मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र: या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळते, या योजनेमुळे तरुणांना केवळ अनुभव मिळत नाही तर अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. या योजनेचा ज्या प्रकारे तरुणांना फायदा होतो, त्याचप्रमाणे राज्य सरकारलाही फायदा होतो, तरुणांच्या विविध नवकल्पना आणि संकल्पनाही सरकारला मदत करतात.
एक प्रकारे मुख्यमंत्री फेलोशिप योजना युवक-युवतींना कार्यकारी प्रवाहात आणण्याचे काम करते, त्यामुळे ही योजना खऱ्या अर्थाने सरकार आणि तरुणांमधील महत्त्वाचा दुवा आहे. हा कार्यक्रम तरुणांचे ज्ञान आणि अनुभव वाढवण्यास मदत करतो, सरकारी कामाला गती देतो कारण तरुण नवीन तंत्रज्ञानाचा अधिक उत्साहाने वापर करतात.
मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम अधिसूचना जारी केली आहे. निवड प्रक्रियेत दोन टप्पे असतात, पहिल्या टप्प्यात ऑनलाइन परीक्षा असते आणि दुसऱ्या टप्प्यात निबंध लेखन आणि वैयक्तिक मुलाखत असते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकारने त्यांच्या वेबसाइटवर म्हणजे @ https://mahades.maharashtra.gov.in/ वर मुख्यमंत्री फेलोशिप 2023 कार्यक्रम अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप 2023 कार्यक्रम तरुणांना सरकारचा एक भाग बनण्याची संधी देतो. महाराष्ट्र सीएम फेलोशिप प्रोग्राम 2023 अंतर्गत एकूण 60 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम बद्दलचे सर्व तपशील जसे की अधिकृत अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, पात्रता निकष, अर्जाची लिंक इ. आपण पुढील लेखामध्ये पाहणार आहोत. या योजनेंतर्गत सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र: संपूर्ण माहिती
शासन निर्णयानुसार सन 2015-16 ते 2019-20 या कालावधीत मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र राबविण्यात आला होता, राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असतांना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळावा त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येय्य्वादी, सुजाण नागरिक तयार व्हावेत या करिता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळाला व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कशा रुंदावण्यात मदत झाली, तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता याचा उपयोग प्रशासनाला झाला. आणि तरुणांमधील उत्साह, तंत्रज्ञानाची आवड या माध्यमातून प्रशाकीय प्रक्रियांना गती मिळाली.
शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम संपुष्टात आणण्यात आला होता, परंतु मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबत होत असलेली आग्रही मागणी लक्षात घेऊन सदर कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची तसेच फेलोंना भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल या दृष्टीने सदर कार्यक्रमास शैक्षणिक कार्यक्रमाची जोड देण्यासाठी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
मुख्यमंत्री फेलोशिप योजना Highlights
योजना | मुख्यमंत्री फेलोशिप योजना |
---|---|
व्दारा सुरु | महाराष्ट्र सरकार |
योजना आरंभ | 2023 नव्याने सुरु करण्यात आली आहे |
लाभार्थी | राज्यातील सुशिक्षित तरुण |
अधिकृत वेबसाईट | https://mahades.maharashtra.gov.in/ |
उद्देश्य | राज्यातील तरुणांना सरकारी तंत्राचा अनुभव देण्यासाठी |
पगार | 75,000/- रुपये प्रवास खर्च धरून |
अर्जाची शेवटची तारीख | 02 मार्च, 2023 |
ऑनलाइन परीक्षेची तारीख | 04 & 05 March 2023 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी योजना |
वर्ष | 2024 |
जागा | 60 |
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री फेलोशिप योजना अंतर्गत शासन निर्णय
शासन निर्णय:- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आणि टा अनुषांगाने फिलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती निक्षित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांची रूपरेखा ठरविण्याच्या दृष्टीने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
चला, महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र काम करुया,
‘मुख्यमंत्री फेलोशिप-२०२३’ कार्यक्रमात सहभागी होऊ या…अर्ज करण्याची अंतिम तारीख – २ मार्च २०२३
अर्ज करण्यासाठी भेट द्या – https://t.co/Uyqq4ftHBe@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR pic.twitter.com/5UJ0FGox7T— CM Fellowship (@CMFP_MH) February 16, 2023
