निपुण भारत योजना 2024: भारत सरकारने देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण सुरु केले आहे, या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शासनाचा उद्देश्य आहे कि शिक्षण क्षेत्रात बदल करून देशातील शैक्षणिक क्षेत्रात सर्वात मोठा आणि महत्वपूर्ण बदल घडवून आणणे आणि शिक्षण क्षेत्राचा विकास साधने. कारण शिक्षण क्षेत्राचा विकास म्हणजे सर्वात महत्वाचा विकास आहे, शिक्षण म्हणजे माणसाचा मुलभूत पाया असतो, शिक्षणामुळे माणसात आत्मविश्वास निर्माण होतो त्याचबरोबर शिक्षणामुळे आपले व्यक्तिमत्व सुद्धा घडण्यास मदत होते, तसेच माणसाला जीवनात पुढे जाण्यासाठी त्याचे जीवन घडविण्यासाठी यश मिळविण्यासाठी आपल्याला योग्य आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण घेणे आवश्यक असते, त्या मधूनही शालेय शिक्षणाचे महत्व आपल्या सर्वांच्या जीवनात अत्यंत महत्वाचा टप्पा असतो, त्यावेळी आपल्याला प्राथमिक शिक्षण योग्य आणि योग्य पद्धतीने मिळणे हे अत्यंत आवश्यक असते कारण शिक्षणामुळे माणसाची वैचारिक क्षमता वाढते, शिक्षणामुळे आपण आजूबाजूच्या जगाला समजू लागतो त्यामुळे शिक्षणाचे महत्व थोड्या शब्दातून मांडणे कठीण आहे.
शिक्षण हा माणसाच्या वैयक्तिक व सामाजिक आणि आर्थिक विकासाचा एक महामार्ग आहे, या सर्व बाबींचे महत्व जाणून भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण-2020 सुरु केले, या नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारताचे माननीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी 5 जुलै 2021 रोजी निपुण भारत मिशन हा कार्यक्रम सुरु केला.
निपुण (NIPUN) म्हणजे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टॅडिंग अँड न्युमरसी, भारत सरकारची हि तीन ते नव वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत मुलभूत साक्षरता आणि अंकगणित या विषयांचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे या योजनेचे ध्येय आहे. निपुण भारत मिशन 2024 काय आहे तसेच निपुण भारत योजना 2024 अंमलबजावणी प्रक्रिया काय आहे, अशा प्रकारची, या योजने संबंधित संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत त्यामुळे हि पोस्ट संपूर्ण वाचणे आवश्यक आहे.
निपुण भारत मिशन संपूर्ण माहिती मराठी
निपुण भारत योजना 2024 संपूर्ण माहिती मराठी भारत सरकारचे या योजनेच्या व्दारे ध्येय आहे कि देशातील प्रत्येक मुलाला 2026 – 27 पर्यंत तिसरी इयत्ता संपेपर्यंत मुलभूत साक्षरता आणि अंकगणित (संख्यात्मकता) कौशल्य आत्मसात करणे हे सुनिश्चित करणे, वाचण्याची, लिहिण्याची शिकण्याची क्षमता प्रदान करणे हे या उपक्रमाचे उद्देश्य आहे, भारत सरकारची हि योजना शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग यांच्या मार्फत राबविली जाणार आहे, या योजनेचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे हि योजना केंद्र पुरस्कृत योजना समग्र शिक्षा अभियान या योजनेच्या अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. या मिशन व्दारे शालेय शिक्षणाच्या मुलभूत वर्षांमध्ये मुलांना प्रवेश देणे आणि टिकवून ठेवणे त्याचबरोबर शिक्षक क्षमता वाढ, उच्च दर्जाचा विद्यार्थी आणि शिक्षक संसाधने, तसेच शिक्षण साहित्याचा विकास आणि त्याचबरोबर शिक्षणाचे परिणाम साध्य करण्यासाठी प्रत्येक मुलाच्या प्रगतीचा मागोवा घेणे.
शिक्षण मंत्री श्री पोखरीयाल यांनी सांगितले कि तीन ते नव वयोगटातील मुलांच्या शिकण्याच्या गरजा पूर्ण करणे हे या निपुण भारत योजना 2024 चे उद्दिष्ट आहे. मुलभूत भाषेच्या विकासासाठी शिक्षकांनी प्रत्येक मुलाच्या साक्षरता आणि गणित कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना चांगले वाचक आणि लेखक बनण्यास मदत होईल. शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक सुधारणा आणि शिक्षणाला सीमाभिंतीबाहेर घेऊन मुलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये लागू करण्यात आले आहे,
या योजनेच्या अंतर्गत मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करणे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणासंबंधित गोडी निर्माण करणे हे ध्येय या योजनेच्या माध्यामतून ठेवण्यात आले आहे. या प्रकारे निपुण भारत मिशन या योजनेच्या माध्यमातून मुलांना शालेय जीवनातील महत्वपूर्ण टप्प्यावरच शिकण्याचा समग्र अनुभव, सर्वसमावेशक एकात्मिक आणि आनंददायक व आकर्षक बनविण्यासाठी हा एक उकृष्ट कार्यक्रम आहे.
निपुण भारत कार्यक्रमा संबंधित शिक्षण मंत्री म्हणाले कि, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सर्व मुलांना मुलभूत साक्षरता आणि संख्या कौशल्ये प्राप्त करणे हे जलद गतीचे राष्ट्रीय मिशन बनले पाहिजे असे नमूद केले आहे. हे लक्षात घेवून त्यांच्या विभागाने निपुण भारत योजना 2024 अंतर्गत सर्व समावेशक मार्गदर्शक तत्वे विकसित केली असल्याची माहिती श्री पोखरीयाल यांनी दिली आहे. ते लवचिक आणि सहाय्यक बनविण्यासाठी भागीदार व तज्ञांशी सखोल सल्लामसलत करण्यात आली आहे, यामध्ये राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि शालेय स्तरांवर अंमलबजावणी व्यवस्था प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता तसेच प्रशासकीय पैलू या प्रमुख तांत्रिक बाबींचा समावेश आहे.
मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता कौशल्ये आणि दर्जेदार शिक्षण
राज्याचे शिक्षण मंत्री म्हणाले कि दर्जेदार शिक्षण हा सशक्त राष्ट्र उभारणीचा आधार असून, साक्षरता आणि संख्यात्मकता कौशल्ये हे मुलभूत शिक्षण त्याचे प्रमुख घटक आहेत, येत्या काही वर्षात हे मिशन शालेय शिक्षणांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलेल, आणि एकविसाव्या शतकातील भारतावर त्याचा जोरदार प्रभाव पडेल, निपुण भारत मिशन केवळ आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च वर्गात चांगली झेप घेण्यास मदत करेल असे नाही तर विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यातही त्याच प्रभाव पडेल.
