श्रावण बाळ योजना 2024 महाराष्ट्र | Shravan Bal Yojana: लाभार्थी यादी, ऑनलाइन अर्ज

श्रावण बाळ योजना 2024 महाराष्ट्र: भारत देश हा एक विकासशील देश आहे, आणि कृषिप्रधान देश आहे त्यामुळे आपल्याकडील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहतात, आणि यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक दुर्बल व गरीब सामान्य नागरिक आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात समाजातील निरनिराळ्या स्तरांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित व निराधार नागरिक आहेत, राज्यात ग्रामीण भागात तसेच शहरी भागात मोठयाप्रमाणात कमी उत्पन्न असलेल परिवार आहेत, जे हात मजुरी करून जीवनयापन करतात, अशा बहुसंख्य कुटुंबांकडे जीवनावश्यक आणि मुलभूत वस्तूंची कमतरता असते तसेच बहुसंख्य नागरिक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात, त्यामुळे असे परिवार त्यांच्या घरातील वृद्धांकडे दुर्लक्ष करतात.

त्याचप्रमाणे बहुतांश वृद्धांकडे त्यांच्या वृद्धापकाळात धनार्जनाचे साधन नसते, त्यामुळे बहुतेकवेळा कुटुंबाकडून त्यांची उपेक्षा केली जाते, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यांचा अपमान केल्याजातो त्यामुळे अशा जेष्ठ नागरिकांना समाजात जीवन जगणे कठीण होते, अशा जेष्ठ नागरीकांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून, त्याचप्रमाणे वृध्द नागरिकांना समाजात मानाने जीवनयापन करता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने हि श्रावण बाळ योजना राज्यात राबविली आहे. वाचक मित्रहो, या लेखामध्ये आपण श्रावण बाळ योजना 2024 महाराष्ट्र संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसे कि या योजनेचे फायदे, योजनेसाठी लागणारी पात्रता, श्रावण बाळ योजना काय आहे, महत्वाची कागदपत्रे, अर्ज पद्धती, वैशिष्टे, आणि लाभार्थ्यांची यादी इत्यादी संपूर्ण या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

श्रावण बाळ योजना 2024 महाराष्ट्र  

राज्यातील 65 आणि 65 वर्षाच्या वरील जेष्ठ नागरीकांसाठी त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हि श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केली आहे, महाराष्ट्र सरकारव्दारे  नेहमीच राज्याच्या नागरिकांसाठी कल्याणकारी आणि लोक उपयोगी योजना राबविल्या जातात, या योजनांव्दारे समाजातील कमी उत्पन्न असलेले, वंचित नागरिक, आर्थिक दुर्बल घटक त्याचबरोर निराधार जेष्ठ नागरिक आणि सामान्य गरीब नागरिक यांचे जीवनमान सुधारणे त्यांना आर्थिक सुरक्षा देणे तसेच त्यांना आरोग्यविषयक सुविधा निर्माण करून देणे आणि त्यांना समाजात मानाने जीवन जगण्यास पाठबळ देणे हा उद्देश शासनाचा असतो, त्याप्रमाणे या श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार दरमहा 600/- रुपये जेष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ निवृत्तीवेतन देत आहे. जेणेकरून वृद्ध नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील, ज्या पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवायचा आहे ते महाराष्ट्र शासनच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात, तसेच ऑफलाईन सुद्धा या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया पुढे लेखामध्ये दिली आहे.

                   मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

श्रावण बाळ योजना 2024 महाराष्ट्र: मुख्य घटक आणि वैशिष्ट्ये 

श्रावण बाळ योजना 2024 महाराष्ट्र हि योजना राज्यातील निराधार आणि वंचित वृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवेल, हि योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक आणि विशेष साहाय्य विभागाकडून राबविली आणि नियंत्रित केली जाते, या योजनेप्रमाणेच निराधार व दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी संजय निराधार योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना शासनव्दारे राबविल्या जातात. श्रावण बाळ या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या दोन श्रेण्या करण्यात आल्या आहे, श्रेणी – (अ) आणि श्रेणी- (ब), या योजनेंतर्गत 65 व 65 वर्षावरील आणि दारिद्र्य रेषेच्याखालील कुटुंबाच्या यादीत नाव समविष्ट असणाऱ्या निराधार स्त्री व पुरुष नागरिकांना श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना गट –(अ) मधून 400/- रुपये प्रतीमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते आणि याच लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे 200/- प्रतिमहिना असे एकूण 600/- प्रतिमहिना प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते.