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम करिता फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, फेलोंच्या नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेखा व अंमलबजावणी बाबत खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप योजना फेलोंच्या निवड संबंधित निकष
यामध्ये अर्जदार भारताचा नागरिक असावा
शैक्षणिक अहर्ता: या योजनेच्या अंतर्गत कोणत्याही शाखेचा पदवीधर (किमान 60% गुण आवश्यक) असावा, तथापि उच्चतम शैक्षणिक अहर्तेस प्रधान्य दिले जाईल
अनुभव: यामध्ये किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटरशिप/अप्रेंटीसशिप/आर्टिकलशिप सह एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहील, पूर्णवेळ स्वयंरोजगार, उद्योजकतेचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल, अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल
भाषा व संगणक ज्ञान: मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील, हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरसे ज्ञान असणे आवश्यक राहील, तसेच संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील
वयोमर्यादा: उमेदवारास वय अर्ज सादर कारवायांच्या अंतिम दिनांकास किमान 21 वर्षे व कमाल 26 वर्षे असावे
अर्ज कारवायाची पद्धत: अर्थ व सांख्यिकी संचालानालायाव्दारे विहित केलेल्या ऑनलाइन अप्लिकेशन सिस्टीमव्दारे यामध्ये उमेदवाराने अर्ज करवयाचा आहे.
अर्जासाठी आकारण्यात येणारे शुल्क: 500/- रुपये
फेलोंची संख्या: सदर कार्यक्रमात फेलोंची संख्या 60 इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या 1/3 इतकी राहील, 1/3 महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याएवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल
फेलोंचा दर्जा: शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समक्ष असेल
नियुक्ती संदर्भातील कार्यवाही: फेलोंच्या निवडीसाठी जाहिराती देणे, अर्ज मागविणे,अर्जाची छाननी करणे, परीक्षा घेणे, उमेदवारांची निवड करणे, नियुक्ती देणे यासाठी तसेच कार्यक्रम राबविण्याकरिता कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ नियुक्ती, आवश्यकतेनुसार वेबसाईट/वेबपेज तयार करणे व अद्यावत करणे, कार्यक्रमाचा प्रचार करणे व प्रसिद्धी करणे या कामासाठी आवश्यक संस्थाची नेमणूक इत्यादी बाबतची कार्यवाही अर्थ व सांख्यकी संचालनालय मुंबई यांच्या मार्फत पार पाडण्यात येईल.
योजनेंतर्गत निवडीची कार्यपद्धती
- फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाइन अर्ज करून ऑनलाइन परीक्षा शुल्क भरावे लागेल, तसेच ऑनलाइन अर्ज करतांना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
- परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणी (online objective test) परीक्षा द्यावी लागेल.
- ऑनलाइन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटीचे व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील
- देशातील प्रमुख शहरे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल, तथापि प्राप्त अर्जाची संख्या विचारात घेता उमेदवारास उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्राबाबत अर्थ व सांखिकी संचलनालयाचा निर्णय अंतिम राहील
- यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाही, तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील
- वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वधिक गुण मिळविणाऱ्या 210 उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल
या 210 उमेदवारांच्या मुलाखतीसाठी खालीलप्रमाणे समिती गाठीत करण्यात येईल
संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई | अध्यक्ष |
---|---|
विशेष कार्यकारी अधिकारी, उपमुख्यमंत्री सचिवालय | सदस्य |
उपमुख्यमंत्री सचिवालयाने नामनिर्देशित केलेला उपसचिव अथवा त्यावरील दर्जाचा एक अधिकारी | सदस्य |
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने नाम निर्देशित केलेला गट अ दर्जाचा एक अधिकारी | सदस्य |
आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी | सदस्य |
मुख्य संशोधन अधिकारी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई | सदस्य सचिव |
मुख्यमंत्री फेलोशिप योजना महत्वपूर्ण मुद्दे
- मुलाखतीच्या वेळी शैक्षणिक आहर्तेसोबत उमेदवाराची सामाजिक व सार्वजनिक कामासंबंधात बांधिलकी सशक्त चारित्र्य, सकारत्मक दृष्टीकोन, संघ भावनेने काम करण्याची वृत्ती, संबंधित कामाचा अनुभव, सदर कार्यक्रमासाठी त्याची योग्यता या आणि इतर बाबी विचारात घेतल्या जातील.