Hon’ble Education Minister @DrRPNishank will be launching the National Initiative for Proficiency in reading with Understanding and Numeracy (NIPUN) Bharat under the Atma Nirbhar Programme today! #NEP2020 #NIPUNBharat pic.twitter.com/9LaEtSTxB9
— Ministry of Education (@EduMinOfIndia) July 5, 2021
या निपुण भारत योजना 2024 कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाची उद्दिष्ट सूचीच्या स्वरुपात किंवा मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्यांसाठी लक्षांच्या स्वरूपात निर्धारित केली जातात, इयत्ता तिसरी अखेरीस अपेक्षित शैक्षणिक परिणाम साध्य करणे हे उद्दिष्ट असले तरी, पालक, समुदाय, स्वयंसेवक इत्यादींमध्ये अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी बालवाडी ते इयत्ता तिसरी पर्यंतचे उद्दिष्ट विकसित केले गेले आहे. या निपुण भारत कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये आंतराष्ट्रीय संशोधन आणि एनसीआरटी आणि ओआरएफ अभ्यासांनी विकसित केलेल्या शिक्षण परिणामांवर आधारित आहे. याचे उदाहरण म्हणजे एखाद्या मुलाला त्याच्या वयानुसार अपरिचित पाठ्य सामुग्री स्पष्टपणे समजण्यात सक्षम झाले पाहिजे, त्याचप्रमाणे कमीतकमी 45 ते 60 शब्द प्रती मिनिट इयत्ता दुसरी आणि तिसरी पर्यंत स्पष्टपणे वाचण्यात सक्षम झाले पाहिजे.
या शिवाय निपुण भारत योजना 2024 कार्यक्रम अंतर्गत खालील क्षेत्रांची काळजी सुद्धा घेतली जाणार आहे, शाळेतील शिक्षण, शिक्षक क्षमता निर्माण करणे त्याचबरोबर उच्च दर्जाचा विद्यार्थी आणि शिक्षक संसाधने, शिक्षण साहित्याचा विकास मुलांच्या शिक्षण प्रगतीचा मागोवा घेणे.
निपुण भारत कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे
योजनेचे नाव | निपुण भारत मिशन 2024 |
---|---|
व्दारा | भारत सरकार |
योजनेची सुरुवात | 5 जुलै 2021 |
लाभार्थी | देशातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी |
उद्देश्य | इयत्ता तिसरी अखेरीस मुलांना मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्रदान करणे |
विभाग | शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग |
आधिकारिक वेबसाईट | इथे क्लिक करा |
श्रेणी | शिक्षा योजना |
वर्तमान वर्ष | 2024 |
निपुण भारत योजना 2024: कार्यक्रमाचा उद्देश्य
देशातील विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये निर्माण करणे हा या निपुण भारत मिशन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आहे, या योजनेच्या माध्यमातून 2026 ते 27 पर्यंत देशातील प्रत्येक मुलाला इयत्ता तिसरी च्या अखेरीस लेखन आणि वाचन व अंकगणित स्पष्टपणे समजण्याची क्षमता विकसित करणे, मुलांच्या विकासासाठी हि योजना अत्यंत प्रभावी ठरेल, या योजनेमुळे सर्व विद्यार्थ्यांना पुढील अभ्यास करणे सोपे जाईल व आणि इतर माहिती समजण्यात ते अगोदरच सक्षम होतील. शैक्षणिक स्थितीच्या वार्षिक अहवालाच्या निष्कर्षा नुसार, अनेक वर्षापासून प्राथमिक शाळेत शिकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मुलभूत लिहिता आणि वाचता किंवा गणिते समजत नाहीत. हि वस्तुस्थिती समजून घेऊन मुलांचे मुलभूत प्राथमिक शिक्षण बळकट व्हावे यासाठी निपुण भारत मिशन सुरु करण्यात आले आहे.
हि योजना नवीन शिक्षण धोरणा नुसार सुरु करण्यात आली आहे.
एफएलएन मिशन या कार्यक्रमाची अंमलबजावणी शिक्षण मंत्रालयाच्या माध्यामतून होणार आहे, आणि सर्व राज्य व संघ राज्य क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, ब्लॉक, आणि शालेय स्तरांवर एका पांच स्तरीय कार्यक्रमाची व्यवस्था तयार केली जाणार आहे. या कार्यक्रमाला बळकटी आणि मजबुती देण्यासाठी या कर्यक्रमाची मिशन या पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल.
नवीन शैक्षणिक धोरण काय आहे ?
शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक सुधारणा आणि शिक्षणाला सिमाभिंतीबाहेर नेऊन मुलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये लागू करण्यात आले आहे, या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 5+3+3+4 पद्धतीवर शैक्षणिक रचना निश्चित करण्यात आली असून, यामध्ये 3 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला आहे 5+3+3+4 म्हणजे 5 वर्षे मुलभूत शिक्षण (तीन वर्षे पूर्व प्राथमिक शिक्षण आणि इयत्ता पहिली आणि दुसरी ) 3 वर्षे तयारी स्तर (वर्ग 3 ते 5) 3 वर्ष मध्यम (किंवा उच्च प्राथमिक) स्तर (इयत्ता 6 ते 8) 4 वर्षे उच्च (माध्यमिक) स्तर (वर्ग 9 ते 12) इयत्ता पाचवी पर्यंतच्या शिक्षणात मातृभाषा / स्थानिक किंवा प्रादेशिक भाषा हे अभ्यासाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यावर भर देण्यात आला आहे. या सोबतच माहिती तंत्रज्ञानाव्दारे मुलांना डिजिटल शिक्षणही दिले जाणार आहे, त्यासाठी शाळांमधील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी निधीचीही तरतूद आहे. मुलांनी सुध्रुड राहण्याबरोबरच शिक्षितही राहावे यासाठी शाळांमधील सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांना बागकाम, नियमित खेळ, योग, नृत्य, कला, यांचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जाईल. शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा एनसीआरटी व्दारे तयार केला जाईल, या धोरणाचे महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे 2030 पर्यंत अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता चार वर्षाची एकात्मिक बीएड पदवी अनिवार्य केली जाईल. उल्लेखनीय आहे कि नवीन शिक्षणिक धोरण 2020 अंतर्गत एम.फील. हा अभ्यासक्रम रद्द करण्यात आला आहे.
समग्र शिक्षा अभियान म्हणजे काय ?
सर्व शिक्षा अभियान (SSA) राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (RMSA) आणि शिक्षक शिक्षण योजना (TE) या तीन शिक्षणिक योजना विलीन करून संपूर्ण शिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला समग्र शिक्षा अभियान 2.0 असेही म्हणतात, 2018 मध्ये सुरु झालेली हि योजना एक एकीकृत योजना आहे, ज्यामध्ये प्री स्कूल ते इयत्ता 12 पर्यंतचे शिक्षण समाविष्ट आहे, हे सर्व समावेशक, न्याय आणि प्रवेश योग्य शालेय शिक्षण प्रदान करण्याचा उद्देश्य आहे. सुमारे 11 लाख शाळा, 15 कोटींहून अधिक विद्यार्थी आणि सरकारी आणि अनुदानित शाळांचे सुमारे 60 लाख शिक्षक या योजनेत समाविष्ट आहेत. हि योजना एक केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार, आणि राज्य सरकार यांच्यात 60:40 च्या प्रमाणात निधींची तरतूद आहे.