श्रावण बाळ योजना
श्रावण बाळ योजना

याचप्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट – (ब) हि योजना जे नागरिक खरोखरीच गरजू निराधार वृद्ध आहेत परंतु ज्यांची दारिद्य रेषेखालील यादी मध्ये नोंद नाहीत. तसेच या योजनेंतर्गत ज्या नागरिकांचे वय वर्षे 65 व 65 वर्षाच्या वरील आहे आणि ज्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपयेच्या आत आहे अशा वृद्ध नागरिकांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट – (ब) मध्ये 600/- रुपये प्रतिमहिना प्रतीलाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते.

                 रमाई आवास योजना

महाराष्ट्र श्रावण बाळ योजना उद्दिष्ट (Objectives)

श्रावण बाळ योजना 2024 महाराष्ट्र हि योजना महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी आणि मुख्य योजना आहे, या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 65 वर्षावरील वृद्ध निराधार आणि वंचित राज्याच्या नागरिकांना आर्थिक सहाय्य आणि प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर या पेन्शन योजनेचा उद्देश राज्यातील वयोवृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करून त्यांना समाजात मानाचे जीवन देणे हा आहे, जेणेकरून वृद्धांना कुटुंबातील कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही व त्यांना स्वावलंबीपणे जीवन जगता यावे. शासनाच्या या योजनेचा उद्देश आहे हि योजना समाजातील प्रत्येक गरजू निराधार वृद्ध नागरिकांपर्यंत पोहचवावी.

श्रावण बाळ योजना 2024 महाराष्ट्र: Highlights

योजनेचे नावश्रावण बाळ योजना
व्दारा सुरु महाराष्ट्र शासन
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी गरीब जेष्ठ नागरिक
उद्देश्य वृध्द नागरिकांना आर्थिक मदत
विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
प्रकार पेन्शन योजना

श्रावण बाळ योजना 2024 महाराष्ट्र: लाभार्थी पात्रता

महाराष्ट्र सरकारने श्रावण बाळ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे (बीपीएल) यादीत समावेश असल्याच्या आधारावर दोन गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे, गट अ आणि गट ब त्यामुळे लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे पात्रता निकष आहे.

गट (अ) :- 

  • या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदार महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असावे
  • योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जादारचे वय 65 वर्ष किंवा 65 वर्षाच्या वर असावे
  • योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदाराचे नाव दारिद्य्ररेषेखालील यादीत असावे

गट (ब) :-

  • या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदारचे वय 65 वर्ष किंवा 65 वर्षाच्या वर असावे
  • या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपये पेक्षा जास्त नसावे
  • या योजनेमध्ये असे पात्र अर्जदार ज्यांच्या कुटुंबाची दारिद्र्यरेषेखालील यादीत नोंद नाही