- अंतिम निवड करतांना वस्तुनिष्ठ चाचणी, निबंध व मुलाखत यासाठी अनुक्रमे 15 30 व 50 असे गुण राहील, मान्यताप्राप्त संस्थेची पदव्युत्तर पदवी वा व्यावसायिक पदवी यांच्या आधारावर 5 गुण राहील
- उमेदवारांची अंतिम निवड करतांना दोन उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास महाराष्ट्राचा अधिवासी असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
- एकूण 60 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल
- फेलोशिप कार्यक्रमासाठी नियुक्तीचा कालावधी:- फेलोंची नियुक्ती 12 महिने कालावधीसाठी असेल, यामध्ये वाढ करण्यात येणार नाही, तसेच फेलो रुजू झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.
- विद्यावेतन:- सदर कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये 75,000/- व प्रवास खर्च रुपये 5000/- असे एकत्रित रुपये 75,000/- छात्रवृत्ती स्वरूपात देण्यात येईल
- शैक्षणिक कार्यक्रम: शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिप कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असेल, निवड झालेल्या फेलोंसाठी आयआयटी, मुंबई आणि आयआयएम नागपूर यांच्या सहकार्यातून स्वतंत्र शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातील, या कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी काम करतांना फेलोंना उपयोगी पडतील अशा विविध विषयांवर फेलोशिपच्या सुरुवातीला दहा दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, या कार्यक्रमाचा उद्देश्य फेलोंना सार्वजनिक हितासाठी काम करतांना व धोरण निर्मिती करतांना योग्य साधने व शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यासाठी मदत करणे तसेच विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य व क्षमता वाढविणे हा असेल, आयआयटी मुंबई आणि आयआयएम, नागपूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल
- शैक्षणिक कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात आयआयटी मुंबई आणि आयआयएम, नागपूर मार्फत विविध विषयांचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाईल, विषयांचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यावर फेलोंना संबंधित संस्थांमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल, आयआयटी मुंबई आणि आयआयएम, नागपूर या प्रत्येक संस्थेसाठी प्रत्येकी 50% फेलो निवडले जातील, फेलोंना प्रशिक्षणाकरिता संस्था वाटपाचे संपूर्ण अधिकार अर्थ व सांख्यिकी संचलनालयास राहतील, संबंधित अधिकाऱ्यांवर संस्था निवडीसाठी कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्याचा अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालानालायास राहील, शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यलयात वा प्राधिकरणासोबत फेलोंनी करावयाचे काम ( फिल्ड वर्क) व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही यशस्वीपणे पूर्ण फेलोंसाठी पूर्ण करणे फेलोंसाठी अनिवार्य राहील.