निपुण भारताचे यश प्रामुख्याने शिक्षकांवर अवलंबून राहणार आहे, त्यामुळे शिक्षकांच्या क्षमता वाढीवर विशेष भर दिला जाणार आहे, निष्ठा अंतर्गत एनसीआरटी व्दारे मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता कौशल्यांसाठी एक विशेष पॅकेज तयार केले जात आहे आणि पूर्व प्राथमिक ते प्राथमिक इयत्तांमध्ये शिकवणाऱ्या सुमारे 25 लाख शिक्षकांना यावर्षी FLN वर प्रशिक्षण दिले जाईल.
मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान महाराष्ट्र राज्यात या अभियानाची आवश्यकता
महाराष्ट्र राज्यात २२ जून 2015 च्या प्रगत महाराष्ट्र राज्य या कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील नियमितपणे शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाने अध्ययन क्षमता प्राप्त करणे हा उद्देश्य होता, या कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील कोणतेही मुल अभ्यासात मागे न राहणे हे ध्येय होते, याकरिता अधिकाऱ्यांनी आणि शाळा व्यवस्थापनाने व अधिक महत्वाचे म्हणजे शिक्षकांनी या विशिष्ट कार्यक्रमाला गती देण्याचे काम केले. सन 2014 ते 2018 च्या ASER अहवालानुसार या कार्यक्रमाला प्रचंड यश मिळाले, परंतु कोविड -19 च्या महामारीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता.
युनोस्कोने केलेल्या अभ्य्सासानुसार, भारतीय विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा 65 टक्के ते 75 टक्के वेळ वाया गेला आहे. अझीम प्रमजी विद्यापीठाने सप्टेंबर 2020 मध्ये केलेल्या सर्वेक्षानानुसार, केवळ 42 टक्के मुले ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहू शकली नाही, या बाबतीत सदर संधी अपेक्षित परिणाम साधू शकली नाही. बहुसंख्य शिक्षक ऑनलाइन वर्गामध्ये दररोज प्रत्येक इयत्तेला एकाचा तास शिकऊ शकले, 80 टक्के पेक्षा अधिक शिक्षकांना ऑनलाइन विद्यार्थ्यांबरोबर भावनात्मक संपर्क ठेवणे कठीण गेले. आणि 90 टक्के पेक्षा अधिक शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे परिणाम कारक मूल्यमापन करता आले नाही.
एशियन विकास बँक 2021च्या नुसार, शाळा बंद राहिल्यामुळे पाच एशियन देशांमधील मुलांच्या भावी कमाईच्या ३.5 टक्के ते 4.7 टक्के नुकसान झाले. तसेच दक्षिण आशियाच्या सन 2020 सालच्या एकूण ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नच्या 5 टक्के ते 7 टक्के झाले. एका सर्वेक्षणात शाळा आधीच सोडलेल्या 3 टक्के मुलांबरोबर 6 टक्के मुले शाळेत येण्याची शक्यता नाही. करोना महामारी नंतर शिक्षण व्यवस्थेमधून आणखी 24 दश लक्ष मुलांची गळती होईल, यासाठी सध्याची परिस्थिती व गेल्या कालावधीत शाळा सतत बंद राहिल्यामुळे झालेले नुकसान लक्षात घेता, पुढील काळात शिक्षणाचा पाया ‘’पायाभूत असणे’’ आवश्यक आहे,
निपुण भारत अंतर्गत मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानाची
अंमलबजावणी
भाषिक कौशल्ये :- 3 ते 9 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा प्रारंभिक भाषा विकास होण्यासाठी मातृभाषेमध्ये मौखिक भाषा ज्ञान, समजपूर्वक एकने आणि त्याचे आकलन, मुद्रणशास्त्र व उच्चारशास्त्र यांच्या विकासाची जाणीव व लेखन कौशल्याचा विकास होणे गरजेचे आहे. भाषिक कौशल्ये प्राप्त होण्यासाठी भाषेचे पूर्वज्ञान मदतगार ठरेल, ज्या विद्यार्थ्यांचा भाषेचा पाया मजबूत असतो, ते विद्यार्थी इंग्रजी आणि इतर भाषा सहजतेने शिकू शकतात.
मुलभूत साक्षरतेचे घटक:-
- मौखिक भाषा विकास:- लेखन आणि वाचांची कौशल्ये विकसित करण्यासाठी मौखिक भाषेचा विकास होणे गरजेचे आहे.
- उच्चार शास्त्राची जाणीव:- शब्दाची लय आणि ध्वनीची जाणीव या बाबींचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.
- सांकेतिक भाषा / लिपी समजून घेणे:- यामध्ये छापील मजकुरांचे आकलन करण्यासाठी क्षमता, अक्षरांचे ज्ञान, सांकेतिक भाषा, लिपी समजून घेणे, शब्द ओळखणे.
- शब्द संग्रह:- मौखिक शब्द संग्रह, वाचन / लेखन शब्दसंग्रह व शब्दांच्या विविध अर्थछटा
- वाचन व आकलन:- मजकुरांचे वाचन करून अर्थ समजून घेणे, माहिती प्राप्त करणे व मजकुरांचे स्पष्टीकरण करणे.
- वाचनातील ओघवतेपणा:- मजकूर अचूकपणे व लयबद्ध वाचणे, अभिव्यक्ती व आकलन.
- लेखन:- अक्षरे व शब्द लिहिणे, अभिव्यक्तीसाठी लिहिण्याची क्षमता
- आकलन :- छापील मजकूर / पुस्तके यामुळे आकलन कौशल्ये विकसित होण्यास मदत.
- वाचन संस्कृती आणि वाचनाकडे कल:- यामध्ये विविध तऱ्हेची पुस्तके व इतर वाचन साहित्य वाचनाकडे कल असणे
पायाभूत संख्या साक्षरता,संख्याज्ञान आणि गणितीय कौशल्ये
मुलभूत संख्या साक्षरता याचा अर्थ असा होतो कि दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडविण्यासाठी सध्या संख्यात्मक कल्पनांचा वापर करणे आणि संख्या व संख्या कल्पनेचा विकास, तसेच तुलना करण्याचे ज्ञान, व कौशल्य, क्रमश मांडणी करणे, आकृती / संरचना ओळखणे व त्याचे वर्गीकरण. या बाबी वर्गात गणित अध्ययनाचा पाया घालतात.