महाराष्ट्र श्रावण बाळ योजना लाभ आणि विशेषता

  • मुलभूत गरजांसाठी वृद्ध नागरिकांना कुटुंबावर अवलंबून राहावे लागत होते, या योजनेमुळे ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील, आणि त्यांना समाजात सन्मानाने जीवन जगता येईल.
  • श्रावण बाळ योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील निराधार आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वृद्धांना दर महिन्याला 600/- रुपयांची आर्थिक सहायता करणार आहे.
  • श्रावण बाळ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील वंचित आणि कमी उत्पन्न गटातील वृद्ध नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील.
  • शासनाने हि योजना निराधार वृद्ध लोकांसाठी राबविल्यामुळे राज्यातील वृद्ध नागरिक आपल्या आर्थिक समस्यांवर मातकरू शकणार आहे.
  • महाराष्ट्र सरकारने या योजनेंतर्गत दोन श्रेणी बनविल्या आहे श्रेणी (अ) आणि श्रेणी (ब) श्रेण्यांमध्ये असे नागरिक असतील श्रेणी (अ) मध्ये ज्यांचे कुटुंब (बीपीएल) यादीत नोंदणीकृत आहे, तसेच श्रेणी (ब) मध्ये ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकूण 21,000/- रुपयाच्या आत आहे, आणि श्रावण बाळ हि योजना महाराष्ट्रातील वृद्ध निराधार नागरिकांसाठी लागू आहे.

                    मागेल त्याला शेततळे योजना

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आवश्यक कागदपत्र

  • वयाचा दाखला:- ग्रामपंचायत किंवा नगरपालिका / महानगरपालिका मधून अधिकृत जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड मध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा ग्रामीण / नागरी रुग्णालयाच्या अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.
  • दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव:- दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याचा अधिकृत पुरावा.
  • रहिवासी दाखला:- ग्रामीणभागामधील ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला.

श्रावण बाळ योजना 2024 महाराष्ट्र: ऑनलाइन अर्ज

श्रावण बाळ योजना 2024 महाराष्ट्र या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र लाभार्थी उमेदवारांनी सर्व प्रथम महाराष्ट्र शासनच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट देऊन प्रथम नोंदणी करणे आवशयक आहे यासाठी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया आणि अर्ज करण्याची प्रक्रिया शासनाच्या या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी पात्र लाभार्थी या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात, या वेबसाईटवर नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रियेच अनुसरण करावे.

श्रावण बाळ योजना मराठी

  • तुम्हाला सर्व प्रथम महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, या नंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल.
  • होम पेजवर तुम्हाला ”New Registration” हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

shravan bal yojana marathi registration

  • यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील तुम्हाला त्यापैकी एक पर्याय निवडावा लागेल, जर तुम्ही पर्याय  एक निवडला असेल तर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर नोंदणी साठी वापरावा लागेल तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल आणि युजर आयडी व पासवर्ड मिळवावा लागेल.

shravan bal yojana marathi

  • जर पर्याय दोन निवडला असेल तर आता तुम्हाला एक नोंदणी फॉर्म दिसेल ज्या ठिकाणी तुम्हाला विचारलेला स्वतः बद्दलचा संपूर्ण तपशील भरावा लागेल जसे कि अर्जदाराचा पत्ता, मोबाइल नंबर, युजर नेम वेरिफिकेशन, फोटो, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा इत्यादी आवश्यक माहिती भरावी
    लागेल.
  • यानंतर तुम्हाला ”Register” क्लिक करावे लागेल, अशाप्रकारे शासनच्या या वेबसाईटवर आपली नोंदणी प्रक्रिया संपूर्ण होईल.
  • त्यानंतर आता नोंदणीकृत उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया सुरु ठेवण्यासाठी वेबसाईटवर लॉगिन करणे आवश्यक आहे, यानंतर तुम्हाला तुमचे युजर नेम आणि पासवर्ड वापरून दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