- इतर कार्यक्रम:- शैक्षणिक कार्यक्रमा व्यतिरिक्त परिचय सत्र, विविध सामाजिक संस्थांना भेटी, मान्यवर व्यक्तींशी संवाद, प्रमाणपत्र प्रदान या उद्देश्याने वर्षभरात इतर काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
मुख्यमंत्री फेलोशिप योजना अंतर्गत निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
टप्पा 1
- भाग 1: ऑनलाइन चाचणी
- भाग 2 : सर्वाधिक गुणांच्या आधारे स्टेज 2 साठी 210 उमेदवारांची निवड
टप्पा 2
- भाग 1 : निवडलेले उमेदवार निबंध अपलोड करतील
- भाग 2 : मुलाखत (निबंध अपलोड करणार्या शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लागू)
- भाग 3 : निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे
ऑनलाइन चाचणीचे स्वरूप:
- एकाधिक निवड वस्तुनिष्ठ प्रश्न
माध्यम
- परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल. जिथे शक्य असेल तिथे प्रश्नांचे मराठी भाषांतर आणि पर्यायी उत्तरे दिली जातील
कालावधी: 60 मिनिटे
योजनेंतर्गत स्टेज 2 साठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग
- एकूण गुण 100 पैकी असावेत
- सर्वाधिक गुण मिळालेल्या 210 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल
- निवडलेल्या उमेदवारांनी 3 लेखी निबंध सादर करावेत. निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असू शकतात
- निबंधांचे विषय उमेदवारांना ईमेल आणि वेबसाइटद्वारे कळवले जातील
- सर्व 3 निबंध सादर केलेल्या निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. सर्व 3 निबंध सादर न केलेले शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरणार नाहीत
योजनेंतर्गत अंतिम निवड
उमेदवारांच्या अंतिम निवडीसाठी खालील चिन्हांकन प्रणाली वापरली जाईल
- ऑनलाइन परीक्षेचे 100 पैकी 15 गुण + निबंध 30 गुण + मुलाखत 50 गुण + पदव्युत्तर किंवा व्यावसायिक पदवी 5 गुणांमध्ये रूपांतरित केले जातील.
- निवडलेल्या 60 उमेदवारांची यादी आणि 15 उमेदवारांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाईल
- निवडलेल्या उमेदवारांनी निर्धारित कालावधीत ऑफर लेटर न स्वीकारल्यामुळे निर्माण झालेल्या रिक्त जागा प्रतीक्षा यादीतून भरल्या जातील.
फेलोंच्या नियुक्तींच्या अनुषांगाने विहित करण्यात येत असेलल्या अटी व शर्ती
- भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर संबंधित अधिकार्यांवर निवडीसाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्याचा अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयास राहील.
- फेलोंच्या नियुक्तीनंतर:- पोलीस पडताळणी अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत रुजू झाल्यावर करण्यात येईल,
- नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचे सक्षमतेचे प्रमाणपत्र रुजू होताना सादर करणे बंधनकारक राहील
- फेलोंची शैक्षणिक अहर्ता, इत्यादी च्या सत्यतेबद्दल कागदपत्रांची तपासणी इत्यादी बाबी अर्थ व सांख्यिकी संचालनालयास, मुंबई यांच्या मार्फत करण्यात येईल.
- या कार्यक्रमांतर्गत निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला 12 महिन्यांच्या कराराने फेलोशिप देऊन नियुक्ती करण्यात येईल, सदर 12 महिन्यांचा कालावधीत शैक्षणिक कार्यक्रमाचा कालावधी तसेच फेलोशिप कार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या इतर उपक्रमांचा कालावधी अंतर्भूत धरण्यात येईल. कराराच्या कालावधीत मानधनामध्ये कोणतीही वाढ अनुज्ञेय असणार नाही
- निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर निर्देशित केलेल्या ठिकाणी व विहित मुदतीत उमेदवारास स्वखर्चाने हजार व्हावे लागेल, कोणत्याही परिस्थितीत यात सवलत दिली जाणार नाही निर्देशित ठिकाणी व विहित मुदतीत हजार न राहणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती रद्द केली जाईल, या संदर्भात अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने घेतलेला निर्णय अंतिम राहील
- उमेदवाराकडून विभाग/कार्यालय/प्राधिकरण बाबत पसंती क्रामाची विचारणा करण्यात आली तरी शासनाच्या प्राथमिकता तसेच उमेदवाराची योग्यता व उपयुक्तता विचारात घेऊन उमेदवारास विभाग/कार्यालय प्राधिकरण नेमून दिले जाईल, याबाबत अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांच निर्णय अंतिम राहील. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास निवड झाल्यानंतरहि नियुक्ती न देण्याचा व निवड प्रक्रियेतून बाद करण्याचा अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनाल, मुंबई यांना राहील.
