महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट: अन्नधान्य खरेदी करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना रेशन कार्ड हे भारतातील राज्य सरकारांद्वारे जारी केलेले अधिकृत दस्तऐवज आहेत. ते बर्याच भारतीयांसाठी एक सामान्य ओळख म्हणून देखील काम करते, NFSA अंतर्गत, भारतातील सर्व राज्य सरकारांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून अनुदानित अन्नधान्य खरेदी करण्यासाठी पात्र असलेल्या कुटुंबांची ओळख करून त्यांना शिधापत्रिका उपलब्ध करून द्याव्या लागतात. NFSA अंतर्गत दोन प्रकारचे शिधापत्रिका आहेत, वन नेशन, वन रेशन कार्ड” ही आधार -आधारित राष्ट्रीय शिधापत्रिका पोर्टेबिलिटी योजना आहे, जी भारतातील अंतर्गत स्थलांतर करणाऱ्या नागरिकांसोबत सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करते.
या रेशनकार्ड अंतर्गत लाभार्थी भारतात कोठेही अनुदानित अन्न खरेदी करू शकतात. उदाहरणार्थ, एक स्थलांतरित कामगार त्याच्या स्थलांतरित गंतव्य स्थानावर पोहचल्यावर त्याचा वाट्याचे अन्नधान्य मिळवू शकतो तर त्याचे कुटुंब त्यांचा वाटा त्यांच्या स्त्रोत/मूळ निवासस्थानावर मिळवू शकते. आता महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट शी संबंधित सर्व सुविधा महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. वाचक मित्रहो आज आपण महाराष्ट्र रेशनकार्ड संबंधित सर्व माहिती जसे कि महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट काय आहे, रेशनकार्ड सूची पाहण्याची प्रक्रिया, प्रक्रियेचे फायदे, पात्रता आणि वैशिष्ट्ये काय आहे, हि सर्व माहिती आपण पाहणार आहोत, तरी हि महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट संबंधित माहिती पूर्ण वाचावी.
महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2024 माहिती मराठी
महाराष्ट्र अन्न विभागाने महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट ऑनलाइन जरी केली आहे, हि सर्व सुविधा महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी करण्यात आली आहे, त्यामुळे आता राज्यातील नागरीक घरबसल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून भेट देऊन रेशनकार्ड मधील आपले नाव तपासू शकता. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ज्या नागरिकांनी रेशनकार्डसाठी अर्ज दाखल केला आहे, त्यांना आता कुठेही किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही कारण, हि सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.
महाराष्ट्र शासनाने शिधापत्रिका संबंधित संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन केल्यामुळे दरवर्षी प्रमाणे रेशनकार्ड मधील नागरिकांची नावे वयानुसार अपडेट्स केली जातात, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र शासनाने रेशनकार्ड यादीतील लाभार्थ्यांची नावे अपडेट केली आहे. हि अद्यावत रेशनकार्ड सूची ऑनलाइन पाहण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. राज्यातील नागरिक शासनाची अधिकृत वेबसाईट mahafood.gov.in वर जाऊन आपली नावे तपासू शकतील.
महाराष्ट्र रेशन कार्ड माहिती
मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये रेशनकार्ड असते तसेच आपल्या भारत देशा मध्ये प्रत्येक नागरिकाला रेशन कार्ड असणे हा देखील त्याचा एक मुख्य अधिकार आहे. यामध्ये भारतात रेशनकार्ड किती प्रकारचे आहे हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे
- पिवळे रेशनकार्ड (Yellow ration card):- पिवळे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबांना कमी किंमती मध्ये खाद्यतेल गहू तांदूळ हे मिळत असते. तसेच पिवळे रेशन कार्ड हे दारिद्र्यरेषेखालील असणाऱ्या कुटुंबांना मिळत असते.
- केसरी रेशनकार्ड:- केसरी रेशनकार्ड हे पंधरा हजारा पर्यंत तसेच पंधरा हजारांच्या वर वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना दिले जाते. तसेच एक लाखाहून कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना केसरी रेशनकार्ड दिले जाते.
- बीपीएल कार्ड (BPL card):- बीपीएल रेशनकार्ड हे दारिद्र रेषेखालील असणाऱ्या कुटुंबांना दिले जाते. ज्या कुटुंबाकडे जमीन नाही त्या कुटुंबांना हे रेशनकार्ड दिले जाते. बीपीएल रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबांना प्रतिमहा 35 किलो तांदूळ हा दोन रुपये दराने दिला जातो. तसेच बीपीएल कार्ड असणाऱ्या कुटुंबांना गहू, तांदूळ, खाद्यतेल, मीठ, साखर हे देखील कमी किंमती मध्ये, बीपीएल कार्डधारकांना पुरविली जाते. तसेच बँकांमार्फत कर्ज देखील कमी व्याजदरांमध्ये बीपीएल कार्डधारकांना उपलब्ध करून दिल्या जाते.