shravan bal yojana marathi maharashtra

  • यानंतर समोरील ड्रॉप डाऊन सूचीमधील तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल आणि त्यावर क्लिक करून पुढे जावे लागेल, आपण भरलेला सर्व तपशील त्योग्य असल्यास तुमचे आपले सरकार पोर्टवर लॉगिन होईल, आता आपण श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज करू शकता.
  • आता तुम्हाला डाव्या मेनू साईडबारमधून सबंधित विभाग निवडावा लागेल जसे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल, समोर असलेल्या यादीतून तुम्हाला संजय निराधार / श्रावण बाळ योजना हा पर्याय निवडून प्रोसिड वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हला लॉगिन फॉर्म दिसेल यामध्ये तुमचे सर्व लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.
  • आता यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव, तुमचा संपर्क तपशील, ईमेल आयडी, पत्ता माहिती इत्यादी प्रविष्ट करावे लागेल.
  • यानंतरच्या विभागात योजनेशी सबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील, आता तुम्हाला बँक सबंधित तपशील याप्रमाणे बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँकेचा IFSC कोड, हि माहिती प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
  • हि माहिती प्रविष्ट केल्यानंतर सर्व माहितीची पुन्हा तपशीलवार पडताळणी करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा, या नंतर अर्ज यशस्वीपणे सबमिट झाल्यावर एक अर्ज क्रमांक तयार होईल, तुम्हाला हा अर्ज क्रमांक भविष्यातील संदर्भासाठी नोट करून ठेवणे आवश्यक आहे.

                       शिव भोजन योजना

श्रावण बाळ योजना 2024 अर्जाची स्थिती तपासणे

  • महाराष्ट्र श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर उमेदवार त्यांच्या अर्जाच्या स्थिती शासनाच्या या वेबसाईटवर भेट देऊन पाहू शकतात, अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
  • तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत आपले सरकार वेबपोर्टलवर भेट द्यावी लागेल, त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल, या होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ”Track Your Application” या पर्यायावर क्लिक करा.

shravan bal yojana marathi 2022

  • या पुढील स्टेप ड्रॉप-डाऊन यादी मधून सबंधित विभाग आणि योजनेचे नाव निवडा व दिलेल्या जागेत तुमचा आयडी प्रविष्ट करा आणि त्यानंतर go बटनावर क्लिक करा, हि प्रोसेस यशस्वीपणे केल्यानंतर तुम्हाला अर्जाची स्थिती तुमच्यासमोर प्रदर्शित होईल.

श्रावण बाळ योजना संपर्क

ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
नवीन नोंदणी इथे क्लिक करा
श्रावण बाळ योजना फॉर्म PDF डाऊनलोड
महाराष्ट्र आपले सरकार पोर्टल इथे क्लिक करा

श्रावण बाळ योजना 2024 महाराष्ट्र  

महाराष्ट्र सरकारच्या वतीने लोक कल्याणासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात त्यामधील हि एक लोक उपयोगी संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, हि योजना शासनाच्या तर्फे 1980 पासून राबविण्यात येत आहे या योजनेच्या अंतर्गत राज्यातील निराधार नागरिक, वृद्ध व्यक्ती, अपंग, शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यत्क्ती, विधवा महिला, मूकबधीर, मतिमंद प्रवर्गातील स्त्री व पुरुष, क्षयरोग, पक्षघात, कर्करोग, एडस, कृष्ठरोग  या सारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे स्त्री व पुरुष, वेश्या व्यवसायापासून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिला, समाजातील या सर्व नागरीकांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ उद्देशाने संजय गांधी निराधार अनुदान योजना शासनाने सुरु केली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना उदिष्टे

महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब नागरिक, निराधार, वृद्ध व्यक्ती, अपंग, शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, विधवा महिला, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला अनाथ मुले, तृतीयपंथी, परितक्त्या अशा सर्व नागरिकांना आर्थिक सहाय्य करून त्यांना स्वावलंबी करणे, गरीब नागरिकांना आर्थिक मदत करणे, या योजनेच्या अंतर्गत दिल्याजाण्याऱ्या आर्थिक मदतीमुळे राज्यातील निराधार लोकांना आर्थिक पाठबळ मिळेल, या योजनेंतर्गत शासनाकडून मिळणाऱ्या पेन्शन मुले राज्यातील निराधार नागरिक आपल्या मुलभूत गरजा भागवू शकतील.

संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्र लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील निराधार आणि गरजू कुटुंबाना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचे पात्र लाभार्थी खालीलप्रमाणे असेल.  