- ज्या विभाग/कार्यालय/प्राधिकरण मध्ये फेलोंची नियुक्ती करण्यात येईल त्या कार्यालयाने संबंधित फेलोला फेलोशिपच्या कार्यकाळात संगणकीय सुविधा इंटरनेट जोडणीसह उपलब्ध करून द्यावी, संबंधित फेलोचा कार्यकाळ संपताच फेलोकडून सदर संगणकीय सुविधा काढून घेण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाची राहील.
- फेलोंना फेलोशिपच्या कालावधीत तात्पुरते ओळखपत्र व तात्पुरता अधिकृत शासकीय ई-मेल आयडी देण्यात येईल, संबंधित फेलोचा कार्यकाळ संपताच फेलोकडे असणारे ओळखपत्र संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना परत करणे आवश्यक राहील, तसेच फेलोला देण्यात आलेल्या ई-मेल आयडीची सुविधा बंद करण्यात येईल.
- फेलोंना महागाई भत्ता, अंतरिम किंवा वेतन आयोगाचे सेवा विषयक लाभ अनुज्ञेय असणार नाही,
- फेलोंना करार कालावधीत वैद्यकीय प्रतिपूर्ती अनुज्ञेय असणार नाही
- करार कालावधीत सेवा हि निवृत्तीवेतन, बोनस, रजा प्रवास सवलत, रजा रोखीकरण किंवा अन्य कोणत्याही आर्थिक लाभासाठी व सेवा विषयक लाभांसाठी विचारात घेतली जाणार नाही.
- व्यवसाय कराची वसुली फेलोच्या मानधनातून करण्यात येणार नाही
- फेलोंचा- समूह वैयक्तिक अपघात विमा जोखीम: या योजनेंतर्गत विमा उतरविण्याबाबत वित्त विभागाच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- सम संवर्गातील अधिकारी जी कर्तव्ये बजावतात, टी कर्तव्ये फेलोंची राहील, त्यानुसार फेलो कार्यालयातील सर्व नियमांचे पालन करून निर्धारित वेळेनुसार कार्यालयात उपस्थित राहून कर्तव्ये पार पाडतील तसेच या कालावधीत फेलो पूर्णवेळ अभ्यासक्रम, खाजगी व्यवसाय व अर्ध /पूर्ण वेळ नोकरी करू शकणार नाही, कार्यलयीन कामकाजाच्या दिवसा व्यतिरिक्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जर कार्यलयीन कामकाजासाठी कर्तव्ये बजावावे लागले, तर त्यासाठी फेलोंना कामावर हजर राहावे लागेल, त्याकरिता कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त मानधन अनुज्ञेय असणार नाही.
- कराराच्या 12 महिन्यांच्या कालावधीत फेलोंना 8 दिवसांची किरकोळ रजा अनुज्ञेय रहील, अन्य कोणत्याही प्रकारची रजा त्यांनी उपभोगल्यास त्यानुसार मानधनातून कपात करण्यात येईल
- फेलोंनी मुख्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असून संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशियाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही
- फेलोंचा कालावधी बारा महिन्यांचा असेल फेलोंची निवड बारा महिन्याचा कालावधी समाप्त झाल्यावर आपोआप संपुष्टात येईल. फेलोची निवड हि फक्त तात्पुरत्या स्वरुपाची असेल, फेलोंना सरकारी नोकरीत समाविष्ट होण्याचा हक्क प्राप्त होणार नाही
- करार कालावधीत जर फेलोचा मृत्यू झाल्यास व अपंगत्व आल्यास, त्यांच्या कर्तव्य कालावधीतील छात्रवृत्ती/विद्यावेतन रक्कम त्यांच्या घोषित कुटुंबियांना देण्यात येईल, परंतु सानुग्रह अनुदान किंवा अनुकंपा तत्वानुसार नियुक्ती देण्यात येणार नाही.