प्रारंभिक गणिताचे दृष्टीकोन :-
- संख्या पूर्व :- गणन आणि संख्या ज्ञान
- संख्या व संख्येवरील क्रिया :- दशमान पद्धतीचा वापर, संख्येवरील प्रभुत्व संपादन करणे,
- गणना करणे :- तीन अंकी संख्येची बेरीज करणे, वजाबाकी करणे, गुणाकार करणे, भागाकार करणे, या गणितीय क्रिया करण्याच्या पद्धती समजून घेणे आणि त्याचा उपयोग करणे.
- आकार व अवकाश या बाबत समजून घेणे :- या मध्ये तीन अंकी संख्यापर्यंतची सोपी आकडेमोड करून त्यांचा विविध संदर्भातील दैनंदिन कार्यात उपयोग करणे.
- नमुना /संरचना :- आकार आणि अवकाशातील वस्तू समजून घेण्यासाठी संबंधित शब्द संग्रह शिकणे.
निपुण भारत 2024 च्या भागधारकांची यादी
- CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ)
- राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश
- राज्य शिक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
- केंद्रीय शाळा संघटना
- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
- मुख्य शिक्षक
- समुदाय आणि पालक
- जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था
- ब्लॉक रिसर्च सेंटर आणि क्लस्टर रिसोर्स सेंटर
- जिल्हा शिक्षण अधिकारी व गट शिक्षणअधिकारी
- नागरी समाज संघटना
- खाजगी शाळा
- गैर सरकारी संघटना
निपुण भारत अभियानाचे महत्त्वपूर्ण भाग
- निपुण भारत योजना अभियानचे शासनाने सतरा भागांमध्ये विभागणी केली आहे, ती माहिती खालीलप्रमाणे असेल
- परिचय
- मुलभूत संख्या आणि गणित कौशल्ये
- मुलभूत भाषा आणि साक्षरता समजून घेणे
- शिक्षण आणि शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या क्षमता आणि विकासावर लक्ष केंद्रित करणे
- सक्षमतेवर आधारित शिक्षणाकडे वळणे
- शिकण्याचे मुल्यांकन
- अध्यापन – अध्ययन प्रक्रिया यामध्ये शिक्षकांची भूमिका
- राष्ट्रीय मिशन: पैलू आणि दृष्टीकोन
- शाळेची तयारी
- अभियानाची धोरणात्मक योजना
- अभियानाच्या अंमलबजावणी मध्ये विविध भागधारकांची भूमिका
- SCERT आणि DIET व्दारे शैक्षणिक साहित्य
- DIKSHA/NDEAR चा लाभ घेणे, डिजिटल संसाधनांचे भंडारा
- देखरेख आणि माहिती तंत्रज्ञान फ्रेमवर्क
- अभियान शाश्वतता
- पालक आणि समुदाय प्रतिबद्धता
- संशोधन, मूल्यमापन आणि दस्तऐजीकरण गरज
शाळा आधारित मूल्यांकनाचे उद्दिष्ट्ये
- मुलांचे आरोग्य
- शारीरिक विकास
- व्यायाम आणि खेळ
- स्वच्छतेचे पैलू
- वस्तू, खेळणी इत्यादी व्यवस्थित करणे
- मुलांची सामाजिक आणि भावनिक प्रगती इत्यादी
- मुलांना प्रभावी संवादक बनविणे
- शाळा आधारित मूल्यमापन अंतर्गत, मुलांची मातृभाषा हि संभाषणकर्त्याची भाषा बनविणे जेणेकरून ते संभाषका समोर आपले मुद्दे मांडू शकतील.
- भाषा आणि मुलभूत साक्षरता प्र्त्याक्षिक उपायुक्त
- हास्याचा विकास
- गैर मौखिक संवादाचे महत्व
- मुलांना सहभागी करून शिकणारे बनविणे
- कथा तयार करून प्रोत्साहित करणे
- मुलांना विविध प्रकारचे प्रकल्प आणि कार्य देणे
- भौतिक वातावरण समजून घेण्याची संधी प्रदान करणे
- पोर्टफोलिओ
- मूल्यांकनासाठी दृकश्राव्य साधनांची निर्मिती करणे
- प्रश्न बँकेचा विकास इत्यादी
निपुण भारत अभियाना अंतर्गत 3 ते 9 वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे, सन 2026, 2027 पर्यंत शैक्षणिक लक्ष निर्धारित करण्यात येत आहे.
अ. क्र. | अंगणवाडी /बालवाडी अखेर | इयत्ता पहिली अखेर | इयत्ता दुसरी अखेर | इयत्ता तिसरी अखेर |
---|---|---|---|---|
भाषा साक्षरता | अक्षरे व त्या सबंधी आवाज ओळखतो किमान दोन-तीन अक्षरे असलेले साधे शब्द वाचतो | अपठीत मजकूर असलेली किमान चार -पाच साधे शब्द असलेली छोटी वाक्य वाचतो | अपठीत मजकूर चाळीस ते पन्नास शब्द प्रती मिनिट अर्था सकट वाचतो | अपठीत मजकूर साठ शब्द प्रती मिनिट अर्था सकट वाचतो |
संख्या साक्षरता | दहा पर्यंत अंक ज्ञान (ओळखणे व वाचणे) | नव्यानव पर्यंत संख्यांचे वाचन, लेखन. साधी बेरीज व वजाबाकी करतो. | नवशे नव्यानव पर्यंतचे संख्यांचे वाचन, लेखन. नव्यानव पर्यंत संख्यांची वजाबाकी करतो | नव हजार नवशे नव्यानव पर्यंत संख्यांचे वाचन, लेखन. सोपी गुणाकाराची उदाहरणे सोडवतो |
आनंदी व्यक्तिमत्वाची जोपासना
मुलांना शैक्षणिक वातावरणात आनंदी आणि सुरक्षित वाटते, चांगल्या सवयी विकसित होतात. शरीर तंदुरस्त राहते, स्वतः बाबतचा आदर वाढतो. स्वतः बाबत सकारात्मक विचार निर्माण होतात व त्यामुळे अशा सकारात्मक दृष्टिकोनाचे योग्य संवर्धन केल्यास त्याचे परिणाम आयुष्यभर लाभकारी ठरते, त्यामुळे सर्व शिक्षकांनी मुलांच्या सामाजिक आणि भावनात्मक स्वास्थ्याची जपणूक कशी करावी याविषयी संवेदनशील असणे आवश्यक आहे.
निपुण भारत योजना 2024: समावेशित शिक्षण
निपुण भारत अभियानाच्या अंतर्गत विशेष आवश्यकता
असलेल्या व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत शिक्षक व व्यवस्थेतील सर्व घटकांनी खालील बाबी करणे आवश्यक आहे.
- समतेचा दृष्टीकोन ठेऊन प्रत्येक छोट्या समूहाला शिकविण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल.