- पांढरे रेशनकार्ड:- या रेशनकार्डच्या अंतर्गत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक आहे तसेच त्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे, अशा कुटुंबांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते. तसेच त्या कुटुंबाकडे चार हेक्टर पेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली आहे अशा कुटुंबांना पांढरे रेशन कार्ड घेण्यास पात्र असतात.
रेशन कार्ड संबंधित पुढील महत्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे
भारत देशातील कोणत्याही रेशन कार्ड धारकाला तसेच महाराष्ट्र राज्यातील कोणते रेशन कार्ड धारकाला कोणत्याही राज्यांमधून तसेच कोणतेही गावांमधून रेशन घेण्याचा अधिकार आहे. रेशन कार्ड हे स्वतःकडे ठेवण्याचा तसेच रेशन कार्ड रद्द करण्याचा अधिकार हा रेशन दुकानदारांना नाही. रेशन दुकान हे साप्ताहिक सुट्टी वगळता सकाळी चार तास व संध्याकाळी चार तास उघडे असायला हवे. रेशन दुकानांमध्ये सर्वांना स्पष्टपणे वाचता येईल तसेच दिसू शकतील अशा पद्धतीमध्ये फलक लावणे गरजेचे असते, तसेच बंधनकारक सुद्धा देखील असते. या फलका मध्ये दुकानाचा नंबर दुकानाचे नाव तसेच धान्य वाटप हे नमूद करणे आवश्यक असते.
महाराष्ट्र बीपीएल रेशन कार्ड लिस्ट आणि एपीएल रेशनकार्ड लिस्ट माहिती
महाराष्ट्र शासनाने जारी केलेले रेशन कार्ड हे आपल्या ओळखीचा पुरावा तसेच आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचा सुद्धा पुरावा मानला जातो. हा एक राज्य सरकारने आपल्याला दिलेला एक अधिकृत दस्तऐवज आहे, आपल्याला भारत देशामध्ये कायदेशीर कागदपत्रे लागू करण्यासाठी रेशन कार्डचा फायदा होत असतो. रेशन कार्ड हे आपले रहिवासी प्रमाणपत्र म्हणून देखील एक प्रकारे ओळखले जाते. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक राज्याव्दारे नागरिकांना तीन प्रकारचे रेशनकार्ड देण्यात येते, यामध्ये एपीएल रेशनकार्ड, बीपीएल रेशनकार्ड आणि एएवाय रेशनकार्ड हि तीन प्रकारची रेशनकार्ड सरकार व्दारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येते, या रेशनकार्डचे वर्गीकरण असे करण्यात येते यामध्ये राज्यातील जे नागरिक दारिद्र्यरेषे वरील आहे त्यांना एपीएल रेशनकार्ड देण्यात येते, त्याचप्रमाणे राज्यातील जे नागरिक दारिद्र्यरेषेखालील आहे त्यांना बीपीएल रेशनकार्ड उपलब्ध करून देण्यात येते. तसेच राज्यातील जे नागरिक अत्यंत गरीब आहे त्यांच्यासाठी एएवाय हे रेशनकार्ड उपलब्ध करून देण्यात येते,
रेशनकार्डचा उपयोग आपण ओळखीचा पुरावा महणून सुद्धा करतो, जर आपण आधार कार्ड काढले नसेल तर आपण रेशन कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून देखील त्या ठिकाणी जोडू शकतो. रेशन कार्ड हे मुख्यपणे अनुदानामध्ये इंधन आणि खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी वापरण्यात येतात. रेशनकार्ड हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे कारण सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ते अत्यंत महत्वाचे आहे, या रेशनकार्डच्या माध्यमातून राज्यातील सरकार गरीब नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करीत असते. या रेशनकार्ड माध्यमातूनच फक्त गरीब कुटुंबाना रेशन उपलब्ध करून दिल्या जाते.
महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2023 Highlights
योजनेचे नाव | महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2024 |
---|---|
व्दारा सुरु | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | राज्याचे गरीब नागरिक |
अधिकृत वेबसाईट | http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx |
उद्देश्य | राज्यतील गरीब जनतेला किफायती दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणे |
सुरु करण्याची तारीख | दिनांक 1 जून, 1997 |
विभाग | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग |
श्रेणी | रेशनकार्ड यादी |
वर्ष | 2024 |
रेशनकार्ड पाहण्याची पद्धत | ऑनलाइन |
महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2024 नवीन माहिती
रेशन कार्ड हे आपल्याला ठिकठिकाणी उपयोगात पडतं. यामुळे मोफत किंवा कमी किंमतीमध्ये रेशन तर मिळतंच पण त्याचबरोबर याच रेशन कार्डचा वापर सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी होतो, आणि काही वेळा हेच रेशन कार्ड आपण ओळख प्रमाणपत्र (Identity Certificate) म्हणून देखील वापरु शकतो. भारत सरकारच्या किमान सामायिक कार्यक्रमाअंतर्गत दारिद्रयरेषेखालील (गरीब) कुटूंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरविण्याची योजना राज्यात दिनांक 1 जून, 1997 पासून सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत सुरुवातीला गरीब कुटूंबांना प्रति कुटूंब दरमहा 10 किलो अन्नधान्य प्रचलित दराच्या अर्ध्या किंमतीत उपलब्ध करुन दिले जात होते. नंतर धान्याच्या प्रमाणामध्ये दिनांक 1 एप्रिल, 2000 पासून वाढ करुन प्रति कुटूंब दरमहा 20 किलो अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जात होते. त्यानंतर दि. 1 एप्रिल, 2002 पासून दारिद्रयरेषेखालील म्हणजे Yellow (BPL) शिधापत्रिकाधारकांना दरमहा 35 किलो धान्य (गहू व तांदूळ) व केशरी (APL) शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह 15 किलो धान्य (तांदूळ व गहू) देण्यात येत होते.