- कराराच्या कालावधीत फेलोंना राजीनामा द्यावयाचा असल्यास किमान एक महिना अगोदर स्वाक्षांकित अर्ज नियुक्ती केलेल्या कार्यालयामार्फत संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना सादर करवा लागेल
- राजीनामा किंवा इतर कारणास्तव एखाद्या फेलोची फेलोशिप खंडित झाल्यास सदर फेलोस शैक्षणिक कार्यक्रमही पूर्ण करता येणार नाही
- फेलोंनी केलेल्या कामगिरीबाबत, कराराच्या कालावधीत तसेच कार्यक्रमाची मुदत संपल्यानंतरहि पूर्ण गुप्तता बाळगण्यात येईल. करार कालावधीत त्यांनी केलेली कामगिरी/संशोधन/जमा केलेली माहिती/मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेले मुद्दे याबाबत कराराच्या कालावधीत किंवा त्यानंतरही त्यांना कोणतीही माहिती प्राधिकृत अधिकाऱ्या व्यतिरिक्त कोणासही देता येणार नाही
- फेलोशिपच्या कालावधीत फेलो कोणत्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकणार नाही, तसेच त्यांच्याकडून कोणतेही अशोभनीय कृत्य घडणार नाही, यांची त्यांनी दक्षता घ्यावी, फेलोंची सचोटी राखणे, निवडणुकीत भाग न घेणे, वृत्तपत्रांना माहिती न देणे, कोणत्याही प्रकारची देणगी न घेणे ई. बाबत दक्षता घ्यावी
- फेलोंना राज्यातील प्रकल्पांना/आस्थापनांना भेट देताना नियुक्त केलेल्या कार्यलयाच्या प्रमुखाची पूर्व मंजुरी घ्यावी लागेल, यासंदर्भात ज्या प्रकल्पांना /आस्थापनांना भेट द्यावयाची आहे, त्यांच्या प्रमुखाला त्यांबाबतची पूर्वकल्पना द्यावी
- फेलोशिपच्या संपूर्ण कालावधीत तसेच त्यानंतर फेलोंनी केलेल्या कोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी व बेकायदेशीर कृत्यांच्या अनुषंगाने त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वी फेलोंवर राहील.
- फेलोंच्या कराराच्या कालावधीत असमाधानकारक कामगिरी किंवा गैरशिस्तीच्या कारणांमुळे कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांचा फेलो म्हणून नियुक्तीचा करार समाप्त करण्यात येईल.
- फेलोंना प्रत्येक महिन्यात त्यांच्या कामगिरीचा अहवाल ई-मेल व्दारे नियुक्त केलेल्या कार्यालयाच्या प्रमुखास व संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना सादर करावा लागेल
- अहवालात फेलोंनी महिनाभरात केलेले कामकाज तसेच त्या कामातून ते काय शिकले व त्या अनुषांगाने त्यांच्या सूचना याबाबत नोंद ठेवणे अपेक्षित आहे.
- फेलोंच्या नियुक्तीनंतर प्रत्येक तीन महिन्यांनी फेलोंच्या कामगिरीचे मूल्यमापन संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई हे करतील
- शासनाच्या हितासाठी या अटी/शर्तीमध्ये बदल /वाढ करण्यात आल्यास त्या फेलोंवर बंधनकारक राहतील
- उपरोक्त अटी /शर्ती मान्य आहेत, या आशयाचे संमतीपत्र नियुक्ती देण्यापूर्वी फेलोंकडून घेण्यात येईल,
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी यांच्या अधिनस्त कंत्राटी तत्वावर एका समन्वयकाची सेवा घेता येईल, तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयास आवश्यकतेनुसार कमाल 5 इतक्या मनुष्यबळ मर्यादेत कंत्राटी तत्वावर सेवा घेता येतील
- शैक्षणिक कार्यक्रम व इतर कार्यक्रम आयोजनाकरिता येणारा खर्च तसेच आवश्यकतेनुसार तज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित केल्यास त्यांच्या मानधनावरील खर्च मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा, या कार्यक्रमांसाठी आवश्यकतेनुसार निवास व भोजन व्यवस्था करणे शक्य न झाल्यास प्रत्येक फेलोस रुपये 2,250/- (प्रतिदिन) या दराने भत्ता देण्यात येईल.
महाराष्ट्र सीएम फेलोशिप प्रोग्राम अभ्यासक्रम
महाराष्ट्र सीएम फेलोशिप प्रोग्राम 223 अभ्यासक्रम: महाराष्ट्र सीएम फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत विषयाचा विषय खाली खाली दिलेल्या आहेत.