- समावेशक शिक्षणाचा द्र्ष्टीकोन म्हणजे वेगवेगळ्या पद्धती अवलंबणे आणि निर्धारित लक्ष साध्य करण्यासाठी पूरक असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांबरोबर स्नेह निर्माण करणे आणि वर्ग अध्यापना पूर्वी विद्यार्थ्यांच्या स्वस्थ व आनंदी व्यक्तिमत्वासाठी आत्मविश्वास आणि स्वयं प्रोत्साहन यावर लक्ष केंद्रित करणे
- संपादणूक तपासण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती व दृष्टिकोनाचे अवलंबन करणे
- प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन करण्याच्या पद्धतीशी जुळवून घेण्यासाठी अधिक परिश्रमाची आवश्यकता आहे.
मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानचे आधारस्तंभ
निपुण भारत योजना 2024 अंतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी प्रामुख्याने सहा आधारस्तंभ ठरविण्यात आले आहे, प्रत्येक विद्यार्थ्यास इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत लेखन आणि वाचन व गणितीय कौशल्य प्राप्त होतील, हे लक्ष 26 – 27 पर्यंत साध्य करण्यात येईल. कोणताही विद्यार्थी त्याच्या शैक्षणिक प्रवासात मागे राहणार नाही व पुढील आयुष्यात त्याच्या व्यक्तिमत्वावर नकारात्मक परिणाम होणार नाही, यासाठी प्रत्येक आधारस्तंभ संयुक्त भूमिका पार पाडेल.
निपुण भारत अभियानाचे आधारस्तंभ | संपूर्ण विवरण |
---|---|
संबंधित घटकांचे निदान | राज्यातील सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीचे मुलभूत निदान करून पुढील कृती कार्यक्रमाचे नियोजन करणे, सध्याचे धोरण, क्षमता व अंदाजपत्रक. व्यवस्थापकीय : सध्याची उद्दिष्ट्ये, शैक्षणिक सहाय्य, सनियंत्रण व पालकांची प्रतिबद्धता. वर्ग अध्ययनाचा परिणाम विद्यार्थ्यांची पूर्व तयारी, सूचना देण्याची वेळ, बालमानसशास्त्र व संसाधने |
सर्व स्तरांवर उद्दिष्ट्ये व लक्ष्य यांचे निर्धारण | या अभियानाशी संबंधित सर्व संबंधितांचे स्पष्ट व मापनयोग्य उद्दिष्ट्ये निश्चित करणे गरजेचे आहे, हे उद्दिष्ट्ये विद्यार्थ्यांच्या संपादणूकीशी व सध्याच्या अध्ययन स्तरांशी सुसंगत व शिक्षकांना सहाय्यभूत असावीत.यामध्ये 3 ते 5 वर्षे वयोगटातील व 1 ली ते 3 री इयत्तेतील उद्दिष्ट्ये स्पष्ट झाल्यास विचारांची देवाण घेवाण सुलभ होऊन संबंधित घटकांची जबाबदारी निश्चित होईल. |
उच्च दर्जाचे अध्ययन व अध्यापन साहित्य | विद्यार्थी व शिक्षकांसाठी आवश्यक अध्ययन – अध्यापन साहित्य उपलब्ध करण्यात येईल |
शिक्षकांचा व्यावसायिक विकास | अंगणवाडी / बालवाडी आणि शाळेतील शिक्षकांनी या अभियानाला यशस्वी करण्यासाठी नवनवीन अध्यापन तंत्रे व त्याचा परिणामकारकरीत्या वापर करण्याचे आवश्यक कौशल्ये प्राप्त करण्यासाठी शिक्षकांचा व्यावसायिक विकासाचे उपक्रम आयोजित करण्यात येईल |
शिक्षकांच्या मदतीसाठी यंत्रणा | शिक्षकांना मदत करण्यासाठी, जिल्हा, गट व समूह साधन स्तरांवरील पर्यवेक्षीय यंत्रणांनी वर्ग निरक्षण, पर्यवेक्षण, प्रशिक्षण, पाठपुरावा, आढावा अभियानाचे उद्दिष्ट व अध्यापनशास्त्र याबाबतीत अद्यावत असले पाहिजे |
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन | अध्यापनात सुधारणा करण्यासाठी, ठराविक कालावधीने विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर शिक्षकाला व शाळा व्यवस्थापनाला समजण्यासाठी मुलांच्या प्रगतीचे मापन करण्यासाठी मूल्यमापनाची गरज आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला पायाभूत चाचणी तर वर्ष अखेरीस चाचणी यातून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करता येईल |
गृह अध्यापन आणि स्वयंशिक्षण
कोविड 19 च्या महामारीमुळे पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रीये मध्ये महत्वाची भूमिका पार पाडावी लागत आहे, आणि केवळ टेक्नोलॉजीच्या भरवश्यावर शंभर टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य नाही, हे दिसून आले आहे, त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी नवीन पद्धतीचा वापर केले पाहिजे.
या प्रक्रीयेमध्ये विद्यार्थ्यांना घरी शिकविण्यासाठी पालकांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे, हे साध्य करण्यासाठी पालकांनी तसेच शाळेने भरपूर छापील साहित्य उपलब्ध केले पाहिजे, यामध्ये जलद वाचन, संख्या साक्षरता व पाढे यासाठी वाचन साहित्य व कार्यपुस्तिका इत्यादी सामुग्री शाळेत व घरी मोठ्याप्रमाणात उपलब्ध करून देण्यासठी समग्र शिक्षा, STARS प्रकल्प व स्थानिक स्वराज्य संस्था पुरेशी तरतूद उपलब्ध करतील. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हि गट व ग्रामपंचायत यांना छापील साहित्य व सराव तक्ते तयार करून विद्यार्थ्यांना देण्यासाठी CSR व अशासकीय संस्था (NGO) यांची मदत घेण्यात येईल, संगणक व मोबाईल यांचा शिक्षणात वापर करावा लागेल. मात्र दुर्गम भागातील विद्यार्थी व संगणक साक्षर विद्यार्थी यांच्यातील दरी कमी करावी लागेल.
यासाठी शाळेच्या ग्रंथालयातून छोटी गोष्टींची पुस्तके, अध्यापन अध्ययन साहित्य या आधारे पालक मुलांबरोबर घरी नियमितपणे कोणत्या कृती करू शकतात त्याची यादी तयार करून पालकांना प्रोत्साहन दिले जाऊ शकते यासाठी खालीलप्रमाणे उपक्रम आयोजित करता येईल.
काही सोप्या कृती, चिठ्या वाचणे, वर्तमानपत्रातील, नोटांवरील, कॅलेंडरवरील, शब्द वाचणे तसेच पुस्तके वाचणे, खेळ खेळणे, गाणी, व कविता म्हणणे, आवाजातील योग्य चढउतारासह गोष्टी सांगणे व मुलांबरोबर संवाद साधने.