मागच्या वर्षी पर्यंत संपूर्ण भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू होता आता सद्ध्या परिस्थितीत करोना महामारीचा प्रभाव संपूर्ण राज्यात कमी झालेला आहे, हे तुम्हाला माहीत आहेच, हा संसर्ग रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊनमुळे पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू करण्यात आली होती, या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील गरीब जनतेला 2 रुपये किलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ देण्यात आले होते. महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेलाही शासनाकडून देण्यात येत असलेल्या या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल आणि आपले जीवन उत्तम प्रकारे जगता येईल.
महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2024 पोर्टेबिलिटी उपयोगिता
2018 मध्ये सादर करण्यात आलेले “वन नेशन, वन रेशन कार्ड” ही भारतातील अंतर्गत स्थलांतर करण्याऱ्या नागरिकांसह सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आधार-आधारित राष्ट्रीय रेशनकार्ड पोर्टेबिलिटी योजना आहे. यात लाभार्थीच्या ऑनलाइन पडताळणीसाठी लाभार्थ्यांच्या आधार कार्डाचा वापर करण्यात आला. हि योजना स्थलांतरित कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देशात कोठेही कोणत्याही रास्त भाव दुकानातून PDS लाभ मिळवण्यास सक्षम करते, अशा प्रकारे रेशनकार्डच्या आंतर-राज्य पोर्टेबिलिटीद्वारे अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात येते. मार्च 2021 पर्यंत, 20 राज्ये आधीच या योजनेत सामील झाली आहेत, आणि उर्वरित या योजनेत स्थलांतरित होण्याच्या प्रक्रियेत आहेत.
यापूर्वी “अन्नवितरण पोर्टल” ने राज्यातील ई-पीओएस उपकरणांद्वारे अन्नधान्याच्या वितरणाचा डेटा ठेवला होता, ज्यामुळे स्थलांतरित कामगार किंवा त्याच्या कुटुंबाला त्यांच्या जिल्ह्याबाहेर पण त्यांच्या राज्यात PDS सार्वजनिक वितरण प्रणालीमधून अन्न मिळू शकते. आता, “सार्वजनिक वितरण प्रणालीचे एकात्मिक व्यवस्थापन” (IM-PDS) पोर्टल सुरू करण्यात आले आहे, जे अन्नवितरण पोर्टलच्या संयोजनात रेशन कार्डची आंतर-राज्य पोर्टेबिलिटी सक्षम करण्यासाठी कार्य करते, ज्याच्या अंतर्गत स्थलांतरित कामगार त्याच्या/तिच्या वाट्याचे अन्न खरेदी करू शकतात. त्यांच्या स्थलांतरित गंतव्य स्थानावर सुद्धा, आणि त्याच्या/तिच्या कुटुंबातील उर्वरित सदस्य त्यांच्या FPS (फूड प्रोव्हिजन स्टोअर) मधून अनुदानित धान्य खरेदी करू शकतात. या योजनेमुळे गळती, फसवणूक प्रतिबंधित होते आणि FPS ( राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 ) ची अंमलबजावणी वाढवते). सर्व FPS आणि देशभरात PoS (पॉइंट ऑफ सेल्स) मशीन्स बसवण्यात आल्या आहेत आणि अन्नवितरण पोर्टलला आधारसह सीड करण्यात आले आहे.
सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) म्हणजे काय ?
सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) ही एक भारतीय अन्न सुरक्षा प्रणाली आहे जी भारतीय रेशनकार्ड संबंधित वितरण प्रणाली आहे, भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतातील गरिबांना अनुदानित दरांवर अन्न आणि गैर-खाद्य वस्तूंचे वितरण करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये स्थापन केलेल्या रास्त भाव दुकानांच्या (ज्याला रेशनशॉप म्हणूनही ओळखले जाते) नेटवर्कद्वारे वितरीत केल्या जाणार्या प्रमुख वस्तूंमध्ये मुख्य अन्नधान्य, जसे की गहू , तांदूळ , साखर आणि रॉकेल सारखे अत्यावश्यक इंधन यांचा समावेश होतो. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया , एक सरकारी मालकीची कॉर्पोरेशन, PDS ची खरेदी आणि देखभाल करते. आज, चीनशिवाय जगात सर्वात जास्त धान्याचा साठा भारतात आहे, देशभरातील गरीब लोकांना अन्नधान्याचे वितरण राज्य सरकारद्वारे केले जाते. 2011 पर्यंत संपूर्ण भारतात 505,879 वाजवी किंमत दुकाने (FPS) होती . पीडीएस योजनेंतर्गत, दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक कुटुंब दरमहा 35 किलो तांदूळ किंवा गहू मिळण्यास पात्र आहे, तर दारिद्र्यरेषेवरील कुटुंबाला मासिक आधारावर 15 किलो धान्य मिळण्यास पात्र आहे.
