75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत: महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्र शासन वेळोवेळी राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध आणि अनेक प्रकारच्या योजनांची  अंमलबजावणी करत असते, या योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांच्या  उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असते,  यावेळी माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतंत्र्याच्या अमृत मोहत्सावानिमित्त हि घोषणा केली, महाराष्ट्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील नागरिकांसाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यावेळी जेष्ठ नागरिकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्यातील ज्या जेष्ठ नागरिकांनी वयाचे 75 वर्ष पूर्ण केले आहे अशा जेष्ठ नागरिकांना यानंतर एसटी बसच्या प्रवासाठी पैसे खर्च करावे लागणार नाही, कारण महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी आता एसटी प्रवास मोफत केला आहे, वाचक मित्रहो, या पोस्ट मध्ये आपण शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णया संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचावा.

75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत: हि योजना काय आहे 

महाराष्ट्र सरकारने जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे त्यामुळे राज्यातील जेष्ठ नागरिकां मध्ये आनंदाचे वातावरण आहे, महाराष्ट्र राज्यात या अगोदर जेष्ठ नागरिकांना प्रवासात पन्नास टक्के सूट दिली जात होती, परंतु आता शासनाच्या नियमानुसार वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. या सबंधित निर्णयाची योग्य रीतीने अंमलबजावणी करण्यासाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चन्ने यांच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले आहे.

75 वर्ष वरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत
75 वर्ष वरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत

शासनच्या या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार पासून सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षे वयाच्या जेष्ठ नागरिकांना एसटी बसमधून विनामुल्य प्रवास शासनाच्या या योजनेचा फायदा जवळपास राज्यातील पंधरा लाख जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे, एसटी महामंडळाच्या शिवनेरी या एसटी सेवें सह सर्व प्रकारच्या एसटी सेवांसाठी हि जेष्ठ नागरिकांची मोफत प्रवास योजना लागू असेल हि माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

                देश कि पहली हाइड्रोजन फ्युल बस पुणे में लॉन्च

जेष्ठ नागरिकांसाठी असलेली मोफत एसटी बस प्रवास योजनेची काही वैशिष्ठे 

महाराष्ट्र राज्यातील शासना कडून राज्यातील जनतेसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते आणि त्या योजनांचा सर्व पात्र नागरिकांना लाभ मिळावा म्हणून सरकार नेहमी प्रयत्नशील असते, सर्वसामन्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या राज्यातील वयोवृध्द नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त हि मोफत प्रवास योजना सुरु केली आहे, तसेच हि जेष्ठ नागरिकांसाठी असलेली मोफत प्रवास योजना राज्यातील तळागाळातील नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहे.


या योजनेच्या संदर्भात अधिक माहिती म्हणजे हि योजनेच शुभारंभ 26 ऑगस्टला झाला आहे, त्यामुळे ज्या नागरिकांनी 26 ऑगस्ट 2022 पूर्वी एसटी मध्य प्रवासासाठी आरक्षण केले असेल आणि 26 ऑगस्ट पासून एसटी प्रवास करण्याऱ्या राज्यातील नागरिकांना तिकिटाचा परतावा शासनाच्या निर्णया प्रमाणे दिला जाणार आहे, या संदर्भातील माहिती एसटी  महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. राज्यातील पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिमंडळच्या अधिवेशना दरम्यान करण्यात आला, या योजनेचे नाव ”अमृत जेष्ठ नागरिक” असे ठरविण्यात आले आहे, या योजनेचा शुभारंभ झाल्यावर एसटी महामंडळा कडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 

                   399 पोस्ट ऑफिस दुर्घटना बिमा योजना

वरिष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजना Highlights

योजनेचे नावअमृत जेष्ठ नागरिक (महाराष्ट्र एसटी बस मोफत प्रवास योजना )
व्दारा सुरुवात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र
योजनेचा शुभारंभ 25 ऑगस्ट 2022
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे 75 वर्षावरील वयोगटातील नागरिक
उद्देश्य राज्यातील वयोवृध्द नागरिकांना आर्थिक सुविधा
श्रेणी योजना
विभाग महाराष्ट्र एसटी महामंडळ