  • विधवा महिला
  • अनाथ मुले
  • शेतमजूर महिला
  • आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब ज्यांची वार्षिक उत्पन्न योजनेच्या विहित उत्पन्ना पेक्षा कमी असल्यास ते कुटुंब
  • निराधार महिला, 65 वर्षाखालील निराधार पुरुष
  • अपंग व्यक्ती
  • कृष्ठरोग, क्षयरोग, कर्करोग, एडस, या सारख्या आजाराने पिडीत महिला व पुरुष
  • घटस्फोटीत महिला परंतु पोटगी न मिळालेल्या
  • अत्याचारित महिला
  • तृतीयपंथी
  • देवदासी
  • 35 वर्षावरील अविवाहित स्त्री
  • तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी
  • सिकलसेल ग्रस्त 

संजय गांधी निराधार अनुदान योजना पेन्शन लाभ 

या योजनेंतर्गत पेन्शनची रक्कम खालीलप्रमाणे असेल,

  • संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेच्या अंतर्गत राज्यातील निराधार नागरिकांसाठी या विशेष साहाय्य म्हणून एका लाभार्थ्याला दरमहा 600/- रुपये दिले जातात, त्याचप्रमाणे कुटुंबात दोन किंवा अधिक लाभार्थी असल्यास 900/- रुपये दरमहा दिले जातात, परंतु या योजनेंतर्गत कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपये पेक्षा जास्त नसावे.
  • या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांचा मुले 25 वर्षाची होईपर्यंत किंवा त्यांना नोकरी मिळेपर्यंत योजनेचा लाभ दिल्या जाईल जे आधी असेल त्या प्रमाणे
  • जर लाभार्थ्यांना फक्त मुलीच असल्यास त्या 25 वर्षाच्या झाल्यावर किंवा विवाहित झाल्या तरीही लाभार्थ्यांचा योजनेचा लाभ सुरु ठेवला जाईल.

संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्र आणि अटी

  • योजनेंतर्गत लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा कमीतकमी 15 वर्षा पासून रहिवासी असावा
  • योजनेंतर्गत लाभार्थी अर्जदाराचे वय 65 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे
  • या योजनेंतर्गत लाभार्थी अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे 

संजय गांधी निराधार अनुदान योजना आवश्यक कागदपत्र

  • वयाचे प्रमाणपत्र:- ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिक मधून अधिकृत जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड किंवा मतदार यादीत नमूद केलेला वयाचा उतारा किंवा ग्रामीण / नागरी रुग्णालयाच्या अधीक्षकाने दिलेला वयाचा दाखला.
  • उत्पन्नाचा दाखला:- तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्य रेषेखालील यादीमध्ये त्या कुटुंबाचा समावेश असल्याचा अधिकृत दाखला
  • रहिवासी दाखला:- ग्रामसेवक, तलाठी मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार, किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला
  • अपंगाचे प्रमाणपत्र:- अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतीमंद, यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र
  • असमर्थता:- रोगाचा दाखला जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला दाखला
  • अनाथ असल्याचा दाखला:- ग्रामसेवक, मुख्याधिकारी, प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी / प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी दिलेला दाखला 

संजय गांधी निराधार अनुदान योजना अर्ज करण्याची प्रक्रिया

संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना अर्ज करावयाचा आहे त्यांना सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा लागेल

यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फॉर्म अचूक आणि तपशीलवार भरून घ्यावा आणि अर्जाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा त्यानंतर अर्जाला लागणारी आवश्यक कागदपत्र / प्रमाणपत्र अर्जा बरोबर जोडून तलाठी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार संजय गांधी योजना या ठिकाणी जमा करू शकतो

अर्ज डाऊनलोड:- Click Here 

संपर्क कार्यालय:- जिल्हाधिकारी कार्यालय / तलाठी कार्यालय / तहसीलदार संजय गांधी योजना 

