प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 | (PMJJBY), पात्रता, फायदे, नोंदणी आणि दावा प्रक्रिया

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024: भारत सरकार नेहमीच जनतेच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवीत असते या योजनांच्या माध्यमातून जनसामान्यांचे जीवनमान उंचावणे त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे तसेच नागरिकांना या योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्यता करून त्यांना आर्थिक सुरक्षा व सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देणे. यावेळी केंद्र शासनाने नागरिकांना त्यांच्या अडचणीच्या वेळी अथवा अचानक निर्माण झालेल्या आपत्तीच्या वेळी त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने अत्यंत कमी प्रीमियममध्ये आणि जास्तीत जास्त सुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि सार्वजनिक व खाजगी विमा कंपन्या व खाजगी क्षेत्रातील बँका यांच्या माध्यमातून सर्व स्तरावरील देशातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 हि योजना 9 मे 2015 रोजी संपूर्ण देशात राबविण्यास सुरुवात केली.

हि एक मुदत विमा योजना आहे, या योजनेंतर्गत विमा धारकाला एक वर्ष विमा संरक्षण आणि कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याला जीवन विमा संरक्षण देते. या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्याने योजनेचे सदस्य बनून विमा पॉलिसी संरक्षण मिळविले आहे, जर त्या विमा पॉलिसी लाभार्थ्याचा कोणत्याही कारणाने वयाच्या 55 वर्षापर्यंत मृत्यू झाल्यास तर त्या लाभार्थ्याचा कुटुंबाला दोन लाखचे विमा संरक्षण मिळेल, हि विम्याची दोन लाख रुपयाची धनराशी त्याच्या कुटुंबातील नॉमिनीला मिळेल जेणेकरून त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करता येईल. वाचक मित्रहो या लेखात आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजने संबंधित संपूर्ण माहिती जसे की योजनेंतर्गत प्राप्त होणारे लाभ, योजनेला लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, योजनेमध्ये अर्ज कसा करावा इत्यादी माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 

केंद्र सरकारने देशातील सर्व वर्गातील नागरिकांसाठी हि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरु केली आहे यामुळे देशातील जे नागरिक महागड्या पॉलिसीचे प्रीमियम भरू शकत नाही त्यांच्यासाठी हि योजना अत्यंत मोलाची ठरली आहे. या योजनेच्या मध्यमातून साधारण आणि गरीब नागरिक वार्षिक 436/- रुपयाचा अत्यंत किफायतशीर प्रीमियम भरून दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळवू शकतो, म्हणजे या योजनेंतर्गत हि पॉलिसी विमा लाभार्थ्याला एक रुपयांपेक्षाही कमी प्रतिदिवसामध्ये दोन लाख रुपये विमा कवर प्रदान करते.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

या योजनेंतर्गत या विमा पॉलिसीचा लाभ मिळविण्यासाठी नागरिकांचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 50 असावे लागते, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हा केंद्र शासनाचा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे या योजनेमुळे समाजातील वंचित आणि गरीब नागरिकांना विम्याचे संरक्षण तर देतेच त्याचबरोबर अडचणीच्या वेळेस त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत सुद्धा प्राप्त होते. कोविड-19 च्या या महामारीच्या काळात हि योजना साधारण आणि गरीब जनतेसाठी अत्यंत उपयोगी आणि सर्वोत्तम योजना आहे. ज्या नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत लाभ मिळवायचा आहे त्यांना या योजनेंतर्गत अर्ज करावा लागेल.

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना वैशिष्ट्ये (Features)

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 हि एक मुदत विमा योजना आहे या विमा योजनेमध्ये गुंतवणीनंतर जर विमा धारकाचा मृत्यू झाला तर सरकार तर्फे त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये दिले जाते, तसेच या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 अंतर्गत देशातील 18 ते 50 वयोगटातील कोणतीही व्यक्ती ज्यांचे बँकेत बचत खाते आहे, या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीचे अनेक बँकेत बचत खाते आहे तर असे व्यक्ती त्यांच्या कोणत्याही एका बचत खात्याच्या मार्फत हि विमा पॉलिसी घेऊ शकतात, यामध्ये विमा पॉलिसी घेण्याऱ्या लाभार्थ्याचा आधार क्रमांक पायाभूत मानला जातो.
  • बँका आणि भारतीय आयुर्विमामहामंडळ यांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाते हि योजना लाभार्थ्यांना एक वर्षाचे विमा संरक्षण प्रदान करणारी जीवन विमा योजना आहे ज्यामध्ये लाभार्थ्यांना पॉलिसीचे दरवर्षीप्रमाणे नुतनीकरण करणे अनिवार्य आहे.
  • या योजनेंतर्गत विमा कव्हरेजचा कालावधी दरवर्षीप्रमाणे 1 जून ते 31 मे असा राहील, या योजनेंतर्गत विमा हप्ता लाभार्थ्याने दिलेल्या पर्यायानुसार बचत खात्यातून प्रत्येक वर्षी विमा कव्हरेजसाठी 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी एका हप्त्यात आटो डेबिट सुविधेव्दारे कापला जाईल. या योजनेसाठी विमा पॉलिसी नुतनीकरणसाठी अर्ज 31 मे पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये योजनेत सहभागी होण्यासाठीचा कालावधी सरकारव्दारे सुरुवातीला
    तीन महिने पर्यंत  वाढवू शकते.
  • या योजनेंतर्गत विमाधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास कुटुंबातील त्याने नामांकित केलेल्या वारसास 2 लाख भरपाई मिळेल.
  • योजनेंतर्गत विमा हप्ता प्रती व्यक्ती प्रती वर्षी 436/- रुपये राहील.
  • विमाधाराकाचे वय 55 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याच्या विमा पॉलिसी संलग्न बँक बचत खात्यात विमा हप्ता कापण्यास पुरेशी रक्कम नसेल तर किंवा बचत खाते बंद केले असेल तर त्याचे विमा संरक्षण संपुष्टात येईल.
  • या योजनेच्या अंतर्गत काही तांत्रिक अडचणीमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल.

