतिरिक्त त्यांना वर्षभरात 30 दिसांच्या सुट्या आणि मेडिकल लिव्ह सुद्धा देण्यात येईल.
- सैन्यात चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर या अग्निवीरांना 11.71 लाख रुपयांचे सेवा निधी पकेज देण्यात येईल ज्यामध्ये त्यांचे प्राप्त व्याज सुद्धा समाविष्ट असेल, या व्यतिरिक्त या सैनिकांना चार वर्षासाठी 48 लाखांचा जीवन बिमा कवर सुद्धा देण्यात येईल, या योजनेच्या अंतर्गत चार वर्षाचा सेवा काळ पूर्ण झाल्यावर या सेवानिवृत्त सैनिकांच्या पुनर्वसनाची जबादारी सरकार घेणार आहे. त्यांना सरकार व्दारा एक कौशल प्रमाणपत्र आणि ब्रिज कोर्स प्रदान केल्या जाईल.
- यामध्ये चार वर्षाच्या सेवेनंतर ज्या सैनिकांना पुन्हा नियमित करण्यात येईल, त्या सैनिकांना सामन्य सैनिकांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी अलग प्रकारचे प्रतिक चिन्ह लावण्यात येईल
- या योजनेच्या अंतर्गत भरती होणाऱ्या अग्निवीरांना आधिकारिक गोपनीयता अधिनियम 1923 च्या अंतर्गत गोपनीयतेची शपथ दिली जाईल जेणेकरून त्यांनी महत्वपूर्ण माहिती त्यांच्या सेवाकालावधीत अधिकृत व्यक्ती शिवाय कुठेही
- या योजनेच्या अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पुलिस बल आणि असम रायफल्स मध्ये होणाऱ्या भरती मधून 10 टक्के जागा अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्यात येईल.
अग्निपथ योजना उद्देश्य (Objectives)
देशातील तरुणांना चार वर्षासाठी भारतीय सैन्यात भरती करणे या माध्यमातून
रोजगार निर्माण करणे आणि तसेच सेनेमध्ये युवाशक्तीला समाविष्ट करणे हा य योजनेचा मुख्य उद्देश्य आहे, या योजनेच्या माध्यामतून ज्या तरुणांचे स्वप्न भारतीय सैन्यात सेवा करण्याचे होते ते या योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. या शिवाय या योजनेच्या अंमलबजावणीमुळे देशाची सुरक्षा आणखी मजबूत होण्यास मदत होईल.
The Union Home and Cooperation Minister Shri Amit Shah thanked the Prime Minister for the ‘Agneepath Yojana’ launched by Prime Minister @narendramodi @PIBHomeAffairs @MIB_India @PIB_India https://t.co/BfRP8PI5Qa pic.twitter.com/BNVim2N2vJ
— PIB in Tripura (@PIBAgartala) June 14, 2022
अग्निपथ योजनेंतर्गत तरुणांची चार वर्षासाठी नियुक्ती केली जाईल ज्यामध्ये त्यांना उच्च कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल, या प्रशिक्षणातून हे अग्निवीर प्रशिक्षित आणि शिस्तप्रिय बनेल. या योजनेच्या अंमलबजावणी मुळे देशातील बेरोजगारीचा दर कमी होण्यास मदत होईल, याशिवाय देशातील नागरिक या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी मुळे सशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील. या योजनेच्या अंमलबजावणी जवानांचे सरासरी वय 26 वर्षा पर्यंत खाली येईल. याव्यतिरिक्त 25 टक्के सैनिकांना पुन्हा नियमित सेवेत घेण्यात येईल.
अग्निपथ योजनेंतर्गत आर्थिक लाभ आणि इतर फायदे
अग्निपथ योजनेंतर्गत भरती होणाऱ्या अग्निवीरांना या योजनेंतर्गत खालीलप्रमाणे
आर्थिक लाभ आणि फायदे मिळणार आहे.
एकूण वार्षिक पॅकेज :-
या योजनेंतर्गत अग्निवीरांना पहील्या वर्षी 4.76 लाख आणि चौथ्या वर्षी 6.92 लाख पॅकेज असेल
भत्ता :-
या योजनेच्या अंतर्गत अग्निवीरांना सामान्य सैनिकांना दिले जाणारे
सर्व भत्ते दिले जाणार आहे
सेवा निधी :-
प्रत्येक अग्निवीराला त्याच्या/ तिच्या मासिक पगाराच्या 30 टक्के योगदान द्यावे, तितकीच रक्कम सरकार कडूनहि दिली जाणार आहे, चार वर्षे पूर्ण झाल्यावर अग्निवीराला 11.71 लाख रुपयांची धनराशी दिली जाणार आहे जी संपूर्ण आयकर मुक्त असेल.
मृत्यूवर भरपाई :-
अग्निवीरांना 44 लाखांचे विना सहयोगी जीवन बिमा संरक्षण प्रदान केले जाईल, सेवेदरम्यान जर अग्निवीराचा मृत्यू झाल्यास, 44 लाखांची अतिरिक्त सानुग्रह रक्कम दिली जाणार आहे, याव्यतिरिक्त 4 वर्षा पर्यंत सेवा निधी घटकांचा न भरलेला भाग दिला जाईल.