अमृत जेष्ठ नागरिक योजनेला लागणारी कागदपत्रे 

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली राज्यातील वरिष्ठ नागरिकांसाठी असलेली एसटी बस मोफत प्रवास योजनेला सुरुवात झाली आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी राज्याच्या वरिष्ठ नागरिकांना प्रवासाच्या दरम्यान काही कागदपत्रांची आवश्यकता पडेल, वरिष्ठ नागरिकांना प्रवासा दरम्यान आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा वाहन परवाना किंवा निवडणूक ओळख पत्र व शासनाने प्रमाणित केलेले ओळखपत्र यापैकी कोणतेही ओळखपत्र एसटी प्रवासा दरम्यान वाहकाला दाखविल्यानंतर वरिष्ठ नागरिकांना योजने प्रमाणे सवलत मिळेल. 
 
जेष्ठ नागरिक मोफत एसटी प्रवास योजनेचा लाभ हा राज्याच्या एमएसआरटीसी च्या शहरातील बसेस साठी उपलब्ध नसणार आहे, या योजनेचा लाभ केवळ राज्याच्या हद्दीत प्रवासा दरम्यानच मिळणार आहे, या अमृत जेष्ठ नागरिक योजनेच्या संबंधित घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच विधानसभेत केली होती. MSRT च्या बसेस स्वच्छ आणि सुसज्ज आहे. आणि एमएसआरटी कडे अनेक बसेस असल्यामुळे आणि त्या राज्यातील विश्वासपात्र आणि खात्रीलायक सेवा देणाऱ्या आहे. 

                       नूतन चुल्हा जानकारी

वरिष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजना उद्दिष्टे 

महाराष्ट्र सरकारचा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत एसटी प्रवास या योजनेचा उद्देश्य म्हणजे या योजनेला महाराष्ट्र सरकारला तळागळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याची आहे जेणेकरून राज्यातील सर्व वरिष्ठ नागरिकांना तसेच गरीब वरिष्ठ नागरिकांना आर्थिक मदत होईल, तसेच करोना महामारी साथीच्या रोगांमुळे राज्यातील बरेच गरीब वरिष्ठ नागरिक बेरोजगार झालेले आहे, आणि त्यांना रोजगार मिळविणे कठीण झाले आहे, अशावेळी महाराष्ट्र सरकारकडून तयार करण्यात आलेली हि वरिष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना त्यांच्यासाठी अत्यंत लाभकारी ठरणार आहे.

तसेच राज्यातील 65 ते 75 वर्ष वयोगोटातील नागरिकांना बसेस सेवांमध्ये तिकीट भाड्यावर 50 टक्के सवलत मिळेल. या योजनेच्या संबंधित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले, या ट्विट  मध्ये त्यांनी असे लिहिले होते कि महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटी कडून मोफत प्रवास योजनेचे प्रमाणपत्र आज वितरीत करण्यात आले. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटी बस मधून मोफत प्रवास योजनेचा लाभ राज्यातील सुमारे पंधरा लाख जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे.