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना 

सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजनांपैकी हि एक जेष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणारी महत्वाची योजना आहे. या योजनेला भारताच्या ग्रामीण विकास मंत्रालयाव्दारे अर्थ सहाय्य केले जाते आणि केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविली जाते, या योजनेमध्ये निराधार आणि दारिद्र्यरेषेखालील व दारिद्य्ररेषेवरील पात्र वृद्ध नागरिकांना केंद्र सरकारकडून तसेच राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जाते, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेच उद्देश पात्र लाभार्थी नागरिकांना सामाजिक संरक्षण प्रदान करणे तसेच हि योजना देशातील कमी उत्पन्न गटातील नागरिक, गरीब कुटुंबे, वृद्ध व्यक्ती, अपंग व्यक्ती, विधवा महिला, अशा नागरिकांना दरमहा पेन्शन देऊन आर्थिक लाभ आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करते.  

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना 

इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजनेच लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना पुढीलप्रमाणे लाभार्थी पात्रता असणे आवश्यक आहे.

या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील 65 वर्ष आणि 65 वर्षावरील सर्व नागरिक पात्र असतील, या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून 200/- रुपये प्रतीमहिना प्रतीव्यक्ती निवृतीवेतन देण्यात येते. तसेच याच लाभार्थ्यांना राज्य शासनच्या श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन मधून 400/- प्रतिमाह निवृतीवेतन मिळते, यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून 400/- रुपये प्रतिमाह आणि केंद्र शासनाकडून 200/- प्रतिमाह असे एकूण दरमहिन्याला 600/- रुपये प्रतीलाभार्थी निवृतीवेतन मिळते.

लाभ:- या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहिन्याला 600/- प्रती लाभार्थी निवृत्तीवेतन दिल्या जाते 

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना लाभार्थी पात्रता

  • या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदार वय 65 वर्षे किंवा 65 वर्षाच्या वर असावे (स्त्री किंवा पुरुष अर्जदार)
  • या योजनेंतर्गत अर्जदाराच्या कुटुंबाचे नाव दारिद्र्यरेषेखालील यादीत असणे आवश्यक आहे त्याच प्रमाणे अर्जदार व्यक्ती राज्याचा 15 वर्षा पासून रहिवासी असावा  
  • या योजनेंतर्गत अर्जदार निराधार असणे आवश्यक आहे आणि त्याच्याकडे कुटुंबाकडून कोणताही आर्थिक आधार नसावा तसेच मिळकतीचे दुसरे साधन नसावे
  • या योजनेमध्ये 60 वर्षे आणि 79 वर्षे वयोगटातील गंभीर आजार असलेले आणि तसेच अनेक अपंगत्व असेलेल दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती व दारिद्र्यरेषेखालील विधवा स्त्रिया हे नागरिक या योजनेस पात्र नाही 

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना फायदे

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून 200/- रुपये मिळतात आणि राज्य शासनाकडून श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेंतर्गत 400/- रुपये निवृत्तीवेतनाच्या स्वरुपात असे एकूण 600/- रुपये दरमहा निवृतीवेतन देण्यात येते.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 600/- रुपये दिले जातात, योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील 65 वर्षे आणि अधिक वयोगट असलेले वृद्ध व्यक्ती लाभास पात्र आहेत, आणि या योजनेंतर्गत देशातील पात्र नागरिकांना मासिक आधारावर पेन्शन मिळते 

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आवश्यक कागदपत्र

या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी अर्जदाराला पुढील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असेल

  • वयाचा दाखला:- या योजनेंतर्गत अर्दाराला वयाचा दाखला ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपलिका मधून अधिकृत दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड किंवा मतदार यादीमध्ये नमूद केलेला वयाचा उतारा किंवा ग्रामीण / नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला
  • दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव:- दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा अधिकृत पुरावा
  • रहिवासी दाखला:- ग्रामसेवक / तलाठी / मंडळ निरीक्षक / नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला
  • अर्जादारचे उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक पासबुक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक 

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या प्रक्रीये नुसार अर्ज करू शकतात

  • अर्जदार या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शासनाच्या निर्णया प्रमाणे तो राहत असलेल्या गावतील तलाठ्याकडे अर्ज तपशीलवार भरून द्यावा.
  • या अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले या योजनेला आवश्यक असलेले संपूर्ण कागदपत्र जोडावे, या नंतर आपला अर्ज सबंधित तलाठ्याकडून संपूर्ण तपासणी करून घ्यावी, यानंतर सबंधित तलाठी प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करून अर्जासोबत जी कागदपत्रे जोडण्यात आली आहेत, त्यांची आणि अर्ज कोणत्या योजनेसाठी दिला आहे याची सविस्तर नोंद घेईल.
  • यानंतर तलाठी प्राप्त अर्जाची आणि त्याबरोबर जोडण्यात आलेली कागदपत्रे यांची सविस्तरपणे पडताळणी आणि छाननी करून प्राप्त अर्ज सबंधित तहसीलदार / नायब तहसीलदार यांच्याकडे पाठवेल
  • या योजनेंतर्गत लाभार्थ्याला मिळणारे निवृतीवेतन बँकेच्या खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील बचत खात्यात जमा करण्यात येते  

संपर्क कार्यालय:- जिल्हाधिकारी कार्यालय / तलाठी कार्यालय / तहसीलदार संजय गांधी योजना.

वाचक मित्रहो, या लेखामध्ये श्रावण बाळ योजना संबंधित संपूर्ण माहिती आणि अपडेट्स देण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही आपल्याला शासनाच्या आपले सरकार या वेबसाईट संबंधित आणि या वर असलेल्या सेवां विषयी आणि माहिती विषयी आणखी स्पष्टीकरण हवे असल्यास शासनाकडून एक टोल-फ्री क्रमांक नियुक्त करण्यात आला आहे 1800 120 8040 या फोन नंबरवर फोन करून आपण माहिती मिळवू शकता, आपल्याला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट्स च्या माध्यामतून जरूर कळवा.

श्रावण बाळ योजना 2023 FAQ 

Q. महाराष्ट्र श्रावण बाळ योजना काय आहे ?

महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील निराधार वृद्ध नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेली महत्वाकांक्षी आणि मुख्य योजना आहे या योजनेव्दारे महाराष्ट्र सरकार एक निश्चित रक्कम 600/- रुपये दरमहिन्याला पेन्शन देऊन राज्यतील निराधार वृद्ध नागरीकांना आर्थिक सहाय्य आणि सामाजिक सुरक्षा देऊन निराधार वृद्ध नागरिकांना स्वावलंबी करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

Q. श्रावण बाळ योजना कोणासाठी आहे आणि पात्रता काय आहे ?

महाराष्ट्र सरकारने या योजनेंतर्गत दोन श्रेणी बनविल्या आहे, श्रेणी अ आणि श्रेणी ब श्रेण्यांमध्ये असे नागरिक असतील, श्रेणी अ मध्ये ज्यांचे कुटुंब (बीपीएल) यादीत नोंदणीकृत आहे, तसेच श्रेणी ब मध्ये ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकूण 21,000/- रुपयाच्या आत आहे, आणि श्रावण बाळ हि योजना महाराष्ट्रातील 65 वर्ष आणि 65 वर्षाच्या वरील वृद्ध निराधार नागरिकांसाठी लागू आहे.

Q. श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

या योजनेसाठी पात्र लाभार्थी ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता, अर्ज करण्यासाठी तुम्हाला तलाठी किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन योजनेसाठी अर्ज करावा लागेल, यासाठी तहसील ऑफिस मध्ये तुम्हाला मार्गदर्शन केल्या जाईल, तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील लेखामध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला आपले सरकार या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल

Q. श्रावण बाळ योजनेमध्ये अर्ज केल्यावर प्रक्रियेला किती वेळ लागतो ?

या योजनेच्या अंतर्गत अर्ज केल्यानंतर योजनेच्या अधिकाऱ्यांना सर्व अर्जाची माहिती आणि तपासणी व सर्व कागदपत्रांची पडताळणी करून संपूर्ण अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी 30 दिवसांचा वेळ लागतो.   

Leave a Comment