रास्त भाव दुकान (FPS) :- सार्वजनिक वितरण दुकान किंवा प्रणाली, ज्याला रास्तभाव दुकान (FPS) म्हणूनही ओळखले जाते, हे भारत सरकारने स्थापन केलेल्या भारताच्या सार्वजनिक व्यवस्थेचा एक भाग आहे जे गरिबांना अनुदानित किंमतीत अन्नधान्य वितरीत करते. स्थानिक पातळीवर ही रास्तभाव दुकाने आणि सार्वजनिक वितरणाची दुकाने म्हणून ओळखली जातात, आणि मुख्यतः गहू, तांदूळ आणि साखर बाजारभावापेक्षा कमी दराने विकतात, ज्याला इश्यू प्राईस म्हणतात. इतर जीवनावश्यक वस्तूही विकल्या जाऊ शकतात. या प्रणालीचा उपयोग घेण्यासाठी किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी रेशनकार्ड असणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहाय्याने ही दुकाने देशभर चालवली जातात. या दुकानातील वस्तू खूपच स्वस्त असतात पण चांगल्या दर्जाच्या आहेत. रेशन दुकाने आता बहुतांश परिसर, गावे आणि शहरांमध्ये आहेत. भारताकडे 5.5 लाख (0.55 दशलक्ष) पेक्षा जास्त दुकाने, जे जगातील सर्वात मोठे वितरण नेटवर्क बनवतात.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
महाराष्ट्र रेशन कार्ड उपयोगिता
रेशनकार्ड हे राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे कारण या महत्वपूर्ण रेशनकार्डच्या माध्यमातून राज्यातील पात्र नागरिक अन्नधान्याची खरेदी करीत असतात, तसेच शासनाव्दारे या रेशनकार्डच्याच माध्यमातून किफायती दरात नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो, या महाराष्ट्र रेशनकार्ड साठी तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ज्या नागरिकांनी आपले रेशनकार्ड अजूनही बनविले नसेल, ते सर्व नागरिक सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. रेशनकार्ड संबंधित ऑनलाइन अर्ज करतांना फक्त काही बाबींचे लक्ष देणे आवश्यक आहे आपण ज्या प्रकारच्या रेशनकार्डसाठी अर्ज करीत आहोत त्यासाठी आपण पात्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील गरीब नागरिकांना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या साह्याने व रेशनकार्डच्या माध्यमातून स्वस्त दरात अन्नधान्याचे वितरण करेल.
रेशन कार्ड (सार्वजनिक वितरण प्रणाली)
महाराष्ट्र रेशन कार्ड हे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाद्वारे जारी केलेले सरकारी दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज सामान्यतः राज्यात राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना अन्नपदार्थ आणि अन्नाशी संबंधित इतर मूलभूत गरजा पुरवण्यासाठी जारी केला जातो.परंतु सध्याच्या काळात रेशन कार्डची उपयुक्तता खूप वाढली आहे. उदाहरणार्थ, अन्नपदार्थ पुरवण्यासोबतच, भारत सरकारने आणि राज्य सरकारने आता इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता ते गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांसह राज्यातील इतर सर्व नागरिकांना देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या रेशनकार्डधारक कुटुंबाला सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कोणत्या किंमतीला कोणते धान्य दिले जाते. ते तुम्ही खालीलप्रमाणे तक्त्यांमध्ये पाहू शकता
अन्नधान्य | एएवाय | बीपीएल | प्रधान्य कुटुंब |
---|---|---|---|
तांदूळ | 3.00 | —— | 3.00 |
गहू | 2.00 | —— | 2.00 |
भरड धान्य | 1.00 | —— | 1.00 |
साखर | 20.00 | —— | —— |
महाराष्ट्र रेशन कार्ड किती प्रकारचे असते ?
राज्य आणि केंद्र सरकार गरीब आणि गरजू नागरिकांना अत्यंत नाममात्र किंमतीत जीवनावश्यक अन्नधान्य उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे यासाठी लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी स्वतंत्र रेशनकार्ड सुद्धा उपलब्ध करून देल्या गेले आहेत. सरकारने प्रत्येक रेशनकार्डावर मिळणाऱ्या धान्याची रक्कमही ठरवून दिलेली आहे. त्यामुळे लोकांच्या कार्डावरती जितकं धान्य लिहिलं असेल, तितकं रेशन त्यांना दिलं जातं. बऱ्याचदा अपुऱ्या माहितीमुळे लोकांना त्यांच्या रेशनकार्डवर मिळणाऱ्या धान्या विषयी माहिती नसते, त्यामुळे बऱ्याचदा काही दुकानदार लोकांना त्यांच्या वाट्याचं धान्य देत नाहीत, आणि नागरिकांची फसवणूक करतात. त्यामुळे या फसवणूकिला आळा घालण्यासाठी आणि लोकांच्या माहितीसाठी तुम्हाला हे जाणून घेणं आवश्यक आहे की, किती प्रकारचे रेशनकार्ड नागरिकांना उपलब्ध करून दिले जातात आणि त्यांच्या माध्यामतून लाभार्थ्यांना किती अन्नधान्य देण्यात येते.
या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने रेशनकार्ड व्यवस्थेचे खालीलप्रमाणे विभागणी केली आहे, यामध्ये नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने हि विभागणी केली आहे.
एपीएल रेशन कार्ड: या रेशनकार्ड योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेवरील, (APL) रेशनकार्ड दारिद्र्यरेषेच्या वर असलेल्या लोकांना दिले जाते. एपीएल रेशनकार्डवर राज्यातील प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 10 ते 20 किलो अन्नधान्य दिले जाते. रेशनची किंमत राज्य सरकारे ठरवते, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये ती बदलू शकते.
अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड: या रेशनकार्ड योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रति कुटुंब 35 किलो रेशन मिळते, ज्यामध्ये 20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ असतो. लाभार्थींना गहू 2 रुपये किलो दराने आणि तांदूळ 3 रुपये किलो दराने उपलब्ध करून दिल्या जात आहे. हे कार्ड केंद्र सरकारकडून अशा भारतीय नागरिकांना दिले जाते जे अत्यंत गरीब श्रेणीतील आहेत. या कार्डमध्ये इतर कार्डं धारकांपेक्षा जास्त रेशन उपलब्ध आहे.
बीपीएल रेशन कार्ड: या रेशनकार्ड योजनेंतर्गत आणि सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) रेशनकार्ड जारी केले जातात. या रेशनकार्डवर राज्यातील प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 10 ते 20 किलो रेशन दिले जाते. रेशनचे हे प्रमाण राज्यानुसार बदलू शकते. तसेच अन्नधान्याच्या किंमतीही राज्य सरकारांवर अवलंबून असतात. आणि हे अन्नधान्याचे भाव बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने कमी असतात.
अन्नपूर्णा रेशन कार्ड: या रेशनकार्ड योजनेंतर्गत, अन्नपूर्णा रेशनकार्ड अंतर्गत मिळणारे धान्य हे गरीब आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना दिले जाते. या रेशनकार्डवर त्यावर दरमहा 10 किलो रेशन मिळते. राज्य सरकार हे कार्डे त्यांच्या निर्धारित मानकांतर्गत येणाऱ्या वृद्धांना जारी करतात. यामध्ये राज्यानुसार धान्याचे प्रमाण आणि किंमत बदलू शकते.
प्राथमिकता रेशन कार्ड: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत प्राथमिक शिधापत्रिका (PHH) जारी केली जातात. राज्य सरकार लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) अंतर्गत प्राधान्यक्रमित कुटुंबाची ओळख पटवतात. या प्राधान्य शिधापत्रिकेवर दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो रेशन उपलब्ध आहे. यामध्ये तांदूळ 3 रुपये किलो आणि गहू 2 रुपये किलो दराने दिला जातो.
मागील काही वर्षात आलेल्या कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली होती, त्याचा लाभ लोकांना 2022 मध्ये मिळणार आहे. याशिवाय विविध योजनांतर्गत रेशनचे वाटप केले जात आहे. या योजनांच्या माध्यामतून सरकार मोफत अन्नधान्य देत नसली तरी गरजू नागरिकांना बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात अन्नधान्य दिले जाते.
महाराष्ट्र रेशन कार्ड योजनेचे फायदे
भारत सरकारकडून दारिद्र्यरेषेखालील लोकांची ओळख पटवणे हा या कार्डचा उद्देश आहे. आणि ही सुविधा त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहे जसे अन्न, निवास आणि मूलभूत सुविधा जसे की अन्नधान्य इ. साधारणपणे, भारत सरकार दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी काही मूलभूत मानके वापरते, जे खालीलप्रमाणे आहेत.
रेशनकार्ड हे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे दस्तऐवज आहे जे बहुतेक सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ओळखपत्र म्हणून काम करते.
या रेशनकार्डचा, तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल किंवा बँकेत खाते उघडायचे असेल, तर तुम्ही रेशनकार्ड ओळखीचा आणि निवासाचा पुरावा म्हणून वापरू शकता. डीएल बनवण्यासाठी हा वैध पुरावा देखील मानला जातो. रेशनकार्ड असल्यास एलपीजी कनेक्शन मिळणे सोपे होते.
देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून सर्व शिधापत्रिकाधारकांना दरमहा मोफत धान्य दिले जात होते. रेशन कार्डच्या अंतर्गत देशात सुमारे 80 कोटी लोक याचा लाभ घेत होते. रेशनकार्डाचे लाभ एवढ्यापुरतेच मर्यादित नसून, इतरही अनेक कामे या रेशनकार्डामुळे सुलभ आणि सोपी होतात.
रेशनकार्ड हे एक दस्तऐवज आहे ज्याच्या माध्यामातून महाराष्ट्रातील नागरिकांना सवलतीच्या दरात, राष्ट्रीय अन्न व सुरक्षा कायद्या अंतर्गत राज्य सरकारने जरी केलेले रेशन किंवा अन्नधान्य जसे गहू, तांदूळ, साखर, रॉकेल, इत्यादी अनुदानित अन्नधान्य उपलब्ध करून देत आहे. यामुळे राज्यातील गरीब जनता आपला उदरनिर्वाह सन्मानाने चालवीत आहे.
या महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2024 योजनेंतर्गत अर्जदार शासनाच्या अधिकृत वेबसाईट जाऊन जिल्ह्यानुसार, आणि नावा नुसार, नवीन रेशनकार्ड सूची डाऊनलोड करू शकतात. आता सरकारने ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ लागू केले आहे. त्यामुळे या बदलानंतर नागरिक देशात कुठेही कोणत्याही राज्याच्या रेशनकार्डचा लाभ घेऊ शकतात. आणि रेशनकार्ड बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ करण्यात आली आहे, या योजनेच्या अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज घरी बसून करता येतो. तसेच एपीएल आणि बीपीएल रेशनकार्डमुळे राज्यातील पात्र गरीब नागरिकांना अत्यंत कमी दरात अन्नधान्य मिळण्यास मदत होते जेणेकरून त्यांच्यावर आर्थिक बोजा कमी पडतो.
महाराष्ट्र रेशन कार्ड बनविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
देशातील सार्वजनिक वितरणाच्या धोरणानुसार, राज्यतील सरकारे प्रत्येक नागरिकाला रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका उपलब्ध करून देतात. या रेशन कार्डाच्या आधारे जीवनावश्यक वस्तू माफक दरात विकत घेता येतात. दारिद्र्यरेषेखालील, दारिद्र्यरेषेवरील, अंत्योदय योजनेखालील कुटुंबांना वेगवेगळ्या रंगाची रेशन कार्डे उपलब्ध करून दिली जातात. या नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे महत्त्वाची असतात.
ज्या व्यक्तीला रेशन कार्ड काढावयाचे आहे, त्याला खालील कागदपत्रे अर्जासोबत जोडावे लागतात.
- नवीन रेशनकार्डसाठी अर्ज
- अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
- आय प्रमाणपत्र
- घरमालकीचा पुरावा
- वीज बिल
- बँकेचे पासबुक
- टेलिफोन, मोबाईल बिल
- ड्रायव्हिंग लायसेन्स
- आधार कार्ड
- घरमालकाचे संमती पत्र किंवा घरमालकाचे वीज बिल
- घरभाडे करारपत्राची कॉपी
- गॅस कनेक्शन
महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2024 ऑनलाइन तपासण्याची प्रक्रिया
- या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील इच्छुक लाभार्थी ज्यांना महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट मध्ये आपले नाव तपासायचे आहे , त्यांनी खालीलप्रमाणे पद्धतीचा अवलंब करावा.
- सर्वप्रथम, अर्जदाराला अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, वेबसाईटचे मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
- या होम पेजवर तुम्हाला सार्वजनिक वितरण प्रणालीचा पर्याय दिसेल . या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पुढील पेज उघडेल, या पेजवर तुम्हाला रेशन कार्डचा पर्याय दिसेल , त्यावर क्लिक करा.
- यानंतर एक नवीन पेज उघडेल, या पेजवर तुम्हाला जिल्हावार वर्गीकरण आणि रेशनकार्डकाधारकांची संख्या असा पर्याय दिसेल , या पर्यायावर क्लिक करा.
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला रेशनकार्ड यादी मिळेल.
- अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन रेशनकार्ड यादीत तुमचे नाव तपासू शकता.
महाराष्ट्र रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
- राज्यातील ज्या नागरिकांना रेशनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे, त्यांनी खालीलप्रमाणे पायऱ्यांचे अनुसरण करावे
- सर्वप्रथम आपल्याला अन्न आणि पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, आता तुमच्यासमोर वेबसाईटचे मुख्यपृष्ठ उघडेल.
- या होम पेजवर तुम्हाला Download चा पर्याय दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
- आता या पेजवर तुम्हाला Application For New Ration Card या पर्यायावर क्लिक करावे लागेल. पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला रेशन कार्ड अर्जाचा फॉर्म PDF उघडेल.
- तुम्ही हा आज डाउनलोड करू शकता. अर्ज डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील. यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाकडे अर्ज जमा करावा लागेल.
महाराष्ट्र रेशन कार्ड सरकारी ठराव/आदेश पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्राच्या शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला सरकारी ठराव/आदेशांच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला विभाग निवडावा लागेल.
- आता तुम्हाला विचारलेली सर्व माहिती टाकावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला सर्च बटणावर क्लिक करावे लागेल.
- संबंधित माहिती दिसून येईल.
या पोर्अटवर अर्धन्यायीक निर्णयांची माहिती पाहणे
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला अर्ध न्यायिक आदेशांच्या माहितीच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- आता या लिंकवर क्लिक करताच तुमच्या समोर एक यादी उघडेल.
- या यादीतील तुमच्या गरजेनुसार तुम्हाला लिंकवर क्लिक करावे लागेल.
- संबंधित माहिती तुमच्यासमोर दिसून येईल.
पोर्टलवर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी/अन्न वितरण अधिकारी यांची माहिती पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- आता तुम्हाला जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी/अन्न वितरण अधिकारी यांच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- या लिंकवर क्लिक करताच सर्व जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी/अन्न वितरण अधिकारी यांची माहिती तुमच्या समोर उघडेल.
या पोर्टलवर तालुका अन्न पुरवठा अधिकारी यांची माहिती पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- यानंतर तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- आता तुम्हाला तालुका अन्न पुरवठा अधिकारी यांच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- या लिंकवर क्लिक करताच तालुका अन्न पुरवठा अधिकारी यांची माहिती तुमच्या समोर उघडेल.
या पोर्टलवर अधिनियम/नियम पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला अधिनियम/नियम या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- या लिंकवर क्लिक करताच सर्व कायदे आणि नियम तुमच्यासमोर खुले होतील.
- तुमच्या गरजेनुसार तुम्ही Act वर क्लिक करू शकता.
- क्लिक केल्यानंतर, संबंधित माहिती तुमच्यासमोर प्रदर्शित होईल.
जिल्ह्यांप्रमाणे राज्य गोडाऊन तपशील पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्राच्या शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला जिल्हानिहाय राज्य गोडाऊन तपशीलाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, स्थिती, क्रमवारी आणि डेपो प्रकार निवडावा लागेल.
- यानंतर तुम्हाला View Report च्या बटणावर क्लिक करावे लागेल.
- संबंधित माहिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर असेल.
जिल्हानिहाय रास्त भाव दुकान तपशीलवार प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- यानंतर तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- आता तुम्हाला जिल्हानिहाय रास्त भाव दुकान तपशीलाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला राज्य, जिल्हा आणि ब्लॉक निवडावा लागेल.
- आता संबंधित माहिती तुमच्यासमोर दिसून येईल.
रेशन कार्ड तपशील पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला रेशन कार्ड तपशीलांच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुम्हाला Know Your Raation Card च्या लिंकवर क्लिक करावे लागेल
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि Verify बटणावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमचा रेशनकार्ड क्रमांक टाकावा लागेल.
- आता तुम्हाला View Report च्या बटणावर क्लिक करावे लागेल.
- संबंधित माहिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर असेल.
रास्तभाव दुकाननिहाय ऑनलाइन नियतन
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- यानंतर तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- आता तुम्हाला FPS वाईज ऑनलाइन वाटपासाठी लिंकवर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- तुम्हाला या पेजवर विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती टाकावी लागेल.
- आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- संबंधित माहिती तुमच्यसमोर दिसून येईल.
ऑनलाइन नियतन सद्यस्थिती पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- यानंतर तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला ऍलोकेशन जनरेशन स्टेटससाठी लिंकवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- तुम्हाला या पेजवर विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती टाकावी लागेल.
- आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
तालुकानिहाय ऑनलाइन वाटप पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- तालुकानिहाय ऑनलाइन वाटप
- त्यानंतर तुम्हाला तालुकानिहाय ऑनलाइन वाटपाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- तुम्हाला या पेजवर विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती टाकावी लागेल.
- आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- या नंतर संबंधित माहिती दिसेल
स्वयंचलित FPS पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुम्हाला ऑटोमेटेड एफपीएसच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला सर्व महत्वाची माहिती टाकावी लागेल.
- आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- संबंधित माहिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर असेल.
ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीवर क्लिक करावे लागेल .
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- या पेजवर तुम्हाला तक्रार नोंदवा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन फॉर्म उघडेल
- तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- तुमची तक्रार खालीलप्रमाणे नोंदवली जाईल.
तुमच्या तक्रारीची स्थिती तपासण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीवर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- या पृष्ठावर, तुम्हाला तुमच्या तक्रारीची स्थिती तपासा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला कम्प्लेंट नंबर आणि मोबाईल नंबर भरावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती तपासण्यास सक्षम असाल.
महाराष्ट्र रेशन कार्ड यादी 2024 संपर्क
- सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ आपल्या समोर उघडेल.
- या होम पेजवर तुम्हाला contact हा पर्याय दिसेल , तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
- या पेजवर तुम्हाला संपर्क क्रमांक पाहायला मिळेल.
महत्वपूर्ण लिंक्स
योजनेची अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
---|---|
नवीन रेशनकार्डसाठी अर्ज फॉर्म PDF | इथे क्लिक करा |
युनिटमध्ये वाढ करणे (नाव वाढविणे) | इथे क्लिक करा |
युनिटमध्ये कमी करणे (नाव कमी करणे) | इथे क्लिक करा |
रेशनकार्डमध्ये बदल करणे | इथे क्लिक करा |
डूप्लिकेट रेशनकार्डसाठी अर्ज करणे | इथे क्लिक करा |
नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक | 1800-22-4950 व 1967 |
वन नेशन-वन रेशन कार्ड संबंधी हेल्पलाईन नं | नं. 14445 |
ई-मेल | [email protected] |
शिधापत्रिका हे एक सरकारी मान्यताप्राप्त दस्तऐवज आहे जे तुम्हाला अन्न, धान्य, रॉकेल इत्यादी जीवनपयोगी वस्तू अनुदानित दरात खरेदी करण्यात मदत करते. जे लोक आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत नाहीत किंवा दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) गटाशी संबंधित आहेत आणि त्यांना अन्नपदार्थ खरेदी करणे कठीण आहे अशांसाठी रेशन कार्ड अत्यंत उपयुक्त ठरले आहे. त्याशिवाय, शिधापत्रिका ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून देखील कार्य करते आणि अधिवास प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र इत्यादीसाठी अर्ज करण्यासाठी वापरली जाऊ शकते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून अनुदानित अन्नधान्य खरेदी करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना रेशन कार्ड हे भारतातील राज्य सरकारांद्वारे जारी केलेले अधिकृत दस्तऐवज आहेत. ते बर्याच भारतीयांसाठी एक सामान्य ओळख म्हणून देखील काम करते. वाचक मित्रहो आम्ही या पोस्ट मध्ये महाराष्ट्र रेशनकार्ड यादी संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्याला हि पोस्ट उपयुक्त वाटली असल्यास आम्हाला कमेंट्सच्या माध्यामतून जरूर कळवा.
महाराष्ट्र रेशनकार्ड लिस्ट 2024 FAQ
Q. महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2024 काय आहे ?
महाराष्ट्र अन्न विभागाने महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट ऑनलाइन जरी केली आहे, हि सर्व सुविधा महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी करण्यात आली आहे, त्यामुळे आता राज्यातील नागरीक घरबसल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन, तुम्ही रेशनकार्ड यादीतील आपले नाव तपासू शकता. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ज्या नागरिकांनी रेशनकार्डसाठी अर्ज दाखल केला आहे, त्यांना आता कुठेही किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही कारण, कारण सरकारने हि सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली आहे
Q. महाराष्ट्र रेशनकार्ड लिस्ट ऑनलाइन कशी चेक करावी ?
रेशनकार्ड संबंधित संपूर्ण माहिती महाराष्ट्र अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइट mahafood.gov.in वर उपलब्ध आहे. जिल्हानिहाय आणि नावानुसार शिधापत्रिका यादी अद्याप उपलब्ध नाही, परंतु शिधापत्रिका क्रमांकाद्वारे शिधापत्रिकेचा तपशील मिळू शकेल.
Q. महाराष्ट्र रेशनकार्डमध्ये ऑनलाइन नाव कसे जोडायचे ?
- महाराष्ट्र राज्याच्या शिधापत्रिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि येथे जाऊन लॉग इन करावे लागेल.
- जर तुमच्याकडे लॉगिन प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर तुम्हाला प्रथम साइन इन करणे आवश्यक आहे.
- आता तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर कुटुंबातील सदस्यांची नावे जोडण्याचा पर्याय मिळेल
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची अचूक माहिती इथे टाकावी लागेल.
- शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा जोडण्यासाठी, तुम्हाला त्याचा जन्म दाखला, लग्नपत्रिका, रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे म्हणून वापरणे आवश्यक आहे.
- आता कागदपत्रांची यादी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.
- या दस्तऐवजांच्या यादीनुसार तुम्ही तुमची कागदपत्रे अपलोड करू शकता.
- आता अर्ज आणि कागदपत्रे सबमिट केल्यानंतर, तुमच्या डिव्हाइसद्वारे तुमच्या डिव्हाइसच्या स्क्रीनवर एक संदर्भ क्रमांक प्राप्त होईल.
- तुम्ही या संदर्भ क्रमांकाद्वारे तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
- यानंतर, एका महिन्यानंतर, तुम्हाला पोस्टाने तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर नावांसह एक नवीन शिधापत्रिका मिळेल.
Q. महाराष्ट्र रेशनकार्डमध्ये ऑफलाईन नाव कसे जोडायचे ?
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या भागातील रास्तभाव दुकानात जावे लागेल. येथे जाऊन, तुम्हाला नाव जोडण्यासाठी फॉर्म मिळवावा लागेल.
- सर्व आवश्यक माहितीसह फॉर्म काळजीपूर्वक भरा.
- ज्या सदस्याचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करायचे आहे, त्याचे नाव फॉर्ममध्ये स्पष्टपणे भरावे लागेल.
- त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील आणि कुटुंबप्रमुखाच्या माध्यमातून शिधापत्रिकेचा अर्ज रेशनकार्ड कार्यालयात जमा करावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी संबंधित विभागामार्फत केली जाईल आणि तुमच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी केली जाईल.
- सर्व माहिती व कागदपत्रे बरोबर आढळल्यास रेशनकार्ड दिले जाईल.
- शिधापत्रिका जारी करण्यापूर्वी तुम्हाला एक संदर्भ क्रमांक प्रदान केला जाईल.
- या संदर्भ क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या शिधापत्रिकेची स्थिती जाणून घेऊ शकता.