छापील साहित्याबरोबर जे पालक शिकण्याचे अन्य साहित्य प्राप्त करू शकतात व ज्यांच्याकडे इंटरनेट उपलब्ध आहे असे पालक मोबाईलवर शैक्षणिक एप्लिकेशन डाऊनलोड करून मुलांना मार्गदर्शन करू शकतात. असा संगणकीय मजकूर पाठ्यपुस्तकांमधून क्यूआर कोडव्दारा स्कॅनिंग करिता उपलब्ध आहे. वॉटसअॅप आधारित स्वाध्याय, ऑनलाइन वर्ग व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (NCERT) आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषद (SCERT) यांच्याव्दारा उपलब्ध करून दिलेली युटूब वरील दृक – श्राव्य साधने शैक्षणिक मूल्यमापनाचे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी पालकांना उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे पालकांनी मुलांना प्रसारमाध्यमांमध्ये दूरदर्शन, रेडीओ यावरील कार्यक्रम व दूरध्वनी व्दारे परस्पर संपर्क, ध्वनिवर्धकावर मोठ्याने वाचन (2 ते 3 मुलांच्या गटांमध्ये) याचा वापर करायला प्रोत्साहन दिले पाहिजे.
- गाव, मोहल्ला, वस्ती या स्तरावर ग्राम शिक्षण मंडळे गठीत करून यामध्ये लहान मुलांमध्ये वाचन, आकलन, लेखन, व संख्या आकलन सुधारावे, यासाठी गावातील उच्च माध्यमिक स्तरावरील / पदवीधर विद्यार्थी आणि लहान मुलांच्या छोट्या – छोट्या गटांमध्ये चर्चा घडवून आणता येईल.
- सहाध्यायी शिक्षण आणि गट शिक्षण ( भावंडे किंवा जवळचे मित्र यांच्या बरोबर शिक्षण) याव्दारे स्वयं शिक्षणाला प्रोत्साहन देता येईल.
- राज्य /जिल्हा स्तरांवर सुरु केलेल्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी त्यांना प्रोत्साहन व पाठींबा देणे यासाठी पालकांचे सक्षमीकरण करणे.
- गुगल रीडिंग अलोंग, पिंटरेस्ट, शब्द जुळवणे खेळ इत्यादी अॅपच उपयोग करून ओघवते वाचन करण्याची क्षमता वाढवता येईल, त्यातून विद्यार्थ्यांची ओघवत्या वाचनामधील प्रगती पाहता येईल.
स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना
निपुण भारत कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये
निपुण भारत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे खालीलप्रमाणे परिणाम अपेक्षित असेल
- प्राथमिक कौशल्ये मुलांना शाळेत टिकवून ठेवण्यास मदत करतात आणि त्यामुळे शाळा मध्येच सोडून जाणाऱ्या मुलांची संख्या कमी होते, त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरांवर शाळा सोडणाऱ्या मुलांची संख्या कमी होते.
- क्रियाकलाप आधारित शिक्षण आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण यामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते
- खेळण्यांवर आधारित आणि अनुभवात्मक शिक्षण यासारख्या नाविन्यपूर्ण अध्ययनशास्त्राचा उपयोग वर्गात शिकणे आनंददायक आणि आकार्षक क्रियाकलाप करण्यासाठी केला जाईल.
- शिक्षकांची सखोल क्षमता निर्माण त्यांना सक्षम करेल आणि त्यांना अध्यापनशास्त्राची कला निवडण्यासाठी अधिक स्वायत्तता देईल.
- शारीरिक आणि समाजिक भावनिक विकास, साक्षरता आणि संख्यात्मक विकास, संज्ञानात्मक विकास, जीवन कौशल्ये इत्यादी परस्परसबंधीत आणि परस्परावलंबी विकासाच्या विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून मुलांचा सर्वांगीण विकास प्रगती कार्डमध्ये दिसून येईल.
- मुलांची शिकण्याची गती अधिक वागवण होईल ज्याचा नंतरच्या जीवनावरील परिणामांवर आणि रोजगारावर सकारत्मक परिणाम होऊ शकतो.
- जवळजवळ प्रत्येक मुल प्राथमिक इयत्तांमध्ये उपस्थित राहतो त्यामुळे त्या स्तरांवर लक्ष केंद्रित केल्याने समाजिक आणि आर्थिक वंचित गटालाही फायदा होईल, त्यामुळे न्याय आणि सर्वसमावेशक दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित होईल.
निपुण भारत अभियानाची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विविध संस्थांची भूमिका व जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असतील
समग्र शिक्षा, मुंबई :
- राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करणे व अभियानाचे सनियंत्रण करणे
- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाशी समन्वय अभियानासाठी तरतूद व खर्च यांचे व्यवस्थापन.
- राज्य शैक्षणिक संशोधन व पशिक्षण परिषद व जिल्हा स्तरावर निधी वितरण.
- जमा-खर्च व्यवस्थापन व त्यासंबंधित प्रशासकीय कार्यवाही
- संपादणूकीचा दर्जा उंचावण्यासाठी अध्ययन –अध्यापन साहित्य विकसित, छापाई व वितरण
- सनियंत्रणासाठी अप/पोर्टल यांची निर्मिती
- विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करणारी साधने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या मदतीने विकसित करणे, राज्य स्तरांवर प्रगतीचा आढावा घेणे, सुकाणू समितीस अद्यावत माहिती देणे.
- सदर अभियान एक चळवळ होण्यासाठी विविध घटकांचा प्रभावी सहभाग घेणे
- सदर अभियानासाठी संबंधित यंत्रणांना वेळोवेळी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना, नियोजनासाठी नमुने उपलब्ध करणे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
- या अभियानाच्या विद्याविषयक अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी
- राष्ट्रीय स्तरांवरील सदर अभियानास अनुसरून राज्याच्या गरजेनुसार सदर अभियानास जोडणे
- या अभियाणाचा पाच वर्षासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करणे.
- शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी अध्ययन – अध्यापन संदर्भ साहित्याचे व दीक्षा अॅपवर विद्यार्थ्यांसाठी इ – संदर्भ साहित्याचे विकसन आणि भाषांतर करणे.
- यापूर्वी शाळांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या गणित पेटी, विज्ञान पेटी, भाषा पेटी, इत्यादी साहित्याचा परिणामकारक वापर होतो किंवा कसे, याची खात्री करणे.
- विविध प्रशिक्षणांची अंमलबजावणी करणे
- विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अध्ययन शैलीनुसार शिक्षक व विद्यार्थी यांचे करिता अध्ययन – अध्यापन साहित्याची निर्मिती
- विध्यार्थ्यांचे मुलभुत सर्वेक्षण तसेच विविध चाचण्या. राष्ट्रीय संपादणूक
सर्वेक्षण (NAS) राज्य संपादणूक सर्वेक्षण यांनी अंमलबजावणी करणे. त्यातील निकालांचे जिल्हानिहाय व गटनिहाय विश्लेषण करून दर्जा उंचावण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करणे. इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती यांचे भाषांतर करून सर्व स्तरांवर क्षेत्रीय अधिकारी व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता, साधन व्यक्ती यांचे सक्षमीकरण करणे. - मुख्यध्यापक, शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचेसाठी जाणीव जागृती करणारे प्रशिक्षण विकसित करणे.