महा शरद पोर्टल रजिस्ट्रेशन

PMJJBY अंतर्गत प्रीमियम धनराशी

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 अतर्गत या विमा पॉलिसीसाठी 436/- रुपये दरवर्षी प्रतीव्यक्ती हप्ता असेल, विमाधारकाने दिलेल्या पर्यायानुसार त्याच्या बँक बचत खात्यातून वार्षिक कव्हरेजचा कालावधी 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी एका हप्त्यात ऑटो-डेबिट सुविधेच्या माध्यमातून प्रीमियम कापला जाईल, तसेच 31 मे नंतर व्यक्तीला या विमा पॉलिसीचे संरक्षण मिळू शकते यासाठी त्याला संपूर्ण वार्षिक प्रीमियम भरून चांगल्या आरोग्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 अंतर्गत विमा पॉलिसी खरीदण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही.

  • एलआयसी / विमा कंपनीला विमा प्रीमियम प्रती वर्षी प्रती सदस्य 289/- रुपये
  • बीसी / मायक्रो / कॉर्पोरेट / एजंट्सना खर्चाची परतफेड प्रती सदस्य प्रती वार्षिक 30/- रुपये
  • सहभागी बँकांना प्रशासकीय खर्चाची परतफेड प्रती सदस्य प्रती वार्षिक 11/- रुपये 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 Highlights

योजनेचे नावप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
व्दारा सुरु भारत सरकार
योजनेची सुरुवात 9 मे 2015
लाभार्थी देशाचे नागरिक
उद्देश्य कमी प्रीमियम मध्ये विमा संरक्षण
आधिकारिक वेबसाईट https://www.jansuraksha.gov.in/
श्रेणी विमा योजना
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन / ऑफलाईन

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना उद्देश

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 योजनेच्या संरक्षण कालावधीच्या अंतर्गत विमा लाभार्थ्याचा कोणत्याही कारणांमुळे मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्यता करण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जाऊ लागू नये म्हणून शासनाकडून दोन लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य देण्यात येते, सामान्य गरीब नागरिकांच्या कुटुंबात जर कमावत्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो त्याच्या मुलांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होतो त्यामुळे अशा संकटाच्या वेळी या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी हि एक विशेष विमा योजना आहे, सामान्य नागरिकांना या योजनेचा लाभ दरवर्षी 436/- रुपये गुंतवणूक करून मिळू शकतो. देशातील ज्या नागरिकांना ते स्वतः गेल्यावर त्यांच्या कुटुंबांना आर्थिक व समाजिक संरक्षण मिळावे असे वाटते त्या नागरिकांसाठी हि योजना अतिशय महत्वपूर्ण आहे. वंचित, गरीब आणि सामान्य सर्वच नागरिक या योजनेचा लाभ मिळवू शकतात.

Mahadbt Scholarship

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लाभार्थी पात्रता

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 मिळविण्याकरिता लाभार्थ्यांना विशेष काही अटी पूर्ण कराव्या लागत नाही.
  • या योजनेसाठी लाभार्थ्यांचे बँक बचत खाते असणे आवश्यक आहे कारण शासनाकडून मिळणारा आर्थिक लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक अकाऊंट मध्ये जमा केल्या जातो.
  • या योजनेसाठी सदस्याचे वय 18 ते 50 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे
  • हि एक मुदत विमा योजना आहे या विमा पॉलिसीसाठी दरवर्षी 436/- रुपये प्रीमियमच्या स्वरुपात द्यावे लागेल.
  • विमाधारकाला दरवर्षी 31 मे किंवा त्यापूर्वी प्रीमियम ऑटो-डेबिटसाठी त्याच्या बँक बचत खात्यात जरुरी बलेंस ठेवणे आवश्यक आहे.  
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 खरीदण्यासाठी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 या पॉलिसीचे दरवर्षी नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
  • पीएम जीवन ज्योती विमा योजनेची नोंदणी कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत आहे.
  • बँकेत प्राथमिक आधार कार्डच्या माध्यमातून KYC केलेली असणे आवश्यक आहे.
  • विमाधारकाने कोणत्याही कारणा अंतर्गत विमा पॉलिसी योजना सोडल्यास तो विमाधारक भविष्यात या योजनेत पुन्हा सामील होऊ शकतात.
  • या योजनेंतर्गत जे पूर्वी सामील झाले नाही किंवा त्यांचे सदस्यत्व बंद झाले आहे, ते पुन्हा सामील होण्यास सक्षम असतील.