योजनेंतर्गत अपंगत्वाच्या बाबतीत भरपाई :-
या योजनेंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निर्धारित केल्यानुसार अपंगत्वाच्या टक्केवारीच्या आधारावर भारपाई दिली जाईल, अपंगत्वासाठी 44/25/15 लाख रुपयांची एकरकमी अनुग्रह धनराशी दिली जाईल.
कार्यकाळ संपूर्ण झाल्यावर :-
कार्यकाळ संपूर्ण झाल्यावर उमेदवारांना सेवा निधी मिळू शकतो, या शिवाय संपादन केलेल्या कौशल्याचे प्रमाणपत्र आणि उच्च शिक्षणासाठी कर्जाची तरतूद केली जाईल.
अग्निपथ योजनेचे अतिरिक्त लाभ याप्रमाणे असतील
खालीलप्रमाणे असतील
- अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची निवड संपूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केली जाईल
- या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे
- या योजनेंतर्गत टेक इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सुद्धा अग्निवीरांची निवड केली जाईल
- या अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणी मुळे देशातील तरुण नागरिकांचे सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे
- या योजनेच्या अंतर्गत चार वर्षाचा कालावधी संपूर्ण केल्यानंतर अग्निवीरांना प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे
- या योजनेच्या अंतर्गत नागरिकांना चांगले आर्थिक पॅकेज दिले जाणार आहे.
अग्निपथ योजनेंतर्गत शासनाने भरती वयाची सीमा वाढविली आहे
अग्निपथ योजनेंतर्गत भरती सुरु करण्यात आली आहे
भारतीय शासनाने अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची भारती सुरु करण्याची अधिसूचना जरी केली आहे, अग्निपथ योजना 2023 भरती, या योजनेंतर्गत देशातील तरुणांची भारतीय दलाच्या तिन्ही शाखेत भरती केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक दलाच्या अधिकृत वेबसाईटवर mod.gov.in ला भेटून तरून वर्ग यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा समजून घेऊ शकतात, शासनाच्या या अधिसूचने प्रमाणे या योजनेत जुलै पासून नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.
सेना | प्रथम ते व्दितीय वर्ष | तिसरे वर्ष | चौथे वर्ष |
---|---|---|---|
भारतीय थल सेना | 40,000 | 45,000 | 50,000 |
भारतीय वायुसेना | 3,500 | 4,400 | 5,300 |
भारतीय नौसेना | 3,000 | 3,000 | 3000 |
या योजनेच्या अंतर्गत निवड झालेल्या तरुणांना अग्निवीर संबोधल्या जाणार आहे,
या अग्निवीरांना त्यांच्या चार वर्षाच्या कालावधीत दरवर्षी केवळ तीस दिवसांची रजा
मिळणार आहे, अग्निवीर भारती प्रक्रिया अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर तांत्रिक (एव्हिएशन / दारुगोळा परीक्षक) अग्निवीर लिपिक / स्टोर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेडमन या पदांसाठी सुरु होईल.
Agnipath Yojana Schedule
या योजनेंतर्गत भरतीसाठी मार्गदर्शक तत्वे जारी करणे (NAVY ) | 25 जून 2022 |
---|---|
प्रशिक्षण कार्यक्रमात (NAVY) सामील होणाऱ्या पहिल्या तुकडीची भर्ती | 21 नोव्हेंबर 2022 |
नोंदणी प्रक्रियेची सुरुवात (वायुसेना) | 24 जून 2022 |
फेज वन (वायुसेना) साठी ऑनलाइन परीक्षेची सुरुवात | 24 जुलै 2022 |
प्रशिक्षण कार्यक्रमात (वायुसेना) सामील होणाऱ्या पहिल्या तुकडीची भर्ती | 30 डिसेंबर 2022 |
लष्कराची अधिसूचना जारी करणे | 20 जून 2022 |
दलाच्या विविध युनिट्सव्दारे अधिसूचना जारी करणे | 1 जुलै 2022 |
भरतीच्या दुसऱ्या लॉटची सामील होण्याची तारीख | 23 फेब्रुवारी 2023 |
अग्निपथ योजनेंतर्गत पात्रता
अग्निपथ योजना 2024 मराठी अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी उमेदवार भारताचा कायमचा रहिवासी असला पाहिजे, त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवाराचे वय 17.5 ते 21 वर्ष दरम्यान असावे, केवळ अशा उमेदवारांना या योजनेंतर्गत पात्र मानले जाईल, तसेच ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून प्रमाणित शिक्षण घेतले आहे
अग्निवीर (सामान्य कर्तव्य) सर्व शस्त्र
- या मध्ये उमेदवाराची आयु 17.5 ते 23 वर्षाच्या दरम्यान आसावे.
- अग्निवीर व्दारे इयत्ता दहावीमध्ये एकूण 45 टक्के आणि 33 टक्के प्रत्येक
विषयात गुण प्राप्त करणे आवश्यक आहे - यामध्ये ज्या बोर्डात ग्रेडिंग सिस्टीम आहे त्यामध्ये उमेदवाराला प्रत्येक
विषयात कमीत कमी डी ग्रेड प्राप्त करणे आवश्यक आहे आणि फायनल ग्रेड कमीत कमी सी ग्रेड प्रप्त करणे आवश्यक आहे
अग्निवीर (टेकनिकल) (ऑल आर्म) आणि अग्निवीर (टेकनिकल) (एव्हिएशन एंड एम्युनेशन
examiner)
- उमेदवाराचे वय 17.5 ते 23 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे
- अग्नीवर व्दारे इयत्ता 12 वी वर्गात फिजिक्स, केमेस्ट्री, गणित, आणि इंग्लिश घेऊन 50 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे, आणि या सर्व विषयात कमीत कमी 40 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
- ज्या उमेदवारांनी Nios किंवा ITI कोर्स केला आहे, असे उमेदवार सुद्धा या
योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकतात, परंतु त्यांनी कमीत कमी संबंधित फिल्ड मध्ये NSQF लेव्हल 4 किंवा त्याच्या वरील कोर्स केला असला पाहिजे
अग्निवीर क्लर्क/स्टोर कीपर (टेकनिकल) (ऑल आर्म)
- अर्जदाराचे वय 17.5 ते 23 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे,
- अग्निवीर व्दारा इयत्ता 12वी पास असणे आवश्यक आहे, त्याला प्रत्येक विषयात कमीत कमी 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे,
- या योजनेच्या अंतर्गत अग्रीगेट गुण 60 टक्के निर्धारित केल्या गेले आहे
- अग्निवीर व्दारा math / accounts / book keeping मध्ये इयत्ता 12वीत 50 टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे
अग्निवीर ट्रेड्समन (ऑल आर्म) 10 वी पास
- या मध्ये अर्दाराचे वय 17.5 ते 23 वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे
- अग्निवीर कमीत कमी इयत्ता 10 वी पास असणे आवश्यक आहे
- अर्दाराने कमीत कमी 33 टक्के गुण प्राप्त केले असले पाहिजे
अग्निवीर ट्रेड्समन (ऑल आर्म ) 8 वी
पास
- अर्जदाराचे वय 17.5 ते 23 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे
- अर्दाराने कमीत कमी इयत्ता 8वी पास असणे आवश्यक आहे
- अर्दाराने कमीत कमी 33 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे
मोठ्या संख्येने उमेदवार भारतीय सैन्यात भरतीसाठी अर्ज करतात नाव नोंदणी
करतात, आणि भारतीय सशस्त्र दलाचे सदस्य होण्याचे स्वप्न पाहतात, तथापि अजूनही काही उमेदवार आहेत ज्यांना भारतीय सैन्यात जाण्याची संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी हि योजना योग्य संधी आहे, या योजनेच्या व्दारे ते आपले स्वप्न पूर्ण करू शकतात, या योजनेच्या अंतर्गत अग्निवीराची सेवा पूर्ण झाल्यावर त्याची सैन्यातील कामगिरी पाहून त्याला नियमित करण्याची शक्यता आहे
अग्निपथ योजनेंतर्गत वेतनमान अतिरिक्त फायदे
लाख आहे, आणि ते पकेज सर्विसच्या कालावधीत चौथ्या व अंतिम वर्षात 6.92 लाख असेल, म्हणजेच या चार वर्षाच्या सेवेत त्यांना 30,000/- रुपये प्रारंभिक वेतन मिळणार आहे, यामध्ये 30 तक्के म्हणजे 9000/- रुपये PF च्या स्वरुपात कापणी करण्यात येईल, आणि सरकार व्दारा तितक्याच धनराशीचे योगदान केले जाणार आहे, त्यानंतर दरमहा 21000/- रुअप्ये वेतन दिल्या जाईल, या मध्ये पगारात 10 टक्के वाढ सरकारकडून वर्षभरात केली जाईल, त्यमुळे चौथ्या वारी अग्निवीराला 40000/- रुपये दरमहा पगारा मिळेल.
वर्ष | मासिक पॅकेज | हाताशी पगार | अग्निवीर कॉपर्स फंडात 30टक्के योगदान | भारत सरकारकडून कॉपर्स फंडात योगदान |
---|---|---|---|---|
पहिले | 30,000/- रुपये | 2,1000/- रुपये | 9,000/- रुपये | 9,000/- रुपये |
दुसरे वर्ष | 33,000/- रुपये | 23,100/- रुपये | 9,900/- रुपये | 9,900/- रुपये |
तिसरे वर्ष | 36,500/- रुपये | 25,580/- रुपये | 10,950/- रुपये | 10,950/- रुपये |
चौथे वर्ष | 40,000/- रुपये | 28,000/- रुपये | 12,000/- रुपये | 12,000/- रुपये |
चार वर्षानंतर कॉपर्स फंडात योगदान | 5.02/- लाख रुपये | 5.02/- लाख रुपये |
या योजनेंतर्गत चार वर्षाचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण झाल्यावर अग्निवीरांना
एकवेळचे सेवा निधी 11.71 लाख रुपयांचे पॅकेज दिले जाईल, ज्यामध्ये त्यांचे योगदान आणि त्यावर जमा व्याज आणि त्यांच्या योगदानाच्या जमा झालेल्या रक्कमे इतकेच सरकारचे योगदान असेल, ज्यावर कोणताही कर आकाराला जाणार नाही याशिवाय अवघड ठिकाणी पोस्टिंग असेल तर अशा स्थितीत सैन्यातील इतर सैनिकांप्रमाणे उच्चपदस्थ भत्ता दिला जाईल. अग्निवीरांना 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण सुद्धा प्रदान करण्यात येईल, आणि त्याचप्रमाणे चार वर्षाच्या कार्यकाळात अग्निवीराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला 1000000/- रुपयांची भरपाई दिली जाईल. तसेच अग्निवीरांना स्वतःचा उद्योग करण्यासाठी बँकेच्या कर्जाची हि सुविधा दिली जाणार आहे.
अग्निवीरांची निवड
नियुक्त केले जाऊन शकते, याशिवाय सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अग्निवीर सन्मान आणि पुरस्कार सुद्धा दिले जातील.
अग्निपथ योजना शासन मागे घेणार नाही
भारतीय सेनेच्या एक संयुक्त प्रेस कॅफ्रेंसच्या दरम्यान पत्रकाराने विचालेल्या प्रश्नाच्या उत्तर स्वरूपात सेनेच्या प्रमुखांनी सांगितले कि केंद्र किंवा भारतीय सेना कोणत्याही परिस्थितीत अग्निपथ योजना मागे घेणार नाही, यामध्ये सेनाव्दारा दिल्या माहिती नुसार काही तत्व चुकीचा प्रचार करून नागरिकांना भटकविण्याचा प्रयत्न करीत आहे, या दरम्यान त्यांनी हे पण सांगितले कि संयुक्त सेना सशस्त्र बलांची वाढती आयु आणि पेन्शन खर्चांना कमी करण्यासाठी या योजनेला अगोदरच लागू करण्यसाठी प्रयत्न करीत होते.
- यामध्ये महत्वाचे सांगायची म्हणजे अग्निवीरांची भर्तीची प्रक्रिया 24 जून 2022 पासून तिन्ही सेनांच्या आधिकारिक वेबसाईटवर सुरु करण्यात आली आहे.
- या योजनेच्या अंतर्गत प्राथमिक बॅच मध्ये संयुक्त सेनांमध्ये जवळपास 48000 सशस्त्र बळांच्या भरतीची प्लानिंग केली जात आहे, यासाठी लवकरच गाईडलाईन्स जारी केल्या जाईल.
- या मध्ये एका प्रश्नाच्या उत्तरात सेना अधिकाऱ्यांनी योजनेच्या संबंधित दंगा
किंवा प्रदर्शन करणाऱ्या तरुणांना सेनेत भर्ती करण्याच्या संबंधित त्यांनी
सांगितले कि अशा तरुणांना कोणत्याही परिस्थितीत सेनेत भरती केल्या जाणार नाही.
अग्निपथ योजनेचे काही फायदे आणि वैशिष्ट्ये
- या योजनेव्दारे देशातील सर्व तरुणांना ज्यांना भारतीय सैन्यात सहभागी व्हायचे आहे, ते या योजनेच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात
- या योजनेमुळे भारतीय सैन्य दलाच्या तीनही शाखांमध्ये मोठ्याप्रमाणात भर्ती केली जाईल, भारतीय सैन्यात, वायुसेनेत आणि नौदलात
- हि सैन्यातील भर्ती अग्निपथ या योजनेंतर्गत केली जाणार आहे
- या योजनेंतर्गत 4 वर्षासाठी भर्ती होणार आहे
- हि योजना सुरु करण्याची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कराच्या तिन्ही सेना प्रमुखांनी केली आहे
- या योजनेंतर्गत भरती झालेल्या /किंवा निवड झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हणून संबोधल्या जाणार आहे
- या अग्निपथ योजनेला मंत्रिमंडळाच्या सूक्ष्म व्यवहार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे
- सरकार हि योजना सुरु करण्याचा निर्णय 14 जून 2022 रोजी घेतला होता
- हि अग्निपथ योजना सर्वांगीण लाभाची ठरणार आहे या योजनेच्या माध्यमातून
बेरोजगारी तर कमी होईलच त्याचबरोबर देशात रोजगाराच्या संधीही निर्माण होईल, आणि तसेच या योजनेच्या अमलबजावणी मुळे देशाची सुरक्षा सुद्धा मजबूत होण्यास मदत होईल - हि अग्निपथ योजना सुरु करण्यापूर्वी तिन्ही सेना प्रमुखांनी पंतप्रधान श्री
नरेंद्र मोदी यांना या योजनेच्या संबंधित projection सुद्धा दिले आहे - या योजनेच्या अंमलबजावणी मुळे राज्यातील तरुण सशक्त आणि शिस्तप्रिय स्वावलंबी होतील, आणि तसेच त्यांचे राहणीमान सुद्धा उंचावण्यास मदत होईल
अग्निवीरांची पहिली बच वर्ष 2023 मध्ये सुरु होणार
अपंगत्व / मृत्यू झाल्यास मिळणारे आर्थिक सहाय्य
श्रेणी | अग्निवीरांना लाभ दिला जातो |
---|---|
सेवेच्या दरम्यान मृत्यू झाल्यास | 48 लाखांचे विमा संरक्षण, चार वर्ष पूर्ण होईपर्यंत वतन सेवानिधीसह 44 लाखांची एकरक्कमी धनराशी प्रदान केली जाईल |
सामान्य मृत्यूच्या बाबतीती | सरकारी योगदान आणि व्याजासह 48 लाखांचे अग्निवीर सेवानिधी निधीचे विमा संरक्षण |
कार्त्यव्यावर असताना अपंगत्व आल्यास | एकरकमी धनराशी 44/25/15 लाख अपंगत्व 100/75/50 टक्के आधारावर. 4 वर्षे पूर्ण होई पर्यंतचा पगार सेवानिधी सह प्रदान केला जाईल, अग्निवीराचा सेवानिधी सरकारी योगदान आणि व्याजासहित प्रदान केला जाईल |
योजनेंतर्अगत अपंगत्व झाल्यास आर्थिक सहाय्य
स्विकारणीय पंगत्वाची टक्केवारी | अपंगत्वाच्या भरपाईची टक्केवारी |
---|---|
20टक्के आणि 49 टक्के | 50 टक्के |
50 टक्के आणि 75 टक्के | 75 टक्के |
76 टक्के आणि 100 टक्के दरम्यान | 100 |
कार्पोरेट उद्योग आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी
अग्निपथ योजनेच्या संबंधित भ्रांती आणि त्यांचे तथ्य
अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांना त्यांचा चार वर्षाचा सेवाकाळ संपल्यानंतर निवृत्त केल्या जाईल, या सेवानिवृत्त अग्निवीरांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकार अनेक रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल, त्यानंतर असे अग्निवीर जे निवृत्ती नंतर स्वतःचा उद्योग करू इच्छित आहे अशा अग्निवीरांना केंद्र सरकार अर्थ सहायता किंवा बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात मदत करेल. त्याचबरोबर ज्या अग्निवीरांना पुढे शिक्षण घ्यायचे आहे त्यांना केंद्र सरकार बारावी पूर्वीचे प्रमाणपत्र देऊन ब्रिज कोर्स केले जाईल. याशिवाय जे अग्निवीर नोकरी करण्यात इच्छुक आहे त्यांना केंद्रीय सुरक्षा बल किंवा राज्य पोलीस मध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याजाईल. याशिवाय अग्निशमन दलासाठी आणि इतर अनेक क्षेत्रे खुले केली जातील जेणेकरून अग्निवीरांच्ये भविष्य सुरक्षित करण्यात येईल.
तरुणांना कमी संधी मिळतील :
या मध्ये जे नागरिक अग्निवीर बनतील त्यांना सशक्त सशस्त्र दलात भरती होण्याची
शक्यता वाढेल सशस्त्र दलात सध्याच्या संख्येपेक्षा तिप्पट अग्निविरांची भरती केल्या जाईल
रेजिमेंट च्या निष्ठेवर परिणाम होईल :
भारत सरकार कडून रेजिमेंट प्रणालीमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. या योजनेच्या अंमलबजावणी रेजिमेंट सिस्टीम आणखी मजबूत होणार आहे. त्याचे कारण म्हणजे मजबूत आणि सशक्त अग्निवीर इथे निवडून येतील
लष्करी दलांच्या कार्यक्षमतेवर परिणाम :
संपूर्ण जगभरात देशातील नागरिकांची सैन्य दलात अल्प कालावधीसाठी भरती केली जाते, पहिल्या वर्षी सरकारकडून एकूण लष्करी दलांच्या केवळ 3 टक्के सैन्यात भरती केले जाईल, यानंतर अग्निववीरांची कामगिरी तपासल्यानंतर त्यांना चार वर्षानंतर पुन्हा सैन्यात समाविष्ट केले जाणार आहे, या यंत्रणे मुळे लष्कराला अनुभवी सैनिक मिळतील.
तरुण सैनिक विश्वासार्ह नसतील :-
जगभरातील बहुतेक सैनिक तरुण आहे, अग्निवीर योजनेच्या अमलबजावणीमुळे तरुण आणि अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्यांना समान प्रमाणात सैन्यात समाविष्ट केले जाईल
अग्निपथ योजनेची इतर देशांच्या समान योजनेशी तुलना
इजराइल
इजराइल या देशात तेथील नागरिकांना देशाच्या सैन्य दलात आपली सेवा देणे
अनिवार्य असते, या देशात नियमांप्रमाणे पुरुष आणि महिला दोघांना सुद्धा सेना मध्ये भर्ती होऊन आपली सेवा देणे अनिवार्य असते, पुरुष नागरिकांना तीन वर्ष आणि महिला नागरिकांना दोन वर्ष आपली सेवा देणे अनिवार्य असते.
ब्राझील
ब्राझील देशात तेथील नागरिकांना वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर सैन्यात भरती होणे अनिवार्य असते, यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय समस्या असल्यास त्यांना सेनेत भर्ती होण्यापासून सूट दिल्या जाते, ब्र्झील मध्ये नागरिकांना 10 ते 12 महिने सैन्यात सेवा देणे अनिवार्य असते.
दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया या देशात नागरिकांना देशाची सेवा संबंधित अत्यंत कडक नियम निर्धारित केलेले आहे, या देशात 18 ते 24 वर्षाच्या तरुण नागरिकांना तेथील सैन्यात 21 महिने आणि नौसेनेत 23 महिने व 24 महिने वायुसेनेत सेवा देणे अनिवार्य असते, तसेच जर देशातील तरुण नागरीकाव्दारा एशियाई खेळांमध्ये गोल्ड जिंकले जाईल तर त्याला सेनेत सेवा देण्याच्या नियमापासून सूट देण्यात येते, तसेच जर खेळाडूंनी एशियाई खेळांमध्ये कोणतेही मेडल जिंकले नाही अशा परिस्थितीत त्यांना वापस सेनेत सेवा देणे आवश्यक असते.
उत्तर कोरिया
या देशात संपूर्ण जगभरातील देशांपेक्षा अधिक जास्त वेळेसाठी सैन्यात सेवा प्रदान करणे आवश्यक आहे, या देशात पुरुषांना एकूण 11 वर्ष आणि महिलांना 7 वर्ष सेवा देणे आवश्यक असते.
तुर्की
या देशात वायाची 20 वर्षे पूर्ण केल्यावर सैन्यात सेवा देणे अनिवार्य असते, यामध्ये देशातील तरुण जर शिक्षण घेत असेल तर शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना सेनेत सेवा देणे आवश्यक असते, देशातील तरुण जे 30 वर्षापासून देशाबाहेर असतील त्यांना एक विशिष्ट शुल्क देऊन या सेवेपासून सूट मिळू शकते
रुस
या देशात ज्या तरुण नागरिकांचे वय 18 ते 27 वर्षाच्या दरम्यान आहे, त्यांना सैन्यात 12 महिन्याची सेवा देणे अनिवार्य असते.
सिरीया
या देशाच्या नियामनुसार देशातील पुरुष नगरीकांना सैन्यात सेवा देणे अनिवार्य असते, जर एखादा पुरुष सैन्यात सेवा देण्यास नकार करतो तेव्हा त्याला तुरुंगात पाठविल्या जाते. या देशात महिला वॉलंटीयर सेवा प्रदान करू शकतात. या देशात 2011 मध्ये देशाच्या राष्ट्रपती व्दारा सेनेत सेवा देण्याची मर्यादा 21 महिन्यातून 18
महिने करण्यात आली आहे.
स्वित्झर्लंड
या देशात 18 ते 34 वर्षाच्या पुरुष नागरिकांना 21 हप्ते सैन्यात सेवा देणे आवश्यक असते, या देशात महिलांना सेनेत सेवा प्रदान करणे अनिवार्य नाही, परंतु महिला नागरिक स्वतःच्या इच्छेने सैन्यात भर्ती होऊ शकतात.
अग्निपथ योजना 2024 संबंधित काही महत्वपूर्ण माहिती
- अग्निपथ योजना 2024 संबंधित महत्वपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे
- अग्निवीरांना एक वर्षात तीस वार्षिक रजा आणि वैद्यकीय सल्यानुसार आजारी असण्याची रजा दिली जाईल
- याशिवाय सर्विस रुग्णालयाच्या माध्यमातून अग्निवीरांना वैद्यकीय सुविधाही पुरविल्या जाणार आहे
- अग्निवीराला सैन्यातील निर्धारित कार्यकाळ पूर्ण केल्याशिवाय सेना सोडता येणार नाही
- अग्निवीराला सेना सोडण्याची परवानगी विशिष्ट परिस्थितीत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यावर
- या परिस्थतीत सेवानिधीच्या रकमेत अग्निवीराणे केलेले योगदान दिले जाईल, ज्यामध्ये जमा झालेले व्याज समाविष्ट केले जाईल.
- अग्निवीर कॉपर्स फंड सरकार तयार करेल
- ज्यामध्ये सरकारचे आणि अग्निवीरांचे योगदान असेल
- अग्निवीराला चार वर्षाचा निर्धारित कार्यकाळ संपूर्ण झाल्यावर हि धनराशी
दिल्या जाईल - अग्निवीराला कोणत्याही सरकारी पीपीएफ मध्ये योगदान देण्याची गरज नाही
- याशिवाय अग्निवीराला कोणतीही ग्रॅच्युइटी किंवा पेन्शन लाभ मिळणार नाही
अग्निपथ सेवानिधी पॅकेजच्या संबंधित महत्वपूर्ण माहिती
खालीलप्रमाणे आहे
- या योजनेच्या अंतर्गत अग्निवीरांनी चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर 10.04 लाखांचे
सेवानिधी पकेज दिले जाईल. ज्यामध्ये अग्निवीर आणि सरकारचे समान योगदान असेल - या योजने अंतर्गत जर अग्निवीरांची कायमस्वरूपी भरती झाली तरच त्यांच्या
योगदानाची रक्कम अग्निवीरांना दिली जाईल - अग्निवीराने जर मुदतीपूर्व राजीनामा दिल्यास, या प्रकरणात केवळ त्याच्या
व्दारे जमा केलेलं योगदान दिले जाईल - या योजनेच्या अंतर्गत दिले जाणारे सेवानिधी पकेज आयकर मुक्त आहे,
- या योजनेंतर्गत अग्निवीराला महागाईभत्ता आणि लष्करी सेवा वेतन दिले जाणार नाही
- अग्निवीराला फक्त रिस्क आणि हार्डशिप, रेशन, ड्रेस, आणि ट्रॅव्हल अलाउन्स प्रदान केले जाईल
- या योजनेंतर्गत जर अग्निवीर इयत्ता 10 वी पास करून भरती झाला असेल त्याला चार वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर इयत्ता 12 वी चे प्रमाणपत्र दिले जाईल.