- विद्याविषयक क्षेत्रनिहाय गरज ओळखून शिक्षकांना मदत करणे
- या अभियानाच्या सनियंत्रण व मूल्यमापनासाठी समग्र शिक्षा कार्यालयाशी समन्वय ठेवणे.
- अध्ययन निष्पत्तीशी सुसंगत विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध व प्रसारित शैक्षणिक साहित्य, हस्तपुस्तिका, गृहकार्याचे नियोजन व ई-साहित्य यांचे विकसन व वितरण करणे.
स्थानिक स्वराज्य संस्था
- अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करणे व अभियानाचे सनियंत्रण करणे.
- समग्र शिक्षा समन्वयाने या अभियानाचे जिल्हा स्तरांवर व्यवस्थापन, सनियंत्रण
- प्रशिक्षण, अध्ययन – अध्यापन सामुग्री यासाठी अंदाज पत्रकिय तरतूद व खर्चाचे व्यवस्थापन
- शाळा स्तरांवर निधी वितरण व उपयोगिता
- अभियानाची परिणामकारकता दरमहा तपासून माहितीचे संकलन, विश्लेषण व त्यानुसार कृती कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी
- वेळोवेळी प्रगतीसाठी आढावा बैठका
- इयत्ता 1 ली ते 3 री साठी 100 टक्के शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे यांची खात्री करणे
- यापूर्वी जिल्हा गुणवत्ता कक्ष या शासन निर्णयाने व्यपगत करण्यात येत आहे
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था
- शाळा व शिक्षक यांना प्रशिक्षण व विद्याविषयक मदत
- गट व समूह साधन स्तरांवर शिक्षकांचे प्रशिक्षण व प्रशिक्षणाचा परीणाम तपासणे
- वर्ग व शाळा भेटीसाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि साधन व्यक्ती यांना व्यावसायीक विकासासाठी प्रशिक्षण व सक्षमीकरण
- पालक सहभागासाठी जागरुकता निर्माण करणाऱ्या उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करणे
- प्रशिक्षणातून learing loss टाळण्यासाठी नियोजन करणे
- अभियांशी संबंधित सर्व घटकांशी समन्वय व सहकार्य करणे
- यशोगाथांचे संकलन आणि दस्तेवाजीकरण करणे
गट व साधन स्तर
- गट व समूह स्तरांवर अंमलबजावणी
- या अभियानाच्या यशस्वितेसाठी शिक्षकांना मदत, सनियंत्रण, माहितीचे संकलन करणे
- विशेष गरजा असलेली व संथ गतीने शिकणारी मुले यांना वैयक्तिक मार्गदर्शन व मदत करणे
- वर्ग निरक्षण व मार्गदर्शन करणे
- या अभियानातील यशस्वी ठरलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांचे परस्पर आदान प्रदान करणे
महिला व बालविकास/एकात्मिक बालविकास योजना
- अंगणवाडी/बालवाडी सेविका व मदतनीस यांना मदत
- बालसंगोपन व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान यांची सांगड घालणे
- शिक्षण विभागाच्या समन्वय या विभागाशी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी/बालवाडी सेविका, एकात्मिक बालविकास योजना पर्यवेक्षक, प्रकाशक पालक इत्यादी मध्ये जागरुकता व सक्षमीकरण यासाठी उपक्रमांचे आयोजन करणे.
- अंगणवाडी/बालवाडी सेविकांसाठी त्यांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम आयोजित करणे .
- अंगणवाडी/बालवाडी स्तरांवर मार्गदर्शनपर पुस्तके, अध्ययन-अध्यापन सामुग्री, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने तयार करणे. साहित्याचे अंगणवाडी स्तरांवर वितरण व वापर याची खात्री करणे.
ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन समिती
- स्थानिक पातळीवर शाळा आणि शिक्षक यांना मदत
- या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकसहभाग तसेच वित्त आयोगाच्या तरतुदीतून शाळांना आर्थिक मदत
- शंभर टक्के पटनोंदणी करणे आणि उपस्थिती कायम राखणे
- 3-4 मुलांच्या गटामध्ये मोहल्ला /वस्ती स्तरांवर वर्ग घेणे, सहाध्यायींबरोबर अभ्यासास चालना देणे
- या अभियानाचे महत्व सर्व पालकांना पटवून देणे
- विद्यार्थी आणि पालकांशी सत्यात्यपूर्ण संवाद, अध्ययनातील प्रगती समजावून घेणे, अभ्यासात मागे राहिलेल्या आणि शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रवृत्त करणे.
निपुण भारत अभियानाविषयी जाणीव आणि जागृती
निपुण भारत अभियानाच्या अंतर्गत मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान संबंधित अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी खालीलप्रमाणे बाबी केल्या जाईल
- मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानाबाबत माहिती आणि निकालांचा आलेख सर्व शाळा ठळकपणे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करतील.
- सदर अभियानातून शाळेतील शिक्षणाव्दारे विषयवार व इयत्तावार प्राप्त करावयाची अध्ययन निष्पत्ती शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना अवगत केल्या जातील.
- राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून शाळा, शिक्षक व पालक यांचेकरिता भित्तीपत्रके, पत्रे, समाजिक माध्यम संदेश, आकाशवाणी व दूरदर्शन वरील भाषणे इत्यादी संपर्क सामग्री तयार करून प्रसारित करेल
- मुलांना घरी शिकण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित सोपी सामुग्री, गमतीदार अशा कृती व कृतीपुस्तिका उपलब्ध करण्यात येतील.
- निपुण भारत योजना 2024 हि एक लोकचळवळ होण्यासाठी वेळोवेळी ग्राम जागरुकता बैठक/सभा, शालेय मेळा, पुस्तक जत्रा, वाचनाचे कार्यक्रम, गोष्टींचा मेळा, गणित मेळा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये ग्रामपंचायत/शाळा व्यवस्थापन समिती यांची भूमिका महत्वाची असेल.
SCERT आणि DIET व्दारे शैक्षणिक समर्थन
FLN मिशन अंतर्गत, शिक्षक प्रशिक्षण मॉड्युल विकसित करण्याची जबाबदारी SCERT व्दारे घेतली जाईल. याशिवाय सर्व शिक्षक प्रशिक्षण मॉड्युल स्थानिक भाषेत उपलब्ध करून दिले जाईल. इयत्ता 1 ली ते 5 वी साठी इतर काही शैक्षणिक साहित्य दिले जाईल जे मुलांना आनंददायक असेल. दुसरीकडे, प्रत्येक DIET एक शैक्षणिक संसाधन पूल विकसित करेल ज्यामध्ये शिक्षक, जिल्हा शिक्षण नियोजन आणि विद्यापीठांच्या शिक्षण विभागातील प्राध्यापक असतील. या योजनेंतर्गत इतर अनेक पावले उचलली जातील ज्याद्वारे शैक्षणिक मदत दिली जाईल.