PMJJBY अंतर्गत संरक्षण समाप्ती

PMJJBY या योजनेच्या अंतर्गत जीवन ज्योती विमा पॉलिसीची खालीलप्रमाणे परिस्थितीमध्ये समाप्ती होऊ शकते, या परस्थितीमध्ये विमाधारकाचे पॉलिसी संरक्षण संपुष्टात येईल आणि त्यानंतर कोणताही लाभ देय असणार नाही.

  • जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत विमाधारकाचे वय 55 वर्ष पूर्ण झाल्यावर विमा पॉलिसीचे नूतनीकरण होणार नाही आणि हि विमा पॉलिसी आपोआप संपुष्टात येईल.
  • योजनेंतर्गत विमाधारकाचे जीवन ज्योती विमा योजने संबंधित बँक बचत खाते बंद झाल्यास किंवा बचत खात्यात वार्षिक विम्याचा प्रीमियम कापण्यासाठी अपुरी रक्कम असेल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.
  • विमाधारकाने जर पीएम जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत एलआयसी किंवा इतर विमा कंपनी मध्ये एकापेक्षा जास्त बचत खात्यांव्दारे विमा संरक्षण प्राप्त केले असल्यास आणि विमा कंपनीकडून अवधानाने प्रीमियम प्राप्त झाला असेल तर विमाधारकाचे विमा संरक्षण दोन लाखापर्यंत मर्यादित केले जाईल आणि विमाधारकाकडून प्रीमियम जप्त केला जाईल.
  • पीएम जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत काही तांत्रिक कारणांमुळे उदाः विमाधारकाच्या संलग्न बचत खात्यात अपुरी रक्कम असणे किंवा काही प्रशासकीय समस्यांमुळे विमाधारकाचे विमा संरक्षण संपुष्टात आले असेल तर विमाधारकाने एकाच हप्त्यात संपूर्ण वार्षिक प्रीमियम भरल्यास आणि चांगल्या आरोग्याचे स्वघोषणापत्र दिल्यास विमा संरक्षण पुन्हा सुरु केल्या जाईल.
  • सहभागी बँका विमा कंपन्यांना प्रीमियम पाठवतील 30 जून रोजी किंवा त्यापूर्वी नियमित नाव नोंदणीमध्ये आणि इतर प्रकरणांसाठी प्राप्त झाल्यावर त्याच महिन्यात. 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना दावा प्रक्रिया

पीएम जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत विमाधारकाचा मृत्युच्या पश्चात विमा पॉलिसीसाठी दावा करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल, या योजनेंतर्गत मृत्यू पश्चात विमाधारकाला 2 लाख रुपये विमा लाभ दिला जातो.

  • या योजनेंतर्गत विमाधारकाच्या मृत्यू नंतर लगेचच विमाधारकाच्या नामांकित व्यक्तीला क्लेम-कम-डिस्चार्ज फॉर्म जारी केला जातो जर नॉमिनी व्यक्ती अल्पवयीन असेल तर त्याचा / तिचा नियुक्त पालक यांनी आणि जर नॉमिनी व्यक्तीचा विमाधारकाच्या अगोदर मृत्यू झाला असल्यास विमाधारकाचा दुसऱ्या  कायदेशीर वारसाने विमा धारकाच्या शक्यतो मृत्यूच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत बँकेच्या शाखेत सादर करणे आवश्यक आहे.
  • योजनेंतर्गत विमा पॉलिसी सुरु झाल्यापासून किंवा पॉलिसीमध्ये पुन्हा सामील झाल्यापासून 45 दिवसाच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास (पॉलिसी सोडल्यानंतर पुन्हा नवीन नोंदणी करण्याबाबत किंवा नुतनीकरणमध्ये विलंब झाल्यामुळे) दावा देय असणार नाही.
  • संबंधित बँक आवश्यक कागदपत्रांसह सबमिट केलेल्या दावा फॉर्मची खालीलप्रमाणे पडताळणी आणि पुष्टी करेल.
  • या योजनेंतर्गत व्यक्तीने नवीन नाव नोंदणी केल्यावर किंवा योजना सोडल्यानंतर पुन्हा नवीन नोंदणी केल्यानंतर 45 दिवसांच्या आत जर विमाधारकाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास, अपघाती मृत्यूचा पुरावा सादर करणे आवश्यक असेल.
  • यासाठी मृतक विमाधारक सदस्य / नामांकित व्यक्ती / नियुक्त पालक / यांचा आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक
  • नामनिर्देशित व्यक्ती / नियुक्त पालक / दावेदार यांचे KYC कागदपत्र उदाः बँक पासबुकची पहिली दोन पाने, खाते तपशील दर्शविणारे बँक खाते विवरण, किंवा नॉमिनी / नियुक्त पालक / दावेकराच्या खात्यावरील रद्द केलेला चेक जे असेल.
  • जर विमाधारकाच्या अगोदर नामनिर्देशित व्यक्तीचा झाला असेल तर नामनिर्देशित व्यक्तीच्या मृत्यूचा पुरावा सादर करणे.
  • कायदेशीर वारस असल्याचा पुरावा, जर दावेदार नामनिर्देशित किंवा नियुक्त पालकाव्यतिरिक्त असेल तर सादर करणे आवश्यक आहे.
  • दाव्याच्या वितरणाची पावती, योग्यरीत्या भरलेली आणि स्वाक्षरी केलेली 

PMJJBY अंतर्गत दाव्या संबंधित बँक प्रक्रिया

विमाधारकाच्या मृत्यूपश्चात दाव्या संबंधित बँक प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल

  • संबंधित बँकेचे अधिकृत अधिकारी विमाधारक सदस्याचे खाते आणि ऑटो-डेबिट-स्टेटमेंट आणि खाते विवरण तपासतील, नाव नोंदणीची पुष्टी, प्रीमियमचे डेबिट / विमाधारकाला प्रीमियम पाठविणे आणि दावा फॉर्ममध्ये विमाधारकाचे तपशील नावनोंदणी डेटा बँक रेकार्डच्या आधारे भरला जाईल, त्यानंतर दाव्या फॉर्ममध्ये दिलेल्या संपूर्ण माहितीची पडताळणी करण्यासाठी, त्या दाव्याच्या संबंधित एकत्रित केलेल्या संपूर्ण माहितीचे प्रमाणीकरण करेल.  
  • त्यानंतर दावेदारांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी बँक दावेदारांच्या KYC कागदपत्रांची पडताळणी करेल, आणि त्या विमाधारक सदस्याचा दावा बँकेने सहभागी विमा कंपनी कडे पाठविला नाही याची पडताळणी करेल.
  • यामध्ये दावा सादर  केल्यापासून सात दिवसांच्या आत बँक दाव्याची कागदपत्रे सहभागी विमा कंपनीला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवेल. ई-मेल आयडी किंवा अॅपवर फॉरवर्ड करेल.
  • विमा कंपनी सत्यापित करेल आणि पुष्टी करेल कि विमाधारकाला प्रीमियम पाठविला गेला आहे आणि विमाधारकाचा मास्टर पॉलिसी मध्ये विमाधारका व्यक्तीच्या यादीमध्ये समावेश केला जातो. 
  • योग्य डुप्लिकेशन यंत्रणेमार्फत विमा कंपनी पुष्टी करेल कि PMJJBY अंतर्गत दावे इतर कोणत्याही विमा कंपनीने देखील अदा केले आहे, जर ते दिल्या गेले असेल तर सहभागी विमा कंपनी दावा नाकारू शकते.
  • ज्या विमा कंपनीने बँकेसाठी मास्टर पॉलिसी जारी केली आहे, बँकेकडून प्राप्त झालेल्या दाव्याचे निराकरण त्या विमा कंपनीकडून दावा मिळाल्याच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत केले जाईल.
  • दावा स्वीकार्य झाल्यावर असलेल्या परिस्थितीनुसार दाव्याची स्वीकार्य रक्कम नामनिर्देशित व्यक्ती किंवा नियुक्त पालक किंवा कायदेशीर दावेदार यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • नॉमिनी नसल्यास किंवा विमाधारक सदस्याच्या मृत्यू पूर्वी नामनिर्देशित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, स्वीकार्य दाव्याच्या रकमेचा भरणा सक्षम न्यायालय किंवा प्राधिकरणाव्दारे प्रमाणपत्र किंवा कायदेशीर उत्तराधिकारी प्रमाणपत्राच्या निर्मितीवर केला जाईल.
  • पेमेंट किंवा दावा नाकारणे या दोन्ही प्रकरणांमध्ये, विमा कंपनीला ई-मेल / अॅप-आधारित सूचना आणि नॉमिनीच्या मोबाईल फोनवर एक मजकूर संदेश सूचना पाठवेल, याशिवाय सार्वजनिक सुरक्षा पोर्टलवर अपलोड करेल.
  • बँकेला, योग्यरीत्या भरलेला दावा फॉर्म विमा कंपनीला पाठविण्यासाठी वेळ मर्यादा सात दिवस आहे आणि त्यानंतर विमा कंपनीने दावा स्वीकारणे आणि दाव्याची रक्कम वितरीत करण्याची आवश्यक कमाल वेळ मर्यादा सात दिवस आहे.
  • जर बँकेने सहभागी विमा कंपनीला निर्धारित वेळेच्या आत प्रीमियम (विमाधारक सदस्याच्या बचत खात्यातून स्वयंचलितपणे डेबिट केला जातो) पाठवला नाही तर दाव्याचे दायित्व विमा कंपनीव्दारे बँकेकडे हस्तांतरित केले जाऊ शकते, विमाधारक सदस्याच्या बचत खात्यातून देय  तारखेला किंवा त्यापूर्वी प्रीमियम डेबिट करून निर्धारित वेळेत विमा कंपनीला पाठवला गेला नाही तर अशा परिस्थितीत विमा दावा नाकारला जाणार नाही.  

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत प्राप्त दावे

केंद्र सरकारने सामान्य जनतेसाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत किफायतशीर प्रीमियम भरून कोणत्याही कारणांनी मृत्यू झाल्यास दोन लाखाचे विमा संरक्षण मिळविता येते, त्याअनुषंगाने सन 2020-21 मध्ये या योजनेंतर्गत केंद्र शासनाने 2,34,905 मृत्यू दावे स्वीकारले आहेत, यासाठी मृतांच्या कुटुंबियांना 4698.10 कोटी रुपये देण्यात आले आहे. हि रक्कम गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त, आहे हि माहिती आरटीआय कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळविली आहे, या योजनेंतर्गत 2020 ते 21 या वर्षात 2,50,351 मृत्यू दावे प्राप्त झाले होते, त्यापैकी 13,100 मृत्यू दावे बरखास्त करण्यात आले आहेत. आणि इतर 2,346 दाव्या संबंधित विचार करण्यात येत आहे.
 

PMJJBY मागील पाच वर्षातील मंजूर मृत्यू दावे

  • PMJJBY योजनेंतर्गत मागील पाच वर्षातील मंजूर मृत्यू दावे आणि त्या संबंधित भुगतान केलेली धनराशी खालीलप्रमाणे आहेत.
वर्षमंजूर दावेभुगतान धनराशी
2016–17 59,118 1,182.36 करोड रुपये
2017-18 89,708 1,794.16 करोड रुपये
2018-19 1,35,2122,704.24 करोड रुपये
2019-20 1,78,189 3,563.78 करोड रुपये
020-21 2,34,9054698.10 करोड रुपये

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत लाभ

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 हि एक केंद्र शासनाकडून राबविलीजाणारी मुदत विमा योजना आहे या योजनेंतर्गत नोंदणी करून 436/- रुपये सारख्या अल्प प्रीमियमवर समाजातील कोणत्याही स्तरावरील
    नागरिक या योजनेचा लाभ मिळवू शकतात.
  • या योजनेंतर्गत विमा धारकाचा कोणत्याही कारणांनी मृत्यू झाल्यास त्यांनी नामनिर्देशित कुटुंबातील व्यक्तीला 2 लाख रुपये दिले जातात.
  • पीएम जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देशातील सर्व 18 ते 50 वर्षाचे नागरिक मिळवू शकतात.
  • PMJJBY या योजनेचा ज्या नागरिकांना लाभ मिळवायचा आहे त्यांना या योजनेच्या अंतर्गत अर्ज करणे आवश्यक आहे. योजनेमध्ये नोंदणी झाल्यावर 436/- रुपये वार्षिक हप्ता भरून लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे सदस्य होण्यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार सुलभ पद्धतीने स्वतःच्या मोबाईल किंवा कॉम्पुटरव्दारा अर्ज करू शकतो.
  • या योजनेच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीने विमा योजना सोडल्यानंतर तो व्यक्ती पुन्हा या योजनेमध्ये नवीन नोंदणी करून सहभागी होऊ शकतो यासाठी त्याला संपूर्ण वार्षिक हप्ता भरून त्याच्या चांगल्या आरोग्याचे घोषणापत्र सादर करावे लागेल.
  • कोविड-19 सारख्या जागतिक महामारीच्या कालावधीत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना देशातील सर्व वर्गातील नागरिकांसाठी अत्यंत मोलाची आणि महत्वाची ठरत आहे.
  • या मुदत विमा योजनेची सरकारव्दारा कार्यपद्धती अत्यंत सुलभ ठेवण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला नोंदणीसाठी एक बँक बचत खाते असणे आवश्यक आहे ज्याच्या मधून विमा प्रीमियम सुलभ पद्धतीने ऑटो-डेबिटव्दारे दरवर्षी कापण्यात येतो.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 योजनेंतर्गत दावा प्रक्रिया सुद्धा सोपी आणि सुलभ ठेवण्यात आली आहे, PMJJBY योजनेचा क्लेम करण्यासाठी, विमाधारकाचे ज्या बँकेत विमा खाते आहे त्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधून, यासाठी विमाधारकाचे डेथ सर्टिफिकेट आणि क्लेम फॉर्म जमा करावा लागेल, यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळणारी विम्याची रक्कम नामनिर्देशित व्यक्तीच्या बँक खात्यात जमा केली जाते.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना संबंधित मुख्य तथ्य

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे सभासद होण्यासाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी व्यत्क्तीची वयोमर्यादा 18 वर्ष ते 50 वर्षाच्या दरम्यान असावी
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 यामध्ये सहभागी होण्यासाठी, हि पॉलिसी खरीदण्यासाठी नागरिकांना कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही
  • PMJJBY हि एक केंद्र सरकार कडून मदत विमा पॉलिसी योजना आहे यामध्ये मॅच्युरीटी बेनिफिट किंवा सरेंडर व्हॅल्यु असे विमा संबंधित प्रकार यामध्ये नाही, हि एक शासनाकडून नागरिकांना अडचणीच्या वेळेस मदत किंवा आर्थिक सहाय्य म्हणून मदतीची विमा पॉलिसी आहे.
  • हि योजना एक मुदत विमा योजना आहे त्यामुळे या विमा योजना पॉलिसीला दरवर्षी  नूतनीकरणाची आवश्यकता आहे, दरवर्षी नुतनीकरण करावे लागेल.
  • या योजनेंतर्गत विमाधारकाला मृत्यू पश्चात 200,000/- रुपये आर्थिक मदत दिली जाते.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा एनरोलमेंट पिरिएड 1 जून ते 31 मे पर्यंत आहे.
  • या योजनेंतर्गत विमा पोलिसी सुरु झाल्यापासून 45 दिवसांच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास दावा देय असणार नाही. 

PMJJBY अंतर्गत करोना महामारी मध्ये विमा संरक्षण

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 एक प्रकारची वार्षिक संरक्षण विमा योजना आहे, या योजनेला वार्षिक नूतनीकरणाची आवश्यकता असते, या योजनेच्या अंतर्गत वार्षिक विमा संरक्षण कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत असतो. या योजनेसाठी एक बँक बचत खाता असणे आवश्यक आहे आणि खातेधारकाला या योजनेसाठी ऑटो-डेबिट सुविधेसाठी स्वतःची सहमती देणे आवश्यक आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत विमा करणाऱ्या कुटुंबांना या करोना महामारीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. करोना संसर्गाच्या आजारामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत काही अटींच्या बरोबर 2 लाख रुपये विमा रक्कम प्रदान केल्या जात आहे.

या योजनेंतर्गत नोंदणी केल्यानंतर विमाधारकाला पुन्हा दरवर्षी अर्ज करण्याची गरज नसते, दरवर्षी विमाधारकाच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम कापली जाते आणि विमा पॉलिसीचे नुतनीकरण होते, या योजनेमध्ये नावनोंदणीच्या पहिल्या 45 दिवसापर्यंत नवीन विमाधारक दावा करू शकत नाही, यामध्ये 45 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच दावा केला जाऊ शकतो, या योजनेमध्ये नावनोंदणीनंतर पहल्या 45 दिवसात विमा कंपनीकडून कोणताही दावा निकाली काढला जात नाही, परंतु विमाधारकाचा मृत्यू अपघातामध्ये झाला असेल तर अशा प्रकरणात विमा संरक्षणाचा लाभ दिला जातो.  

PMJJBY अंतर्गत डेथ क्लेम 1134 कोटी रुपये

केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना कमीत कमी प्रीमियम मध्ये विमासंरक्षण उपलब्ध करून दिल्या जात आहे. यासाठी नागरिकांना अत्यंत कमी 436/- रुपयांचा प्रीमियम दरवर्षी द्यावा लागतो. या योजनेंतर्गत नोंदणीकृत विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला 200,000 रुपये आर्थिक सहाय्यता दिली जाते. सन 2020 मध्ये या योजनेच्या अंतर्गत शासनाव्दारा 1134 करोड रुपये डेथ क्लेमसाठी देण्यात आले, हे दावे 56716 नागरिकांना देण्यात आले, या सर्व नागरिकांना या विमा योजनेंतर्गत दोन-दोन लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. माहिती नुसार करोना महामारीमुळे मुदत विमा दाव्यांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे, माहिती नुसार सर्व मृत्यू दाव्यांपैकी जवळपास 50 टक्के मृत्यू दावे हे करोना महामारीमुळे झाले आहेत. 
      

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आवश्यक कागदपत्रे

या योजनेच्या अंतर्गत योजनेचा लाभ मिळविण्याकरिता योजनेचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे, योजनेसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक असतील.

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • बचत बँक खाते क्रमांक
  • ओळखपत्र
  • अर्जदाराचा मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

                पोस्ट ऑफिस दुर्घटना बिमा योजना 2022 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया

देशातील ज्या नागरिकांना पीएम जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यांनी या योजनेच्या अंतर्गत अर्ज करणे आवश्यक आहे, या योजनेमध्ये सदस्य होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे राहील.

  • योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 योजनेच्या अधिकृत वेबसाईट जन सुरक्षा योजना या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

  • या वेबसाईटवर भेट दिल्यावर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल या होम पेजवर तुम्हाला ‘’फॉर्म्स’’ हा पर्याय दिसेल, या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

  • यानंतर या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर तीन पर्याय उघडतील, यानंतर तुम्हाला या तीन पर्यायामधून ‘’प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, या नवीन पेजवर तुम्हाला अर्ज आणि दावाफॉर्म हे पर्याय दिसतील, आता तुम्हाला ‘’अर्ज’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

  • यानंतर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हिंदी किंवा इंग्रजी किंवा मराठी तुमच्या गरजेनुसार भाषा निवडून तुम्ही PMJJBY अर्जाचा PDF डाऊनलोड करू शकतात.
  • यानंतर अर्ज डाऊनलोड केल्यावर तुम्हाला अर्जाची प्रिंट काढावी लागेल

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

  • आता तुम्हाला अर्जाच्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल, याप्रमाणे बँकेचे नाव किंवा विमा कंपनीचे नाव, खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, नॉमिनीचे नाव इत्यादी माहिती
  • अशा प्रकारे संपूर्ण माहिती अचूक भरल्यानंतर, जिथे तुमचे बचत खाते आहे त्या बँकेत जाऊन बँक अधिकाऱ्या कडे अर्ज फॉर्म सबमिट करावा लागेल,
  • अर्जदाराने त्याच्या विमा खात्याशी संलग्न बँक खात्यामध्ये विमा प्रीमियमचा हप्ता भरण्यासाठी पुरेशी रक्कम असल्याची खात्री करून घ्यावी.
  • त्यानंतर तुम्हाला विमा प्रीमियम ऑटो-डेबिट करण्याच्या पर्यायासाठी एक संमतीपत्र देणे आवश्यक आहे त्याचबरोबर योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी संमती पत्र द्यावे लागेल, हे संमतीपत्र विधिवत भरलेल्या विमा अर्जा सोबत जोडून सबमिट करावे लागेल.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी सहमती घोषणा फॉर्म अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकतो.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना दावा प्रक्रिया

  • PMJJBY अंतर्गत विमाधारकाच्या मृत्यू नंतर विमाच्या रकमेसाठी दावा करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करून डेथक्लेम करू शकतो.
  • यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट जन सुरक्षा योजना या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  • या वेबसाईटवर भेट दिल्यावर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल या होम पेजवर तुम्हाला ‘’फॉर्म्स’’ हा पर्याय दिसेल, या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • यानंतर या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर तीन पर्याय उघडतील, यानंतर तुम्हाला या तीन पर्यायामधून ‘’प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, या नवीन पेजवर तुम्हाला अर्ज आणि दावा फॉर्म हे पर्याय दिसतील, आता तुम्हाला ‘’दावा फॉर्म’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हिंदी किंवा इंग्रजी किंवा मराठी तुमच्या गरजेनुसार भाषा निवडून तुम्ही PMJJBY ‘’क्लेम फॉर्म’’ PDF डाऊनलोड करू शकतात.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

  • यानंतर हा क्लेम फॉर्म डाऊनलोड केल्यावर, फॉर्मची प्रिंट काढावी लागेल त्यानंतर क्लेम फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

  • यामध्ये महत्वाचे म्हणजे हा क्लेम फॉर्म नॉमिनीव्दारेच भरला गेला पाहिजे, अर्जदार हा क्लेम फॉर्म बँकेतून किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकतात.
  • यानंतर अर्जदाराला बँकेतून डिस्चार्ज स्लीप मिळवावी लागेल आणि डिस्चार्ज स्लीप बरोबर विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र आणि रद्द केलेल्या चेकची प्रत क्लेम फॉर्म सोबत जोडून बँकेमध्ये जमा करावा लागेल.
  • या प्रकारे विम्याच्या रकमेसाठी दावा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

PMJJBY फॉर्म्स डाऊनलोड कसे करावे

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर जावे लागेल, यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल या होम पेजवर तुम्हाला ‘’फॉर्म्स’’ हा पर्याय दिसेल.
  • या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल, यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला ‘’प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’’ हा विकल्प दिसेल, त्यावर क्लिक करा.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

  • आता तुमच्यासमोर ‘’अप्लिकेशन फॉर्म्स’’ आणि ‘’क्लेम फॉर्म्स’’ हे दोन पर्याय दिसेल, तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार पर्याय निवडून त्यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला फॉर्म्स डाऊनलोड करावा लागेल, या प्रकारे तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म्स डाऊनलोड करू शकतात.  

PMJJBY अंतर्गत नियम पाहण्याची प्रक्रिया

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल
  • या होम पेजवर तुम्हाला नियम हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

  • यानंतर तुमच्यासमोर सर्व नियम आणि सूचनांची यादी उघडेल, तुम्हाला तुमच्या गरजेनुसार विकल्प निवडून त्यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला आवश्यक असलेली संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून येईल.

PMJJBY जिल्ह्या प्रमाणे टोल-फ्री नंबर डाऊनलोड करणे

  • यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट जन सुरक्षा योजना या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  • या वेबसाईटवर भेट दिल्यावर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल या होम पेजवर तुम्हाला ‘’संपर्क’’ हा पर्याय दिसेल, या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

  • या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, या नवीन पेजवर तुम्हाला ‘’राज्य निहाय टोल-फ्री PDF’’ हा पर्याय दिसेल आता तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्ही हे PDF डाऊनलोड करून राज्याप्रमाणे टोल-फ्री नंबर पाहू शकता.

PMJJBY अंतर्गत परफॉमेंस कसा पाहावा ?

  • यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट जन सुरक्षा योजना या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  • या वेबसाईटवर भेट दिल्यावर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल, या होम पेजवर तुम्हाला ‘‘परफॉमेंस’’ हा पर्याय दिसेल, या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, या नवीन पेजवर तुम्हाला  कामगिरी संबंधित संपूर्ण माहिती जाणून घायला मिळेल. 

योजना हेल्पलाईन क्रमांक

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हेल्पलाईन क्रमांक खालीलप्रमाणे आहेत

PMJJBY योजना अर्ज PDFClick Here
PMJJBY अधिकृत वेबसाईट Click Here
PMJJBY क्लेम फॉर्म PDF Click Here
PMJJBY घोषणा फॉर्म PDF Click Here
PMJJBY योजना नियम PDF Click Here
PMJJBY टोल-फ्री नंबर Click Here
महाराष्ट्र सरकारी योजना Click Here

आजच्या जलदगतीने धावणाऱ्या जीवनमानात जीवनाच्या सुरक्षे संबंधित भरोसा देता येत नाही, त्यामुळे माणसाची परिवारा संबंधित आर्थिक चिंता महत्वपूर्ण ठरते, आणि दुर्दैवाने जर घरातील मुख्य कमावत्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला तर त्याच्या परिवाराला अनेक आर्थिक समस्यांचा आणि अडचणींचा सामना करावा लागतो, साधारण आणि सामान्य गरीब नागरिकांच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र शासनाने हि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची संपूर्ण देशात अंमलबजावणी सन 2015 पासून सूर केली आहे. वाचक मित्रहो, या लेखात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 संबंधित संपूर्ण महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही आपल्याला योजने संबंधित आणखी इतर काही माहिती जाणून घायची असल्यास वरील प्रमाणे टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती जाणून घेऊ शकता. आपल्याला या लेखातील माहिती उपयुक्त वाटली असल्यास आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून अवश्य कळवा.   

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना FAQ

Q. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना काय आहे ?

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024 एक मुदत संरक्षण विमा योजना आहे ज्या अंतर्गत विमाधारकाला कोणत्याही कारणांनी मृत्यू झाल्यास तर त्याचा कायदेशीर वारसदाराला 2 लाख विमा संरक्षण देण्यात येते, यासाठी वार्षिक 436/- रुपये प्रीमियम विमाधारकाच्या बचत खात्यातून ऑटो-डेबिट माध्यमातून कापला जातो. या विमा पॅलिसीला दरवर्षी नूतनीकरणाची आवश्यकता असते.

Q. PMJJBY अंतर्गत किती लाभ मिळतो आणि त्यासाठी किती हप्ता भरावा लागतो ?

या योजनेंतर्गत कोणत्याही कारणांनी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृत्यू पश्चात त्याच्या कायदेशीर नॉमिनीला दोन लाख रुपये सरकारकडून देण्यात येते, यासाठी विमाधारकाला 436/- रुपये वार्षिक हप्ता भरावा लगतो.

Q. PMJJBY मध्ये सदस्य होण्यासाठी पात्रता काय आहे ?

या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी देशातील कोणताही 18 ते 50 वयोगटातील नागरिक पात्र आहे

Q. 2016-17 पासून नवीन सदस्यांसाठी या योजनेत काय बदल करण्यात आले आहे ?

या योजनेंतर्गत नवीन नोंदणी झालेल्या विमाधारकांना, नवीन नावनोंदणी झाल्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कोणताही लाभ देय असणार नाही, परंतु विमाधारकाचा मृत्यू अपघातामध्ये झाला असल्यास अशा प्रकरणामध्ये विमा संरक्षण देण्यात येते.

Q. हि पॉलिसी एकदा सोडल्यानंतर पुन्हा पॉलिसी मध्ये सामील होता येते काय ?

होय, एखाद्या विमाधारकाने हि पोलिसी सोडल्यानंतर, विमाधारक पुन्हा या विमा योजनेत भविष्यात सामील होऊ शकतो, यासाठी त्याला वार्षिक प्रीमियम भरून त्याबरोबर चांगल्या आरोग्याचे घोषणापत्र देणे आवश्यक राहील.

Leave a Comment