                          राष्ट्रीय वयोश्री योजना

जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेचे लाभ 

महाराष्ट्र सरकारने  या जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेला राज्यातील तळागाळातील गरीब आणि सर्वच स्तरांवरील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे लक्ष ठेवले आहे, या योजनेच्या माध्यमातून शासनाला राज्यातील वयोवृध्द नागरिकांची आर्थिकदृष्ट्या मदत करायची आहे, एसटी मोफत प्रवास योजनेचा लाभ राज्यातील 75 वर्ष वयोगटातील वरिष्ठ नागरिक महाराष्ट्र महामंडळाच्या एसटी बसचा प्रवास, या योजनेला लागणारी योग्य प्रमाणपत्रे किंवा आवश्यक कागदपत्र सादर करून घेऊ शकतात (ओळखपत्र)
  • देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या नंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री यांनी या जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेची घोषणा केली, आणि या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
  • जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेचा लाभ कसा मिळवावा :- राज्यातील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रवासाला निघण्या अगोदर त्यांच्या कडे असलेले ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे (पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना  या मधील कोणतेही एक, त्यानंतर त्यांना हे ओळखपत्र प्रवासा दरम्यान एसटी वाहकाला दाखवावे लागेल.
  • एसटी वाहकाला हि ओळखपत्रे दाखविल्यानंतर वरिष्ठ नागरिकांना त्यांना प्रवासासाठी लागणाऱ्या भाड्यासाठी सवलत मिळेल. 
  • जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लागणारी पात्रता :- महाराष्ट्र जेष्ठ नागरिक एसटी मोफत प्रवास योजने साठी खालीलप्रमाणे पात्र असणे आवश्यक आहे 
  • वरिष्ठ नागरिक ज्यांना या योजनेचा लाभ मिळवायचा आहे ते महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे
  • वरिष्ठ नागरिक पंच्याहत्तर वर्षावरील वयोगटातील असणे आवश्यक आहे 
  • या योजनेचा लाभ फक्त एसटी महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना मिळणार आहे 
  • या जेष्ठ नागरिक एसटी बस मोफत प्रवास योजनेचा लाभ फक्त राज्याच्या हद्दीमध्यच मिळणार आहे म्हणजे वरिष्ठांना राज्याच्या आतमध्येच प्रवास करण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. 
महाराष्ट्र राज्य सरकारने अमृत जेष्ठ नागरिक योजना म्हणजे, 75 वर्षे वयोगटातील वृध्द नागरिकांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या सेवांमध्ये प्रवास विनामुल्य केला आहे, या योजनेची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी सुरु झाली आहे, अशा  प्रकारची विनामुल्य प्रवास योजना तयार करून शासनाने राज्यातील वयोवृध्द नागरिकांना आर्थिक आधार दिल्यासारखा आहे. राज्यातील वरिष्ठ नागरिकांनी या एसटी बस मोफत प्रवास योजनेचा अवश्य लाभ घ्यावा, वाचक मित्रहो, या योजनेच्या संबंधित आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे, तरीही आपल्याला या योजनेच्या संबंधित काही विचारायचे असल्यास आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून अवश्य विचारा आम्ही आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. 
 

जेष्ठ नागरिक एसटी बस मोफत प्रवास योजना FAQ 

Q. अमृत जेष्ठ नागरिक योजना काय आहे ?
 
महाराष्ट्र शासनाने देशाच्या अमृत मोहत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील 75 वर्षे वयोगटातील वृध्द नागरिकांना राज्याच्या आत प्रवास संपूर्णपणे विनामुल्य करण्यात आला आहे, या योजनेचे नाव सरकारने अमृत जेष्ठ नागरिक योजना असे ठेवण्यात आले आहे. म्हणजे यानंतर 75 वर्षाच्या वरील वयोवृद्ध नागरिकांना एसटी प्रवासासाठी कोणतेही भाडे किंवा पैसे खर्च करण्याची गरज नाही.
 
Q. या योजनेच्या अंतर्गत किती वयाच्या नागरिकांना एसटी मध्ये सवलत मिळणार आहे ?
 
या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ठरविल्या प्रमाणे 75 वर्षाच्या वरील वयोगटातील राज्याच्या नागरिकांना या योजनेमध्ये एसटी भाड्यामध्ये संपूर्ण सवलत मिळणार आहे.
 
Q. या योजनेच्या अंतर्गत 75 वर्षा खालील नागरिकांना एसटी महामंडळाच्या नियमानुसार काय सवलत मिळणार आहे ? 
 
माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती कि, 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा आणि त्याचबरोबर 65 ते 75 च्या दरम्यान असणारे जेष्ठ नागरिकांना सुद्धा एसटी महामंडळाच्या सर्व सेवांमध्ये 50 टक्के सवलतिच्या दरात प्रवास करता येईल

Leave a Comment