दीक्षा : डिजिटल सामुग्री
निपुण भारत योजनेंतर्गत दीक्षा पोर्टल सुरु करण्यात आले आहे, दीक्षा पोर्टल
व्दारे ई-सामुग्री उपलब्ध करून दिली जाईल. जे स्थानिक भाषेत असेल. हि ई-सामुग्री शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाहि उपलब्ध असेल. DIKSHA पोर्टलवर उपलब्ध असलेली सामुग्री NCERT व्दारे तयार केली जाईल, शिक्षकांसाठी अनेक प्रकारच्या शिक्षक प्रशिक्षण संस्थाही दीक्षा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील, याप्रमाणे प्रशिक्षण मॉड्युल, प्रशिक्षण सत्रांसाठी सहाय्य, व्हिडीओ, वाचन संसाधने, शिक्षक पुस्तिका इत्यादी दीक्षा प्लॅटफॉर्म अॅपव्दारे देखील ऑपरेट केले जाऊ शकते. शिक्षण विभाग लवकरच गुगल प्ले स्टोर आणि एपल स्टोर वर दीक्षा अॅप्लिकेशन लॉच करणार आहे.
योजना संशोधन, मूल्यमापन आणि दस्तऐवजीकरणाची आवश्यकता
निपुण भारत योजना 2024 योजनेच्या अंमलबजावणीमध्ये संशोधन, मूल्यमापन आणि दस्तऐवजीकरण या प्रक्रिया प्रमुख भूमिका बजावणार आहेत, शिक्षण सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, हे संशोधनाव्दारे कळते. त्याचप्रमाणे योजनेच्या अंमलबजावणीसाठी उचलेली पावले कितपत यशस्वी ठरलेली आहे हे मुल्यमापनाव्दारे कळते. तसेच सर्व पुरावे कागदपत्रांवरून नोंदवले जातात. संशोधन, मूल्यमापन, आणि दस्तऐवजीकरण हा निपुण भारत अभियानाचा अविभाज्य भाग आहे, संशोधन, मूल्यमापन राष्ट्रीय, राज्य,जिल्हा, ब्लॉक, आणि शालेय स्तरावर केले जाऊ शकते, ज्यासाठी सक्रीय संशोधन, प्रक्रिया मूल्यमापन, प्रभाव मूल्यमापन इत्यादि सारख्या विविध प्रकारच्या तंत्रांचा वापर केला जाऊ शकतो.
देशात शिक्षण क्षेत्रातील विकास हा राष्ट्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण विकास असतो, त्यामुळे देशातील शिक्षण क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण सुरु केले आहे, या नवीन शिक्षणिक धोरणांतर्ग शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारत सरकार विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. जेणेकरून या अभियानाच्या माध्यमातून शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधता यावा, अशा प्रकारे निपुण भारत योजना 2024 आपल्या शाळा, शिक्षक, आणि समुदाय तसेच विद्यार्थ्यांना प्रत्येक संभाव्य मार्गाने मुलांची खरी क्षमता साध्य करण्यासाठी
आणि राष्ट्राला नवीन उंची गाठण्यासाठी मदत आणि प्रोत्साहित करेल. वाचक मित्रहो, निपुण भारत योजना 2024 या योजने संबंधित आपण संपूर्ण माहिती पाहीली आहे. हि पोस्ट आपल्याला उपयुक्त वाटली असल्यास आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता.
निपुण भारत महाराष्ट्र GR |
---|
निपुण भारत गाईडलाईन्स PDF |
अधिकृत वेबसाईट |
महाराष्ट्र सरकारी योजना |
निपुण भारत योजना FAQ
Q. निपुण भारत मिशन काय आहे ?
निपुण भारत योजना 2024 या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे कि देशातील विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करणे जेणेकरून त्यांना पुढील भविष्यात स्वतः च्या पायावर उभे राहून स्वावलंबी होऊन, आयुष्यात प्रगतीचे शिखर गाठणे शक्य होईल, या योजनेच्या अंतर्गत 2026 ते 2027 पर्यंत विद्यार्थ्यांना इयत्ता तिसरीच्या अखेरीस वाचन, लेखन आणि सामन्य अंकगणित समजण्याची क्षमता मिळेल, मुलांच्या विकासाच्या दृष्टीने निपुण भारत योजना अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.
Q. निपुण भारत योजनेची उद्दिष्ट्ये काय आहे ?
शिक्षण मंत्री श्री पोखारीयाल यांनी या योजनेच्या संबंधित माहिती दिली कि या योजनेचे मुख्य उद्देश्य म्हणजे देशातील 3 ते 9 वयोगटातील मुलांच्या शिक्षणा संबंधित संपूर्ण गरजा या निपुण भारत योजनेच्या माध्यमातून पूर्ण करणे, तसेच मुलभूत भाषेच्या विकासासाठी शिक्षकांनी प्रत्येक मुलाच्या साक्षरता आणि संख्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पुढील जीवनात त्यांना चांगले वाचक आणि लेखक बनण्यास मदत होईल. त्याचबरोबर मुलांना डिजिटल शिक्षणही दिले जाईल.
Q. निपुण भारत योजनेचे मुख्य घटक काय आहे ?
या योजनेचे मुख्य घटक खालीलप्रमाणे आहे, मुलभूत साक्षरता आणि मौखिक भाषा आणि मुलभूत अंकगणितचे ज्ञान, लेखन आणि वाचनाचा विकास, आकार आणि स्थानिक समज, मोजमाप, नमुना, नंबर आणि नंबर ऑपरेशन, वाचन आकलन, मुद्रण संकल्पना, शब्दकोश, डिकोडिंग, वाचन संस्कृती हे या निपुण भारत अभियानाचे मुख्य घटक आहे.
Q. निपुण भारत योजना केव्हा सुरु करण्यात आली ?
देशातील शिक्षण क्षेत्राचा संपूर्णपणे विकास करण्यासाठी भारत सरकार कडून हि योजना संपूर्ण देशात राबविण्यात आली आहे, या योजनेमध्ये मुलांचे प्राथमिक शिक्षण, तसेच अध्ययन आणि अध्यापन आणि शिक्षणा संबंधित साहित्य यांचा विविध घटकांच्या अंतर्गत विकास करण्यात येणार आहे. निपुण भारत योजना भारत सरकार आणि शिक्षण मंत्रालयाने 5 जुलै 2021 रोजी सुरु केली.
Q. निपुण भारत फुल फॉर्म काय आहे ?
हि योजना National Initiative For Proficiency In Reading With Understanding And Numeracy, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टॅडिंग अँड न्युमरसी, भारत सरकारची हि तीन ते नव वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना आहे.