महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी : Shiv Bhojan Thali Yojana

Shiv Bhojan Yojana Maharashtra 2024 | शिवभोजन थाळी योजना महाराष्ट्र | सरकारी योजना | महाराष्ट्र सरकारी योजना | महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 | शिवभोजन योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन

महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी: केंद्र सरकार तसेच राज्य शासनाकडून नेहमीच राज्यातील गोरगरीब नागरिक, वंचित, आदिवासी या सारख्या नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात जेणेकरून या लोकांना सामाजिक सुरक्षा मिळावी त्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, महाराष्ट्र शासनाने आवास योजना, निराधार पेन्शन योजना, या सारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून या गरीब आणि वंचित नागरिकांना सहकार्य तसेच आर्थिक मदत आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच असंघटी कामगार, शेतकरी, नोंदणीकृत मजूर, ग्रामीण भागातील शेत मजूर, ग्रामीण महिला बचत गट या सारख्या समाजातील घटकांसाठी सुद्धा शासनाव्दारे विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

त्यामुळे या आर्थिक मदतीमुळे या घटकांच्या जीवनमानात झपाट्याने बदल घडून येत आहे. यावेळी शासनाने राज्यातील गरीब, वंचित, गरजू कष्टकरी लोकांसाठी महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी सुरु केली आहे, जेणेकरून अशा गरीब व कष्टकरी नागरिकांना अत्यंत कमी दरात एकवेळचे पोटभर जेवण मिळाव, वाचक मित्रहो, या लेखामध्ये आपण शासनाच्या शिव भोजन योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी 

महाराष्ट्र शासनाने सन 2020 मध्ये महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी राबविण्याचे सुरु केले आहे, या योजनेच्या माध्यमातून गरीब, वंचित आणि कष्टकरी लोकांना अत्यंत कमी दरात म्हणजे दहा रुपयात पोटभर जेवण देण्यात येत आहे. राज्यातील शहरी भागात अथवा ग्रामीण भागात समाजात आजही एक वर्ग असा आहे कि ज्यांना एक वेळचे जेवण मिळवणे कठीण जाते कारण त्यांच्याकडे सामान्य रोजगार नसतो, असे नागरिक ग्रामीण भागातून शहरांमध्ये रोजगार शोधण्यासाठी जातात, परंतु शहरांमध्ये स्वस्त दरात जेवण उपलब्ध होणे कठीण जाते, त्यामुळे या नागरिकांसमोर जेवणाची समस्या निर्माण होते.

महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी
महाराष्ट्र शिवभोजन योजना

त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील गरीब लोकांना, विद्यार्थ्यांना कामाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते, शहरात आल्यानंतर या लोकांना स्वस्त दरात जेवण कोठे मिळेल याचा शोध घ्यावा लागतो, त्यामुळे या सर्व नागरिकांची गरज ओळखून त्यांच्या समस्येचे निवारण करण्याच्या उद्देशाने तसेच या नागरिकांना एकवेळचे पोटभर जेवण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने शिव भोजन योजनेची सुरुवात केली आहे. शासनाच्या या महत्वपूर्ण योजनेमुळे समाजातील गरीब आणि कष्टकरी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी अंतर्गत 10/- रुपये प्रती थाळी याप्रमाणे भोजन उपलब्ध करून देण्यात येईल. 

           राष्ट्रीय वयोश्री योजना 

महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 वैशिष्ट्ये 

राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात पोटभर जेवण उपलब्ध करून देण्यासाठी शिव भोजन योजनेचा शासनाव्दारे 26 जानेवारी 2020 मध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला, महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब, मजूर, शेतकरी आणि गरीब विद्यार्थी, नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी हि अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत सुरु करण्यात आली.