- सामान्य ज्ञान: भारत आणि महाराष्ट्र संदर्भात चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, सामाजिक समस्या आणि अर्थशास्त्र यावरील प्रश्न
- रिझनिंग: रिझनिंग क्षमतेशी संबंधित प्रश्न
- इंग्रजी भाषा: वाक्य निर्मिती आणि व्याकरण संबंधित प्रश्न
- मराठी भाषा: व्याकरण आणि रचना
- माहिती तंत्रज्ञान: विंडोज 7, एमएस ऑफिस 2010, इंटरनेट
- परिमाणात्मक योग्यता: डेटा व्याख्या, अंकगणित, बीजगणित, मूलभूत भूमिती
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम अर्ज प्रक्रिया
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम अर्ज प्रक्रिया: महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2023 अंतर्गत पदवीधर फेलोशिप पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2023 आहे. अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही खाली PDF देखील पाहू शकता
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
---|---|
मुख्यमंत्री फेलोशिप योजना दिशानिर्देश माहिती PDF | इथे क्लिक करा |
योजना आरंभ | 8411960005 |
ई-मेल आयडी | [email protected] |
महाराष्ट्र सरकारी योजना | इथे क्लिक करा |
केंद्र सरकारी योजना | इथे क्लिक करा |
निष्कर्ष / Conclusion
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम तरुणांना सरकारचा भाग बनण्याची संधी देतो. फेलोच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा प्रशासनाला फायदा झाला. फेलोचा उत्साह आणि तंत्रज्ञानाची जाण प्रशासकीय प्रक्रियेला गती देते. कार्यक्रमाने तरुण फेलोना ज्ञान आणि अनुभवांद्वारे त्यांची दृष्टी विस्तृत करण्यात मदत केली आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजना FAQ
Q. महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम काय आहे?
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा आणि मुख्य उपक्रम आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम तरुणांना सरकारचा भाग बनण्याची संधी देतो. तसेच फेलोच्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रशासनाला मदत करतात. फेलोचा उत्साह आणि तंत्रज्ञानाची जाण प्रशासकीय प्रक्रियेला गती देते. हा कार्यक्रम तरुण फेलोना ज्ञान आणि अनुभवांद्वारे त्यांची दृष्टी विस्तृत करण्यात मदत करतो.
Q. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम कोणाव्दारे सुरू करण्यात आला आहे?
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस. हा कार्यक्रम 2020 पर्यंत राबविण्यात आला होता, त्यानंतर 2023 मध्ये माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला.
Q. या योजनेंतर्गत निवड प्रक्रियेचे विविध टप्पे कोणते आहेत?
निवड प्रक्रियेत 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यावर सर्व अर्जदारांना दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणी देणे आवश्यक आहे.
ऑनलाइन परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारे 210 अर्जदार दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरतात. या उमेदवारांनी दिलेल्या विषयांवर 3 निबंध सादर करणे आवश्यक आहे. अंतिम निवडीसाठी निबंध सादर करणाऱ्या उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्या जातात. गुणवत्तेच्या आधारावर 60 उमेदवारांची निवड केली जाते. ऑनलाइन चाचणीची रचना तसेच अंतिम निवडीसाठी ऑनलाइन चाचणी, निबंध आणि मुलाखती.
Q. या योजनेंतर्गत कामाचे स्वरूप काय आहे?
प्रत्येक फेलोचे कामाचे स्वरूप वेगळे असते. ते ज्या कार्यालयात/अधिकारी आहे तेथील नियुक्ती आणि आवश्यकता यावर अवलंबून असते. फेलो चालू कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी, उपक्रम/प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी, प्रकल्प देखरेख, विद्यमान सरकारी कार्यक्रमांचे पुनरावलोकन, धोरण तयार करणे, इत्यादींना पाठिंबा देण्यासाठी सहभागी असू शकतात. फेलोशिपच्या संपूर्ण कालावधीत एकाच प्रकल्पावर काम करू शकतात. किंवा कामाच्या स्वरूपावर अवलंबून अनेक प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकते.