आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना मराठी | लाभार्थी यादी

Maharashtra Acharya Balshastri Jambhekar Patrkar Sanman Yojana List Of Beneficiaries | Journalists Pension Scheme Eligibility | Acharya Balshastri Jambhekar Patrkar Sanman Yojana Information In Marathi | आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना माहिती मराठी

महाराष्ट्र बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना हि योजना राज्यातील जेष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी हि योजना पत्रकारांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शंकराव चव्हाण सुवर्ण मोहोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत जेष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना महाराष्ट्र शासनाने राबविली आहे. आणि शासनाच्या मान्यतेनुसार पात्र पत्रकार लाभार्थ्यांची यादी शासनाने प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रातील जेष्ठ पत्रकारांसाठी हि पेन्शन योजना हि पत्रकारांच्या विविध संघटनांची प्रदीर्घ प्रलंबित मागणी होती. वाचक मित्रहो, आपण या लेखामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या महान कार्याबद्दल आणि त्यांचा जीवनाबद्दल माहिती आणि महाराष्ट्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने बद्दल संपूर्ण माहिती व लाभार्थी यादी, पाहणार आहोत.

Table of Contents

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनाविषयी महत्वाचे

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे आद्य जनक म्हणतात, त्याचबरोबर ते महान प्रबोधनकार आणि समाजसुधारक होते, बाळशास्त्री जांभेकर मुंबईला वास्तव्यास असतांना समाजात वावरतांना अनेक समस्या त्यांना अस्वस्थ करीत पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याचबरोबर समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे व्याधिग्रस्त झालेला समाज, या सर्व विचाराने ते चिंता करत असत, केवळ महाविद्यालयात शिकून उपयोग नाही तर संपूर्ण समाजाला ध्येय  देणे आवश्यक आहे, आणि ते करण्यासाठी समाजाचे प्रबोधन करणे आवश्यक आहे, असे त्यांच्या लक्षात आले, म्हणून त्यांनी समाजाचे प्रबोधन आणि समाज सुधार घडविण्यासाठी 6 जानेवारी 1832 रोजी ”दर्पण” हे मराठीतील पहिले वृतपत्र सुरु करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा मान मिळविला.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी कोकणातील पोंभुर्ले महाराष्ट्र, या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर शास्त्री जांभेकर होते आणि आई सगुणाबाई जांभेकर होत्या बाळशास्त्री जांभेकर यांनी वडिलांकडे घरीच मराठी आणि संस्कृत भाषांचा अभ्यास केला, यानंतर 1825 साली त्यांना मुंबईला पाठविण्यात आले. मुंबईस येऊन त्यांनी इंग्रजी आणि संस्कृत या दोन विषयांबरोबर गणित व शास्त्र या विषयात प्राविण्य मिळविले. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी, संस्कृत बंगाली, गुजराती, कानडी, तेलगु, फारसी, फ्रेंच, लॅटीन, ग्रीक, या दहा भाषांचा ज्ञान होते, बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण वृत्तपत्राचा उपयोग एक लोक शिक्षणाचे मध्यम म्हणून आणि त्याचा उत्तम वापर त्यांनी प्रबोधना साठी करून घेतला, महाराष्ट्रातील शिक्षण प्रसाराच्या सुरवातीच्या अवस्थेत निरनिराळ्या विषयांवरील अभ्यासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे अतिशय कठीण काम या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी केले.

सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या बाबतीत बाळशास्त्री यांची वृत्ती प्रगतशील  विचारांची होती आणि भारतीय समजातील व हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात किमान त्याला आळा बसावा अशी त्यांची भूमिका होती त्यांनी नेहमी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला, बाळशास्त्री जांभेकर खऱ्या अर्थाने द्रष्टे समाजसुधारक होते विविध समस्यांवर सकस चर्च्या घडविण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी नेटिव इंप्रुव्हमेंट सोसायटी ची स्थापना केली. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकारतर्फे दर्पण दिन अथवा वृतपत्र दिन म्हणून साजरा केल्या जातो, बाळशास्त्री जांभेकर हे आद्य मराठी पत्रकार आणि आद्य समाजसुधारक होते त्यांच्यासोबत त्याना आद्य प्रध्यापक संबोधिले जाते त्यांचे हे महान कार्य पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत आहे.

      महा शरद पोर्टल महाराष्ट्र 

महाराष्ट्र बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना (Highlights)

योजनेचे नाव आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2022 माहिती मराठी
व्दारा सुरु महाराष्ट्र शासन
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ पत्रकार
योजनेची तारीख 2019
उद्देश्य योजनेच्या माध्यमातून जेष्ठ पत्रकारांना आर्थिक मदत
विभाग सामान्य प्रशासन विभाग
दरमहा आर्थिक मदत 11,000/- रुपये
अधिकृत वेबसाईट https://dgipr.maharashtra.gov.in/sanman

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना उद्दिष्टे

प्रसिद्धी माध्यमे हा भारतीय लोकशाहीचा चौथा आधार स्थंभ आहे, राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना वेळेवेळी राबवीत असते, त्या योजनांचा संपूर्ण प्रचार आणि प्रसिद्धीचे महत्वाचे काम हि प्रसार माध्यमे आणि त्यामध्ये काम करणारे पत्रकार निरपेक्ष भावनेने करत असतात, त्यामुळे जेष्ठ पत्रकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून हि योजना सुरु करण्या बद्दल महाराष्ट्र शासन विचाराधीन होते. पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात असलेली मागणी, त्याबरोबर विविध पत्रकार संघटना आणि लोकप्रतिनिधी, विधानमंडळ सदस्य यांच्याकडून वारंवार करण्यात येत होती.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना महाराष्ट्र शासनाने राज्यातील जेष्ठ पत्रकारांसाठी या योजनेची सुरवात केली आहे, महाराष्ट्र सरकारच्या विभागाने या बाबतचा निर्णय जरी केला आहे महाराष्ट्र सरकारने या योजनेची घोषणा करतांना अर्थसंकल्पात 15 कोटी निधीची तरतूद केली होती, तसेच पत्रकारांच्या विविध संघटनांनी सातत्याने मागणी केल्यामुळे आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना प्रत्यक्षात आली आहे, महाराष्ट्र सरकारने 2 फेब्रुवारीला या योजनेची घोषणा केली होती, महाराष्ट्र शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे, स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पारेकर कल्याण निधीच्या विश्वस्त मंडळामार्फत हि योजना जेष्ठ पत्रकारांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी राबविली जात आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना (features)

  • महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ पत्रकार आणि सर्व प्रसार माध्यमातील अनुभवी पत्रकारांसाठी या योजनेची सुरुवात केली आहे.
  • पत्रकारांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या विश्वस्त मंडळामार्फत योजना राबविली जाणार आहे.
  • या योजनेंतर्गत जेष्ठ पत्रकारांना दरमहा 11,000/- रुपये आर्थिक सहाय्य केल्या जाते 
  • पत्रकारांना पेन्शन मिळावी म्हणून राज्यातील विविध पत्रकार संघटना वेळोवेळी सातत्याने मागणी करत होत्या, त्यामुळे हि योजना सुरु करण्यात आली आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना 2022 पात्रता आणि आवश्यक कागदपत्र 

  • प्रसारमाध्यमांंमध्ये आणि इतर समाचार माध्यमातील पत्रकार किंवा संपादक म्हणून काम केलेले आणि वयाचे 60 वर्षे पूर्ण झालेले महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ पत्रकार.
  • समाचार माध्यमामध्ये फोटोग्राफर म्हणून आणि पत्रकार म्हणून किमान सलग 30 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले आणि वयाचे 60 वर्ष पूर्ण झालेले फोटोग्राफर आणि जेष्ठ पत्रकार
  • स्वतंत्र व्यावसायी पत्रकार फोटोग्राफर म्हणून पत्रकारिता, फोटोग्राफर पत्रकार म्हणून वयाचे 60 वर्ष पूर्ण झालेले स्वतंत्र व्यवसायी पत्रकार
  • ज्या पत्रकारांची उपजीविका फक्त पत्रकारितेवर अवलंबून आहे आणि दुसरी अन्य कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय नाही असे जेष्ठ पत्रकार
  • ज्या पत्रकारांना केवळ फक्त कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) योजना व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रोतातून पेन्शन किंवा पेन्शन विषयक लाभ मुळात नसेल अशा जेष्ठ पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळेल.
  • तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार पत्रकार आयकर भरत नसावा.
  • किमान सलग १० वर्षे अधिस्वीकृतीधारक असलेले पत्रकार आणि वयाची 60 वर्ष पूर्ण झालेले असावे
  • अधिस्वीकृतीधारक नसलेले पत्रकारांच्या बाबतीत अधिस्वीकृतीपत्रिकेसाठी असलेले निकष पूर्ण करीत असलेले पत्रकार यांचा योजनेसाठी विचार करण्यात येईल, या विषयी निर्णय घेण्याचा अधिकार समितीला राहील.   
  • अर्जदार पत्रकारांना सलग 30 वर्षाचे सेवा समाप्तीचे आदेश असे आवश्यक पुरावे आणि आवश्यक कागदपत्रे जोडावी लागेल.
  • या योजनेमध्ये जेष्ठ पत्रकार ज्या माध्यमामधून पत्रकारिता करून निवृत्त झाले आहे ते, प्रसार माध्यम नियमित असावे आणि सक्षम प्राधिकाऱ्याकडे नोंदणीकृत असावे.
  • या योजनेंतर्गत निवृतीवेतन केवळ जेष्ठ पत्रकाराच्या जीवनकाळातच मिळेल आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराला देय असणार नाही.
  • गंभीर गुन्ह्यामध्ये दोषसिद्ध होऊन शिक्षा झालेली असल्यास अशा पत्रकारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

             सुकन्या समृद्धी योजना मराठी 

महाराष्ट्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आवश्यक कागदपत्र

  • मूळ अर्जासोबत दोन झेरॉक्स प्रती अर्ज सादर करावा
  • सलग 30 वर्ष सेवेचे नियुक्ती पत्रे आणि सेवा समाप्तीचे आदेश मानधन किंवा वेतनाचे पुरावे
  • अनुभवाचा पुरावा आणि ज्या ज्या माध्यमात काम केले आहे तेथील नियुक्ती आदेश

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना

  • माध्यमा मध्ये काम करतांना मिळालेल्या वेतनाचा किंवा मानधनाचा पुरावा
  • भविष्य निर्वाह निधी (EPFO) निवृतीवेतन PPO आदेशाची प्रत
  • अधिस्वीकृती पत्रिका मिळाल्याची दिनांक आणि झेरॉक्स प्रती
  • यापूर्वी अधिस्वीकृती पत्रिका असल्यास त्याची झेरॉक्स प्रत व ती केव्हा मिळाली आणि तीन वर्षाचा  उत्पंन्नाचा दाखल्याची मूळ प्रत
  • अर्जदाराचे पॅनकार्ड
  • अर्जदाराची सर्व माहिती खरी असल्याबद्दल आणि अर्जदार आयकर भारत नसल्यास तसेच अर्जदारास गंभीर गुन्ह्यामध्ये दोष सिद्ध होऊन शिक्षा झाली नसल्यास तसे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सोबत जोडावे लागेल.
  • किमान 60 वर्षे पूर्ण केल्याचा पुरावा म्हणून आवश्यक कागदपत्र ( शाळा सोडल्याचा दाखला किंवा अन्य पुरावा)
  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्र
  • आधारकार्डची प्रत
  • बँकेमधील खाते क्रमांक
  • अर्ज हा सुस्पष्ट भरलेला असावा आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली असावी 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेमध्ये पेन्शन मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा

महाराष्ट्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता जेष्ठ पत्रकारांनी आवश्यक कागदपत्रांसह सबंधित जिल्हा माहिती कार्यालयात अर्ज सादर करावा. या नंतर हे अर्ज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील महासंचालक यांच्या अध्यक्षतेखालिल समितीकडून तपासण्यात येतात, या प्रमाणे पात्र अर्जदारांची निवड करण्याचा अधिकार समितीला असतो.

 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लाभार्थी यादी कशी पहावी

  • आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव तपासण्यासाठी खालीलप्रमाणे शासनच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
  • ऑफिशिअल लिंक :- https//dgipr.maharashtra.gov.in/sanman या लिंक वर भेट दिल्यावर आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी, पेजवर खालीलप्रमाणे दिसेल.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना

योजनेची अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
शासन निर्णय PDF इथे क्लिक करा 
अर्ज PDF इथे क्लिक करा
महाराष्ट्र सरकारी योजना इथे क्लिक करा 

महाराष्ट्र शासनाने राज्यातील जेष्ठ पत्रकारांन प्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी हि योजना सुरु केली आहे, या योजनेचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा.   

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना FAQ

Q. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना काय आहे ?

महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, पत्रकारांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शंकराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याणनिधी या योजना, या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत राबविण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.

Q. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लाभार्थी पात्रता काय आहे ?

समाचार वृतपत्र आणि इतर प्रसारमाध्यम संस्थांमध्ये काम केलेले पत्रकार आणि संपादक, 30 वर्ष सेवा दिल्यानंतर पत्रकार किंवा संपादक म्हणून सेवा निवृत्त झालेले आणि वयाचे 60 वर्ष पूर्ण झालेले जेष्ठ पत्रकार.

Q. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने ची लाभार्थी यादी कशी पहावी ?

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव तपासण्यासाठी खालीलप्रमाणे शासनच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल

ऑफिशिअल लिंक :- https//dgipr.maharashtra.gov.in/sanman या लिंक वर भेट दिल्यावर आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी, पेजवर खालीलप्रमाणे दिसेल.

Q. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने मध्ये अर्ज कसा करावा ?

महाराष्ट्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता जेष्ठ पत्रकारांनी आवश्यक कागदपत्रांसह सबंधित जिल्हा माहिती कार्यालयात अर्ज सादर करावा.  

Leave a Comment