महाराष्ट्र शिवभोजन योजना 2022

 • महाराष्ट्र राज्यात गोरगरीबांना स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालायातून भोजन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी सुरु करण्यात आली.
 • महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या भोजनालयात, 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मृद भात आणि 1 वाटी वरण, असे जेवण समाविष्ट असलेली थाळी याप्रमाणे भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
 • या योजनेच्या अंतर्गत भोजनालय चालविण्यासाठी सध्याच्या स्थितीत सुरु असलेल्या खानावळ, भोजनालय, NGO, महिला बचत गट, रेस्टॉरंट, किंवा मेस यापैकी हि योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालायाची समितीव्दारे निवड करण्यात येईल.
 • अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माहितीनुसार कोविड-19 महामारीच्या कालावधीत स्थलांतरित कामगार, मजूर वर्ग, शेतकरी आणि बेघर नागरिक यांनी शिव भोजन थाळीचा मोठ्याप्रमाणात लाभ घेतला, शिव भोजन थाळीसाठी राज्य शासनाला एक थाळीला शहरीभागात 50/- रुपये आणि ग्रामीण भागात 35/- रुपये पडतात. आणि गरीब नागरिकांना शिव भोजन थाळी 10/- रुपयात उपलब्ध केली जाते. सरकारकडून उर्वरित रक्कम अनुदान स्वरुपात दिल्या जाते.
 • शिव भोजना योजनेच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी आता संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरु करण्यात येत आहे, या संदर्भात शासनाने निर्णय जारी केला आहे, राज्यातील 18 हजार ठिकाणी तसेच नागपूरसह संपूर्ण राज्यात शिव भोजन थाळी योजना सुरु करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
 • या योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील बसस्थानके, शहरातील हॉस्पिटल्स, शासकीय कार्यालये, गजबजलेली ठिकाणे, बाजारपेठा, तसेच ज्या-ज्या ठिकाणी गरीब आणि मजूर वर्गाची वर्दळ जास्त प्रमाणात असते अशा ठकाणी शिव भोजन थाळीची विक्री केल्या जाईल

                      महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता 

Shiv Bhojan Yojana 2024 Key Highlights

योजना नावमहाराष्ट्र शिवभोजन योजना
व्दारा सुरु महाराष्ट्र शासन
योजना सुरु करण्याची तारीख 26 जानेवारी 2020
लाभार्थी राज्याचे नागरिक
राज्य महाराष्ट्र
उद्देश्य कमीत कमी दारात भोजन उपलब्ध करून देणे
विभाग अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी योजनेचे स्वरूप

शिव भोजन योजनेच्या अंतर्गत एका शिव भोजन थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतीथाळी 50/- रुपये आणि ग्रामीण भागात 35/- रुपये एवढी असेल, या योजनेमध्ये समितीने पात्र ठरविलेल्या खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यांना प्रतीग्राहकांकडून प्राप्त झालेल्या 10/- रुपये रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या देण्यात येईल.

महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी राबविण्यासाठी सक्षम खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, रेस्टॉरंट अथवा मेस यांची निवड करण्यासाठी पुढील प्रमाणे समिती स्थापन करण्यात येईल.

समितीमहानगरपालिका स्तरावरजिल्हा स्तरावरतालुका स्तरावर
जिल्हाधिकारी अध्यक्ष अध्यक्ष
महानगरपालिका आयुक्त सदस्य
जिल्हा पुरवठा अधिकारी /अन्नधान्य वितरण अधिकारी सदस्य सचिव सदस्य सचिव
मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य
तहसीलदार अध्यक्ष
गट विकास अधिकारी सदस्य
नगरपालिका मुख्याधिकारी सदस्य सचिव

शिवभोजन योजना राबविण्याच्या अटी आणि नियम

 • या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रयोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्हाच्या मुख्यालयी व महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येईल.
 • हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल. हि भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहील
 • सदर भोजनालयात दुपारी 12 ते 2 या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची असेल. यासाठी भोजनालय चालवण्यासाठी सदर मालकाकडे स्वतःची पर्याप्त जागा असावी.
 • या भोजनालयात एका वेळी किमान 25 व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल, एका भोजनालयात किमान 75 आणि कमाल 150 थाळी भोजन उपलब्ध होईल.
 • सदर भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल.
 • शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी हि योजना राबविण्यात येईल तेथील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर भोजनालयात सवलतीच्या दराने जेवण्यास सक्त मनाई असेल.
 • कोणत्याही परिस्थितीत शिळे अथवा खराब झालेले अन्न ग्राहकांना पुरविण्यात येणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील, कोणत्याही ग्राहकास सदर अन्नाचे सेवन केल्यामुळे विषबाधा होणार नाही याची दक्षता भोजनालय चालकाने घ्यावी.
 • प्रत्येक भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी करून घेऊन त्या प्रशासनाने दिलेले प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावण्याची जबाबदारी भोजनालय चालकाची राहील.

सोलर रूफटॉप योजना

महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी: उद्देश

महाराष्ट्र सरकारने गरीब नागरिकांचा शिव भोजन योजनेस प्रतिसाद पाहून राज्यात अनेक ठिकाणी शिव भोजन केंद्रे / भोजनालय सुरु करण्यात आली आहे, या शिव भोजन केंद्रांना गरीब नागरिकांचा मोठ्याप्रमाणात प्रतिसाद पाहून शासनाने शिव भोजन केंद्रांच्या संख्येत टप्प्या टप्प्याने वाढ करण्याचे ठरविले आहे, हि महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी चालविण्यासाठी राज्य शासन महिला बचत गटांचा प्राधान्याने विचार करत आहे. या पाठीमागे शासनाचा उद्देश आहे महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा त्याचबरोबर आर्थिक सुरक्षा मिळावी. राज्यामधील कोणीही गरीब नागरिक, बेघर, मजूर, गरीब विद्यार्थी, कष्टकरी प्रत्येकाला शिव भोजन थाळी उपलब्ध व्हावी, यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रत्येक शिव भोजन केंद्रांवर शिव भोजन थाळीचा लाभ घेतल्यानंतर लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर नमूद केल्या जातो यामुळे योग्य लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होत आहे.

शिव भोजन योजनेमुळे तळागाळातील गरीब नागरिकांना अत्यंत अल्प दरात पोटभर जेवण मिळण्याची हमी मिळत आहे यामुळे या घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे, कोविड -19 च्या महामारीच्या काळात शासनाने शिव भोजन केंद्रे सुरु ठेवली होती त्यावेळेला संपूर्ण राज्यात टाळेबंदी होती, तसेच त्या कालावधीत राज्य शासनाने शिव भोजन थाळीचे मोफत वितरण केले होते, करोना महामारीच्या कालावधीत महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा आधार देणारी ठरली आहे. शिव भोजन थाळी योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात देण्यात येत असलेल्या शिव भोजन थाळी मध्ये पाचपट वाढ करण्यात आली आहे. तसेच शिव भोजनाच्या वेळेत शुद्धा वाढ करण्यात आली असून सकाळी 11 ते 3 भोजनाची वेळ ठेवण्यात आली आहे. राज्यामध्ये सुरु असलेली शिव भोजन थाळी योजना गरीब व गरजू नागरिकांपर्यंत अधिकाधिक पोहचवावी असा शासनाचा उद्देश आहे.

                   जननी सुरक्षा योजना 

शिवभोजन थाळी योजनेची करोना कालावधीत उपयोगिता

महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब, वंचित, बेघर नागरिक, शेतकरी, गरीब विद्यार्थी या सर्व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी योजना हि अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना, शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून 26 जानेवारी 2020 मध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील कष्टकरी गोरगरीब, बेघर, वंचित नागरिक यांच्यासाठी दहा रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली, जागतिक स्तरावर करोना विषाणूचा प्रदुर्भाव तसेच देशात आणि महाराष्ट्र राज्यातही करोना महामारीच्या कालावधीत करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील कष्टकरी लोक, असंघटित कामगार, स्थलांतरित कामगार, बाहेर गावावरून आलेले विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर नागरिक, इत्यादी नागरिकांचे हाल व उपासमार होऊ नये म्हणून शिवभोजन थाळी योजना विस्तारित करण्यात येऊन, तालुकास्तरावर सुद्धा शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली.

महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी

तसेच जिल्हास्तरावर शिवभोजन थाळ्यांच्या संख्येत वाढ करून ती पाचपट करण्यात आली त्याचबरोबर शिवभोजनाच्या वेळेत वाढ करून सकाळी 11 ते 3 पर्यंत भोजन उपलब्ध करून देण्यात आले, राज्यातील करोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता राज्यातील गोरगरीब, रस्त्यावरील बेघर नागरिक, बाहेरगावातील विद्यार्थी, कष्टकरी नागरिक, मजूर वर्ग यांची हाल – अपेष्टा होऊ नये त्यांची उपासमार होऊ नये याकरिता शासनाने अत्यंत अल्प सवलतीच्या दरात केवळ 5 रुपयांमध्ये या नागरिकांना भोजन देण्याचा निर्णय मार्च 2020 मध्ये घेतला होता. मात्र पुढे वाढत्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते, त्यावेळेस राज्य शासनाकडून हि महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी गरीब नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती.

महाराष्ट्र शासनाच्या या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोक उपयोगी शिवभोजन योजनेमुळे करोना विषाणू प्रदुर्भावाच्या कालावधीत जे नागरिक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नव्हते, असे बेघर लोक, मजूर वर्ग, स्थलांतरित कामगार, गरीब विद्यार्थी उपाशी राहिले नाही, या नागरिकांसाठी हि योजना जीवनदायनी योजना ठरलेली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत हे नागरिक उपाशी राहणार नाही याची शासनाने दक्षता घेतली होती, करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत अल्प दरात महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी उपलब्ध करून देऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांना शासनाच्या शिवभोजन योजनेमुळे मोठा आधार मिळाला आहे.

आधिकारिक वेबसाईटइथे क्लिक करा
शासन GR PDF इथे क्लिक करा
दक्षता परिपत्रक इथे क्लिक करा
शिवभोजन APP इथे क्लिक करा
महाराष्ट्र सरकारी योजना इथे क्लिक करा

शिवभोजन थाळी योजना महाराष्ट्र FAQ

Q. शिवभोजन योजना काय आहे ?

राज्यातील गोरगरीब, असंघटित कामगार, स्थलांतरित मजूर, रस्त्यावरील बेघर नागरिक, बाहेर गावातील विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत उपाशी राहणार नाही, तसेच त्यांना अत्यंत अल्प दरात (10/- रुपये) पोटभर जेवण मिळावे हा महत्त्वाकांक्षी उद्देश ठेऊन महाराष्ट्र शासनाने हि महाराष्ट्र शिवभोजन योजना 2024 माहिती मराठी सुरु केली आहे.

Q. जवळचे शिवभोजन केंद्र कसे शोधावे ?

जवळचे शिवभोजन केंद्र शोधण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गूगल प्ले स्टोर वर जाऊन या योजनेची अप्प्लीकेशन (शिवभोजन APP) डाऊनलोड करावी लागेल, यानंतर तुम्ही यामध्ये तुमच्या जवळचे किंवा जिल्हेवार शिवभोजन केंद्राचा शोध घेऊ शकतात.

Q. शिव भोजन थाळीची किंमत किती आहे ?

शिव भोजन योजनेच्या अंतर्गत एका शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतीथाळी 50/- रुपये आणि ग्रामीण भागात 35/- रुपये एवढी असेल, परंतु नागरिकांसाठी हि शिवभोजन थाळी 10/- रुपये या अल्प दरात शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जात आहे.

Q. शिव भोजन योजनेचा उद्देश काय आहे ?

राज्यातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी जे स्वतःच्या भोजनाची सोय करू शकत नाही, अशा नागरिकांना अत्यंत अल्प दरात पोटभर भोजन सहज आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे हा शासनाचा उद्देश आहे. 

Leave a Comment