अग्निपथ योजना नियम आणि अटी
- अग्निपथ योजनेंतर्गत चार वर्षासाठी नागरिकांची भरती केल्या जाईल
- या योजने अंतर्गत निवड झालेल्या नागरिकांना वेगळा दर्जा दिल्या जाईल
- अग्निवीर चार वर्षाची निर्धारित मुदत पूर्ण केल्यावर कायमस्वरूपी नाव नोंदणी करू शकतो
- सुमारे 25 टक्के अग्निवीर नियुक्त केले जाईल
- कायमस्वरूपी नाव नोंदणी झाल्यास लष्कराच्या विद्यमान नियमांनुसार अग्निवीराची पात्रता तपासली जाईल
- यावर्षी 46000 अग्निवीरांची नियुक्ती करण्यात येणार आहे
- या योजनेंतर्गत नावनोंदणी ऑनलाइन केंद्र्कृत प्रणाली, रली, कॅम्पस
मुलाखतीव्दारे केली जाईल - अखिल भारतीय सर्व वर्गाच्या सेटलमेंटवर नावनोंदणी केली जाईल
- या अग्निपथ योजने मध्ये अर्ज करण्याचे वय किमान17.5 ते आणि कमाल 21 वर्ष आहे
- अग्निपथ योजने अंतर्गत किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी इतकी निश्चित
करण्यात आली आहे
अग्निपथ योजनेच्या अंतर्गत डिस्चार्ज
- या योजनेंतर्गत अग्निवीर निर्धारीत कार्यकाळाची चार वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्त होणार आहे
- या योजनेंतर्गत निवृत्त झालेल्या अग्निवीराला सेवा निधीची रक्कम दिली जाणार आहे
- अग्निवीराला ग्रॅच्युइटी किंवा पेन्शन दिली जाणार नाही
- माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना,
- कॅन्टीन स्टोरडिपार्टमेंट सुविधा, माजी सैनिक दर्जा, आणि सैन्याला दिलेले इतर फायदे देखील अग्निवीराला दिले जाणार नाहीत
- जर अग्नीवीराने सैन्याची गुप्त माहिती सार्वजनिक केली असेल किंवा कोणालाही दिली असेल तर, अग्निवीरावर अधिकृत गोपनीयता कायदा 1923 अंतर्गत कारवाई करण्यात येईल
अग्निपथ योजनेंतर्गत महत्वपूर्ण कागदपत्रे
- अर्दाराचे आधार कार्ड
- वर्तमान रहिवासी पुरावा
- आय प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- 10 वी किंवा 12 वी वर्गाची मार्कशीट
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाइल नंबर
- इ-मेल आयडी
- अग्निपथ योजनेच्या अंतर्गत मृत्यू झाल्यास त्याचे वर्गीकरण
अग्निपथ योजना अंतर्गत निर्धारित वय सीमा
भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या व्दारे सुरु करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत सेनेच्या सर्व तिन्ही दलांसाठी चार वर्षाच्या कालावधीसाठी देशातील तरुण नागरिकांची भरती सुरु करण्यात आली आहे, त्यामुळे देशातील ज्या तरुणांना भारतीय सेनेच्या संरक्षण दलांमध्ये भरती होण्याची इच्छा आहे, त्यांना केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या नियमानुसार आणि निर्धारित केलेल्या पात्रतेच्या मापदंडानुसार या योजनेच्या अंतर्गत अर्ज करावे लागतील, या योजनेमध्ये असे तरुण योग्य ठरतील ज्यांचे वय 17.5 वर्षे आणि 21 वर्षाच्या दरम्यान असेल, या नंतर निवड झालेल्या अग्निवीरांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येईल
अग्निवीरांची भरती प्रक्रिया
- आतापर्यंत ज्या पद्धतीने भारतीय सेनेत चयन प्रक्रिया होती त्याचा पद्धतीने या योजच्या अंतर्गत अग्निवीरांची सुद्धा निवड केल्या जाणार आहे.
- या योजनेच्या अंतर्गत निवड करण्यासाठी सैन्याचे निवड सेंटर संपूर्ण देशात
स्थित आहे - या सेंटरच्या माध्यमातून अग्निवीरांचे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे
- या अग्निपथ योजनेंतर्गत उमेदवारांची निवड सैन्याने जारी केलेल्या गुणवत्ता यादींच्या आधारे केली जाईल
- यामध्ये लेखी चाचणी, शारीरिक चाचणी, साक्षरता इत्यादींच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल
अग्निपथ योजना 2024 अंतर्गत अर्ज करण्याची पर्क्रिया
सूचनांचे अनुसरण करावे
वायुसेना अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम आपल्याला वायुसेनेच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेजे उघडेल
- या होम पेजवर तुम्हाला, अग्निवीर रिक्रुटमेंट दिसेल
- यानंतर तुम्हाला अग्निवीर रिक्रुटमेंट या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर अर्जचा फॉर्म दिसेल
- आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण महत्वपूर्ण माहिती भरावी लागेल
- यानंतर तुम्हाला अर्जा संबंधित लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागेल
- आता सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा
- अशा प्रकारे तुम्ही अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर बनण्यासाठीसाठी अर्ज करू
शकतात
आर्मी मध्ये अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया असेल
- सर्वप्रथम तुम्हाला आर्मीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज ओपन होईल
- या होम पेजवर तुम्हाला अग्निवीर या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल, या अर्जात विचालेली संपूर्ण माहिती भरावी लागेल
- यानंतर या योजनेच्या संबंधित संपूर्ण कागदपत्रे अपलोड करावी लागेल
- आता तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल
- अशा प्रकारे तुमची अग्निवीर बनण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल
नौदल अग्निपथ योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम आपल्याला नौसेनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल
- या होम पेजवर तुम्हाला अग्निवीर भर्ती या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर अर्ज फॉर्म उघडेल
- या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण महत्वपूर्ण माहिती जसे कि तुमचे नाव, मोबाइल नंबर, इ-मेल आयडी इत्यादी माहिती भरावी लागेल
- आता तुम्हाला या योजनेच्या संबंधित लागणारी संपूर्ण कागदपत्रे अपलोड करावी लागेल
- यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- अशा प्रकारे तुम्ही अग्निवीरसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता
Mygov Agnipath PDF | इथे क्लिक करा |
---|---|
अग्निवीर भारती पात्रता PDF | इथे क्लिक करा |
आर्मी नोटिफिकेशन PDF | इथे क्लिक करा |
एअर फोर्स नोटिफिकेशन PDF | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट आर्मी | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट वायुसेना | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट नौसेना | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट अग्निपथ | इथे क्लिक करा |
अग्निपथ योजना 2024 या योजनेचा देशात शुभारंभ झाला, केंद्र सरकार नेहमी लोक कल्याणासाठी विविध उपायांचे उपयोग करीत असते, जेणेकरून देशातील नागरिकांना सुविधा आणि चांगले जीवन जगता येईल, त्याचबरोबर समाजातील सर्व स्तरांवर असलेली बेरोजगारी सुद्धा या योजनांच्या माध्यमातून कमी करण्याचा सरकार नेहमी प्रयत्न करीत असते, या सर्व प्रयत्नात एक पाऊल पुढे महणजे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदिजी यांनी पाहिलेले आत्मनिर्भर भारताचे स्वप्न या माध्यमातून आणखी मजबूत करणे, देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या महत्वपूर्ण उद्देशाने केंद्र सरकारने हि अग्निपथ योजना 2024 ची सुरुवात केली आहे या योजनेची घोषणा देशाचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी केली. या योजनेंतर्गत भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सैन्यात भरती करण्यात येईल. वाचक मित्रहो, या लेखात अग्निपथ योजना 2024 या महत्वपूर्ण योजने संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केले आहे, तरीही आपल्याला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून अवश्य कळवा.
अग्निपथ योजना 2024 FAQ
अग्निपथ योजना 2024 हि भारतीय सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सुरु
करण्यात आलेली योजना आहे, हि योजना भारताच्या तिन्ही सेना म्हणजे लष्कर आणि वायुसेना व नौसेना या तिन्ही दलांमध्ये अनुक्रमे जवान, एअरमन, आणि खलाशांच्या पदांवर भरतीसाठी तयार केलेली एक नवीन योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत निवड झाल्यावर या जवानांना अग्निवीर म्हणून संबोधल्या जाईल.
Q. अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
अग्निपथ योजना भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सुरु करण्यात आली आहे, या योजनेसाठी भरतीसाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी असणे अनिवार्य आहे
Q. अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी वयाची मर्यादा काय आहे ?
केंद्रीय शासनाने सुरु केलेली अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भरतीसाठी वयोमर्यादा किमान 17.5 वर्षे आणि कमाल 21 वर्षे निर्धारित करण्यात आली आहे, या निर्धारित वयोमर्यादेत येणारे तरुण या अग्निपथ योजनेंतर्गत अर्ज करू शकतात
Q. अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांचा पगार किती असेल ?
या योजनेंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांना पहिल्या वर्षी 30,000/- रुपये दरमहा वेतन मिळेल, तसेच त्यांना 9000/- रुपयांच्या PPF चा देखील लाभ मिळेल, या प्रकारे अग्निवीरांचे पहिल्या वर्षाचे एकूण वेतन 4,76 लाख होईल. या प्रकारे सेवेच्या दुसऱ्या वर्षाला दरमहा 33 हजार रुपये पगार मिळणार आहे, आणि यावर्षी सुद्धा पहिल्या वर्षाप्रमाणे त्यांना 9000/- रुपये PPF मिळेल, अशा प्रकारे तिसऱ्या वर्षी या अग्निवीरांना 36000/- दरमहा पगार दिला जाणार आहे, तसेच PPF 10950/- जमा होईल, या योजनेमध्ये चौथ्या वर्षा पर्यंत वेतन 40000/- रुपये होईल, आणि PPF सह हे अग्निवीरांचे वार्षिक वेतन 6.92 लाख रुपये होईल.
Q. अग्निवीराचा सेवेच्या दरम्यान मृत्यू झाल्यास काय होईल ?
या योजनेंतर्गत अग्निवीराचा देशसेवेच्या दरम्यान मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना व्याजासहित सेवानिधीसह एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळणार आहे, याशिवाय उर्वरित नोकरीचा पगारहि देण्यात येईल, तसेच जर सेवेच्या दरम्यान अपंग झाल्यास त्याला 44 लाख रुपये पर्यंतची रक्कम दिली जाईल, आणि उर्वरित नोकरीचे वेतन सुद्धा मिळेल.
Q. अग्निवीर कोण आहे ?
अग्निपथ योजना 2024 या योजनेची सुरुवात भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आहे, तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी या योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना या योजनेच्या संबंधित सादरीकरण केले होते, या योजनेच्या अंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निवीर म्हणून संबोधल्या जाणार आहे, या योजनेच्या अंतर्गत अल्प कालावधीसाठी तरुणांना सैन्यात भरती केल्या जाईल, या योजनेला अग्निपथ असे नाव देण्यात आले आहे.